भाषांतराचे हक्क !

चिनार's picture
चिनार in काथ्याकूट
10 Mar 2015 - 11:52 am
गाभा: 

The Nuclear Jihadist नावाची एक कादंबरी वाचनात आली होती. पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाचे जनक डॉक्टर अब्दुल कादीर खान यांच्या आयुष्यावर आणि कार्यावर ही कादंबरी आहे. कादंबरीत सांगितलेल्या काही गोष्टी खरोखर धक्कादायक आहेत.

मला कादंबरी आवडल्यामुळे त्याचे भाषांतर करण्याचा विचार सहज डोक्यात आला. मी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कामाला सुरवात केली. काही दिवसांनी मी पुण्यातल्या मेहता प्रकाशन संस्थे कडे गेलो आणि माझे भाषांतराचे काम त्यांना दाखवले. पण या पुस्तकाचे भाषांतर आधीच झाले असून ते पुढील २-३ महिन्यात विक्रीसाठी येईल असे त्यांनी सांगितले. भाषांतराचे हक्क मेहता प्रकाशन सन्स्थेनॆच घेतलेले आहेत. आणि भाषांतरीत पुस्तक सध्या विक्री साठी बाजारात आलेले आहे .

माझ्याजवळ हक्क नसल्यामुळे मी माझे भाषांतर कोठेही प्रकाशित केले नाही. फक्त माझ्या कुटुंबियांनी ते वाचले आहे. मी ते भाषांतर मिपावर किंवा माझ्या ब्लोग वर प्रकाशित करू शकतो का ?

प्रतिक्रिया

सुनील's picture

10 Mar 2015 - 12:08 pm | सुनील

माझ्या आठवणीनुसार सदर भाषांतर मिपाकर काळे यांनी केले आहे. इथे ते प्रसिद्धदेखिल झाले होते.

आता, तुमचे करायचे की नाही हा निर्णय संमं घेईलच.

श्री काळे यांचे पूर्ण नाव आणि ती लिंक मिळू शकेल का ?

श्रीरंग_जोशी's picture

10 Mar 2015 - 11:27 pm | श्रीरंग_जोशी

चिनार यांनी Nuclear Jihadist या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. सुधीर काळे यांनी Nuclear Deception: The Dangerous Relationship Between the United States and Pakistan या पुस्तकाचे भाषांतर केले होते.

मेहता पब्लिकेशन्स बहुतांश प्रसिद्ध पुस्तकांचे अनुवाद हक्क विकत घेऊन ठेवतात असे दिसते. मागे जॉर्ज बुश यांच्या पुस्तकाबाबत दोन फुल एक हाफ मध्येही याबाबत मेहतांना चिमटा काढला गेला होता.

बाकी चर्चा रोचक आहे.

सुनील's picture

11 Mar 2015 - 8:27 am | सुनील

धन्यवाद!

या निमित्ताने अनेक दिवस घोळत असलेला प्रश्न.
असा एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करायचा असेल, तर त्याची पद्धत काय आहे? आधी अनुवाद, मग प्रकाशनाची परवानगी? की उलट? की आणखी काही?
कोणी जाणकार मार्गदर्शन करू शकतील का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2015 - 12:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनुवाद करून सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करायचा असेल तर त्या पुस्तकाचे अधिकार बाळगणार्‍या व्यक्ती अथवा संस्थेकडून तशी लेखी परवानगी घेतल्यास सर्व श्रम केल्यानंतर नकार मिळण्याचा धोका टाळता येईल. कारण, कोणत्याही कारणाने (दुसर्‍याने ते हक्क अगोदरच घेतले आहेत, इ) नकार मिळाल्यास सगळे श्रम फुकट जातील.

काही वेळेस प्रथम अनुवाद तपासून मगच प्रकाशित करण्याची परवानगी मिळेल अश्या अटीवरही अनुवादाची परवानगी मिळू शकते... विशेषतः अनुवादक/लेखक नवखा असल्यास.

विशाखा पाटील's picture

10 Mar 2015 - 1:06 pm | विशाखा पाटील

अनुवाद करण्याअगोदर प्रकाशकाची परवानगी घ्यावी. पण अनुवादाचे हक्क विकत घेऊन ते अनुवादित पुस्तक प्रसिध्द करणे, विक्रीला ठेवणे हे एका व्यक्तीचेही काम नाही. त्यापेक्षा अनुवादाचा प्रस्ताव मराठीतल्या प्रकाशनसंस्थेकडे न्यावा. त्यांना तुमचा प्रस्ताव मान्य असेल तर ते मूळ प्रकाशकांशी संपर्क साधून हक्क मिळवतात.

बऱ्याचदा चांगल्या पुस्तकांचे हक्क आधीच प्रकाशनसंस्थेने घेतलेले असतात, जे चिनार यांच्याबाबतीत झालेले दिसतेय.

इनिगोय's picture

10 Mar 2015 - 1:12 pm | इनिगोय

असे हक्क विकत घेताना संस्थेकडे अनुवादक दरवेळी हाताशी असतोच? की हक्क घेऊन मग सुयोग्य व्यक्ती शोधून काम सोपवलं जातं? मराठीतल्या प्रकाशनसंस्थांचं काम कसं चालतं?

मेहता प्रकाशन सारख्या मोठ्या संस्थांकडे व्यावसायिक भाषांतरकार असतात . गरज पडल्यास ते नवीन भाषांतरकार शोधतात.
अन्य भाषेतील bestseller पुस्तकं निवडून त्याचे हक्क विकत घेतात आणि त्याचे भाषांतर करतात . काही वेळेला एका पुस्तकाचं भाषांतर करायला ३-४ जणांची चमू असते .

काळा पहाड's picture

10 Mar 2015 - 12:55 pm | काळा पहाड

हा अनुवाद नावाचा प्रकार अतिशय व्यापारी पद्धतीने आणि गचाळपणे लिहिला जातो हे नमूद करू इछ्छितो. मला आवडलेले चांगले अनुवादक लेखक दोनच आहेत. विजय देवधर आणि रविंद्र गुर्जर. अनुवाद हा अतिशय अवघड प्रकार आहे आणि सध्या ज्या प्रकारे अनुवाद 'पाडले' जातात ते पहाता मी मूळ इंग्रजी कादंबरी वाचायला प्राधान्य देतो. कित्येक इंग्रजी वाक्प्रचारांचं किंवा बोली भाषेत विशिष्ट प्रकारे वापरल्या जाणार्‍या शब्दांचं सरळ सरळ भाषांतर केलं जातं. 'hey doug' या शब्दाचं सरळ सरळ 'कुत्र्या' असं भाषांतर केलं जातं. याचं कारण असं असावं की हे भाषांतरकार अमेरिकेत/ब्रिटन मध्ये राहिलेले नसतात किंवा त्यांच्यात असं भाषांतर करायची क्षमता/मानसिकता किंवा संशोधन करायची इच्छा नसते. कदाचित शिक्षकी पेशा प्रमाणे याही क्षेत्रात resource quality चा प्रॉब्लेम असावा.

भाषांतरांच्या दर्जाबाबत सहमत, अनेकदा अशा तर्हेच्या कामामुळे विषय चांगला असूनही पुस्तक पसंत पडत नाही. जसं 'दृष्ट काढ गं पोराची..' 'ऊन ऊन पाण्याने शेक जरा.' अशा वाक्यांचं तंतोतंत भाषांतर करणं शक्य नाही, तसंच आहे हे. तिथे भावांतर करता आलं तरच आशय पोचवता येतो.

बोका-ए-आझम's picture

10 Mar 2015 - 1:53 pm | बोका-ए-आझम

जर्मन लेखक गुंथर सोन्थायमर यांनी व्यंकटेश माडगूळकरांच्या ' बनगरवाडी ' चा इंग्लिश अाणि जर्मन अनुवाद केलेला आहे. इंग्लिश अनुवाद स्वतः माडगूळकरांना अावडला होता. तप लंडन विद्यापीठाच्या स्कूल आॅफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज मध्ये अभ्यासग्रंथ म्हणून शिकवलाही जात असे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 1:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. पॅपिलॉन, गॉडफादर वगैरे वाचताना हे अगदी जागोजागी जाणवतं.

बोका-ए-आझम's picture

10 Mar 2015 - 1:49 pm | बोका-ए-आझम

मार्जोरी राॅलिंग्ज या लेखिकेच्या ' Yearling ' चा कै. राम पटवर्धनांनी केलेला अनुवाद अप्रतिम होता. त्याचप्रमाणे भा.रा.भागवतांनी केलेले ज्यूल्स व्हर्नच्या विज्ञानकथांचे अनुवाद आणि निरंजन घाट्यांनी केलेले आर्थर सी. क्लार्क आणि आयझॅक अॅसिमाॅव्ह यांच्या विज्ञानकथांचे अनुवाद दर्जेदारही होते आणि सामान्य वाचकाला समजतील अशा भाषेतही होते. रवींद्र गुर्जर आणि विजय देवधर यांचे अनुवाद रोचक असतात यात शंका नाहीच आहे पण त्यांच्यानंतर मराठी अनुवादक्षेत्र नाहीच असं मानणं चुकीचं आहे. मधुकर तोरडमलांनी आगाथा ख्रिस्तीच्या समग्र कादंब-यांचा अप्रतिम अनुवाद केलेला आहे. अपर्णा वेलणकर, लीना सोहोनी यांनीही चांगले अनुवाद केलेले आहेत. माहिती नसताना लगेचच पायताण काढून हाणणे हे चुकीचेच आहे.

पायताण हाणायचा प्रकार नाहीये. पण एखादं नवं पुस्तक उत्साहाने हाती घ्यावं आणि जेवताना खडे लागावेत त्याप्रमाणे हे शब्द वाचताना लागावेत यासारखं उत्साहावर पाणी टाकणारं दुसरं काही नाही. बाकी आपल्याला सगळेच लेखक माहीत नसतात किंवा त्यांचं लेखन वेगळ्या प्रकारचं असतं. त्यामुळे कुणी कितीही चांगलं लिहिलं तरी आपण ते वाचतोच असं नाही. भारा भागवत आणि निरंजन घाटे/लक्ष्मण लोंढे यांनी चांगलं लिहिलंच आहे पण ते मुख्यतः मूळ लेखन आहे अनुवाद नव्हे किंवा ते लेखक जुन्या जमान्यातले आहेत. तसं पहाता पुलंनीही चांगला अनुवाद केलायच ना? मी मुख्यतः बोलतोय ते सध्या व्यापारी पद्धतीनं जे फास्ट फूड प्रमाणे अनुवाद केले जातायत त्याबद्दल.

बोका-ए-आझम's picture

12 Mar 2015 - 8:34 am | बोका-ए-आझम

हे बरोबर. पुष्कळ वेळा लोक अनुवाद म्हणजे शब्दश: अनुवाद करतात आणि मग अनेक हास्यास्पद चुका होतात. पी.जी.वुडहाऊसच्या ' जीव्हज ' चा सखाराम असा आणि बटलर ला हरकाम्या असा शब्द वापरलेले अनुवाद मीही वाचलेले आहेत. पण अनुवाद ही एक कला आहे आणि ती प्रत्येकाला जमते असं नाही. चांगल्या अनुवादकांच्या यादीत दोन नावं अजून आठवली - सुनीती देशपांडे आणि उमा कुलकर्णी.

सिरुसेरि's picture

10 Mar 2015 - 2:55 pm | सिरुसेरि

प्रा. भालबा केळकर यांनी सर आर्थर कोनन डाइल यांच्या शेरलॉक होम्सच्या कथांचे अनुवादही छान आहेत .

गौरी देशपांडेंनी केलेला अरेबियन नाइट्स, शांता शेळकींनी केलेला लिट्ल विमेन चा चौघीजणी, राम पटवर्धनांचं पाडस उत्कृष्ट अनुवाद आहेत.
मेहता प्रकाशनाच्या अनुवादांबद्दल काय वर्णावे !!!!! डुकराचे तळलेले तुकडे काय, चल ऊठ कोवळ्या कुत्रे काय.....मज्जाय !

रॉजरमूर's picture

10 Mar 2015 - 10:58 pm | रॉजरमूर

सुधीर काळे
यांची " Nuclear Deception " या कादंबरी वरील अनुवादित लेखमाला प्रसिद्ध झाली आहे भाग १ ते २० > त्याची लिंक
इथे

आणि इथेही वाचता येईल

त्यानिमित्ताने बरेच चांगले अनुवाद माहित झाले एकदा वाचायला हवेत. इंग्रजी न समजणाऱ्यांची गरज या दृष्टीने आवश्यक आहेत. भाषांतरच होते भावांतर कठीणच असते. संस्कृतीच नसलेल्या देशातून (अमेरिका)आलेल्या पुस्तकांचे भाषांतर सोपे असते.

नवीन लेखकांनी प्रथम दोन चार भाग लिहून ते प्रकाशकाकडे घेऊन जाणे हे उत्तम. हक्क मिळालेले नसताना भाषांतर करणे म्हणजे हौसेखातर दुसऱ्याच्या बागेतले गवत उपटायला जाणे.

विशाखा पाटील's picture

11 Mar 2015 - 10:01 am | विशाखा पाटील

संस्कृतीच नसलेल्या देशातून (अमेरिका)आलेल्या पुस्तकांचे भाषांतर सोपे असते.
याच्याशी असहमत. अमेरिकेचीही आपल्याएवढी प्राचीन नसली तरी वेगळी अशी संस्कृती तयार झालेली आहे. शिवाय अमेरिकेन इंग्रजीत slang चा विपुल वापर असतो, त्यामुळे त्याचे भाषांतर करणे अवघड होते. आपल्याकडे काही अनुवादक Slang dictionary वापरतात की नाही, याची शंका आहे. त्यामुळे वर काही जणांनी म्हटले आहे तसे भयानक अनुवाद होतात.

हक्क मिळालेले नसताना भाषांतर करणे म्हणजे हौसखातर दुसऱ्याच्या बागेतले गवत उपटायला जाणे. - मस्त वाक्य! copyright घेऊन ठेवा. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Mar 2015 - 10:56 am | डॉ सुहास म्हात्रे

हक्क मिळालेले नसताना भाषांतर करणे म्हणजे हौसखातर दुसऱ्याच्या बागेतले गवत उपटायला जाणे.

हा, हा, हा !!!

सुनील's picture

11 Mar 2015 - 11:09 am | सुनील

हक्क मिळालेले नसताना भाषांतर करणे म्हणजे हौसखातर दुसऱ्याच्या बागेतले गवत उपटायला जाणे.

तसं नै हो!

कुणी 'स्वान्त सुखाय' भाषांतर करू ईच्छित असेल तर, का अडवा?

(एक जुने मिपाकर गाजलेल्या हिंदी चित्रपट गीतांचे मराठी भाषांतर इथे टाकीत असत)

हक्क मिळालेले नसताना भाषांतर करणे म्हणजे हौसखातर दुसऱ्याच्या बागेतले गवत उपटायला जाणे.

यावाक्यावरून त्रिशूल मधला संवाद आठवला. तो उत्तरादाखल देतो आहे
"जिंदगी मी कुछ बाते फायदे और नुकसान से उपर होती हैं. मगर अफसोस के कुछ लोग इसे नाही समज पाते"

बोका-ए-आझम's picture

12 Mar 2015 - 8:39 am | बोका-ए-आझम

श्री.म. माट्यांनी अनुवाद म्हणजे अत्तर एका कुपीतून दुस-या कुपीत ओतणे अशी सुंदर उपमा वापरलेली आहे. परवानगी न करता केलेला अनुवाद म्हणजे कायदेशीर दृष्टीने जरी चुकीचा असला तरी मूळ लेखकाला दिलेली दाद आहे असं माझं मत आहे. तरीही कायदेशीर गोष्टींचं पावित्र्य (sanctity) ही मानायलाच पाहिजे.

इकडचे वटपोर्णीमा (एका पवित्र झाडाच्या बुंध्याला दोरा गुंडाळून पतीला दीघायुष्य चिंतणे) अथवा निहोंगोतील चहापान(जपानमध्ये पाहुण्यांचा आदर करून चहाचे गरम पाणी पाजतात)असं काहीतरी भाषांतर होईल. भावांतर कठीण आहे परंतू भाषांतरीत कादंबरीत हे वाचत विमानाच्या खिडकीबाहेरचे अथवा आतले कंटाळवाणे दृष्य आठ दहा तास बघण्याचे टाळू शकतो.
अमेरिकेतले पडशब्द slang हे एक वेगळा अर्थवाले शब्द आहेत इतकेच .gas पेट्रोल डिजेल , dateपटवलेल्या पोरा पोरींनी भेटणे ,screw (=bother)मानसिक त्रास देणे .भुलथापा देऊन पैसे वस्तु लुबाडणे फसवणूक करणे यासाठी बरेच slang असतील.आणखी काही गूढ अर्थ त्यात आहेत का ?