भाज्यांचे लोणचे

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
11 Feb 2015 - 7:27 pm

दिल्लीत फेब्रुवारी महिना सुरु होताच वादळ आणि धुक्याचे राज्य संपते. सूर्याचे तेज जाणवू लागते. या मौसमात बाजारात भाज्याही भरपूर असतात. भाज्यांचे लोणचे घालण्यासाठी हा मौसम आदर्शाच. दरवर्षी सौ. या मौसमात भाज्याचे लोणचे एक- दोनदा तरी घालतेच. गेल्या रविवारी भाज्यांचे लोणचे घातले होते. त्याचीच कृती.

साहित्य:

भाज्या: फुलगोबी १किलो ,गाजर१/२किलो ,शलजम १/२किलो, अदरक १०० ग्रम, लहसून १०० ग्रम

मसाले : सौंप (बडीशेप) ( २ चमचे) , मेथी दाणे (१ चमचा), हिंग १/४ चमचे, मोहरीची डाळ १ वाटी, तिखट १/२ वाटी, हळद १/४ वाटी, काळी मिरी ५-६ दाणे, तेल १ वाटी, सिरका १ वाटी, गुड १/2 वाटी. मीठ आवश्यकतेनुसार.

कृती:

प्रथम गोबी,गाजर आणि शलजम या तिन्ही भाज्यांचे एकसारखे तुकडे करून घ्या.एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. एक उकळी आल्यावर पाण्यात १ चमचा हळद टाकून त्यात चिरलेल्या भाज्या टाकाव्यात. तीन ते चार मिनिटांनी गॅस बंद करून सर्व भाज्या एका मलमलच्या कपड्यावर किंवा साडीवर पसरून वाळायला घाला. तीन चार तासात भाज्या वाळतील (अर्थात ओलसरपणा निघून जाईल). अदरक किसून घ्या आणि लहसून बारीक वाटून घ्या.

साहित्य

आता कढई गॅस वर ठेवा. 1 चमचा तेलात सौंप आणि मेथी दाने परतून घ्या. मग पुन्हा २ चमचे तेल टाकून अदरक आणि लहसून परतून घ्या. त्या नंतर वाचलेले तेल कढईत टाकून तेल गरम झाल्यावर काळी मिरी टाका (तेल गरम झाले कि नाही कळण्यासाठी). नंतर गॅस बंद करा. एका भांड्यात सिरका व गुड घालून उकळायला ठेवा. गुड विरघळल्या वर गॅसबंद करा.

एका परातीत किंवा भांड्यात सर्व मसाला अर्थात - परतलेले अदरक, लहसून, सौंप (बडीशेप), मेथी दाणे व तिखट, हळद, मेथी दाणे, मीठ व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर गरम तेल मसाल्यावर टाका. मिश्रण थंड झाल्यावर त्यात गुड आणि सिरक्याचे मिश्रण मिसला. मसाला थंड झाल्यावर सर्व वाळलेल्या भाज्या मिसळा.
भाज्यांचे लोणचे
हे लोणचे १०-१२ दिवस आरामात टिकते.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Feb 2015 - 7:43 pm | प्रचेतस

मस्त.
आवडलं.

वाह! चटपटीत, छान दिसयेत लोणचे.

सुंदर फोटो आले आहेत.
स्वादिष्ट व आरोग्यपूर्ण पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद.

हरयाणा टुरीझमच्या पानिपतयेथील NH1 वरील skylark tourism complex मध्ये हमखास विकत मिळायचे!

स्वाती२'s picture

11 Feb 2015 - 7:57 pm | स्वाती२

मस्त! थोड्या प्रमाणात करुन बघेन.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Feb 2015 - 8:35 pm | अत्रुप्त आत्मा

बोले तो....एकदम झकास! :clapping:

रुस्तम's picture

11 Feb 2015 - 10:36 pm | रुस्तम

शलजम म्हणजे काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Feb 2015 - 10:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

शलगम / शलजम = नवलकोल


(जालावरून साभार)

हा रेड रॅडीश म्हणजे लाल मुळा वाटतोय. नवलकोल जरा वेगळा दिसतो माझ्या मते.

मुख्य फरक पानांमध्ये आहे म्हणुन कळालं. नवलकोलला त्याच्या कंदावरुन पाने फुटतात तर मुळ्याला फक्त वर शेंडी असते.

