नवलकोलची भाजी

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
7 Dec 2014 - 5:23 pm

साधारणपणे भात कापणीनंतर कोकणात लाल माठ, मुळा, नवलकोल, गावठी मिरच्या इत्यादी भाज्या लावल्या जातात. याच सिझनला त्या मिळतात. ज्यांनी नवलकोलची भाजी पाहिली नाही, त्यांच्यासाठी हा फोटो आंतरजालावरून साभार.
navalcol
साहित्यः दोन जुड्या नवलकोल, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, दोन/तीन सुक्या लाल मिरच्या, तिखट, मीठ, गूळ, ओले खोबरे(ऐच्छीक).
कृती: नवलकोलच्या कांद्यांवरील कोवळी पाने काढून धुऊन बारिक चिरावीत. कुकरला दोन शिट्या करून घ्याव्या. नवलकोलच्या कांद्याची साले काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी कराव्या. नेहमीप्रमाणे फोडणी करावी, फोडणीत सुक्या मिरच्या घालाव्या. त्यावर चिरलेल्या फोडी टाकून थोडे पाणी घालून शिजवून घ्याव्या. फोडी शिजल्या की चवीनुसार तिखट, मीठ, गूळ घालावे. शिजलेली पाने मिक्स करावीत. आवडत असल्यास थोडे ओले खोबरे घालावे. गरमागरम पोळीबरोबर भाजी फस्त करावी. या भाजीत फोडीबरोबर पानेही घातल्याने भाजी छान लागते.
navalcol

प्रतिक्रिया

नुसत्याच कि काय घालून?? नवलकोल तर फोडणीत वाफेवर शीजवलेला दिसतोय. असो. हि भाजी खुप आवडते पण तो नवलकोल शीजताना नाकि नउ येतात.

अनन्न्या's picture

7 Dec 2014 - 9:32 pm | अनन्न्या

नवलकोलचा कांदा कापल्यावर जर आत पांढय्रा रेषा दिसल्या आणि चिरताना सहज चिरला नाही गेला तर तो घेऊ नका.

टवाळ कार्टा's picture

7 Dec 2014 - 10:12 pm | टवाळ कार्टा

तुम्ही भाजी घेताना ती "चिरुन" बघता???

अजया's picture

7 Dec 2014 - 6:24 pm | अजया

कधी अाणलाच नाही नवलकोल.तू पाकृ टाकली आहेस तर आणून बघेन.

दिपक.कुवेत's picture

7 Dec 2014 - 7:12 pm | दिपक.कुवेत

वाफेवर फार वेळ लागतो का?

अनन्न्या's picture

7 Dec 2014 - 9:21 pm | अनन्न्या

ती नुसत्या वाफेवर शिजवून भाजी मिळून येत नाही, हे माझे मत. नवलकोल शिजतो खरंतर पण तरीही तुम्ही तोही कुकरला लावून घेऊ शकता.

अच्छा! हा वेगळा प्रकार आहे. माझ्या समजुतीप्रमाणे तू फक्त पाने कुकरला उकडून घेतलीयेस आणि नवलकोल साले काढून चिरलायस ना? करून बघते.
मी भिजवलेली हरभरा डाळ घालून करते. नवलकोलाच्या काचर्‍या साले काढून करते. ओला नारळ, हि. मिरच्या, कोथिंबीर, मीठ. पानांचा उपयोग कसा करावा ते समजत नव्हते. आता कोवळी पानेही घालत जाईन.

तुझी आणि रेवाक्का दोघींची रेसिपी एकत्र केली आणि आज केली भाजी . पानं पण टाकली आणि हरभरा डाळ पण. मी आज पहिल्यांदाच केली आणि पहिल्यांदाच खाल्ली. नवरा लग्न झाल्यापासून नवलकोलची भाजी कर म्हणतोय , तुझ्या पाक्रु मुळे आज आला एकदाचा तो योग :)

अविनाशकुलकर्णी's picture

7 Dec 2014 - 9:03 pm | अविनाशकुलकर्णी

किसुन पण करत्तात ना?

नवलकोल दोन भाग करून खवणून घेऊन त्यातच मूगडाळ मिसळून भिजत ठेवायची. डाळ भिजली की फोडणीत परतून कोथिंबीर, ओलं खोबरं घालून मस्त लागते.

मुक्त विहारि's picture

7 Dec 2014 - 10:39 pm | मुक्त विहारि

मी तर बर्‍याच वेळा नुसतीच खातो.

पोळ्यांबरोबर ही भाजी खाण्यापेक्षा, आमटी-भातात ही भाजी कालवून खायला मला जास्त आवडते.

उदय के'सागर's picture

8 Dec 2014 - 10:04 am | उदय के'सागर

बाजारात नेहमी फ्रेश नवलकोल पहातो आणि घेण्याचा मोह होतो पण ती कशी बनवतात ह्याची विशेष माहिती नव्हती. पाककृती विभागात ह्या भाजीबद्दल वाचलं आणि उत्साहाने धागा उघडला पण हिरमोड झाला :( पाककृती एवढी थोडक्यात देण्याऐवजी थोडी सविस्तर द्यायला हवी होती (एकतर फोटो ही नाहीत क्रमवार, पण ते ही असो सविस्तर असती तरी चाललं असतं). तरीही जे काय समजलं आहे सध्या त्यावरून बनवून पाहीन.

सविता००१'s picture

8 Dec 2014 - 11:09 am | सविता००१

खूप सुरेख लागते ही भाजी. आणि रेवाक्काने लिहिलय ती पण.
मला मुवि म्हणतात ते अगदी पटतं. ही भाजी पोळीपेक्षा आमटी भाताबरोबर बेस्टच लागते.

