सोने : गुंतवणूक की सुरक्षा ? की यापैकी काहीच नाही ?

चिनार's picture
चिनार in काथ्याकूट
9 Mar 2015 - 12:49 pm
गाभा: 

काही दिवसांपूर्वी माझ्या गावातल्या घरी चोरी झाली. त्यात दुर्दैवाने माझ्या पत्नीचे आणि आई चे सोन्याचे दागिने चोरीला गेले. चोर सापडले पण सोनं सापडलं नाही ! असो !

माझं नुकतंच लग्न झालेलं आहे. पहिल्याच वर्षी सूनेच सोनं चोरी गेल्यामुळे माझ्या आई- वडीलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. ते घरी असताना चोरी झालेली असल्यामुळे त्यांना अधिकच अपराधी वाटत आहे. वस्तुस्थिती पाहता ,मी ,माझी पत्नी आणि माझे सासू-सासरे ह्या सगळ्यांनी त्यांना समजावून सांगितले की झाले गेले गंगेला मिळाले, त्याविषयी जास्त विचार करू नका. पण आता नुकसान भरपाई म्हणून ते यथाशक्ती सुनेसाठी काही सोनं घेण्याच्या विचारात आहे. ह्या गोष्टीला साहजिकच माझा आणि पत्नीचा प्रचंड विरोध आहे.
वडीलांच्या मते सोनं हे स्त्रीधन असतं. त्यामुळे ते परत जमवणं आवश्यक आहे. शिवाय सोन्यासारखी चांगली गुंतवणूक कोणतीही नाही.

यावरून मला काही प्रश्न पडले आहेत

१. सोन्याचे दागिने ही खरच गुंतवणूक आहे का ? कारण गुंतवणुकीच्या नावाखाली घेतलेलं सोनं आपण शक्यतो कधीच विकत नाही. शिवाय परत ते सोनं सोबत वागवणं म्हणजे जीवाला धोकाच नाही का ?
२. स्त्रीधन या शब्दाचा विचार केला तर, जुन्या काळात पती च्या निधनानंतर पत्नी आणि कुटुंबाची आर्थिक सुरक्षा या उद्देशाने सोने खरेदी केला जात असावं असं मला वाटते. पण जीवन विम्याच्या काळात हा प्रकार आवश्यक आहे का ?
३. जर नुकसान भरपाई द्यायचीच असेल (जी आम्हाला अजिबात नकोय!) तर सुनेच्या नावानी मुदत ठेव किंवा अन्य काही गुंतवणूक करणे जास्त व्यवहार्य नाही का ?

कृपया या विषयावर आपले मत कळवा !

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

9 Mar 2015 - 1:30 pm | सुबोध खरे

चिनार साहेब
गुंतवणूक हि शारीरिक( प्रत्यक्ष)असते तशीच भावनिक सुद्धा असते. आपल्या मुलांच्या लहानपणी रुपये १०,०००/- (दहा हजार)ला घेतलेला फिल्मचा कॅमेरा आजच्या डिजिटल युगात अक्षरशः कवडीमोलाचा आहे. पण मुलांच्या लहानपणीचे फोटो आज आपण घालवलेल्या अमुल्य क्षणांच्या आठवणींची किंमत काय आहे?
आपले आई वडील किंवा आपण आपल्या पत्नीच्या अंगावर जे दागिने घालाल त्याची प्रत्यक्ष किंमत ५ % ने वाढेल पण त्यात असलेली आपल्या पत्नीची भावनिक गुंतवणूक याची किंमत कशी करणार. आजपासून ५० -६० वर्षांनी आपले आई वडील कदाचित हयात नसतील पण त्यांनी बनविलेले हेच दागिने आपल्या पत्नीला त्यांच्या प्रेमाची साक्ष देत राहतील. त्याची किंमत काय करणार?
लग्नानंतरच्या पहिल्या वर्षात आपले जेवढे सण वार होतात तेंव्हा आपली पत्नी लंकेची पार्वती म्हणून उभी राहणार आहे काय. चार दागिने अंगावर घातल्यावर आणी सुंदर साडी नेसल्यावर पत्नी किती सुंदर दिसते हे मी आपल्याला सांगायची गरज नाही. याची आठवण म्हणून काढलेले फोटो नंतर आपल्याला किती आनंद देतील तो आनंद आपल्या मुदत ठेवीच्या पावत्या देतील काय?
पैसा हे सुखाचे साधन आहे. साध्य नव्हे. शिवाय जर आपल्या आईवडिलांना आपल्यामुळे आपल्या सुनेचे स्त्रीधन चोरीस गेले आहे याची खंत राहणार असेल तर त्यांना त्याची भरपाई करण्यात मिळणाऱ्या आनंदापासून आपण वंचित करू इच्छिता काय?
राहिली गोष्ट- निव्वळ व्यवहाराची- सोने हे कदाचित मुदत ठेवीपेक्षा कमी व्याज देईल परंतु अर्ध्या रात्री सुद्धा सोने गहाण ठेवून आपल्याला पैसे अगदी खेड्यातही मिळू शकतात. आणी शहरात त्यःक सोन्याला तरणा ठेवून आपल्याला एक दिवसात सुवर्ण कर्ज सुद्धा मिळू शकते. असे कर्ज घेऊन व्यवसाय करून भरभराटीस आलेले कितीतरी व्यावसायिक माझ्या पाहण्यात आहेत. शिवाय पत्नीचे सोने गहन ठेवून व्यवसाय सुरु केला आहे म्हणून तेवढ्याच जबाबदारीने ते कर्ज सुद्धा फेडले जाते असा अनुभव आहे.
माझे वैयक्तिक मत असे आहे कि आपल्या बचती तील काही भाग म्हणून सोने जरूर असावे. मग ते घेणार असाल तर ते हौसे मौजेच्या दिवसात का नको?

चिनार's picture

9 Mar 2015 - 3:24 pm | चिनार

खरे साहेब ,
भावना आणि व्यवहार यांची सांगड घालून एखादं उत्तर शोधण्याचा माझा प्रयत्न आहे.
अगदीच लंकेची पार्वती होण्याची परिस्थिती सध्यातरी नाहीये. आणि खर सांगायचं तर हे दागिने घेऊन माझ्या पत्नीला अजिबात आनंद होणार नाही. याउलट सासर्यांनी भरपाई देऊन आपल्याला परकं केलं असे विचार मनात येऊ शकतात.
सोनं किंवा पैसा यापेक्षा नातेसंबंध सुरळीत राहावे याला मी जास्त प्राधान्य देईल.

सांगलीचा भडंग's picture

10 Mar 2015 - 2:12 am | सांगलीचा भडंग

उत्तम प्रतिसा . त्या मास्टरकार्ड च्या जाहिराती सारखे . सम थिंग्स मनी कान्ट बाय

अत्रन्गि पाउस's picture

9 Mar 2015 - 2:48 pm | अत्रन्गि पाउस

मी अर्थत्द्न्य नसलो तरी काही मुद्दे मला नेहेमी जाणवतात :
>>१ किलो सोने बाळगून असलेला माणूस गेले ५०० वर्षे 'सुखवस्तू' धरला गेलेला आहे ... हे दुसर्या कुठल्याही गुंतवणुकीला लाभलेले नाही (अगदी रोकड सुद्धा नाही )
>> खरे साहेब वर म्हणतात त्याप्रमाणे त्यात भावनिक मूल्य आहे तसेच ती जगभरात मिड नाईट करन्सी म्हणून धरली जाते (कित्येक शतके)
>> बडे बडे अर्थतज्ञ जरी सोन्याला मृतवत गुंतवणूक म्हणत असले तरी बऱ्याच आर्थिक व्यवहारांमध्ये सोने गृहीत धरले जातेच .
>> बहुतेक प्रगत राष्ट्रे सोन्याचा प्रचंड साठा बाळगून असतात आणि तो सहसा वापरत नसतात असे दिसते ..
...असो ...मिपा वरील अर्थतज्ञ ह्यावर आपली मते मांडतील तेव्हा अजून मुद्दे विचारात घेऊ....

