✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

द्वारकाधीश

आ — आनंदमयी, Wed, 04/22/2015 - 17:13
मन श्रावण ओला, मन यमुनेचा तीर मन स्वैर पाखरू घुमणारे भिरभीर मन लहर जळाची उसळे व्यर्थ दहादा मन वृन्दावानिची अबोल वेडी राधा मन मागे पडले खिन्न आर्त गोकूळ मन माय एकटी अधिर, विरह-व्याकूळ मन क्षीर शुभ्र, मन फुटलेला घट ओला मन मोरपंख केसात जुना रुजलेला मन वेडा कान्हा, मन ओला घननीळ मन सांज केशरी, मन वेळूची शीळ मन अथांग सागर, मन तुटलेले पाश मन निर्मोही, निश्चयी द्वारकाधीश... अदिती जोशी

प्रतिक्रिया द्या
3885 वाचन

💬 प्रतिसाद (8)

@मन निर्मोही, निश्चयी

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/22/2015 - 17:36 नवीन
@मन निर्मोही, निश्चयी द्वारकाधीश...>> हेच अवघड... बाकि सर्व सोपं.
  • Log in or register to post comments

:)

कवितानागेश
Wed, 04/22/2015 - 18:50 नवीन
:)
  • Log in or register to post comments

ये बात! छान आहे.

आदूबाळ
Wed, 04/22/2015 - 18:58 नवीन
ये बात! छान आहे. आत्मूजींशी सहमत. निर्मोही + निश्चयी होणं कठीण आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर!!!!

प्राची अश्विनी
Wed, 04/22/2015 - 21:59 नवीन
सुंदर!!!!
  • Log in or register to post comments

द्वारकाधीशाचा विषय निघाला आहे

सन्जय गन्धे
Wed, 06/10/2015 - 13:36 नवीन
द्वारकाधीशाचा विषय निघाला आहे तर दोन कविता /गाणी शेअर केल्याशिवाय राहावत नाही. एक म्हणजे "सांज ये गोकुळि". यातील शेवटच्या कडव्यातील श्रीकृष्णाचा ओझरता उल्लेख. "माउली सांज अंधार पान्हा विश्व सारे जणू होय कान्हा मंद वार्‍यावरी वाहते बांसरी अमृताच्या जणू ओंजळी" आणि दुसरे तसे आत्ताचे, 'मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो' मधील मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार लपतो न परि चेहरा आत भेसूर ! तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही त्या श्यामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !!
  • Log in or register to post comments

बरच मनन झालयं.

द-बाहुबली
Wed, 06/10/2015 - 13:43 नवीन
बरच मनन झालयं.
  • Log in or register to post comments

कविता आवडली, पण वर गुर्जी

सूड
Wed, 06/10/2015 - 17:22 नवीन
कविता आवडली, पण वर गुर्जी म्हणतायेत त्याच्याशीही सहमत!!
  • Log in or register to post comments

वाह, सुरेख !

चौथा कोनाडा
Sat, 01/18/2020 - 13:17 नवीन
मन अथांग सागर, मन तुटलेले पाश मन निर्मोही, निश्चयी द्वारकाधीश... वाह, सुरेख !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा