मांजर (रेखाटन)

वर्षा's picture
वर्षा in जे न देखे रवी...
16 Nov 2007 - 12:34 am

नमस्कार,

हे मी काढलेलं एका मांजराचं रेखाटन. (मिसळपाववर मी पहिल्यांदाच माझं रेखाटन देतेय... इतके दिवस रीड ओन्ली मोड मध्ये होते :))
वास्तविक पक्ष्या-प्राण्यांचे मऊ केस,पिसं वगैरे तंतोतंत कागदावर उतरवणे मला नीटसं जमत नाही ..कोणी स्केच आर्टिस्ट असतील इथे तर मला जरा सूचना द्या :))

-वर्षा

कलाविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

16 Nov 2007 - 12:40 am | विसोबा खेचर

वा वर्षा!

तू उत्तम पाककृती करतेस हे मला माहीत होतं. परंतु तू एवढी उत्तम चित्रकारही आहेस हे पाहून सुखद धक्का बसला! :)

क्या बात है, रेखाटन मस्तच काढलं आहेस..

मिसळपाववरील तुझ्या प्रथम रेखाटनाचं मनापासून स्वागत..
यापुढे इथे फक्त 'रीड ओन्ली' मोडात न राहता लेखनावरही भर दे, हीच विनंती...

तात्या.

कोलबेर's picture

16 Nov 2007 - 12:40 am | कोलबेर

>> मऊ केस,पिसं वगैरे तंतोतंत कागदावर उतरवणे मला नीटसं जमत नाही ..
पण डोळे मात्र मस्त जमले आहेत! छान!!

आनंदयात्री's picture

16 Nov 2007 - 9:51 am | आनंदयात्री

पण डोळे मात्र मस्त जमले आहेत! छान!!

असेच वाटले. (पण माउ थोडी चकणी वाटते का ??)

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Mar 2008 - 7:57 pm | llपुण्याचे पेशवेll

चित्र एकदम उत्तम. पण मांजर थोडी चिडकी वाटत आहे.
पुण्याचे पेशवे

विजुभाऊ's picture

24 Mar 2008 - 12:31 pm | विजुभाऊ

हो ना! अगदी सदाशिव पेठी चित्पावन च जणु

धनंजय's picture

16 Nov 2007 - 1:03 am | धनंजय

>> मऊ केस,पिसं वगैरे तंतोतंत कागदावर उतरवणे मला नीटसं जमत नाही ..
पण यातच जे तंत्र वापरले आहे तेही आवडले.

आजानुकर्ण's picture

16 Nov 2007 - 7:36 pm | आजानुकर्ण

असेच म्हणतो

सुवर्णमयी's picture

16 Nov 2007 - 1:21 am | सुवर्णमयी

माझी चित्रकला तीन डोंगर, त्यामधे दिसणारा सूर्य आणि उडणारे दोन चार पक्षी या उच्च् पातळीला संपली.
वर्षा , हे चित्र खूप सुरेख झाले आहे. ..
शुभेच्छा

विकास's picture

16 Nov 2007 - 2:22 am | विकास

माझी चित्रकला तीन डोंगर, त्यामधे दिसणारा सूर्य आणि उडणारे दोन चार पक्षी या उच्च् पातळीला संपली.

आमच्या सुर्याला डोळे असतात आणि तो हसरा असतो :-)

इतके छान चित्र पाहून मस्त वाटले!

प्रियाली's picture

16 Nov 2007 - 2:39 am | प्रियाली

चला इथे बरेचजण माझ्यासारखे आहेत.

वर्षा,

चित्र खूप सुरेख आहे. कधीतरी ते कसं काढतेस याबद्दलही लिहि.

नंदन's picture

16 Nov 2007 - 4:08 am | नंदन

म्हणतो. सुरेख रेखाटन.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2007 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रेखाटन छान झालंय यात शंका नाही.

