टोमॅटो राईस

मनिमौ's picture
मनिमौ in पाककृती
22 Dec 2014 - 3:05 pm

1
साहित्य
2 वाटया बासमती तांदुळ
5 मिडियम टोमॅटो प्युरी करून
2 मोठे कांदे
3 मिरच्या
आलं लसूण पेस्ट 2 मोठे चमचे.
साजूक तूप 1/2 वाटी
पाव वाटी काजू
मीठ
साखर
कोथिंबीर (सजावटीसाठी)

कृती

प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवा. कांदा बारीक व उभा चिरा.
छोट्या कुकरमध्ये तुप घालुन जिरं व कांदा घालून परतून घ्या.त्यात
तांदूळ घालून परतावे.नंतर मिरचीचे तुकडे आणी आलं लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. थोडा वेळाने 5 वाट्या गरम पाणी घालावे. भात अधर्वट शिजल्यावर टोमॅटो प्युरी घालावी. चवीपुरते मीठ व किंचित साखर घालून झाकण लावून ठेवावे. साधारण 10 मिनिटात भात तयार.
काजू पाकळ्यांची सजावट करून गरमागरम सर्व करा.

2

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

22 Dec 2014 - 3:17 pm | कविता१९७८

तों.पा.सु, इथेही फोटो नाही??????????

माझ्या सासुबाई फारच छान करतात टोमॅटो राईस. *i-m_so_happy*

जर्मनीत शिकल्या असतील टो.भा. म्हणुनच चव असावी भाताला ओरिगिनल!!
होय ना त्रीवेणी?

सविता००१'s picture

22 Dec 2014 - 3:35 pm | सविता००१

मस्त रेसिपी. फोटो दिसत नाहीये गं.

पैसा's picture

22 Dec 2014 - 4:02 pm | पैसा

फोटोंना पब्लिक अ‍ॅक्सेस दे ग मनिमौ. म्हणजे दिसतील!

अजया's picture

22 Dec 2014 - 3:41 pm | अजया

मने,छान पाकृ!
@त्रिवेणी..माझे किनी बै सासरे फार छान करतात टोमॅटो राईस =))

प्रीत-मोहर's picture

22 Dec 2014 - 3:43 pm | प्रीत-मोहर

माझ्या सासरी कुणीच नाही टॉमॅटो राईस करत. ;) मने तुच ये.

मस्त पाकृ बायदवे.

मितान's picture

22 Dec 2014 - 4:18 pm | मितान

नेटवरच्या मंजुळा आज्जी, निशामधुलिकावहिनी, चकलीवन्सं, वाहशेफ भावोजी, तरलाकाकू आणि संजीवमामा या सगळ्यांनी केलेल्या टोमॅटो भातापेक्षा तुझा टो भा सोपा आहे मनिमौ... ;)
मी नक्की करणार. :)
पण मी काय म्हणते, ते तुमच्यात त्यात फोडणी करताना ते हरभरा डाळ नि शेंगादाणे नै घालत का ? त्याने क्रंच का काय येतो म्हणे !!!

मस्त सोपी पाकृ.माझ्या सासुबाईंना पण सांगते करायला..

स्पंदना's picture

26 Dec 2014 - 3:07 pm | स्पंदना

गुणाची गो गुंणाची. साबांना सांग मिपावर सगळ्या सासवाच करतात हा भात म्हणुन.

सविता००१'s picture

22 Dec 2014 - 4:30 pm | सविता००१

प्रिमोकडे जाशील् तेव्हा माझ्याकडेही चक्कर टाक गं. टोमॅटो राईस करायला माझ्याकडेही नाहीत बै सासूबाई-सासरे!

माझ्याकडेहि नाहित सासुबाई-सासरे.त्यामुळे मीच करून बघेन.
पा़कृ छान वाटतीये पण फोटो दिसत नाहियेत मौ.

नाहीत सासुसासरे? मग अनाहितावर चर्चा कसली करणार तुम्ही?
चिंताग्रस्त अनाहिता
अजया

सविता००१'s picture

22 Dec 2014 - 4:42 pm | सविता००१

आत कशावर बोलणार अनाहिता?
अजून एक चिंताग्रस्त अनाहिता
सविता

मधुरा देशपांडे's picture

22 Dec 2014 - 4:46 pm | मधुरा देशपांडे

अगदी अगदी. मी पण तुमच्या सोबत...
अजून एक चिंताग्रस्त अनाहिता
मधुरा

एकच एक हॉट टॉपिक सासुचा..आणी सासुबैच नाही..छ्या..अता अनाहिता बंद पडतय लौकर..

पिलीयन रायडर's picture

22 Dec 2014 - 4:51 pm | पिलीयन रायडर

आता आपण सुनांवर चर्चा करुयात ना ग!!
साबु - साबांवर बोलायचे दिवस (आणी फॅशन) जातील बघ चटकन !!

त्रिवेणी's picture

22 Dec 2014 - 4:41 pm | त्रिवेणी

माझ्या सासु बै ना नेतात का ग तुमच्याकडे.*sad* :-( :( +( =( :-(( :(( +(( =(( :sad:

जाउ दे..त्रिवेणी तुच ये माझ्याकडे.साबांच राहुदेत सध्या.

पा स्त्रि पा स्त्रि का धा ! :P

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

पिलीयन रायडर's picture

22 Dec 2014 - 4:50 pm | पिलीयन रायडर

मी टोमॅटो (१/४ किलो), तांदुळ (१/२ किलो), मीठ (चवीपुरतं) आणि सासु-सासरे (१ जोडी) द्यायला तयार आहे.. कुणीही मला ही रेसेपी करुन द्या...

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2014 - 5:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

...आणि सासु-सासरे (१ जोडी)...

अरे बापरे, ही सामिष पा़कृ झाली की मग :) ;)

त्याऐवजी, पनीर घालून ही पाकृ शाकाहारी करता येईल का ? *scratch_one-s_head*

(हघ्याहेवेसांन)

त्रिवेणी's picture

22 Dec 2014 - 5:42 pm | त्रिवेणी

पनीर,बटाटा,वांगे,तोंड्ली आवडेल ते घ्या.
जाता जाता आज माझ्याकडे तोंड्ली भात आहे. उद्या टाकते रेशिपी.

त्रिवेणी's picture

22 Dec 2014 - 6:11 pm | त्रिवेणी

एक्का काका
(ह्घ्याहेवेनसां)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2014 - 6:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 7:11 pm | टवाळ कार्टा

अंडे घालून करता येइल?

मितान's picture

22 Dec 2014 - 8:13 pm | मितान

अंडे कोण घालणार पण ?
:P

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 8:29 pm | टवाळ कार्टा

मिपावर अंडी घालणारे खूप भेटतील...कोणालातरी पकडू की...त्यातले काही अवतारी सुध्धा आहेत

कविता१९७८'s picture

22 Dec 2014 - 8:44 pm | कविता१९७८

त्या अवतारात टवाळक्या करणारे कीती आहेत हो भाऊ??

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 9:08 pm | टवाळ कार्टा

मिपावर वरचेवर आलात तर असे प्रश्न पडणार नाहित :P

कविता१९७८'s picture

22 Dec 2014 - 9:20 pm | कविता१९७८

काय करणार अनाहीतामध्ये बिझी असतो ना :—)

बॅटमॅन's picture

24 Dec 2014 - 3:34 pm | बॅटमॅन

टोम्याटो राईस बनवून...

अंडे का लपविता??????????????

अशी नवीन कविता पाडायला हर्कत नसावी. =))

पिलीयन रायडर's picture

22 Dec 2014 - 5:58 pm | पिलीयन रायडर

जमेल.. पण "तशी" मजा नाही येणार!

पिलीयन रायडर's picture

22 Dec 2014 - 4:52 pm | पिलीयन रायडर

मने.. रेसेपी बेश्ट!!! आजच करुन पहाणार!!

निवेदिता-ताई's picture

22 Dec 2014 - 4:54 pm | निवेदिता-ताई

हा हा हा,..
स्वता: करून बघा...
हो की नै ग मौ

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 5:00 pm | टवाळ कार्टा

सासुसासरे मी देतो...त्यांच्यासाठी सुनबै पाठवा माझ्याकडे...सगळे मिळून खाउ टोभा ;)

सस्नेह's picture

22 Dec 2014 - 5:18 pm | सस्नेह

आहेत त्यात भागवू आम्ही.
सुनबै टोभा करेलच याची काय ग्यारंटी ? नैतर तुम्हालाच करायला लावायची ! *lol*

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 7:13 pm | टवाळ कार्टा

त्यानिमित्ताने तरी ती येइल ;)

टवाळाकडे कोण देईल मुलगी? घरीच ठेवुन घेऊ त्यापेक्षा ^_~

टवाळा आवडे विनोद, हे वाक्य आपलं सहज आठवलं. ;)

सस्नेह's picture

22 Dec 2014 - 9:49 pm | सस्नेह

पण विनोदला टवाळ आवडतो का ? *wink*

अजया's picture

22 Dec 2014 - 9:53 pm | अजया

=))

सूड's picture

22 Dec 2014 - 9:53 pm | सूड

अर्र लैच!!

स्वप्नांची राणी's picture

22 Dec 2014 - 11:34 pm | स्वप्नांची राणी

टवाळ आणी विनोद एकमेकांना पसंत असतील तर मग सुनबाईची गरजच नसावी.... ;)

टवाळ कार्टा's picture

23 Dec 2014 - 9:47 am | टवाळ कार्टा

अर्रे ए....&!$*#!$!@(!@!@
@##@%$#!#$^%$$&^%$@%#

अर्रे ए,हे काय लिहिलंय !@@#$विनोदला लिहिलेलं इथे आलं काय चुकून!@##$%%^

रुस्तम's picture

23 Dec 2014 - 10:03 am | रुस्तम

=))

टवाळ कार्टा's picture

23 Dec 2014 - 10:06 am | टवाळ कार्टा

ते फुल्या फुल्या फुल्या आहे

प्यारे१'s picture

23 Dec 2014 - 12:36 pm | प्यारे१

उच्च!

उमा @ मिपा's picture

22 Dec 2014 - 5:12 pm | उमा @ मिपा

हे शाब्बास मौ! सोप्पी पाकृ. आजच करते. माझ्या साबांनी कधीच नाही बाई केला हा भात, त्यामुळे आमच्या घरात मीच पयली.

कविता१९७८'s picture

22 Dec 2014 - 5:14 pm | कविता१९७८

केकता कपुर इश्टाईल मधे वाचा बरं का..

काय?*shok**shok* तुमच्या कडे सासुबाई नाहीयेत?*shok*...... .तुमच्या कडे सासुबाई नाहीयेत? *shok*.......तुमच्या कडे सासुबाई *shok*नाहीयेत?

मनिमौ's picture

22 Dec 2014 - 5:34 pm | मनिमौ

धागा शतकी करणार का?

पिलीयन रायडर's picture

22 Dec 2014 - 5:57 pm | पिलीयन रायडर

सुपारी??!!! अगदी... अगदी...!!

आजची पाटी:- इथे पाकृ धागे सुद्धा शतकी करुन देण्यात येतील..!

टोम्याटो राईस लै वेळेस खाल्ला नाय, पण जवा जवा खाल्ला तवा तवा आवडला. तस्मात् हा करून बघितल्या जाईल.

सव्यसाची's picture

22 Dec 2014 - 7:36 pm | सव्यसाची

पाकृ मस्त आणि सोपी आहे.
पण फोटो दिसत नाही आहेत. :(

आजच्या सुना उद्याच्या सासवा ;)
असो! आम्हाला वादात नाही तर भातात विन्टरेस्ट.
माई, टोमॅटो राईस वाढा थोडा.

पाशवी शक्ती भलत्याच अ‍ॅक्टीव्ह झाल्यात धाग्यावर !! =))))

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2014 - 10:31 pm | अत्रुप्त आत्मा

अवांतरः- खरं आहे... :D

मूळः- मस्त हाय ट्याम्याटू रैस! *HAPPY*

फोटो दिसत नाही पण पाकृ वाचून वाटतं चांगलाच झाला असेल टोमॅटो भात.

लवकरच करून चव चाखण्यात येईल.

मुक्त विहारि's picture

22 Dec 2014 - 10:47 pm | मुक्त विहारि

माझा गणेशा झाला....

असो,

निदान रेसीपी तरी समजली.

भाताचे कुठलेही प्रकार आवडत असल्याने, हा पदार्थ पण नक्कीच करून बघणार...

पैसा's picture

23 Dec 2014 - 9:45 am | पैसा

माझा आवडता प्रकार!

(अवांतरः टवाळाला एक सासूबै शोधून द्या गो! नैतर तुम्ही कसल्या अनाहिता?)

प्रीत-मोहर's picture

23 Dec 2014 - 11:37 am | प्रीत-मोहर

अग टवाळाला कोण ग बै देईल मुल्गी? मी तर घरीच ठेवुन घेईल त्यापेक्षा.

टवाळ कार्टा's picture

23 Dec 2014 - 11:41 am | टवाळ कार्टा

ठेवा घरीच...मी...जौदे

प्रसाद गोडबोले's picture

24 Dec 2014 - 12:55 pm | प्रसाद गोडबोले

मिपावर साबुसाबैसुचक मंडळ सुरु करताय का पैसा ताई ? =))

पैसा's picture

24 Dec 2014 - 3:18 pm | पैसा

गुड्ड आयड्या! साबासाबुंबरोबर एक बायको/नवरा फ्री अशी झैरात करता येईल!

कविता१९७८'s picture

24 Dec 2014 - 3:32 pm | कविता१९७८

सहीच *lol*

टवाळ कार्टा परत अनाहितांच्या वाटेला जाणार नाही असं दिसतंय.

