डिस्क्लेमर :
१. फोटोची क्वालिटी बघू नका.
२. संपादकांना नम्र विनंती, की त्यांनी फोटोला योग्य तो आकार-उकार द्यावा.
====================================================================
(शुक्रवारची सकाळ.मुले घरात असल्याने, आज चिकन-बिर्याणीचा बेत होता.बायकोला चिकन आणून दिले, आणि मी मिपा-मिपा खेळत बसलो.इतक्यात फोन वाजला.बायको स्वयंपाकघरात असल्याने, फोन मलाच घ्यावा लागला.)
मी : बोला.
आई : तूच फोनवर आहेस हे बरे झाले.
मी : का गं? काही विशेष काम होते का?
आई : हो ना, परवा तू पाठवलेले सूप फार उत्तम होते.तुझ्या बाबांना तर फार आवडले.
मी : बाबा म्हणाले तसे.आज पण करू का?
आई : नको.मला फक्त सूपची पा.कृ. सांग.
मी : का गं? काही विशेष?
आई : तसे विशेष असे काही नाही.आज मंडळांत सूपची स्पर्धा आहे आणि मला तू केलेले सूप ठेवायचे आहे.
मी : ठीक आहे.तुझ्याकडे १ तास वेळ आहे ना?
आई : हो.आहे ना.
मी : मग ठीक आहे.आता साहित्य घे.
४ टोमॅटो, जितके टोमॅटो त्याच्या तिप्पट मिरे.म्हणजे ४ टोमॅटो असतील तर १२ मिरे.जितके टोमॅटो त्याच्या दुप्पट लवंगा, एक इंच दालचिनी बारीक कुटून, ७-८ लसणीच्या पाकळ्या, एक इंच आले, किसून घे.एक मसाला वेलची आणि एक चक्रीफूल आणि एका मोठ्या नारळाचा खवलेला कीस.हा कीस ताजाच पाहिजे.फ्रीझ मधला घेवू नकोस.
आता साहित्य गोळा केलेस की फोन कर.आणि हो एक राहिलेच थोडी मिरपूड पण घेवून ठेव.साहित्याचा फोटो काढ आणि मला "व्हॉट्स अॅप" वर फोटो पाठव.
इतके बोलून मी फोन ठेवून देतो.थोड्याच वेळात "व्हॉट्स अॅप" वर साहित्याचा फोटो येतो.
अर्ध्या तासातच आईचा परत फोन येतो.
आई : सगळे साहित्य घेतले आणि नारळ पण खवून झाला.आता बोल.
मी : हो मी बघीतला.
आता हे सगळे साहित्य एका मोठ्या पातेल्यात घे.त्यात टोमॅटो अर्धे चिरून घाल आणि टोमॅटोची साले सहज निघतील इतपतच उकड.जास्त उकडू नकोस.हे झाले की मला फोटो पाठव.
फोटो मिळाला की मग मीच तुला फोन करतो.
मी फोन ठेवतो.थोड्याच वेळात मला दुसरे फोटो मिळतात.पहिला फोटो आहे तो टोमॅटो उकडण्यापुर्वीचा आणि नंतरचा फोटो आहे तो टोमॅटो उकडल्या नंतरचा.
फोटो मिळाल्यावर मी आईला फोन करणार, इतक्यात आईने पाठवलेला अजून एक फोटो मिळतो.
फोटो बघून मी आईला, फोन करतो.
मी : टोमॅटो मस्त उकडलेत आणि नारळ पण खवून घेतलास ते उत्तम.आता ह्या टोमॅटो मधल्या पाण्याचा वापर करून नारळाचे दूध काढ आणि मग टोमॅटोचा पण मिक्सर मधून गर काढून घे.मला त्यांचे फोटो पाठव.
आईने थोड्याच वेळांत खालील फोटो पाठ्वले.पहिला फोटो नारळाच्या दुधाचा आणि दुसरा फोटो टोमॅटोच्या गराचा.
