काटा

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
16 Dec 2014 - 7:06 pm

टिपः हि बातमी वाचून जिवाचे पाणी झाले. आणि मग हे उमटले.

---------------------------------

संपूर्ण शरीरावरचे केस
सरसरुन उभे राहीलेत
काटा येणं त्यालाच म्हणत असावे
----
छोट्या छोट्या अर्धोन्मिलित कळ्या
राक्षसी जात्याखाली चिरडून
त्यांचे रक्त जमिनीवर
सडा घातल्यासारखे पसरुन दिले आहे
ते पाहून जे झालं
काटा येणं त्यालाच म्हणत असावे
----
रखरखित धरतीवर
नुकत्याच कोंब फुटलेल्या
कोवळ्या पालवीवर
रनगाडे चालवून
हिरवाकंच मातीत मिसळून
काळे ठिक्कर पाडलेय
ते पाहून जे झालं
काटा येणं त्यालाच म्हणत असावे
-----
वृंदावनात तरारुन
आलेल्या तुळशीच्या मंजिर्‍या
सैनिकी बुटाखाली
चिरडतांना पाहून जे झालं
काटा येणं त्यालाच म्हणत असावे
----
बधिर होऊनही
चर्र झाले
काटा येणं त्यालाच म्हणत असावे
काटा येणं त्यालाच म्हणत असावे

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१६/१२/२०१५)

कविता

प्रतिक्रिया

यसवायजी's picture

16 Dec 2014 - 7:14 pm | यसवायजी

:(

मि.का.
तुमची कविता आवडली वेगळी वाटली.
तुम्ही वापरलेल्या प्रतिमा तर फारच विलक्षण.
खास करुन तुळशीच्या मंजिरी ची
तुमच्या संवेदनेत सहभागी आहे.

विवेकपटाईत's picture

16 Dec 2014 - 8:09 pm | विवेकपटाईत

कविता आवडली, आज १६ डिसेंबर आहे, ती दुर्दैवी घटना आज घडली होती. दोन वर्षांत काही ही फरक पडला नाही. दिल्लीत आज ही रात्री ८ नंतर मुलीना एकटे जाण्याची भीती वाटते.

प्रसाद गोडबोले's picture

16 Dec 2014 - 8:42 pm | प्रसाद गोडबोले

जबरदस्त रॉ मटेरियल आहे ;)

आमच्या ह.कवी मित्रांना कळवतो =))

सवांतर : काटा येण्यासारखं काही नाही , पुढे जाऊन हे १२० आपल्याच काश्मीरात घुसणार होते दहशत माजवायला नाहीतर तिथेच राहुन भारता बद्दल गरळ ओकायला *beee* म्हणुनच म्हणतोय "तत्र का परिदेवना ??"

कवितानागेश's picture

16 Dec 2014 - 9:52 pm | कवितानागेश

असहमत.
मुले ती मुले. त्यात देशाचा किंवा अन्य बाबींचा सम्बन्ध नाही.
आपणही 'आय फ़ॉर अन आय' असा विचार केला तर तिथल्या राक्षसात आणि इथल्या माणसांत फरक काय उरला?
घडलय ते भयानकच आहे, त्यातून वाचलेल्यांनी शाहणे व्हावे ही सदीच्छा.

टवाळ कार्टा's picture

16 Dec 2014 - 10:38 pm | टवाळ कार्टा

कशाला भांडताय...ते नेहमी १०व्या माणसासारखे वागतात....माहित नाही का ;)

प्रसाद गोडबोले's picture

17 Dec 2014 - 12:40 pm | प्रसाद गोडबोले

१०व्या माणसासारखे

१० वा माणुस म्हणजे काय ?

खटपट्या's picture

16 Dec 2014 - 10:38 pm | खटपट्या

असहमत !!

चित्रात दाखवलेली मुले पुढे जाउन दहशतवादी होणार होती असे वाटते का तुम्हाला? वाटत असले तरीही दुष्मनाची मुले ती मुलेच.
abcd

प्रसाद गोडबोले's picture

17 Dec 2014 - 11:58 am | प्रसाद गोडबोले

वाटत असले तरीही दुष्मनाची मुले ती मुलेच.

शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोहीमे नंतर चंद्रराव मोर्‍याची दोन कोवळी पोरे मारली होती त्या बद्दल आपले काय मत आहे ?

शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोहीमे नंतर चंद्रराव मोर्‍याची दोन कोवळी पोरे मारली होती त्या बद्दल आपले काय मत आहे ?

प्रगो, खटपट्याने त्यांचं मत मांडलंय त्यातून त्यांची विचारसरणी कळली. आणि तुम्ही जे काय लिहीलंय त्यातून तुमची!!

इतिहासातले दाखले देऊन या गोष्टीचं जस्टीफिकेशन करत असाल तर आनंद आहे. फार लिहीलं तर कवीच्या प्रतिभेचा अपमान होईल.

संवेदनशील मनाच्या कवीने लिहीलंय, सो तुम्हाला त्यातील संवेदनशीलता कळायलाच हवी अशी अपेक्षा नाही. :)

प्रसाद गोडबोले's picture

17 Dec 2014 - 4:19 pm | प्रसाद गोडबोले

संवेदनशील मनाच्या कवीने लिहीलंय, सो तुम्हाला त्यातील संवेदनशीलता कळायलाच हवी अशी अपेक्षा नाही.

संवेदनशील मनाच्या कवीची २६-११ च्या घटनेवरची कविता पहाण्यात नाही ... बहुतेक तेव्हा मेले ते लोक संवेदना जागृत करायला पुरेसे नसावेत आसे वाटते

इतके बोलुन मी माझे चार शब्द संपवतो .

लेखनसीमा
_______________________________________________________________

>>२६-११ च्या घटनेवरची कविता पहाण्यात नाही ... बहुतेक तेव्हा मेले ते लोक संवेदना जागृत करायला पुरेसे नसावेत आसे वाटते

हो, किंवा मिपावर त्यांचा आयडी तोवर नसावा हेही शक्य असू शकतं. नाही का?

आयमीन, त्यामुळे त्यांनी लिहीली असली तरी मिपावर शोधून सापडणार नाही. आणि त्यामुळे लिहीलीच नसेल असं गृहित धरुन जे काही तुम्ही लिहीलंत त्याने तर आणखीच कवतिक वाटलं.

Yash's picture

16 Dec 2014 - 10:38 pm | Yash

छान कविता आहे. खूप वेगवेगळी उदाहरण दिली आहेत तुम्ही.

चुकलामाकला's picture

17 Dec 2014 - 7:20 am | चुकलामाकला

आज कुछ बस्ते घर नहीं जायेंगे .....
वो 26/11था आज 16/12 है,
कल धरती हमारी थी हथियार तुम्हारे थे,
आज धरती भी तुम्हारी है हथियार भी तुम्हारे है,
हमे दुःख कल भी था आज भी है...

खटपट्या's picture

17 Dec 2014 - 9:01 am | खटपट्या

क्या बात है !

मारवा's picture

17 Dec 2014 - 8:02 am | मारवा

हमे दुख कल भी था
आज भी है
वा

काळा पहाड's picture

17 Dec 2014 - 10:01 am | काळा पहाड

मुलांबद्दल दु:ख होणं ठीक आहे. ते कुठल्याही संवेदनशील माणसाला होईलच. पण उगीच कविता बिविता लिहून गळे काढू नका. या लोकांचे आईबापच यांच्या ('आतंक हेच धोरण') या राष्ट्रीय प्रणालीचे पाठिराखे आहेत. आज तो भस्मासूर त्यांच्यावरच उलटलाय तर त्यांना दु:ख होतंय. काश्मिरी पंडीत मुलांचं काय? किती मुलांना पाकिस्तानात जबरदस्तीनं मुस्लिम व्हावं लागलंय? त्यांचं काय? त्यावेळी आले होते का हे लोक मोर्चा किंवा विरोध करायला? त्यात हे आर्मीचे स्वतःचे लोक आहेत (जी संपूर्णपणे भारतविरोधी आहे) हे लक्षात ठेवा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Dec 2014 - 11:22 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मुलांबद्दल दु:ख होणं ठीक आहे. ते कुठल्याही संवेदनशील माणसाला होईलच. पण उगीच कविता बिविता लिहून गळे काढू नका.