टवाळ कार्टा's picture

23 Dec 2014 - 10:08 am | टवाळ कार्टा

यावर "व्यवस्थित" लिहिले असते पण इथे घरचेच अनाहितांना फितूर आहेत त्याचे काय

आयला!! कोण फितूर आहे म्हणे?? *shok* *help*

बॅटमॅन's picture

23 Dec 2014 - 2:34 pm | बॅटमॅन

कोण फितूर आहे त्यांना उद्देशून एक अनावृत पत्र लिहिले जावे. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2014 - 2:56 pm | अत्रुप्त आत्मा

खाटुकशी शमत हाय! =))

सूड's picture

23 Dec 2014 - 3:04 pm | सूड

+१

माझ्याकडे साबु_साबा नैत. मीच त्यांच्याकडे असतो.....

कविता१९७८'s picture

23 Dec 2014 - 3:45 pm | कविता१९७८

सौ. ना आराम दिसतोय.

एस's picture

23 Dec 2014 - 3:59 pm | एस

आमच्या सा.बा. चं आणि आमचं अजिबात पटत नसल्यामुळे हा टोमॅटोभात अजिबात खाणार नाही. (सौ.पण अजिबात बनवणार नाहीत. "मिपावरची रेसिपी ना? मग करत बसा तुम्हीच!" हे मला तिने बोलण्याआधीच ऐकू येतंय..!)

बादवे, इथल्या कुणा अनाहितांना आमच्यासारख्यांची दया आली आणि एखादं अर्धंमुर्धं आवतण भ्येटलंच तरच कायतरी चानस् हाय!

-(आशाळभूत),
मीच तो!

(रच्याकने, शंभरला अजून किती कमी आहेत? टोभा मिळाल्यास १०० काय, २०० ची पण सुपारी घेतो. बोला...

आमचें येथें धाग्याचीं शंभरी भरवायचें कंत्राट स्वीकारलें जाईल - म्हणजें शंभर प्रतिसाद हो! तुम्हांला कांय वाटलें?)

पाटावरच्या पांढर्‍या पाकिटात काय आहे हे कळायला मान खूऽऽऽऽऽऽपच म्हणजे खूपच तिरकी करावी लागली तेव्हा वाचता आले! :-P

ते मीठ, साखर आणि कोथिंबिर काही नव्हती 'साहित्य' च्या लिस्टमध्ये. संमं, ते पण करून टाका चला! ;-)

खटपट्या's picture

23 Dec 2014 - 10:31 pm | खटपट्या

अहो पांढर्‍या पाकीटावर काय लीहीलय ते मान तीरकी करूनही दीसत नाहीये. पूर्ण वटवाघळासारखे लटकावे लागणार तेव्हा दिसेल. नाहीतर लॅपटॉप उल्टा करावा लागेल. :)

मुक्त विहारि's picture

23 Dec 2014 - 10:47 pm | मुक्त विहारि

बरोबर...

मी पण लॅपटॉप उल्टा करूनच बघीतले.

ती "आले-लसूण" पेस्ट आहे.

पण ऑफिस मधे मी डेस्कटॉप कसा उलटा करु?

मग शिरसान करुन "योगा" प्रेमी असल्याचे ऑफिस मधल्या मंडळींना पटवुन ध्या ! :P

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ}
Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report
As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets
All About Arihant

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 5:15 pm | टवाळ कार्टा

त्यापेक्षा "Ctrl + Alt + Down Arrow key" एकत्र दाबा हा.का.ना.का.

दिपक.कुवेत's picture

24 Dec 2014 - 5:18 pm | दिपक.कुवेत

उपाय आहे!!!

दिपक.कुवेत's picture

24 Dec 2014 - 5:20 pm | दिपक.कुवेत

पेस्ट बरोबर दिसली पण बाकि सगळे उलटे झाले....

दिपक.कुवेत's picture

24 Dec 2014 - 5:21 pm | दिपक.कुवेत

शीकायची आहे एकदा व्बॉ...

टोभा सारखा सारखा अपडेट होतो आहे, कोथिंबीर कमी पडली काय ? *LOL*

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

ह्म्म फोटो आले. शेवटल्या फोटोत दोन वाडग्यांच्या मधले दह्याचे शिंतोडे आणि डाव्या बाजूला खालच्या कोपर्‍यात पडलेली कोथिंबीर वगळता फोटो मस्त आलाय.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2014 - 5:27 pm | अत्रुप्त आत्मा

@दह्याचे शिंतोडे आणि डाव्या बाजूला खालच्या कोपर्‍यात पडलेली कोथिंबीर वगळता फोटो मस्त आलाय.>>>> घेतालान सूड मेल्यान! :-D

दिपक.कुवेत's picture

23 Dec 2014 - 5:28 pm | दिपक.कुवेत

हो नं...आयडि च्या नावाला पुरेपुर जागतो मेला!!!

त्रिवेणी's picture

23 Dec 2014 - 6:09 pm | त्रिवेणी

अ रे दे वा.
अ हो ती चि त्रा हु ती आहे.

चित्रावती ?(चित्राहुतीचा अपभ्रंश) काय की!! असो. =))))