प्रसाद भागवत's picture

9 Mar 2015 - 3:33 pm | प्रसाद भागवत

आपणांस जर सोन्यांत गुंतवणुक करावयाचीच असेल तर एक्चेंज ट्रेडेड फंडातुन सोने ईलेक्ट्रॉनिक स्वरुपात घेणे अधिक चांगले असे मी सुचवेन. अर्थात या पर्यायात होणारे अनेकविध फायदे (खरेदी/विक्रीस सुलभ, स्वस्त मिळणे, शुद्ध्तेची खात्री, सांभळण्याचा खर्च नाही, अधीक सुरक्षीत, कमी दराने कर आकारणी ई.) विरुद्ध सोने दृश्य स्वरुपात नसल्याने होणारे मानसिक/ सामाजिक परिणाम याबद्दल आपण जरुर विचार करावा

काळा पहाड's picture

9 Mar 2015 - 4:49 pm | काळा पहाड

सोने ही गुंतवणूक ही नाही आणि सुरक्षा ही नाही. सोने हे चलन आहे. सोने तुम्हाला काहीही नवीन बनवून देवू शकत नाही (जसे शेअर्स). म्हणून ती सुरक्षा नाही. सोने तुम्हाला दर महिन्याला (किंवा वर्षाला) ठराविक प्रमाणाचा परतावा देवू शकत नाही. म्हणून ती गुंतवणूक नाही. सोन्याचा भाव हा फक्त स्पेक्युलेशनने (याला म्हराटीत काय म्हंतात राव?) वाढत जातो. ते एक स्पेक्युलेशनचे उपकरण आहे. सोने घ्या पण तुमच्या गुंतवणुकीच्या पैकी ५% पेक्षा जास्त सोन्यावर खर्च करू नका. आणि तो खर्च बुडीत खात्यात जमा करा.

अत्रन्गि पाउस's picture

9 Mar 2015 - 5:07 pm | अत्रन्गि पाउस

एखाद्या देशाची नेट वर्थ आणि त्या देशाच्या प्रत्यक्ष ताब्यातील सोने ह्यांचा काही परस्पर संबंध असतो का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2015 - 5:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

जेव्हा एखाद्या देशातील चलन सोन्याशी निगडीत ठेवलेले असते (गोल्ड स्टँडर्ड करन्सी) तेव्हाच त्या देशाची नेट वर्थ आणि त्या देशाच्या प्रत्यक्ष ताब्यातील सोने ह्यांचा काही परस्पर संबंध (बरोबरीचा संबंध नव्हे) असतो, अन्यथा नाही.

संदीप डांगे's picture

9 Mar 2015 - 5:57 pm | संदीप डांगे

देशाच्या ताब्यात म्हणजे केंद्रीय सरकारच्या ना? जनतेच्या घरी अब्जावधी टन सोनं असलं तरी काय उपेग?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2015 - 6:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

केंद्रिय सरकारच्या ताब्यातले "चलनाशी निगडीत सोने (करन्सी टाईड सॉव्हरीन गोल्ड)" सरकारच्या ताब्यातील एकंदर सोन्याच्या साठ्यापेक्षा (सॉव्हरीन गोल्ड) कमी असू शकते.

यासाठीच वरच्या प्रतिसादात कंसामध्ये (बरोबरीचा संबंध नव्हे) असे लिहीले आहे.

ढोबळ व्याख्येने,
देशाची एकूण किंमत/पात्रता (National Net Wealth / Worth) = सरकारी आणि खाजगी सोन्यासकट इतर सर्व मिळकत व संसाधने (रिसोर्सेस) - देशाचे आणि खाजगी (नागरिकांचे) कर्ज.

आजानुकर्ण's picture

9 Mar 2015 - 7:13 pm | आजानुकर्ण

काळा पहाड यांच्याशी सहमत. सोन्यात 'गुंतवलेले' पैसे बुडीत खात्यात जमा करा. गुंतवणुकीचा निर्णय भावनिक होऊन कधीच घेऊ नये. सोने घ्यावे की नको याची चर्चा मिपाकरांशी करण्याऐवजी बायकोशीच करणे उत्तम. ;) मात्र सोने खरेदी केलीच तर ती गुंतवणूक न मानता खर्च मानूनच करावी.

स्त्रीधन आणि सुरक्षितता वगैरेही सोन्याशी चुकून जोडले गेलेले मुद्दे आहेत. जगभरात सर्वात जास्त सोने भारतातल्या बायकांकडे असते. खरं तर इतके स्त्रीधन असलेल्या भारतीय स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व स्वावलंबी मानल्या जाव्यात. मात्र तसे कुठेच दिसत नाही.