स्वाती२'s picture

12 Feb 2015 - 8:53 am | स्वाती२

शलजम = टर्नप

माझी आई असं मस्त लोणच करते, पण हे शलजम नसतं त्यात... गाजर फ्लॉवर आणि मटार. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Ramji Bada Dukh Deena... { राम लखन }

सविता००१'s picture

12 Feb 2015 - 10:32 am | सविता००१

मी पण गाजर, फ्लॉवर, मटार घालून करते. पण त्यात ओली हळद आणि आलं पण घालते किसून. मस्त होतं.

कपिलमुनी's picture

12 Feb 2015 - 1:23 pm | कपिलमुनी

फोटोंसकट रेसिपी येउ द्या !

सविता००१'s picture

12 Feb 2015 - 1:37 pm | सविता००१

लगेच पण फोटो तर फक्त फायनल लोणच्याचाच येइल ना :(
आधीच केलंय.

कपिलमुनी's picture

12 Feb 2015 - 2:03 pm | कपिलमुनी

आवडेल . पराठ्यासोबत असे लोणचे फार छान लागते. दिल्ली , सिमला , मनाली येथील लोणच्यांना वेगळा फ्लेवर वेगळ्या तेलामुळे येतो का ??

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Feb 2015 - 2:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

सरसों उर्फ़ मोहरी च्या तेलातले असते अस्सल उत्तर भारतीय लोणचे सो त्याचा असा एक विशेष वास येतो त्यांस

सविता००१'s picture

12 Feb 2015 - 2:57 pm | सविता००१

करते ते महाराष्ट्रियन पध्दतीने. ते खालील प्रमाणे:
साहित्यः फ्लॉवर, लाल गाजरे (केशरी नाहीतच अज्जिबात) प्रत्येकी अर्धा किलो, मटार पाव किलो, आलं आणि ओली हळद- किसून प्रत्येकी १ वाटी, मेथीदाणे १ टीस्पून,लाल मोहरी अर्धी वाटी, लाल तिखट - अर्धी वाटी, ६-७ लिंबांचा रस, फोडणीसाठी नेहमीचं गोडेतेल, हिंग, हळद, मीठ

कृती: फ्लॉवरचे छोटे छोटे तुरे काढून घ्यायचे, गाजराचे पण अगदी छोटे तुकडे करायचे. मटार दाणे, फ्लॉवरचे तुरे आणि गाजराचे तुकडे हे मीठ घातलेल्या गरम पाण्यात पाच मिनिटे ठेवायचे. मग निथळून घेउन एका पंचावर पसरायचे. ३-४ तासात ते छान कोरडे होतात. मग थोड्या तेलात मेथीचे दाणे तळून घ्यायचे.ते मोहरीबरोबर मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यायचे.

आता एका मोठ्या बोल मध्ये या भाज्या, किसलेलं आलं, किसलेली ओली हळद,वाटलेली मेथी-मोहरीची पूड, लिंबू रस, तिखट, मीठ सगळं एकत्र मिसळून घ्यायच. एकीकडे तेलाची फोडणी करायची. पण जरा जास्त तेल आणि हिंग घालून. फोडणी एकदम चरचरीत व्हायला हवी. तिच्यात गॅस बंद करून थोडं तिखट घालायचं. मग लोणच्याचा रंग अतिशय सुरेख येतो.

एक काचेची स्वच्छ बरणी घेउन त्यात हे सगळं घालावं. वरून फोडणी थंड करून घालावी. लोणच्यावर तेलाचा थोडा थर दिसायला हवा. म्हणजे ते टिकते. (भाजीचे लोणचे तसेही एक महिन्यावर टिकत नाही.)
(जर खूप दिवस राहिले तर तेलाचा एक जुनाट असा वास येतो या लोणच्याला. तो फार वैताग वास असतो. तर मी हे लोणचं करताना लोणच्यावर येइल इतकी फोडणी न घालता एका लहान बरणीत थोडं लोणचं काढून घेते आणि तेवढ्यालाच मस्त खमंग फोडणी घालते. प्रत्येक वेळी नवीन लोणचं. :) )

आता राहिला फोटो. तर तो हपिसात कुठून आणू??????

कपिलमुनी's picture

12 Feb 2015 - 4:25 pm | कपिलमुनी

धन्यवाद !
किलोचे प्रमाण ग्रॅम मध्ये कन्वर्ट करून करण्यात येईल !

सविता००१'s picture

12 Feb 2015 - 4:34 pm | सविता००१

अ‍ॅज यू प्लीज:)

उमा @ मिपा's picture

12 Feb 2015 - 4:35 pm | उमा @ मिपा

मस्त!
कधी गं वेळ काढतेस हे उद्योग करायला? भारी मेहनतीचं काम!

