माझी काझिरन्गा सफर - भाग २

खंडेराव's picture
खंडेराव in भटकंती
26 Mar 2015 - 1:42 pm

नमस्कार.

मागचा भाग :

माझी काझिरन्गा सफर

मागिल भाग थोडा जास्तच त्रोटक झाला. या भागाचा उद्देश ही सहल कशी करावी याची माहिती देणे आहे.

काझिरंगाला पोहोचायचे तर सुरुवात गुवाहाटीपासुन करुयात. गुवाहाटी हे आसामचे सर्वात मोठे शहर. प्रशासकिय राजधानी दिसपुर ही गुवाहाटीचाच एक भाग आहे. मला गुवाहाटी कोणत्याही शहरासारखे वाटले. भरपुर गर्दी आणि महागड्या रिक्शा.
ब्रम्हपुत्रेचे बरेच घाट शहरात आहेत. फॅन्सी बाजार/ पलटन बाजार भागात बरीच होटेल्स आहेत. तिथे रहाता येउ शकते. जर गुवाहाटीत एक/अर्धा दिवस मिळाला तर उमानंदा मंदीर ( हे ब्रम्हपुत्रेत एका बेटावर आहे. कचेरी घाटावरुन फेरी जातात. ५०० रुपयात पुर्ण होडी नेता येते.) आणि कामाख्या मंदीर बघता येइल.

सामिष आहाराची आवड असल्यास मुघल गार्डनला जेवा ( मुसाफिर खाना बहुधा ). एक आसामी मित्र तिथे घेउन गेला. जेवन अगदी छान.

गुवाहाटीवरुन काझिरंगा ( कोहरा मेन गेट ) अंतर २०० किमी आहे. शासकीय बसेस कमी आहेत, पण इतर गाड्या भरपुर. ४ तासात पोहोचु शकाल. रहाण्याचे बुकिंग आधी केले तर चांगले. मला तिथली शासकिय विश्रामघरे आवडली. तिथे ३-४ आहेत. बोनानी, बोनाश्री, अरण्य अशी. ६०० ते २००० पर्यंत दर आहेत. घरंदाज जुन्या इमारती, स्वछ आणि हवेशीर, मोठ्या खोल्या. टिवी नाहियेत, पण ती अपेक्शाही असु नये काझिरंगात. जेवनही चांगले. ८० रुपयात वेज तर २०० मधे चिकन ( एक वाटी चिकन सोडले तर काही फरक नाही :-) ) जर ही विश्रामघरे मिळाली नाहित, तर आतमधे अजुनही काही आहेत, सोसायटीज आणि इतरांची, तिथे रहा. रस्त्याच्या कडेची टाळा. हा हायवे असल्यामुळे रात्रभर आवाज. बरेच रिसॉर्टही आहेत आसपास, पण ते जरा महागडे. सगळीकडे भाव केला जातो.

काझिरंगाला येण्याचे कारण म्हणजे जंगल सफारी. माझा आधीचा कॉर्बेट्ट अनुभव फारसा चांगला नव्हता. दलालांचा सुळसुळाट, २ लोकांनाही पुर्ण गाडी करावी लागणे, आणि एकुणच खर्चिक. काझिरंगाने खुश केले. अगदी चांगले व्यवस्थापन.

इथे दोन प्रकारच्या सफारी होतात. हत्तीवरुन आणि जीप सफारी. दोन्ही कराव्यात. ( जंगलाचे ३-४ भाग आहेत. २ कोहोरापासुन अगदी जवळ, सफारी वेगवेगळ्या भागात कराव्यात )

हत्ती सफारी - सकाळी ५.३० ते ८.३० पर्यत ३ वेळा, १/१ तासाच्या. आदल्या रात्री ति़किट मिळते. आपला होटेल/ विश्रामघर चालक ५०-१०० रुपये जास्त घेऊन व्यवस्था करतो. ६.३० ची सफारी चांगली, कारण धुके कमी झालेले असते. सफारी ति़किट ६०० प्रति व्यक्ति तर गाडी ( रहाण्याचे ठिकाण ते सफारीची जागा व परत ) ५०० रुपये. एकदम मस्त अनुभव. हत्ती अगदी शांत असतात, गेंडे, त्यांचे बछडे ५-१० फूटावरुन दिसतात. भरपुर हरणे, डुक्कर दिसली. तिथे ५००+ पक्षी प्रजाती आहेत, त्यातल्या बर्याच दिसल्या. १-१.२५ तासात परत.

एकटा असल्यामुळे एक ग्रुप शोधला. त्यांच्याबरोबर सकाळी जीप सफारी केली. ( ४ लोकात २४०० :-) खुष होऊन दुपारीही एक करायचे ठरवले. ) जीप सफारीची मजा वेगळी.खुप मोठा भाग फिरुन होतो. भरपुर गेंडे, रानम्हशी, ३ जातीची हरणे, घोरपड ? असे अने़क प्राणी दिसले. पळस फुलल्यामुळे जंगल पेटले होते. हत्ती घास जाळायचे वार्शिक काम ही सुरु होते,
नशीब चांगले होते, एका गेंडा मा-बेट्याजवळ १० मिन. गाडी बंद पडली :-). १२ वाजता परत आलो.

मायहांग नावाच्या आसामी हाटेलात मस्त जेवण केले, आणि खोलीवर परतलो.

पुन्हा, १ वाजता जीपसफारी बुकिंग ऑफिसला पोहोचलो. त्यांनी वाट पहायचा सल्ला दिला. १.४५ ला बस भरुन प्रार्थमिक शिक्शक आले, कार्बी अन्गलोन्ग मधुन. त्यांच्यापैकी एका ग्रुपला चिटकलो. मस्त लोक होते. अगदी खट्याळ. एक काका तर गेंडा बघुन जीपवरुन उडी मारायला लागले ( घाबरुन नाही, त्याला हात लावायला :-) ) सारथी साहेबांनी मस्त पैकी आसामीत शिव्या घात्ल्या तेव्हा शांत झाले. या फेरीत एक भला मोठा गजराज, दातांसहीत, दिसला, आणि भरपुर पक्षी. गेंडे तर खुप.

भरपुर थकलो होतो. ९ वाजताच झोपलो. सकाळी ६ वाजता परतीचा रस्ता पकडला. रमत गमत पायी पायी अरन्याच्या मुख्य दाराकडे निघालो, आणि या प्रवासातली सगळयात रोमांचक अनुभव मिळाला.

मधे एक चहाचा मळा आहे, त्यात उंच झाडे. काहीतरी भला मोठा पक्षी दिसला. बिनधास्त आत शिरलो. झाडाच्या टोकावर ग्रेट भारतिय हॉर्नबिल ची जोडी. काय जबरदस्त दिसतात. डोळ्यांचे पारने फिटले. ४ फुटाहुन मोठे. कॅमेरा काढायचेही भान उरले नाही. त्यांना माझी चाहुल लागली आणि दोघेही उडाले. खोटे वाटेल, पण ते १००-१५० फुट जाइपर्यंत पंखांचा आवाज येत होता.

Hornbill from Internet

त्या धुंदीमधेच परतीचा प्रवास सुरु केला.

काही फोटो :

tusker

.

hornbill

.

genda

.

mhais

.

what

.

g1

.

variety

.

bihu

प्रतिक्रिया

रुस्तम's picture

26 Mar 2015 - 2:08 pm | रुस्तम

:( फोटू दिसत नाहीत :(

खंडेराव's picture

26 Mar 2015 - 2:09 pm | खंडेराव

फोटो दिसत नाहियेत.imgu वरुन टाकले होते :-(

श्रीरंग_जोशी's picture

21 May 2015 - 10:56 pm | श्रीरंग_जोशी

एक चाचणी केली आहे का? ज्या साइटवर अपलोड केले आहे तिथून लॉगआउट करा अन वरील फोटोंचे इमेज युआरएल वापरून ब्राउझरमध्ये उघडून पहा. स्वतःलाही दिसत नसल्यास फोटोज पब्लिकली शेअर करणे अजून बाकी आहे हे निश्चित होईल.

वर्णन आवडले पण फोटोजशिवाय अशा लेखनाचा आस्वाद घेणे अवघड आहे.

खंडेराव's picture

22 May 2015 - 1:05 pm | खंडेराव

तुमच्या ( या आणि आधी दिलेल्या ) सल्ल्यांमुळे फोटो टाकणे जमायला लागलय आता

1
2
3
4
6
७
8
10

नीलमोहर's picture

22 May 2015 - 3:58 pm | नीलमोहर

एकापेक्षा एक खतरनाक फोटोज आले आहेत..

खंडेराव's picture

22 May 2015 - 5:33 pm | खंडेराव

काझीरंगा मस्तच आहे, प्राणी दिसण्याची १००% खात्री!

श्रीरंग_जोशी's picture

22 May 2015 - 5:58 pm | श्रीरंग_जोशी

फोटोज आवडले. या लेखमालिकेसाठी मनःपूर्वक धन्यवाद.

फोटो दिसले नाहीत, पण मस्त माहिती दिली आहे.

पैसा's picture

21 May 2015 - 11:01 pm | पैसा

हे वाचायचं राहिलंच होतं! छान लिहिलंत. मात्र फोटोंचं काय ते बघा. लिंक चुकल्यात.

रवीराज's picture

22 May 2015 - 2:29 pm | रवीराज

स्वारी जेजुरी गडावर आली काय,
(क्रमशः हवे होते म्हणुन विचारतोय)

खंडेराव's picture

22 May 2015 - 5:34 pm | खंडेराव

संपले आता :-) राहत्या घरी परत आलो!

पिलीयन रायडर's picture

22 May 2015 - 5:44 pm | पिलीयन रायडर

प्रवासवर्णन आवडले.. काझीरंगा तर पहायचे आहेच.. त्यामुळे लेख वाखु म्हणुन साठवत आहे.

काझिरंगा पाहाण्याच्या लिस्टीत बरेच दिवसापासुन आहे.छान माहिती मिळाली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 May 2015 - 11:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त ! फोटो जबराट आहेत. काझीरंगा बघण्याच्या यादीत आहेच !