राणीच्या देशात - व्हिटबी अ‍ॅबी - एक विलक्षण अनुभव

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in भटकंती
15 May 2015 - 8:32 pm

मे महिन्याच्या पहिल्या लाँग विकांताला मित्र-परिवारासोबत चार दिवस कॅरावॅन हॉलिडे करुन आले. शेफिल्डपासून अडिच तासाच्या अंतरावर फिली म्हणून कॅरावॅन पार्क आहे तिथे असंख्य स्टॅटिक कॅरावॅन्स, टेंट्स, मोटरहोम्स पार्क करण्याची सुविधा आहे. तर चार दिवसाच्या मुक्कामात जवळपास काय प्रेक्षणीय स्थळे आहेत हे बघायचे ठरवले, जणेकरुन बाहेर फिरणं ही होईल आणि वॅनमध्ये वेळही घालवता येईल. फिलीपासून १०-१५ मिनिटाच्या अंतरावर स्कारबराह बीच आहे त्याचे नॉर्थ बे आणि साऊथ बे असे दोन बीचेस आहेत. तो आमचा आवडता बीच, अनेक वेळा तिथे गेलोय पण नवीन अजून काय बघायचे असे चालले होते. मग फिलीपासून साधारण ३० मिनिटाच्या अंतरावर फ्लॅमबराह नावाची जागा आहे जिथे लाईटहाऊस आणि फ्लॅमबराह हेड बघण्यासारखे आहे. आम्ही तिथे ह्या आधी ही गेलो होतो आणि ह्यावेळेसही जाणार होतोच कारण मैत्रीणीला तिच्या मुलांना लाईटहाऊस टुर करावयाची होती . मग असे ठरले की शुक्रवारी फिली पार्कमध्ये वेळ घालवायचा, शनीवारी व्हिटबी आणि स्कारबराह बीचवर टाईमपास, रविवारी आराम + मस्तं क्रिकेट, उनो खेळायचे, स्वीमींग करायचे आणि सोमवारी फ्लॅमबराह करुन घरी निघायचे.

ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी आंघोळी, ब्रेकफास्ट आटोपून आम्ही व्हिटबीच्या दिशेने निघालो. साधारण ४० मिनिटाचा ड्राईव्ह होता . छान वळण- घाटच्या रस्त्यावरुन आम्ही निघालो. काही मिनिटातचं आम्हाला दुरून व्हिटबी अॅबी दिसू लागले.

.

दहा एक मिनिटात आम्ही अॅबीच्या कार-पार्कपाशी पोहोचलो. खरं तर नंतर लक्षात आले की अम्हाला अॅबीला जाण्यासाठी सुप्रसिद्ध १९९ स्टेप्सपाशी पोहोचायचे होते आणि तिथून मग आम्ही चढाई करून जाणार होतो , पण आमच्या नॅव्हिगेटरने पोस्ट-कोड टेकडी जवळपासचा सिलेक्ट केल्यामुळे आम्ही थेट टेकडीवरचं पोहोचलो. असो, तर गाड्या पार्क करुन आम्ही पुढे निघालो. ईस्ट क्लिफवरुन दिसणारे व्हिटबी शहराचे मोहक दृश्य अगदी सुरेख होते, उजव्या हाताला दिसणरं अॅबी ही खुणावत होतं. काही फोटो काढून आम्ही पुढे निघलो.

टेकडीवरून दिसणारे व्हिटबी.

.

टेकडीवरून दिसणारे व्हिटबी.

.

व्हिटबी अॅबी

.

विटबी हे गाव पुर्वीपासून मासेमारीसाठी ओळखले जाते. अॅस्क नदीच्या काठाशी वसलेलं नॉर्थ यॉर्कशायरमधील एक गाव आहे. तिकडचे मुख्य प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच व्हिटबी अॅबी. सध्या ही अॅबी इंग्लिश हेरीटेजच्या देखरेखीत असल्यामुळे आत जाण्यासाठी तिकिट काढावे लागते. ती काढून आम्ही म्युझियममधून अॅबीकडे निघालो. बाहेर येताच भव्य अॅबीचे दर्शन होते, चहूबाजुंनी हिरवळ आणि मध्यभागी व्हिटबी अॅबी उभं आहे.

.

व्हिटबी अॅबीचा शोध ६५७AD मध्ये नॉर्थथम्ब्रियाचा राजा ऑस्वीने लावला. त्याकाळी विटबीला Streoneshalh ह्या नावाने ओळखले जाई. त्याने (Abbess) साध्वी हिल्डाला ह्या महामठाची संस्थापक म्हणून नेमले होते. साध्वी हिल्डा ही हार्टलीपूल अॅबीची वरिष्ठ होती. व्हिटबी अॅबी हे केल्ट जातीशी संबधीत दुहेरी मठ होते , तेथे अनेक संन्याशी, साध्वींचे वास्तव्य होते. केल्टीक चर्च हे ख्रिस्ती चर्चपासून वेगळे होते, त्यांच्या इईस्टरच्या तारखा ही वेगळ्या असत आणि केशवपनाची पद्धत ही वेगळी असे.

.

.

६६० च्या काळात स्थानिकवासियांना ठरवायचे होते की कुठल्या पद्धतीच्या रुढी, संस्कार पाळायचे म्हणून ६६४ मध्ये अनेक चर्चचे मुख्य अधिकारी व्हिटबीच्या समितीकडे गेले, समितीने त्यावेळी निर्णय दिला की ह्यापुढे नॉर्थथम्ब्रिया मध्ये रोमन रीती पाळल्या जातील.

.

.

६८० मध्ये साध्वी हिल्डाच्या मृत्युनंतर पुढच्या २०० वर्षानंतर म्हणजे ८६७-८७० दरम्यान वायकिंग्स हल्ल्यामुळे अॅबीची नासधूस होऊन ते ओसाड पडले, भकास वाटु लागले . १०६६ साली काही पाद्रींनी ज्यांना Prestebi म्ह्णून ओळखले जाई त्यांनी अॅबीचा अगदी लहान प्रमाणात जीर्णोद्धार केला.

व्हिटबी हे Caedmon ह्या इंगलिश महान कवीचे निवासस्थान होते.

.

माजी सैनिक, रेनफ्रिड जो संन्यासी झाला होता त्याने ह्या अॅबीचे पुनःनिर्माण करायचे ठरवले. १५४० च्या काळात हेनरी दि एट्थ, ज्याचे अॅन बोएलेनशी लग्न झाले होते, तो चर्च ऑफ इंग्लंडचा मुख्य होता आणि त्यानी सगळी मठं बंद केली त्यात व्हिटबी अॅबीही होते. १४-१५ व्या शतकात ह्या चर्चची पुनर्बांधणी केली गेली. एक भव्य दिव्य रस्ता होता त्याला स्वतंत्र आखाती बांधल्या गेल्या. सात चॅपल्स बाधंले गेले, प्रत्येकी एक अल्टार होते. डिसेंबर १९१४ मध्ये अॅबीवर जर्मन युद्धनौकेच्या हल्ल्यमुळे खूप नुकसान झाले.

.

काही थडगी अॅबीच्या आवारात असलेली.

.

व्हिटबी अॅबी अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ती म्हणजे ड्रॅक्युला.
होय, ड्रॅक्युला ह्या पुस्तकाचे लेखक ब्रॅम स्टोकर आयरलँंडवरून इंग्लंड-व्हिटबीला सुट्टीसाठी आले तेव्हा त्यांनी ह्या अॅबीनं प्रभावित होऊन ड्रॅक्युला लिहिलं. अॅबीकडे जाणार्या १९९ पायर्‍या आहेत, पुस्तकात लिहिल्याप्रमाणे जेव्हा ड्रॅक्युलाची बोट किनार्याला येऊन आदळते तेव्हा त्यातून काळा कुत्रा बाहेर येऊन पळत सुटतो आणि थेट १९९ पायर्‍या चढून वर जातो, त्याच ह्या पायर्‍या.

१९९ स्टेप्स - छायाचित्र आंजावरुन साभार

.

व्हिटबी अॅबीला गॉथीक अॅबी म्हणूनही ओळखले जाते आणि व्हिटबीला गॉथ कॅपिटल ऑफ ब्रिटन. जवळपास सेंट मेरी कबरस्थान / स्मशानभूमी आहे जिथे ड्रॅक्युलाने आपल्या पहिल्या व्हिक्टमचा चावा घेऊन रक्त शोषले होते असे म्हणतात.

एकंदरीत हा अनुभव खूपचं उत्कंठापूर्ण होता, अॅबीबद्दल बरीच माहिती मिळाली होती. आमचे १९९ स्टेप्स चढायचे राहून गेले बट देअर इज ऑल्वेज नेक्स्ट टाईम :)

अॅबीतून बाहेर येऊन तिकडची आठवण म्हणून काहीतरी वस्तू घेऊया ठरवले, अनेक ड्रॅक्युलाचे चित्र असलेले मग्ज, स्कार्फ, ब्लड टॉनिक कॉर्डीयल, की चेन्स, पुस्तकं होती. काही वर्षांपूर्वी ड्रॅक्युला पुस्तकचे पीडिएफ वाचले होते मग लगेच सोव्हेनियर म्हणून आणि संग्रहित राहिल म्हणून पुस्तकचं विकत घेतले :)

.

वातावरण ही गार होतं आणि सगळ्यांना भुका ही लागल्या होत्या म्हणून आवारातचं असलेल्या टी-रुम मधे मस्तं व्हेज पनीनी, व्हेज लजानियावर झक्कास ताव मारला :)

व्हेज पनीनी

.

व्हेज लजानिया

.

भरपूर फोटो, एक मस्तं दिवस, छान आठवणी घेऊन अॅबीला टाटा करुन आमची गाडी स्कारबराह बीचच्या दिशेने निघाली. एक अविस्मर्णिय, विलक्षण अनुभव देणारा दिवस गेला होता.

.

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

15 May 2015 - 8:42 pm | श्रीरंग_जोशी

अप्रतिम आहेत फोटोज. स्थापत्य सौंदर्य उत्तमपणे टिपले आहे.

व्हिटबी गावा टूमदार व आखीव रेखीव वाटत आहे. वर्णन अन त्यातले ऐतिहासिक संदर्भ आवडले.

इंग्लंड अंतर्गत ठिकाणांबाबत मराठी आंतरजालावर फारसे वाचायला मिळत नाही अशी खंत होती. ती आज काही प्रमाणात कमी झाली. यासारख्या अधिक प्रवास वर्णनांच्या प्रतिक्षेत.

सूड's picture

15 May 2015 - 8:46 pm | सूड

मस्त ओळख!!

फोटो आणी वर्णन दोन्ही उत्तम. दुसरा फोटो तर लैच्च भारी.

निमिष ध.'s picture

15 May 2015 - 9:18 pm | निमिष ध.

अतिशय सुंदर फोटो आणि प्रवासवर्णन. अगदी जायला आवडेल तिथे. ड्रॅक्युला ही आवडती कादंबरी आहे त्यामुळे नक्कीच जायला हवे :)

मस्त सफर ! छान ओळख करुन दिलीस. फोटोस मध्ये तर तुझा हातखंडा आहेच. ईंग्लंड ला यायचा योग आला की अशा जागा पहायला जास्त आवडतील. यादीमध्ये एक भर घातल्याबद्दल धन्यवाद :)

सुरेख फोटू व अ‍ॅबीची छान ओळख करून दिलीस. घोडे छान दिसतायत.

नीलमोहर's picture

15 May 2015 - 10:23 pm | नीलमोहर

नाविन्यपूर्ण माहिती व ठिकाण..

अत्रुप्त आत्मा's picture

15 May 2015 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा

क्लासिक फोटोज! जवळून बघतोय असं वाटलं.

रुपी's picture

16 May 2015 - 12:27 am | रुपी

फोटो आणि वर्णन दोन्हीही सुंदर!

सुंदर फोटो आणि प्रवासवर्णन..!!!

कॅराव्हॅन चे फोटो आहेत का..?

सानिकास्वप्निल's picture

17 May 2015 - 8:43 pm | सानिकास्वप्निल

कॅराव्हॅन चे फोटो आहेत का..?

होत आहेत ना पण इथे अ‍ॅबीबद्दल लिहिले म्हणून नाही टाकले.

मोदक's picture

18 May 2015 - 9:39 pm | मोदक

मग प्लीज इथे टाका.. प्रतिसादात.

कॅराव्हॅनच्या एकंदर अनुभवाबद्दल लिहिले तर आणखी चांगले.

सानिकास्वप्निल's picture

21 May 2015 - 5:09 pm | सानिकास्वप्निल

स्टॅटिक कॅरावॅन होती रे, त्याबद्दल काय लिहू? म्हणजे ६ स्लिपर्स किंवा ८ स्लिपर्सची असते. आत १ डबल बेडरुम, १ टिव्न रुम आणि लिंव्हिंग रुममध्ये २ पुल-आऊट डबल बेड्स असतात, काही व्हॅनमध्ये दोन बाथरुम्स असतात, बेसिक गोष्टि उपल्ब्ध असलेले किचन आहे (गॅस, फ्रिज, मायक्रोवेव्ह, भांडी, प्लेट्स, टोस्टर वगैरे). आपल्या कॅरावॅन समोर छोटेसे आवार आहे जिथे तुम्ही बार्बेक्यु करु शकता, खेळू शकता. एकंदरीत त्यात राहण्याचा अनुभव खासचं असतो. मोठ्या पार्कमधे सर्वत्र कॅरावॅन्स, मोटरहोम्स (लोकं आप-आपली घेऊन येतात), टेंट्स असतात. जे लोकं टेंट्समध्ये राहतात त्यांच्यासाठी पार्कमध्ये कॉमन बाथरुम / टॉयलेट्सची सुविधा असते. दुर टेकडीवर हे पार्क आणि खाली समुद्र. आवारात लहान मुलांसाठी प्ले ग्राऊंड आहे, सर्वांसाठी स्वीमिंग-पूल असतं, गरजेच्या वस्तू विकत घेण्यासाठी एक सुपर मार्केट आहे, फिश अँड चिप्स, पब असेही आहे. जवळचं पेट्रोलपंप आहे.

रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळे, एखाद रेफ्रेशींग चेंज म्हणून मला ही हॉलिडे फार आवडते :)

काही फोटो देते जे गेल्यावर्षी आणि ह्या वर्षी काढलेले.

कॅरावॅन पार्क

.

कॅरावॅन पार्क

.

डबल बेडरुम

.

ट्विन बेडरुम

.

शॉवर-रुम

.

लिव्हिंग रुम

.

लिव्हिंग रुम

.

किचन

.

.

.

.

श्रीरंग_जोशी's picture

21 May 2015 - 5:33 pm | श्रीरंग_जोशी

कॅरावॅन म्हणजे RV हे या प्रतिसादानंतर कळले. ट्रॅव्हल चॅनेलवर श्रीमंत अन हौशी लोकांच्या RVs चा शो असतो. डोळे दिपतात त्य गाड्या आतून पाहून.

नेहमीप्रमाणे सुंदर चित्रे..

मला असे काहीतरी अपेक्षीत होते. म्हणून मुद्दाम विनंती केली. :)

.

.

.

सानिकास्वप्निल's picture

21 May 2015 - 7:00 pm | सानिकास्वप्निल

ह्याला येथे मोटरहोम्स म्हणतात, लोकं येतात घेऊन.

मोदक's picture

25 May 2015 - 5:31 pm | मोदक

धन्यवाद!

मस्त फोटो ,छान नविन माहिति...

सुरेख फोटो आणि माहिती.जावंसं वाटतंय वाचुन!

खेडूत's picture

16 May 2015 - 5:13 pm | खेडूत

अप्रतिम !
छान माहिती..

शिव कन्या's picture

17 May 2015 - 7:55 am | शिव कन्या

मनोहर.

चित्रगुप्त's picture

17 May 2015 - 10:15 am | चित्रगुप्त

फोटो मस्त, पण अगदी मधोमध ते काॅपीराईट फार रसभंग करते. ( म्हणून मी स्वत: माझ्या फोटो वा चित्रात असे काही टाकत नाही, जाऊ दे, वापरू दे कुणाला वापरायचे तर ... पण फोटो बघताना रसभंग नसावा, असे आपले माझे मत).

सविता००१'s picture

17 May 2015 - 12:39 pm | सविता००१

सुंदर फोटो आणि प्रवासवर्णन..!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

17 May 2015 - 4:05 pm | बिपिन कार्यकर्ते

किती सुंदर!

अंतर्गत भागातील प्रवासवर्णन आवडले. ड्राकुलाचे पुस्तक अनेक वर्षांपुर्वी वाचले होते.

स्पंदना's picture

18 May 2015 - 2:45 pm | स्पंदना

काय हो!
तुम्हाला ड्रॅकुला दिसला का? अस उगाचच विचारावसं वाटत्य.

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 May 2015 - 2:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

आणि प्रवासवर्णनसुद्धा...स्कारबराह बीचबद्दल पुढ्च्या भागात का?

पॉइंट ब्लँक's picture

18 May 2015 - 5:15 pm | पॉइंट ब्लँक

मस्त माहिती दिली आहे. फोटो एकदम झक्कास आले आहेत :)

गणेशा's picture

18 May 2015 - 6:17 pm | गणेशा

चांगली भटकंती.. आवडली.
फोटो वरील नाव फोटोची मजा घालवत आहे..

प्रीत-मोहर's picture

19 May 2015 - 8:55 am | प्रीत-मोहर

मस्त लिहिलय्स साने :)
फोटोबद्दल क्याकेहेने!!

स्वप्निल रेडकर's picture

21 May 2015 - 1:44 pm | स्वप्निल रेडकर

छान लेख सानीका,कुछ कुछ होता है च टाइटल सॉंग इथे शूट झालहोत अस वाटतय:)

सानिकास्वप्निल's picture

21 May 2015 - 3:56 pm | सानिकास्वप्निल

धन्यवाद :)

कुछ कुछ होता है च टाइटल सॉंग इथे शूट झालहोत अस वाटतय:)

नाही त्याचे शुटिंग Inchmahome - स्कॉटलंडला झाले होते.

स्वप्निल रेडकर's picture

25 May 2015 - 4:40 pm | स्वप्निल रेडकर

ओह!माहितिबद्दल आभार!