आम्ही चित्रकलेच्या एलीमेंट्री आणि इंटरमेजीयट या चित्रकलेच्या परिक्षा, शाळेत पास झालेलो आहोत. पण, काय शिकलो आठवत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू's picture

16 Nov 2007 - 10:01 am | बेसनलाडू

रेखाटन छान झालंय यात शंका नाही.
--- सहमत आहे. पण आनंदयात्री म्हणतायत त्याप्रमाणे माऊ अगदी किंचित चकणी वाटली, हे खरे. तुमचा एरव्हीचा अनुभव माहीत नाही; पण प्राण्यांची फर या चित्रात तरी छानच जमली आहे, असे मला वाटले.
आम्ही चित्रकलेच्या एलीमेंट्री आणि इंटरमेजीयट या चित्रकलेच्या परिक्षा, शाळेत पास झालेलो आहोत.
--- आम्ही पण! :)
पण, काय शिकलो आठवत नाही.
--- वस्तुचित्र, स्मरणचित्र, निसर्गचित्र (एलिमेन्टरीला सूर्यफूल आणि इन्टरमिजिएटला अस्टर :)), मुक्तहस्तचित्र (फ्रीहॅन्ड), भूमिती, कॅलिग्राफी???
(चित्रकार)बेसनलाडू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2007 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वस्तुचित्र, स्मरणचित्र, निसर्गचित्र (एलिमेन्टरीला सूर्यफूल आणि इन्टरमिजिएटला अस्टर :)), मुक्तहस्तचित्र (फ्रीहॅन्ड), भूमिती, कॅलिग्राफी???

बेला, क्या बात है !!! आठवणी ताज्या केल्या.(आमच्याकडे एलिमेन्टरीला चाफ्याचं आणि इन्टरमिजिएटला कन्हेरीचं फुलं ) असे होते. बाकी सीलॅबस सेम होता. :)))

माऊ अगदी किंचित चकणी (आमच्या गावाकडच्या भाषेत बांगी-तीरळी ) वाटली.
सहमत !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जुना अभिजित's picture

16 Nov 2007 - 10:02 am | जुना अभिजित

चित्राला संशयकल्लोळ नाव शोभून दिसेल. :)

अभिजित

वर्षा's picture

16 Nov 2007 - 10:37 am | वर्षा

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट मीपण दिल्या होत्या. सूर्यफूल, अस्टरचं फूल्..अगदी अगदी. छान आठवण झाली.:))
चकणी दिसतेय का? हं...मला कडेने दिसणारे चेहेरे काढताना नेहेमी तीच भिती वाटत असते :)
हे चारकोल आणि ग्रॅफाईट पेन्सिल वापरुन काढलंय, त्यामुळे आता खोडाखोड शक्य नाही. पुढच्या वेळेस काळजी घेईन.
प्रियाली, धन्यवाद. अगं पण लिहिण्याविषयी म्हणशील तर अजून बराच पल्ला गाठायचाय गं. माझं काही तंत्र किंवा पद्धत नाहीये. पण या बाबतीत जे. डी. हिलबेरी यांना मी फार मानते.
अभिजित, नाव आवडलं. :)

-वर्षा

कोंबडी's picture

16 Nov 2007 - 2:39 pm | कोंबडी

दुसरं एखादं चित्र बघून काढलंय की थेट मांजरच पुढ्यात ठेवून काढलंय?

हिलबेरी बॉसच दिसतोय, पण तरीही थोडेसे कार्टूनिश प्रसंग उच्चप्रकारे कंपोझ करणारा नॉर्मन रॉकवेल आणि द्विमितीत त्रिमित फसवणूक करणारा एम. सी. एशर हे माझे लाडके आहेत.

- कोंबडी.

चित्रा's picture

17 Nov 2007 - 6:44 pm | चित्रा

तुम्ही पाठवलेली ही पण चित्रे छान आहेत. धन्यवाद.

ध्रुव's picture

16 Nov 2007 - 12:26 pm | ध्रुव

फारच सुरेख चित्र.....
डोळे जमलेत :), थोडासा रागीट स्वभाव असलेली मांजर आहे असं वाटत आहे. :)

--
ध्रुव

रम्या's picture

16 Nov 2007 - 2:19 pm | रम्या

फारच सुरेख चित्र.....
डोळे जमलेत :), थोडासा रागीट स्वभाव असलेली मांजर आहे असं वाटत आहे. :)

रागीट चेहरा नसलेलं मांजर किंवा प्रेमळ चेहरा असलेलं मांजर माझ्यातरी पाहण्यात नाही !!!.
मला तरी सगळीच मांजरं धूर्त, लबाड, आतल्या गाठीची असल्यासारखी दिसतात.
बोक्याचं वागणं तर एकदम राजेशाही! कूणाच्या बापाची भिती नसल्यासारखं!
माझ्या घराच्या कौलांवर खूप मांजरं आहेत. अचानक मध्यारात्री कधीतरी त्यांची तारस्वरातली भांडण सुरू होतात. अशावेळी झोपमोड झाल्यामूळे फार राग येतो त्यांचा. पण फक्त तेवढ्या पुरता.

एक दिवस एक बोका आमच्या कौलावर येऊन सकाळच्या उन्हाला येऊन बसला होता. मला भयंकर राग आला त्याचा. आता तुम्ही म्हणाल यात राग येण्यासारखं काय? ते बरोबर आहे हो. पण नवीनच विकत आणलेल्या कुंडीमधील माती उकरून त्या मातीत एखादं जनावर बसल्यावर राग येणार नाही तर काय? मी हळूच एक काठी घेतली आणि एक जोराचा फटका त्याच्या ढुंगणावर ठेवून दिला. मला वाटलं होतं असा मार मिळाल्यावर धूम ठोकेल लेकाचा. परत माझ्या कौलावर येताना दहावेळा विचार करेल. पण कसचं काय आणि कसचं काय ! पठठ्याने एकदा मान वर करून माझ्याकडे पाहीलं आणि परत निवांत झोपी गेला. जसा काय मी त्याला दिसलोच नाही.
आता मात्र माझं डोकं फिरलं. अरे एक दिड दमडीचा बोका एका मनुष्याच्या रागाला आणि माराला भिक घालत नाही म्हणजे काय?
अजुन एक पण किंचीतसा जोरात फटका परत एकदा लागावला. यावेळेला मात्र हा फटका त्याला लागला असावा. तो माझ्याकडे त्रासिक नजरेने पाहून थोडा गुरगुरला, एकदम हळूहळू निवांत पणे उठला, अंगाला आळोखे पिळोखे दिले आणी अगदी राजाच्या थाटात चालत चालत निघून गेला!! माझा राग गेला आणि हसू आलं.

एकदा आमच्या विभागतल्या उघड्यावर चालणार्‍या वाचनालयात वर्तमान पत्र वाचीत होतो. इतक्यात आमचे बंधूराज हातात झाडू घेऊन हळूच एका बोक्याच्या मागून त्याला मारण्यासाठी चोरपावलांनी जाताना दिसले. कुतूहल म्हणून मी ही त्यांच्या मागोमाग गेलो. बंधूराज त्या बोक्याला हाणणार तेवढ्यात बोक्याने धूम ठोकली.
असेल त्या दोघांचं काहीतरी जुन भांडण म्हणून मी परत आलो. बंधूराजही आले. आल्यावर मी काही विचारलं नाही पण माझ्या चेहेर्‍यावरील कुतूहल त्यांनी ओळखलं आणि स्वत:च म्हणाले,
"चांगला हाणणार होतो. पळून गेला."
"पण का?", माझा मूळ प्रश्न.
"शांतपणे पेपर वाचत पायरीवर बसलो होतो, तर तो बोका आला आणि माझ्या पायावर मुतून गेला साला!!!"
मला मांजरासारखं फस्स् करून हसायला आलं.!!