अहो, माणसांचेच कच्चेबच्चे होते ते.

या लोकांचे आईबापच यांच्या ('आतंक हेच धोरण') या राष्ट्रीय प्रणालीचे पाठिराखे आहेत. आज तो भस्मासूर त्यांच्यावरच उलटलाय तर त्यांना दु:ख होतंय. काश्मिरी पंडीत मुलांचं काय? किती मुलांना पाकिस्तानात जबरदस्तीनं मुस्लिम व्हावं लागलंय? त्यांचं काय? त्यावेळी आले होते का हे लोक मोर्चा किंवा विरोध करायला? त्यात हे आर्मीचे स्वतःचे लोक आहेत (जी संपूर्णपणे भारतविरोधी आहे) हे लक्षात ठेवा.

त्याचा इथे काय संबंध? गाय आणि वासरु मारणारे दोघेही वाईटच असतात.
पण त्यातल्यात्यात वासरु मारणार्‍यांची जास्त घृणा वाटते. काय चुकलं?
संवेदना तीव्र असलेल्यांना त्रास होतो.. काय चुकलं?

असो.

काळा पहाड's picture

17 Dec 2014 - 5:12 pm | काळा पहाड

त्याचा इथे काय संबंध? गाय आणि वासरु मारणारे दोघेही वाईटच असतात.
पण त्यातल्यात्यात वासरु मारणार्‍यांची जास्त घृणा वाटते. काय चुकलं?
संवेदना तीव्र असलेल्यांना त्रास होतो.. काय चुकलं?

उद्या पाकिस्तानने संवेदनाशील लोकांच्या अभिव्यक्तीचा फायदा स्वतः दहशतवादाची शिकार कशी होतेय ते सांगण्यासाठी करू नये एवढीच इच्छा. तसं झालं तर त्याचा प्रतिवाद तथाकथित असंदनाशील लोकांवर टीका करणारे तथाकथित संवेदनाशील लोक कसा करतील हे बघणं मनोरंजक ठरेल. आजपर्यंतच्या कृत्यांबद्दल पाकिस्तान ने नाक घासून माफी मागितल्या नंतर आम्हीही या शोकसंवेदनेत सामील होवू. ताक फुंकून पिणं यालाच म्हणतात.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Dec 2014 - 7:18 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तुम्हाला नमस्कार!
मला अजुन काहीच बोलायचे नाही.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Dec 2014 - 8:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

धन्यवाद!

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Dec 2014 - 10:23 am | ज्ञानोबाचे पैजार

जे झाल ते नक्कीच घॄणास्पद, निंदनिय आणि मानवतेला काळिमा फासणारे आहे.

वादासाठी एकवेळ मान्य केले की पाकिस्तान भारताचा दुष्मन देश आहे. तरी सुद्धा त्या लहानग्यांच्या बाबतीत असे घडायला नको होते.

विज्ञान आणि तंत्रज्ञान जसजसे पुढे जात आहे तस तसा मानव जंगली प्राण्यांपेक्षा जंगली होत चालला आहे. काय कामाची आहे ही असली प्रगती?

पैजारबुवा,

दहशतवादाला न जात असते न धर्म, न नाती असतात न नीती !
त्यांची एकच जात ती म्हणजे माणुसकी शून्य क्रूरता !

"अपनी मर्जी से तो
मजहब भी नही उसने चुना था
उसका मजहब था जो
मां बाप से ही उसने
विरासत में लिया था
अपने मां बाप चुने कोई
ये मुमकिन ही कहा है

मुल्क में मर्जी थी उसकी
न वतन उसकी रजा से
वो थो कल नौ ही बरस का था
उसे क्युं चुनकर
फिरकादाराना फसादात ने
कल कत्ल किया ?
- कवी गुलजार

प्रसाद गोडबोले's picture

17 Dec 2014 - 11:57 am | प्रसाद गोडबोले

दहशतवादाला न जात असते न धर्म, न नाती असतात न नीती !

बरं . चला ह्या वाक्याची चिकित्सा करु .

सिडनीत दहशत माजवणार्‍याचे नाव काय आहे ?
२६-११ ला मुंबईत राडा केला त्या अतिरेक्यांची नावे काय आहेत ?
संसदेवर हल्ला केला त्या अतिरेक्यांची नावे काय आहेत ?
बामियान्च्या अप्रतिम सुंदर बौध्द मुर्ती उध्वस्त केल्या त्या अतिरेक्यांची नावे काय आहेत ?
सीरीयात अमेरिकी ब्रिटीश पत्रकारांना छळुन छळुन मारले त्या लोकांची नावे काय आहेत५ ?
आणि पाकिस्तानात लहान पोराअंना मारले त्या दहशत वाद्यांची नावे काय आहेत ?

आधी ह्या प्रशांची उत्तरे द्या ... म्हणजे तुम्हाला दहशतवादाचा खरा रंग कळेल !!

चाणक्य's picture

17 Dec 2014 - 2:01 pm | चाणक्य

जे झालं ते वाईट झालं.शेवटी पेराल ते उगवेल.

संवेदनशील मनातून अशा घटनेबाबत प्रतिक्रिया उमटली नाही तरच नवल!
कविता आवडली असं तरी कसं म्हणावं?

बाकी मुलांना मारणारी सुद्धा विशीतली पोरंच होती हे वाचलं.
१२-१३ ते २५-२८ पर्यंत च्या पोरांना पकडून त्यांचा ब्रेनवॉश करुन त्यांचा वापर करुन घेणारे लोक आहेत हे.
माणूस कधी होणार आपण? :(

मदनबाण's picture

17 Dec 2014 - 3:54 pm | मदनबाण

@मिका
भापो...

माणूस कधी होणार आपण?
हे पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या राज्यकर्त्या कम सौन्य कम आयसआय कम मुजाहिदीन यांना विचारावे...
आता हेच पाकडे या घटनेचा वापर करुन आम्हीच दहशदवादाचे शिकार कसे आहोत असे सगळ्यांना सांगत बसतील..पण त्याना पोसले आणि मोठे कोणी केले या बद्धल ब्र सुद्धा काढणार नाहीत...
असो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलित

प्रसाद गोडबोले's picture

17 Dec 2014 - 4:01 pm | प्रसाद गोडबोले

माणूस कधी होणार आपण?

९२ च्या मुंबईतील बाँबस्फोटांचा सुत्रधार अन २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार पाकिस्तानने सविनय आणि खेदपुर्वक भारताच्या ताब्यात दिला की तुम्हला माणुस व्हायला चांगला मुहुर्त आहे असे सुचवु इच्छितो बुवा :D

हे दात दाखवायच बंद केल तर जास्त लवकर माणुस होता येईल.

मदनबाण आणि प्रगो दोघांसाठीही.

मी देशाच्या आणि धर्माच्या अभिनिवेशाच्या पलिकडं जाऊन गेलेल्या प्रत्येक मुलाची आणि त्याच्या आईची जी ताटातूट झाली आहे त्या संदर्भात बोलतो आहे. जे टाळता येणं सहज शक्य आहे त्याची केवढी मोठी किम्मत भोगावी लागत आहे ह्याचा काही विचार?

हीच भावना प्रत्येक अतिरेकी हल्ला, बेजबाबदारीनं केला गेलेला अपघात, खून, मारामार्‍या ह्याबाबत असेल. असो!

प्रसाद गोडबोले's picture

17 Dec 2014 - 5:23 pm | प्रसाद गोडबोले

प्यारेबुवा ,

तुम्ही धर्माच्या अन देशाच्या अभिनिवेशापार गेला आहात विश्वात्मक जाहला आहात , आम्ही अजुन भौतिकातच आहोत

पुण्यात्मा आणि पापात्मा | दोन्हीकडे अंतरात्मा |
परी साधु भोंदु ही सीमा | सांडुच नये ||

असा आमचा सोप्पा नियम आहे ,

ही पोरं काय पुढे जाऊन शांततेसाठी काम करणार होती काय ? खैबर पख्तुन्वा पेहावर वझीरीस्तान मधील परीस्थिती आपणास ठाऊक नाही काय ? दहशतवादी कोठे अन कसे तयार होतात ह्यबद्दल आपण अनभिज्ञ आहात की डोळ्यावर कातडी ओढुन घेतली आहे ?

इतरत्र कोठेही ही घटना झाली असती तर आम्ही हळहळ व्यक्त केली असती , तुका म्हणे एका देहाचे अवयव | सुखदुख जीव भोग पावे || अशी आमचीही अवस्था आहेच की !!
, पण पाकिस्तान , गाझापट्टी , इराण , इराक , सीरीया , इन जनरल मध्यपुर्वेतील अशा कोणत्याही घटने बद्दल आम्हाला काडी मात्र खेद वाटत नाही .

कर्मणो गहना गति: ||

करता था तो क्यूँ रहा अब काहे पछताये,. बोवे पेड बभूल का, आम कहासे खाये.
असं कबीर म्हणुन गेलेत.

आपल्यासारख्या ज्येष्ठ लोकांनी अशी डोळेझाक करणं बरं नव्हे .

असो . पांडुरंग | पांडुरंग ||

प्यारे१'s picture

17 Dec 2014 - 5:57 pm | प्यारे१

असहमतीबद्दल सहमत आहोत. असो!

मी देशाच्या आणि धर्माच्या अभिनिवेशाच्या पलिकडं जाऊन गेलेल्या प्रत्येक मुलाची आणि त्याच्या आईची जी ताटातूट झाली आहे त्या संदर्भात बोलतो आहे. जे टाळता येणं सहज शक्य आहे त्याची केवढी मोठी किम्मत भोगावी लागत आहे ह्याचा काही विचार?
झालं ते फार वाईटच... पण पाकिस्तानी लोकांनी / पत्रकारांनी कारगिल युद्धातल्या मधल्या कॅप्टन कालिया आणि साथिदारांना ज्या क्रूरपणे ठार करण्यात आले त्या बद्धल गझल... शायरी... गेला बाजार निशेध व्यक्त केलेला दिसला ? कालियाच्या वडिलांना झालेल्या वेदनेच काय ? पाकड्यांच्या दुखः बद्धल आम्हाला उमाळे यावे असं कोणत गोड फळ त्यांनी आम्हाला दिल आहे ? आमची इतकी माणसं सातत्याने हे ठार मारत आहेत त्या बद्धल काय ? का हिंदूस्थानात ठार केलेले सगळेच लावारिस होते ? त्यांच्या बद्धल पाकड्यांना काही आहे का ? पंजाबची अख्खी तरुण पिढी या पाकिस्ताननी ड्र्ग्स सप्लाय करुन करुन खराब करुन टाकली आहे ! आज यांची कच्च्ची-बच्ची ताड ताड करुन मेली तेव्हा यांना अल्लाह आठवला काय ? इकडे हजारो मेले त्याच काहीच नाही कोणाला !
ज्याप्रमाणे साप गरळ ओकायचा थांबत नाही, विंचू डंख मारायचा थांबत नाही आणि पिसाळलेला कुत्रा चावायचा थांबत नाही, त्याचप्रमाणे पाकडे दहशदवादाला पोसाणं थांबवणार नाहीत ! आपला देश इतके वर्ष या देशानी आपल्यावर थोपवलेले प्रॉक्सीवॉर लढत आहे, त्यांच्या बद्धल उगा जास्त सांत्वन दाखवण्याची आणि भावनाशील होण्याची गरज नाही !
ज्यांची वॄत्तीच अघोरी आहे त्यांच्याकडुन माणुस होण्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे कमालिचा भाबडेपणा किंवा कमालिचा मूर्खपणा अंगी असायला हवा...
असो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Fed calls time on $5.7 trillion of emerging market dollar debt
Oil's Price Decline Weighs On High Yield Debt
U.S. shale junk debt tumbles amid oil crunch

अरे बाबांनो त्या टप्प्यावर मी जातच नाहीये. मी अगदी प्राथमिक बोलतोय.
तुमचं सगळंच मान्य आहे. पण तरीही ... समझा करो!

बाकी अपर्णा इथंच का दुसर्‍या धाग्यावर म्हणाली की ह्याच पोरांनी आपल्या सैनिकांची डोकी कापून नेल्यावर टाळ्या पिटल्या असतील.
हो! नक्की पिटल्या असतील. त्यांना शिकवणच ती आहे. जो समाजच रानटी आहे त्या समाजात ती पोरं वाढत आहेत. हातात खेळायला बंदुका नि पिस्तुलं मिळतात, रक्ताची कारंजी रोज दिसतात, भारतद्वेष हा एक कलमी कार्यक्रम राबवला जातोय त्या देशामध्ये ती पोरं जन्मली. त्या पोरांचा दोष आहेच. ती तिथं जन्मलीत. टाळ्या पिटणारच!
आणि म्हणून ती मेली हे बरंच झालं असं म्हणायला हरकत नाही.

बाकी जर तर ला फार अर्थ नसतो त्यामुळं ह्या सगळ्यांना तरतमभाव शिकवला गेला, डोळ्यावरची नको ती झापडं काढली गेली तर वगैरे बोलण्यात अर्थ नाही.

सूड's picture

17 Dec 2014 - 4:10 pm | सूड

नेमकं लिहीलंय.

श्रीगुरुजी's picture

17 Dec 2014 - 8:51 pm | श्रीगुरुजी

कवितेत भावना चांगल्या मांडल्या आहेत. काही झालं तरी इतक्या लहान मुलांचा बळी जायला नको होता.

या घटनेतून पाकिस्तानला अक्कल सुचून दहशतवादाला पाठिंबा देण्याचं बंद केलं तरच या मुलांच्या बलिदानाला अर्थ राहील.

सस्नेह's picture

18 Dec 2014 - 12:38 pm | सस्नेह

भावना पोचल्या. __/\__

सौंदाळा's picture

18 Dec 2014 - 2:29 pm | सौंदाळा

दु:ख, हळहळ व्यक्त केली लोकांनी तिथपर्यंत ठिक आहे.
पण गेले दोन दिवस शाळांमधे मौन पाळणे, मेणबत्ती मोर्चे काढणे, विद्यार्थांच्या पदयात्रा वगैरे काढणे हे अतीच वाटते.
मला तर कधी कधी वाटते वरील रिकामे धंदे करणार्‍या बहुतांश मोर्चाबहाद्दर लोकांना हळ्हळ व्यक्त करण्यापेक्षा अशा प्रसंगांचा एकप्रकारे इव्हेंट करुन स्वतःच व्यक्त होण्याची विकृती जडली आहे.

नाखु's picture

18 Dec 2014 - 2:42 pm | नाखु

तरी पण "मेण्बत्ती" वाले ज्या तडफेने आणि त्वेशाने "फाशी रद्द्/धर्मांतर" बद्दल बोलतात त्यांचा कंठ (की कंड) सुकला की काय?
चला आता थोर्र्-थोर्र मानवतावादी शोधा बरं मिपावर मिपाबाहेरही *scratch_one-s_head* *SCRATCH* (वाटल्यास जाहीरात द्या)
बहुतेक इतिहासातील हिंदुविरोधी दाखले शोधत बसले अस्तील त्याच मेण्बत्तीच्या प्रकाशात!!

बॅटमॅन's picture

18 Dec 2014 - 2:55 pm | बॅटमॅन

अगदी अगदी सहमत!!!!

शिद's picture

18 Dec 2014 - 3:04 pm | शिद

1

पाकिस्तान दहशतवादाबद्दल कितपत गंभीर आहे?

पाकमध्ये 26/11चा आरोपी लख्वीला जामीन

गौरी लेले's picture

19 Dec 2014 - 1:40 pm | गौरी लेले

:(

फार संवेदनशील कविता ... सुंदर तरी कसे म्हणु :(