आणखी एक मुद्दा म्हणजे भारताला सोने आयात करावे लागते. त्यामुळे परकीय गंगाजळीवर ताण पडतो आणि सरकारच्या चालू खात्यातली तूट वाढते. जबाबदार नागरिकांना सोन्यासारख्या - गरज नसलेल्या - गोष्टींची आयात कमी करता आली तर चांगलेच आहे. अर्थात तुमच्या वैयक्तिक तत्त्वांचा प्रश्न आहे. सोनेखरेदी करणे यात बरेवाईट किंवा देशप्रेम-देशहित-देशद्रोह असे मला काहीही म्हणायचे नाही.

आता राहिला भावनिक मुद्दा -
तर सोने खरेदी नको असे तुमची पत्नी म्हणते आहे ते चोरीच्या तात्पुरत्या धक्क्यामुळे की खरेच सोन्याच्या दागिन्यांची आवड नसल्याने हे तुम्हाला अद्याप माहीत नसावे असे वाटते. तुमचे नुकतेच लग्न झालेले असल्याने (प्रेमविवाह नसल्यास) बायकोच्या आवडीनिवडी समजायला वेळ लागेल. अशा वेळी तुम्ही उलट तिला 'निदान एकदोन ग्रॅमचे तरी दागिने कर' असे सांगून ब्राऊनी पॉईंट्स मिळवायला हवेत. लाँग टर्म वैवाहिक आयुष्यात असे पॉईंट्स खात्यात असणे फायदेशीर असते. शिवाय हे हलक्या वजनाचे दागिने दिसायला छान आणि वापरायला सोयीचे असतात. अगदी चोरीमारी झाली तरी फारसे नुकसान होत नाही. बेंटेक्स वगैरे हानीकारक धातूंपेक्षा ही चांगली सोय आहे. महाग आणि जड दागिने सांभाळायला फार त्रासदायक असतात. शिवाय ते लॉकरमध्ये वगैरे ठेवावे लागतात. म्हणजे हायपोथेटिकल सिच्युएशनमध्ये टीवीवरच्या मालिकांत किंवा सिनेमात दाखवतात तसे अडीअडचणीला दागिने मोडावे वाटले आणि ती शनिवारची संध्याकाळ असली तर सोमवारी बँक उघडेपर्यंत वाट पाहावी लागते. त्यापेक्षा लिक्विड इमर्जन्सी फंड (तीन ते सहा महिने मासिक खर्चाइतका) ठेवलेला बरा.

प्रसाद१९७१'s picture

9 Mar 2015 - 7:32 pm | प्रसाद१९७१

सोने ही गुंतवणूक ही नाही आणि सुरक्षा ही नाही.

ह्याच्याशी असहमत. गुंतवणुक पुर्वी तरी नक्की होती. महागाई पेक्षा जास्त परतावा सोन्यानी कायम दिला आहे. ह्या पुढचे माहीती नाही.
पण सुरक्षा नक्कीच आहे. मुख्य म्हणजे, देशाच्या चलनाचा भाव कीती ही गडगडला तरी सोन्याची पर्चेसिंग पॉवर बर्‍यापैकी तशीच रहाते. उदा. तुम्ही सध्या २० ग्रॅम सोन्याच्या ऐवजी मारुती स्विफ्ट घेऊ शकता, पुढे जर रुपयाची किंम्मत एकदम ढासळली तरी तुम्ही २० ग्रॅम सोन्याच्या बदल्यात मारुती स्विफ्ट घेउ शकाल. आणि तसेच सोन्याचे भाव १०-१५ टक्के खाली जातील पण जास्त नाहीत.

प्रसाद१९७१'s picture

9 Mar 2015 - 7:37 pm | प्रसाद१९७१

२०० ग्रॅम सोन्यात असे म्हणायचे होते

यसवायजी's picture

9 Mar 2015 - 7:47 pm | यसवायजी

@ आणि तसेच सोन्याचे भाव १०-१५ टक्के खाली जातील पण जास्त नाहीत>>>>>

गेल्या शतकातील सोन्याचे दर बघा. ६२ ते ६४ मध्ये ५०% ने कमी झालं होतं.