रम्या

प्राजु's picture

16 Nov 2007 - 6:55 pm | प्राजु

अप्रतिम रेखाटन.
वर्षा,
मांजर हा माझा विक पॉईंट आहे. कसंही असलं तरी मला ते आवडतं आणि चित्रातलं मांजर रागीट दिसत नाहिये... ते तर खोडकर.. खट्याळ दिसते आहे...
अशीच अजूनही येऊदेत...
तुझी हरकत नसेल तर मी हे चित्र माझ्या पी.सि. वर सेव्ह करून घेऊ का?

- प्राजु.

विसोबा खेचर's picture

16 Nov 2007 - 7:11 pm | विसोबा खेचर

तुझी हरकत नसेल तर मी हे चित्र माझ्या पी.सि. वर सेव्ह करून घेऊ का?

धत तेरीकी, कर की! कुणाला कळणार आहे? :)

वर्षा's picture

16 Nov 2007 - 11:49 pm | वर्षा

धन्यवाद. प्राजु, कर की सेव्ह, काही हरकत नाही.
रम्या, बोकोबांचे अनुभव वाचून खूप हसू आलं.
कोंबडी, रॉकवेल आणि एशर माहित नव्हते..धन्यवाद. रॉकवेलचं सेल्फ पोर्ट्रेट जबरदस्त आहे!
-वर्षा

प्रमोद देव's picture

17 Nov 2007 - 12:42 pm | प्रमोद देव

अतिशय उत्कृष्ट चित्र!
मी मांजरप्रेमी नाही तरीही चित्र इतके सुरेख काढलंय की दाद द्यावीच लागली.
मांजरप्रेमी लोकांसाठी इथे हवी तितकी मांजरे आहेत. घ्या, मजा करा.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Nov 2007 - 1:15 pm | प्रकाश घाटपांडे

चित्रावरुन तो बोका आहे कि मांजर याचा "बोध" होत नाही. आता डावा डोळा तिरळा वाटण हा त्या बोका/ मांजराचा दोष आहे कि चित्र काराचा हे समजून येत नाही.मी चित्रकार नाही पण विचित्रकार आहे. त्यामुळे आपल्याला ज्यात गती नाही अशा विषयावर "तज्ञ" व्यक्तीचा आव आणून काहीही बकण्याचा अधिकार मला स्वयंघोषित आहे.
मी एक कथा ऐकली होती. एका राजाचा एक डोळा आंधळा असतो. त्याच्या दरबारी एक विख्यात चित्रकार येतो. राजाचे एक भव्यदिव्य पोर्ट्रेट बनवण्याचे फर्मान निघते. आता चित्रकाराची पंचाईत वास्तववादी चित्र काढावे तर राजा एका डोळ्याने आंधळा आहे हे दाखवावे लागणार. मग तो असे भव्य दिव्य चित्र काडतो कि राजा त्याला भव्यदिव्य बिदागी देतो. ते चित्र असते शिकारी राजा धनुष्यबाणाने मृगाचा वेध घेत आहे. अर्थातच वेध घेताना त्याचा आंधळा डोळा मिटलेला येतो. राजा खूष होतो.

निष्कर्ष- १) ती मांजर जर "स्त्री" बोका असेल तर तो तिरळेपणा हे सौंदर्य समजावे.
२) ती मांजर जर "पुरुष" बोका असेल तर तो तिरळेपणा ही मांजरीसाठी नेत्रपल्लवी आहे असे समजावे

(विचित्रकार)
प्रकाश घाटपांडे

विकेड बनी's picture

17 Nov 2007 - 8:36 pm | विकेड बनी

म्हणजे काय?

मार्जार जातीतील मादीला मांजर आणि नराला बोका म्हणतात असा आमचा समज होता.

पण बोका आणि बोकी आणि मांजरी आणि मांजर असं काही असतं हे माहित नव्हतं.