फोटो बघीतल्यावर मी लगेच आईला फोन करतो.
मी : फोटो मिळाले.आता एक जाड बूडाची कढई घे.त्यात एक वाटी पाणी घाल.पाणी थोडे उकळायला लागले, की लगेच त्यात थोडे मिरे आणि मिरपूड घाल.आणि त्यात लगेच टोमॅटोचा रस घाल.थोडी उकळी आली आली की, लगेच त्यात नारळाचे दूध घाल.आता त्यात चवी-पुरते मीठ घाल आणि सूप जास्त न उकळता, गॅस बंद कर.
आता मला हे सगळे फोटो पाठव आणि तुझी स्पर्धा संपली की मला सांग.
५-१० मिनिटातच आईने पाठवलेले फोटो मिळाले.
...
.
...
====================================================
आता सांगायला हरकत नाही, आमच्या (म्हणजे मी आणि माझ्या आईने बनवलेल्या) सूपला, पहिले पारितोषिक मिळाले.
वाचने
16841
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली
सोप्प आहे की ! (फक्त नारळाचे
नारळाचे दूध काढणे फारच सोपे आहे.
In reply to सोप्प आहे की ! (फक्त नारळाचे by उगा काहितरीच
.
In reply to नारळाचे दूध काढणे फारच सोपे आहे. by मुक्त विहारि
याला ती टेश्ट नाय गवि
In reply to . by गवि
अरे वा
In reply to नारळाचे दूध काढणे फारच सोपे आहे. by मुक्त विहारि
श्रीफळे खरोखरच मस्त असतात....
In reply to अरे वा by gogglya
मस्त!! आता उद्या टॉमेटोचं सार
कर बिंधास्त....
In reply to मस्त!! आता उद्या टॉमेटोचं सार by सूड
सध्या काय तुझा सौजन्य सप्ताह
In reply to कर बिंधास्त.... by मुक्त विहारि
तेच म्हणतो मी.
In reply to सध्या काय तुझा सौजन्य सप्ताह by सूड
हो, तुपाची फोडणी लिहायची
In reply to कर बिंधास्त.... by मुक्त विहारि
++१११
In reply to हो, तुपाची फोडणी लिहायची by सूड
तुपाची फोडणी लिहायची राह्यली...
In reply to हो, तुपाची फोडणी लिहायची by सूड
तुपाची फोडणी लिहायची राह्यली.
In reply to तुपाची फोडणी लिहायची राह्यली... by मुक्त विहारि
धन्य धन्य ती माउली आणि तिचा
(No subject)
एवढी मिरी चांगली नव्हे. अगदी
पाकॄ चांगली वाटतीये पण
त्याने काय होते ?
In reply to पाकॄ चांगली वाटतीये पण by रामपुरी
भारी आहे मायलेकांचा
मातोश्रींना अभिनंदन कळवा आणि
In reply to भारी आहे मायलेकांचा by डॉ सुहास म्हात्रे
अभिनंदन!
अंडेपुणे घालून करता येईल का? ;-)पुणे घालून करता येईल का?
In reply to अभिनंदन! by एस
भले शाब्बास. एकदम झकास पाकृ.
अरे वा! अभिनंदन! सूप चांगले
पा़कृ सांगण्याचा अनोखा प्रकार आवडला!!
छान.. लिहिण्याची पद्धत खूप
सोलकढी
लै भारी
मस्त लिहिलंय ओ मुवि!
तयार ना.दु. वापरून करुन बघेन.
मस्तं सूप दिसतय....
असेच म्हणतो
In reply to मस्तं सूप दिसतय.... by पद्मावति
मस्तच. ते तिखट पदार्थ कमी
तुमची आई नीट मोबाईल वापरुन,
नाटक लिहिताना असे लिहितात
In reply to तुमची आई नीट मोबाईल वापरुन, by पिलीयन रायडर
क्या बात!
मस्त
तुम्हि ते सुप/सार काहिहि म्हणा हो
खरच खुप मस्त बनेल अस वाटतय