अ

प्रसाद१९७१'s picture

9 Mar 2015 - 7:56 pm | प्रसाद१९७१

पण दोन वर्षानी आले ना पुन्हा जागे वर. पुढे कधी असे झाले तरी ३-४ वर्षात पुर्वी इतके होतीलच.
बादवे - त्या २ वर्षात असे काय घडले होते ते जाणुन घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

यसवायजी's picture

9 Mar 2015 - 5:31 pm | यसवायजी

सोनं आपण शक्यतो कधीच विकत नाही.
योग्यवेळी विकले पाहिजे.
२००७ साली नोकारीला लागल्यापासून (त्यावेलेचा दर १२०००) जमा केलेले सोने मी २०१२ मध्ये फ्लॅट घेताना ३०००० ने विकले. आज ३ वर्षानंतरही २७००० पेक्षा कमी दर आहे.
सध्या फ़क्त ६ महिन्यांच्या अन्तराने ५ gram gold ETF घेतोय.

चिनार's picture

9 Mar 2015 - 5:40 pm | चिनार

gold ETF यावर प्रकाश टाकावा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2015 - 5:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

सोन्यातली गुंतवणूक...

गुंतवणूक अश्याच वेळेस होते जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही केवळ फायदा-तोटा (आणि फारतर गरज पाहून) कोणत्याही भावनिक अडथळ्यांशिवाय खरेदीविक्री करू शकता. (एखादी गोष्ट आपण विकणारच नसलो तर तिची किंमत आणि फायदा-तोटा केवळ पुस्तकी राहतात, तिला गुंतवणूक म्हणणे योग्य नाही. मात्र अश्या गोष्टी मानसिक समाधान मात्र जरूर देतात.)

वरच्या व्याख्येप्रमाणे...

१. स्त्रीधन / इतर घरातले दागीने / राहते घर / इ गुंतवणूक नसतात.

२. शुद्ध सोन्याची नाणी अथवा बिस्कीटे गुंतवणुक असतात. यांची चोरी होण्याची शक्यता असते. ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणे हा यावर एक उपाय होऊ शकतो.

भविष्यात योग्य किंमत आल्यास विकायचे आहे असे ठरवलेले असेल तर त्या सोन्याचे दागीने बनवणे अनावश्यक आणि गुंतवणूकीतला फायदा घटवणारे असते. याचबरोबर, २४ कॅरट सोने अत्यंत मऊ असते, त्याचे दागिने सहज वाकतात आणि त्याची सहजपणे झीज होते. यासाठी दागिने बनवताना ते मजबूत व्हावे यासाठी सोन्यात तांबे अथवा इतर धातूंची भेसळ केली जाते. दागिन्यांची विक्री करताना ही भेसळ, ती किती आहे याबाबतीतील मतभेद आणि वापराने होणारी दागिन्यांची झीज दोन्हीही तोटा वाढवतात. त्याविरुद्ध, ९९.९९ किंवा अधिक ठसा असलेल्या सोन्याच्या बिस्कीटांची बाजारभावाने खरेदी-विक्री होऊ शकते.

३. चोरीपासून सर्वात सुरक्षित सोन्यातील गुंतवणूक सोन्याची सर्टिफिकेट्स / रोखे / ETF / इ स्वरूपात करता येते... यात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अधिक माहिती तुमच्या गुंतवणूक सल्लागाराकडून व बँकेकडून मिळू शकेल.

====

* सोने हा एक "विक्रीयोग्य जिन्नस (commodity)" प्रकारचा गुंतवणूकीचा पर्याय आहे. अर्थात त्याच्या बाजारभावात (कधीकधी बेभरवश्याचे) चढ-उतार होतात, त्यासाठी गुंतवणूकदाराची तयारी असणे जरूर आहे हे वेगळे सांगायला नकोच.

प्रसाद१९७१'s picture

9 Mar 2015 - 7:42 pm | प्रसाद१९७१

सोन्यावर नियमीत व्याज मिळण्याची सोय पण सोनारांकडे असते. ( माझ्या वरवरच्या माहीतीत पुण्यात गाडगीळांकडे आहे ). त्यांच्या कडुन सोने घेउन त्यांच्या कडेच FD सारखे ठेवायचे. ते वर्षाला ५-६ टक्के व्याज देतात ( सोन्याच्या रुपात ). आणि परत घेताना सोनेच देतात.

