मराठी भाषा दिनानिमित्त - रच्याकने
बर्याच दिवसांपासून मनामध्ये हा प्रश्न पडला होता शेवटी म्हटले कि हा लेख लिहायला मराठी भाषा दिवसापेक्षा अजून चांगला मुहूर्त सापडू शकत नाही. काल लेख टाकायला आलो तर मिपा बंद. म्हटले असेल काहीतरी दुरुस्तीचे काम. आत्ता उघडून बघितले तर कुसुमाग्रजांचा फोटो. वाह! क्या बात है! सुंदर आलंय हे चित्र अगदी. मिसळपाव संस्थळावरील या चित्र फलकाच्या कलाकाराला आमचा मुजरा. अगदी व्यावसायिक पद्धतीने काढलेले दिसत आहे. त्यातच वेल्लाभट यांचा मराठी भाषेवरील उत्कृष्ट लेख वाचला. आणि मग आपला प्रश्न विचारायला अजूनच स्फुरण चढले. त्यातच त्यांच्या लेखाचे नावही हळूच ढापले. :)
आपण सर्वजण मराठी बोलायचे, लिहायचे, वाचायचे या एकसमान प्रेरणेने मिसळपाववर येतो आणि एकमेकांच्या विचार आदान-प्रदानामध्ये सहभागी होतो. काही जण अगदी हट्टाने मराठीतूनच बोलणार वगैरे प्रतिज्ञा करून काही प्रसंगी मित्र मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून हसूही करून घेतात. अस्मादिकसुद्धा त्यातलेच. परंतु असे कितीतरी चांगले इंग्रजी भाषेतील शब्द आहेत कि त्यांना मराठी भाषेत प्रतिशब्द सापडत नाहीत. यावर मिसळपाववरच अगोदरही बरीच चर्चा झाली आहे. त्याचा संदर्भ आत्ता सापडत नाही आहे. (मिसळपाववरती हि लेख शोधण्याच्या सोयीची कमतरता जाणवते किंवा हे कसे करायचे याची अगोदरच कोणाला माहिती असेल तर कृपया सांगावे) परंतु भाषेत नवीन नवीन शब्दांची भर केल्यानेच भाषा टिकून राहते - समृद्ध होते असा त्या चर्चेचा निष्कर्ष होता. मला वाटते यावर सर्वांचे एकमत होण्याला काही हरकत नसावी.
मराठी भाषेत कितीतरी इतर भाषांमधून शब्द उचलले गेले आहेत. पश्तुनी, उर्दू, इंग्रजी, पोर्तुगीज अशा परदेशी भाषीक शब्दांचाही त्यात समावेश आहे. आजकाल इंग्रजी भाषेची चलती असल्याने त्याचा प्रभाव आपल्या भाषेवर जास्त जाणवतो.
अवांतर:
जगावर इंग्रजांपेक्षा पुरातन मुस्लिम धर्मियांनी राज्य केले असते तर आज सर्व जगात इंग्रजी ऐवजी उर्दू भाषेत आपण बोलून आपल्या मुलांना आपण कॉन्व्हेंटमध्ये पाठवण्याच्या ऐवजी दर्ग्यात शिकायला पाठवले असते का असाही किडा डोक्यात वळवळून जातो.(आपल्यासाठी जग म्हणजे अमेरिका-ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड एवढेच :( ) अति अवांतर: अशी अवांतर विचार करण्याची सवयच लागलीये. मुद्द्याचं लिही रे बाबा.. मुद्द्याचं! तर आपल्या रोजच्या बोली भाषेत वापरायला कितीतरी नवीन नवीन शब्द मराठीत तयार केले गेले. १) computer - संगणक २) Liver - यकृत (आता हा शब्द कशावरून तयार केला असेल माहित नाही. जेव्हा केव्हा कोणाला शरीराचा तो भाग सापडला असेल तेव्हा त्याला यकृत म्हणायचे असे कसे ठरवले गेले असेल?) काहींचे शब्दशः भाषांतर केले आणि ते सुद्धा चालले. १) key board - कळफलक २) mobile phone - भ्रमणध्वनी ३) Television set - दूरदर्शन संच ४) Academy - अकादमी पण काही शब्दांना काही म्हणता काहीच प्रतिशब्द मिळाले नाहीत. उदाहरणार्थ १) After 'Thank You' we say "Welcome" - आता 'Thank you' ला आपण 'धन्यवाद' म्हणतो. पण मग समोरच्याने त्यास प्रतिउत्तर काय द्यावे? इंग्रजी भाषेत ती सोय आहे "Welcome" किंवा "No Mention". यातील No mention मला स्वतःला थोडेसे आगाऊ वाटते परंतु इंग्रजी भाषेत ते चालते. पण 'welcome' ला मला प्रतिशब्द सापडत नाही. 'आभारी आहे' असे म्हणू शकत नाही कारण ते धन्यवादचाच समानार्थी शब्द आहे. २) entrepreneur = उद्योजक हा या शब्दाचा प्रतिशब्द नाही असे मी बर्याच उद्योजकांच्या पुस्तकात वाचले त्यामुळे मराठीत तो शब्द आन्त्रप्रुनर असाच लिहितात. ३) Sepoy = ब्रिटीश आर्मीने भारतीय खंडातील खासगी सैनिकाला तयार केलेला शब्द. (संदर्भ विकिपीडिया) आपण अपभ्रंश करून शिपाई म्हणून वापरतो. A sepoy was formerly the designation given to an Indian soldier. In the modern Nepalese Army, Indian Army, Pakistan Army and Bangladesh Army it remains in use for the rank of private soldier. हे फक्त जेवढे मला सुचले तेवढेच. या सर्वांचा उहापोह करण्याचे कारण म्हणजे मराठी संकेतस्थळांवर जन्मलेला शब्द रच्याकने = रस्त्याच्या कडेने = By The Way विषय बदलायचा असेल किंवा मूळ विषयाकडे परत लक्ष वेधून घ्यायचे असेल तर "By The Way" हा शब्द सर्रास वापरला जातो. रच्याकने हा शब्द गम्मत म्हणून वापरायला ठीक आहे परंतु याला खरंच मराठीत काही प्रतिशब्द आहे का? असेल तर कृपया येथे सांगा. नसेल तर तुम्हाला असे वाटते का कि आपण 'रच्याकने' शब्द रूढ करावा? हसू होईल आपले. "By The Way" हे शब्द वापरायची वेळ आपल्या बोलीभाषेत बर्याचदा येते. तेव्हा त्यास एखादा नवीन शब्द करायची वेळ आली आहे का? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. अजून कांही असे शब्द असतील तर त्यांची चर्चा इथे व्हावयास हरकत नसावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आशयाशी सहमत
धन्यवाद
यावर माझे विचार
१. प्रत्येक ठिकाणची संस्कृती
शुद्ध आचरटपणा!
डेटा=विदा
बाय द वे ला मराठीत "जाता जाता
धन्स.
धन्स, धन्यु, आणि वीकांत (वी
+१११
भाषा शुद्धि चळवळ...
ब्वारं.
ज्या परकीय शब्दांना मराठी
इंडिया का म्याच कब है...!
वर उधृत केलेले (धन्स, धन्यु
मराठीचा गोडवा कशाने वाढेल ते लग्गेच नै सांगता येणार.
रच्याकने म्हणजे काय?
रस्त्याच्या कडेने.
जा२ नक्कू रे...ये मिपाकर भोत
चेतावणी
इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत
रच्याकने
.
असेल असेल
सेपॉय चा अपभ्रंश शिपाई/सिपाही
नवीन शब्द रुळवता येत नाही.
तसंच "शांपू" या आपल्या
http://www.etymonline.com
कोणी किती विरोध करो की निषेध,
अजून एक...
आजच्या "शुद्ध" मराठीसाठी
सीमारेषा कुठली?
भाषेची शुद्धता...
धन्यवाद
परफेक्ट एक्काकाका. मला असं
व्हरांडा या शब्दाबद्द्लही मला
हा शब्द मूळचा पोर्तुगीज़
धन्यवाद !!
माझे २ पैसे (हे देखील
अगदी बरोबर. भाषाशुद्धीची चळवळ
विकान
हा शब्द पु भा भाव्यांच्या
कोणे एके काळी मराठीला
तसेच कोणा मंत्री निधन
समारंभपूर्वक असे म्हटले तरी
शहीद
शासकीय
अहो सरकार = सर्वकार,
अंदाज
communal - जातीयवादी, धर्मांध