सविता००१'s picture

12 Feb 2015 - 4:53 pm | सविता००१

रविवार-अर्थात. :)

प्रभाकर पेठकर's picture

14 Feb 2015 - 12:34 pm | प्रभाकर पेठकर

छान आहे पाककृती.

माझी मावशी हे लोणचे अतिशय सुंदर करते. तिने एकदा दिलेली पाककृती माझ्याकडून हरविली. पण आता पुन्हा ती पाककृती मागवून बनवितो हे सुंदर लोणचे आणि पाककृती टाकतो इथे.

लोणच्यावर तेलाचा थर लावण्याचे कारण भाज्यांचा (किंवा कैरीच्या, लिंबाच्या, मिरच्यांच्या फोडींचा, जे लोणचे असेल त्याचा) बाहेरील हवेशी संबंध तोडणे हा असतो. असे केल्याने लोणचे टिकते. त्याला बुरशी वगैरे येत नाही. म्हणून मोठ्या बरणीतील लोणचे लहान बरणीत काढल्यावर मोठ्या बरणीतील फोडी त्यातील तेलाखाली दाबून ठेवाव्यात. तेल कमी झाले असेल तर नवे तेल, धूर येईपर्यंत तापवून, गार करून वरून ओतावे आणि फोडी कायम तेलाच्या थराखाली राहतील असे पाहावे.

कांही केले तरी भाज्यांचे लोणचे इतर लोणच्यांसारखे टिकावू नसते. १५-२० दिवसात संपेल एव्हढेच बनवावे.

त्रिवेणी's picture

12 Feb 2015 - 1:20 pm | त्रिवेणी

सिरका म्हणजे काय?

पैसा's picture

12 Feb 2015 - 1:27 pm | पैसा

व्हिनेगार.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Feb 2015 - 1:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

पंचरंगा अचार म्हणुन जीटी रोड वर दिल्ली चंडीगढ़ च्या मधे अचार शॉप्स विकतात ते हेच का हो सर?

स्पंदना's picture

12 Feb 2015 - 4:33 pm | स्पंदना

नाही नाही
पंचरंगा मध्ये कमल काकड़ी आणि बरच काय बाय असत।

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Feb 2015 - 5:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

ओके!!, पण ते ही सरसों च्या तेलातले असेल राईट?

उमा @ मिपा's picture

12 Feb 2015 - 4:33 pm | उमा @ मिपा

पाकृ आणि फोटो तोम्पासु!

पिंगू's picture

13 Feb 2015 - 1:33 pm | पिंगू

एकदम टेम्प्टींग लोणचे..

पियुशा's picture

13 Feb 2015 - 4:20 pm | पियुशा

चमचमीत !!!

निवेदिता-ताई's picture

13 Feb 2015 - 7:58 pm | निवेदिता-ताई

मस्तच.

खेडूत's picture

13 Feb 2015 - 8:27 pm | खेडूत

लोणचे मस्तच !
एक आपली शंका :
तुमची साहित्य सामग्री अडीच किलोपेक्षा जास्त झाली अन लोणचे १०-१२ दिवस टिकते म्हणता तर भाजीसारखे खावे लागणार ना?

सविता००१'s picture

14 Feb 2015 - 12:17 pm | सविता००१

१०-१२ दिवस बाहेर चांगलं रहातं.

विवेकपटाईत's picture

21 Feb 2015 - 7:01 pm | विवेकपटाईत

कुठला ही पदार्थ एकटे खाण्यात मजा नाही. माझे सर्व आप्त नातेवाईक दिल्लीतच राहतात आणि लेक जावई सुद्धा दिल्लीतच राहतो. शेजारी पण असतातच. शिवाय घरच्या गच्ची वर ऊन भरपूर येतो. गेल्या रविवारी आलू चिप्स केल्या ५ किलोच्या.
बटाटा चिप्स

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Feb 2015 - 12:23 pm | कैलासवासी सोन्याबापु

2500 ग्रॅम्स / 12 म्हणजे अप्प्रोक्सिमटेली 200 ग्रॅम /दिवस म्हणजे 4 जणांची फॅमिली म्हणली तरी रोजचे माणशी 50 ग्रॅम्स म्हणजे 25 ग्रॅम्स सकाळी व् 25 संध्याकाळी खायला लागेल!!!

जमतंय की (गणिती गृहितका प्रमाणे)

(अवखळ गणिती) बाप्या :D :D

खुप छान! मी याच प्रकारे सुरणाचे लोणचे बनवते.

सुहास झेले's picture

24 Feb 2015 - 10:08 pm | सुहास झेले

सहीच... ह्या आठवड्यात करून बघतो :) :)