Skip to main content

आई.....

लेखक गणेशा यांनी सोमवार, 18/05/2015 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
नयनांची दोन पिल्ले आसूसले घरटे मायेच्या छप्पराला काळजाची झुंबरे पापण्यांच्या तोरणाला अबोल आसवांची घुंगरे हरवलेल्या ह्रदयतरंगावर सूर ओळखीचे हळवे अमुर्त स्वप्नशिल्पास विचारांची जळमटे जाळीदार मनचक्षूमध्ये श्वासांचे बोजड तडफ़डणे नभपोकळीच्या वाटेवरती मेघकल्लोळाचे रणकंदन मुक्त आत्म्याचे फ़क्त आता नश्वर शरीरात रुदन नश्वर शरीरात रुदन ------ शब्दमेघ
लेखनविषय:

वाचने 2614
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान!

आवडली कविता. मला कवितेतलं एवढ कळत नाही, पण शीर्षक जे आहे ते फक्त मला पहिल्या कडव्यात दिसलं, नंतर शोधलं पन सापडलं नाही.

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

सर्वांचे आभार ... आई नसताना ... मुलाची झालेली अवस्था आहे ह्या कवितेत. त्यामुळे घरात तीचे अस्तित्व .. ती जिकडे गेली त्या नभपोकळीत शुन्य नजरेने पहातानाही कल्लोळ करत असणारे मन..तिच्या अधुर्‍या स्वप्नांसहित श्वास ही जड झालेल्या मुलाचे हे चित्रण...

आता कळाल तुम्हाला काय म्हणायचं कवितेत.

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

+++१११ मले बी फैल्या चारोळींणतर कैच सुदरत न्हवते ना भौ!

भेट मगच बोलतो. थेट्भेट नाखु अति अवांतर कवीता बेष्ट! चांगलीच झोंबली(खपलीवर)