टग्या's picture

17 Nov 2007 - 9:53 pm | टग्या (not verified)

> मार्जार जातीतील मादीला मांजर आणि नराला बोका म्हणतात असा आमचा समज होता.

म्हणजे 'बोका' हे फक्त मार्जारजातीतल्या नरालाच म्हणतात हे बरोबर. परंतु 'मांजर' ही संज्ञा मुळात लिंगनिरपेक्ष (जेंडर-न्यूट्रल) आहे.

मार्जारजातीतल्या मादीला 'भाटी' असे म्हणतात. 'मांजरी' असाही प्रवाद ऐकू येतो. 'ती मांजर' असे क्वचित्प्रसंगी ऐकूही येते, परंतु ही बहुधा नंतरची भर असावी. मुळात 'तो बोका, ती भाटी (मांजरी?), ते मांजर'.

देवदत्त's picture

17 Nov 2007 - 11:15 pm | देवदत्त

बोका आणि भाटी हे बरोबर. पण मांजर हे स्त्रीलिंगीच वापरले जाते जास्त करून.

मुळात 'तो बोका, ती भाटी (मांजरी?), ते मांजर'.
ह्यावरून विनोद आठवला.
एक मुलगा शाळेतून आल्या आल्या आईला म्हणाला, "गुरूजींनी आज मला मारले."
आई: "का रे? तूच काहीतरी केले असशील."
मुलगा: "नाही ग. आज गुरूजी आम्हाला शिकवत होते. त्यांनी लिंग दर्शविताना तो, ती, ते चा वापर करायला सांगितला. मी म्हणालो- तो फळा, ती छडी, ते मास्तर."

देवदत्त's picture

17 Nov 2007 - 11:09 pm | देवदत्त

चित्र छान आहे.
ती मांजर एखादयाकडे रागाने बघत असे दिसतेय. पण तो रागीट चेहरा नाही तर, एखाद्याला आपण त्रास दिला तर त्याची खोड कशी मोडावी ह्या प्रकारचा राग वाटतो. किंवा त्या मांजरीला एखादे उंदीर नाही मिळाला तर बहुधा अशी बघत असेल ;)

ॐकार's picture

25 Nov 2007 - 5:48 pm | ॐकार

:)

ऋषिकेश's picture

26 Nov 2007 - 8:11 pm | ऋषिकेश

ती रुसून रागवल्यासारखी आहे. पण मुख्य म्हणजे मांजराच्या चेहेर्‍यावर दिसणार्‍या अनेक भावांपैकी हा एक भाव मस्त टिपला आहे. (कोणत्याहि भावाचा अभाव असण्यापेक्षा हे फार फार आवडलं)
माउ थोडी चकणी वाटते का ? - हो मलाही :)

वर्षा's picture

26 Nov 2007 - 11:43 pm | वर्षा

धन्यवाद सर्वांना.
मला स्वतःलाही हे मांजर जरा रागीट वाटतं :)
-वर्षा

सृष्टीलावण्या's picture

23 Mar 2008 - 10:05 am | सृष्टीलावण्या

छानच रेखाटन. अजून येऊ देत.

अवांतर: हे रेखाटन पाहून आठवले. शांताबाईंच्या एका पुस्तकात मांजरांवर मस्त लेख आहे. त्यात त्यांनी लिहिलयं...

इंग्लंडमध्ये एकाने तिथल्या मार्जार प्रेमाला वैतागून मेलेल्या मांजराचे हजार उपयोग हे पुस्तक
लिहिले. त्यात मेलेले मांजराचे उताणे चित्र आणि त्याच्या वाळलेल्या पायांना लोकर गुंडाळून आजीबाई स्वेटर विणत आहेत अश्या प्रकारची रेखाटने काढली होती.

त्याला उत्तर म्हणून एका मार्जारप्रेमीने मेलेल्या माणसाचे एक हजार उपयोग असे पुस्तक काढले ज्यात वाळलेल्या प्रेताचा होडीसारखा उपयोग करून एक मांजर नदी ओलांडत आहे अश्या प्रकारची रेखाटने काढली होती.

>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सुधीर कांदळकर's picture

23 Mar 2008 - 9:02 pm | सुधीर कांदळकर

वस्तूवर नजर एकाग्र केल्यास समोर डोळे असलेला कोणताहि प्राणी तिरळाच दिसणार. मला हे मांजर संधीची वाट पाहात टपून बसलेले वाटते. सोंगटी वा नाणे चाकासारखे सोडल्यास पिल्लू मस्त खेळते. तसेच एका दो-याच्या टोकाला छोटे वजन बांधून नाचविल्यास ते मस्त खेळते. त्या वेळी त्याची नजर पाहा. अशीच दिसते.

असो. चित्र सुरेख आहे. स्वतःच्या चित्राचे भोचक परीक्षण जरूर करावे. पण न्यूनगंड नसावा. कोणताहि कलावंत सुरुवातीला अपूर्णच असतो. परिपूर्णता कधीच येत नाही. तिचा आपल्याला असलेला ध्यास आवडला.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

ठणठणपाळ's picture

23 Mar 2008 - 9:54 pm | ठणठणपाळ

प्रयत्न मस्तच आहे.
फक्त चित्र three dimensional वाटत नाही.
(माझी चित्रकला दैदिप्यमान असल्यामुळे खरं तर मला चुका काढायचा अधिकार नाही. तरी क्षमस्व!)

ठणठणपाळ

अनिकेत's picture

24 Mar 2008 - 1:30 am | अनिकेत
राजमुद्रा's picture

24 Mar 2008 - 10:56 am | राजमुद्रा

वर्षा,
खूप चांगला प्रयत्न आहे. मला वाटते हे चित्र, तू चित्र समोर ठेवून काढले असावे. पेन्सिल स्ट्रोक्समध्ये आणखी ताकद हवी. अर्थात ती सवयीने येईलच. एकूण तुझी धडपड पाहून खूप आनंद वाटला. (मला हे सांगण्याचा अधिकार आहे की नाही माहित नाही, कारण मी अजून एकही माझे रेखाटन पाठवले नाही.)

राजमुद्रा :)

सकेत विचारे's picture

24 Mar 2008 - 5:48 pm | सकेत विचारे

हे, चित्र खुप सुन्दर आहे.
अजुन कहि चित्र पोस्त करना.

सन्केत.

वर्षा's picture

25 Mar 2008 - 5:14 am | वर्षा

सर्वांना धन्यवाद.

नाही, हे चित्र प्रत्यक्ष मांजर पुढ्यात ठेवून काढलेलं नाही. (मांजर एवढं कुठलं शांत बसायला!)
फोटोवरुन काढलंय. :)
-वर्षा

वर्षा's picture

25 Mar 2008 - 5:30 am | वर्षा

रेखाटन चुकून इथे प्रतिक्रियांच्यात चढवलं. तात्या, प्लीज हे इथून डिलीट करता येईल का?
मी नव्याने पोस्ट टाकून ते चढवेन.

-वर्षा

प्रभाकर पेठकर's picture

27 Mar 2008 - 2:14 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर चित्र आहे.
हे चित्र एका छायाचित्रावरून काढले आहे त्या मुळे छायाचित्रकाराने एवढ्या जवळ कॅमेरा आणल्यावर जो अविश्वास, नैसर्गिक सावधपणा मांजराच्या चेहर्‍यावर आला आहे त्यामुळेच ते किंचित चिडके (कोणाकोणाला) वाटते आहे. तसेच, ज्या अँगलने कॅमेरा धरला आहे त्या अँगलला मांजराचे दोन्ही डोळे पाहण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे ते 'चकणे' वाटत आहे. जसे लहान मुले बशीने दूध प्यायला शिकतात तेंव्हा बशीतल्या दुधावर 'नजर' रोखल्यामुळे 'चकणमल्हार' दिसतात. असो.