यसवायजी's picture

9 Mar 2015 - 7:52 pm | यसवायजी

http://aisiakshare.com/node/3471#comment-81540

ऐसीवर या प्रश्नाला फ़क्त ४ रोचक मिळाले होते. :D उत्तर नाही.

आता मिपावर

गोल्ड डिपॉजिट ही काय भानगड असते? म्हणजे, बॅन्का ते सोने विकुन कुठे इन्वेस्ट करतात आणी काही वर्षांनी तेवढेच सोने व्याजासकट परत देतात काय?
काही बॅन्का तयार दागिनेसुद्धा ठेवून घेतात म्हणे. (१% पे़क्षा कमी व्याज देतात). पण त्यांचा काय फायदा आहे त्यात

प्रसाद१९७१'s picture

9 Mar 2015 - 8:00 pm | प्रसाद१९७१

यसवायजी - मी तुम्हाला उत्तर दिलेच आहे. पुण्यात असाल तर गाडगीळ सराफांकडे चौकशी करा. उदाहरण म्हणुन. जर तुम्ही त्यांच्या कडुनच १०० ग्रॅम सोने घेतले आणि त्यांच्या कडेच डीपॉझीट केले तर ते तुम्हाला वर्षानंतर १०५ ग्रॅम सोने देतील. ( ५ टक्के व्याजदर धरुन ).

बँकांचे माहीती नाही. व्याज देत असतील असे वाटत नाही. ह्या बजेट मधे लोकांच्या घरचे सोने बाजारात येउन आयात कमी व्हावी म्हणुन सरकारने गोल्ड बाँड काढणार असे म्हणले आहे त्यात व्याज देणार आहेत.

व्याज देतात ते माहितच आहे मला, पण कसे? त्या सोन्याचं ते काय करतात? शुद्ध सोनं असेल तर विकुन दुसर्याला कर्ज देऊ शकतात. पण असेच करतात काय?
आणि तयार दागिन्यांच् काय?

मार्मिक गोडसे's picture

9 Mar 2015 - 8:33 pm | मार्मिक गोडसे

प्रसाद भागवत, काळा पहाड, आजानुकर्ण व इस्पीकचा एक्का यांच्याशी सहमत.

गुंतवणूक अश्याच वेळेस होते जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही केवळ फायदा-तोटा (आणि फारतर गरज पाहून) कोणत्याही भावनिक अडथळ्यांशिवाय खरेदीविक्री करू शकता. ह्या हॉलमार्क वाक्याशी प्रचंड सहमत.
ज्याकाळी गुंतवणूकीचे सुरक्षीत पर्याय नव्हते त्याकाळी सोन्यात/सोन्याच्या दागिन्यात गुंतवणूक ठिक होती. आता गुंतवणूकीचे सुरक्षीत पर्याय उपलब्ध असताना सोन्यात/सोन्याच्या दागिन्यात गुंतवणुक करणे हे योग्य वाटत नाही. अडचणीच्या वेळी सोने विकताना किंवा गहाण ठेवताना भावनेमुळे अडचण येत असेल तर अशा गुंतवणुकीचा काय फयदा?

२०१२ साली सोन्याचा बाजारभाव ३१०००/१० ग्रॅ. इतका होता. आजचा बाजारभाव २६०००/१० ग्रॅ. च्या आसपास आहे. म्हणजे अंदाजे ५००० हजाराचे नुकसान. ह्यापेक्षा गाडग्यात ३१००० ठेवले असते तर तोटा न होता हातात मुळ रक्कम नक्कीच मिळाली असती.

सांगलीचा भडंग's picture

10 Mar 2015 - 2:43 am | सांगलीचा भडंग

जर जास्त काळ गुंतवले तर सोने / शेअर बाजार दोन्ही चांगला परतावा देईल पण शेवटी पुढे काय होणार हे कोणीच सांगू शकणार नाही त्यामुळे फ़ाsssssssssssर विचार करण्या पेक्षा . थोडाफार विचार करून जो ऑप्शन पटतोय त्यात लगेच गुंतवले तर फायदा होईल