[शतशब्दकथा स्पर्धा] येक रुपाया!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in स्पर्धा
7 Aug 2015 - 4:52 pm

नुस्ता गुंधूळ वर्गात. बाई कायतरी लिहीत व्हत्या, तेवढ्यात शिपाय आला नोटीस घिवून. सगळ्यान्ला वाटल उद्या सुट्टी!

बाईंनी वाचल, "सर्वांना कळविणेत येते की, पंधरा ऑगस्टनिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा आहे. भाग घ्यायचाय त्यांनी वर्गशिक्षकांकडे फी जमा करणे. नोटीस दिनांक १/८/१९९२."

शाळा सुटल्यावर तीन ढांगात घरी! तायला म्हन्लो, "ताये मला येक रुपाया दी, शाळत चित्रकला पर्धा हाय." धुनं वाळू घालीत म्हन्ली, "त्यान्ला न्हाय काम आन तुला नाय धंदा!"

धा रोज तायच्या म्हाग लाग्लो. रडलोबी. एक दिवस शाळला जाताना तायनी रुपाया दिला.

पुना तीनच ढांगा! हाजरी झाल्याझाल्या बाईन्ला म्हन्लो, "बाई, फी!" बाई म्हन्ल्या, "संदीप, मुलांची यादी कालच जिल्हा परिषदेला दिली."

म्हाग फिरल्यावर बस्करपट्टीबी दिसाना!

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

10 Aug 2015 - 12:22 pm | विशाल कुलकर्णी

+१

ब़जरबट्टू's picture

10 Aug 2015 - 12:25 pm | ब़जरबट्टू

+1

खटपट्या's picture

10 Aug 2015 - 4:47 pm | खटपट्या

+१

gogglya's picture

10 Aug 2015 - 5:12 pm | gogglya

+१

किसन शिंदे's picture

11 Aug 2015 - 1:29 am | किसन शिंदे

मस्त कथा!

पिलीयन रायडर's picture

11 Aug 2015 - 3:11 am | पिलीयन रायडर

+१

अन्या दातार's picture

11 Aug 2015 - 4:08 am | अन्या दातार

+१

संदीप डांगे's picture

11 Aug 2015 - 4:47 am | संदीप डांगे

च्यामारी... माझाच डुआयडी आहे का काय? असाच काहीसा अनुभव अस्मादिकांस आहे. वर्षही तेच आणि कथानायकाचे नावही.

दहा दिवस मागे लागून आमच्या बा नं आम्हाला दोन रुपये दिधले. रंगभरा स्पर्धा. चित्रकलेत शाळेत एक नंबर असुन स्पर्धेत आलो नाही. कारण...

असो.

अशा अनेक घटनांचे मनावरचे वळ आणि व्रण आठवलेत..... :-(

चांदणे संदीप's picture

11 Aug 2015 - 10:47 am | चांदणे संदीप

मिपावरच्या माझ्या पहिल्याच प्रयत्नाने अर्धशतकाची मजल गाठल्याने आनंद होत आहे.
मिपावर चांगल्या लेखनाला नाउमेद केले जात नाही उलट बळ दिले जाते हे मिपाकर वरचेवर दाखवून देतात त्याचाच हा दाखला! सर्व मिपाकरांचे धन्यवाद!

@संदीप डांगे : हा हा! डुआयडी वगैरे प्रकार आताआता कळायला लागलेत, मिपावर आल्यापासून. अस काही करण्याची गरजही वाटत नाही! तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद!

चांदणे संदीप's picture

11 Aug 2015 - 10:50 am | चांदणे संदीप

आणि कथानायकाचे म्हणाल तर, सुज्ञांसी अधिक सांगणे नलगे! ;)

संदीप डांगे's picture

12 Aug 2015 - 9:35 pm | संदीप डांगे

माझा प्रतिसाद तुम्हाला कळला नाही याबद्दल क्षमस्व.

एकाच सदस्याने एकापेक्षा जास्त आयडी घेतले तर तो डुआयडी. एका सदस्याचा डुआयडी दुसरा सदस्यनसतो.

माझ्या विधानाचा अर्थ एवढाच होता की हा जणू माझाच अनुभव आहे. फक्त स्पर्धा रंगभरा आहे, माय ऐवजी बापास पैसे मागितले इतकाच फरक.

आपले नाम-साधर्म्य तर आहेच त्यात सुज्ञांस काय अज्ञासही सहज कळण्यासारखे आहे.

बाकी, तुम्ही कुठल्ले बाप्पा?

चांदणे संदीप's picture

12 Aug 2015 - 10:58 pm | चांदणे संदीप

तुम्ही कुठले? अस मला कुणी विचारलं की मला अवघडल्यासारखच होत. याच कारण म्हणजे….

१. जन्म नागपूरचा!
२. बालपण पंजाबातल….(यत्ता दुसरीपर्यंत मराठीच येत नव्हत बोलायला!)
३. गाव सोलापूर जिल्ह्यातलं!
३. कर्मभूमी पुण्यनगरी!
४. स्वतःचे घर घेतल्यामुळे आता पुणेकर!

डूआयडी वैग्रे जौद्या हो. मलाही खूप आनंद झाला खरे तर तुमच्या अनुभवाशी बंध जोडून!

महाराष्ट्रात जन्म मिळाल्यामुळे धन्य झालेला….
Sandy (हे नाव मित्रांनी केलेल आणि मी टिकवलेल!)

संदीप डांगे's picture

12 Aug 2015 - 11:15 pm | संदीप डांगे

हाय्ला.. जबरीच. आता फकस्त उसगावाचं नाव लावायचं राहिलंय काय लिष्टीत...???

;-)

विवेकपटाईत's picture

12 Aug 2015 - 7:39 pm | विवेकपटाईत

+१

जयनीत's picture

15 Aug 2015 - 11:06 pm | जयनीत

+1