अनन्न्या's picture

8 Dec 2014 - 11:23 am | अनन्न्या

@टवाळ कार्टा, त्यांनी घरी आणलेल्या नवलकोलबद्दल लिहीलय ते, घेताना चिरून नाही बघावा लागत, नेहमी घेणाराला कळतं.
@अधाशी उदय, यात सविस्तर देण्यासारखी कृतीच कुठे आहे? आणि बाकी वस्तूही नेहमी भाजीत घालतो त्याच आहेत. करून पहा, खरच छान लागते.
@अजया, करून बघ, नेहमीच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो.
@रेवती, पाने नुसती कांद्यावर परतून पीठ पेरूनही करता येते, पण यातच पाने चांगली लागतात.
सविता, मुवि, अविनाश कुलकर्णी आणि सर्वांचे आभार.

टवाळ कार्टा's picture

8 Dec 2014 - 11:46 am | टवाळ कार्टा

नवलकोलचा कांदा कापल्यावर जर आत पांढय्रा रेषा दिसल्या आणि चिरताना सहज चिरला नाही गेला तर तो घेऊ नका.

hitesh's picture

8 Dec 2014 - 12:58 pm | hitesh

तर तो खायला घेऊ नका.

टाकुन द्या.

विजय पिंपळापुरे's picture

8 Dec 2014 - 4:20 pm | विजय पिंपळापुरे

नवलकोल किसुन घ्यावा आणि मग फोड्णीवर घालवा. लवकर शिजतो.

त्यात हळ्द, लाल तिखट, हिन्ग घालवा.

मग छान वाफेवर शिजवावा.

शेवटी मिठ घालाव.

कापून पांढऱ्या रेषा दिसल्या तर:=
त्याच्या चकत्या करा आणि विनीगरमध्ये बुडवून ठेवा. मुळा वर्गातले पांढरा, लाल मुळा जपानी लोक असा ठेवून नंतर लोणचे म्हणून खातात. कॉलिंग जपानवासी मिपाकर.

कवितानागेश's picture

8 Dec 2014 - 6:26 pm | कवितानागेश

आमच्याकडे २अर्धे तुकडे करून नारळा सारखे खवून घेतात. त्यात अजून नारळ कोथिम्बीर घालून फोडणी वर वाफवून घ्यायची.

दिपक.कुवेत's picture

8 Dec 2014 - 7:06 pm | दिपक.कुवेत

किसून म्हणायचयं का माउतै??

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2014 - 7:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

खवणणे वेगळे, किसणे वेगळे.

(ओला नारळ) खवणीने खवतात / खवणतात; (काकडी) किसणीने किसतात :)

सूड's picture

8 Dec 2014 - 8:26 pm | सूड

नीट आठवत नाही पण बहुतेक अमर राणेंनी एकदा एका रेसिपी शो मध्ये एका अभिनेत्रीने 'नारळ किसून घ्यावा' असं म्हटल्यावर रोखलं होतं; "ओला नारळ खवून घेतात आणि सुकं खोबरं किसून घेतात."

प्यारे१'s picture

8 Dec 2014 - 10:46 pm | प्यारे१

कस्ला शेफ रे तू? ;) (ह घे)
पदार्थ करायला जमेल न जमेल पण शब्द नि कृती माहिती नको?

- मोदकासाठी बर्‍याच वेळा नारळ खवणण्याचा अनुभव असलेला.

दिपक.कुवेत's picture

9 Dec 2014 - 11:52 am | दिपक.कुवेत

मी खिसून ह्या शब्दाबद्द्ल बोलतोय. म्हणजे नवलकोल खवुन घेतला आणि नवलकोल किसला हे दोन्हि बरोबर आहे. पण वर माउ म्हणतेय कि ती खिसुन घेतेय तर त्या एवजी दोन्हि ठिकाणी एक तर खवुन हवं किंवा किसून हवं आणि बाय द वे आमच्याकडे काकडि चोचवून घेतात.

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 11:56 am | टवाळ कार्टा

आमच्याकडे काकडि चोचवून घेतात

=))

पिलीयन रायडर's picture

9 Dec 2014 - 12:08 pm | पिलीयन रायडर

खिसणे बरोबर की किसणे बरोबर हा एक लाडका वादाचा विषय आहे... उत्तर मिळाल्यास कळवणे..

दिपक.कुवेत's picture

9 Dec 2014 - 12:10 pm | दिपक.कुवेत

कशाचा किस पाडताय त्यावर अवलंबून आहे :D

पैसा's picture

9 Dec 2014 - 12:17 pm | पैसा

किस लिहून अर्थाचा अनर्थ! तुझे मराठीचे मास्तर तुला व्याकरणासाठी नक्कीच बाकावर उभा ठेवत असणार मेल्या! किसणी हा शब्द बरोबर असेल तर कीस हा शब्द बरोबर आहे. आणि चोचवणे हा या दोन्हीपेक्षा वेगळा प्रकार आहे. काकडी किसणीवर किसतात आणि विळीवर चोचवतात. किसताना पाणी संपूर्ण वेगळे होते ते चोचवताना होत नाही हा फायदा. आणि ते जरासे कुरकुरीत लांबट झालेले तुकडे कोशिंबिरीत जास्त चांगले लागतात. सांदण वगैरे करायचे असेल तर मात्र कीस चांगला. (एवढा कीस पुरे का?) :D

दिपक.कुवेत's picture

9 Dec 2014 - 12:22 pm | दिपक.कुवेत

हा आता माझ्या व्याकरणाचा कीस पाडू नकोस. ते कधीच मला जमलं नाहि. ते म्ह्णतात ना विळी-भोपळ्याचं नात तसं माझं आणि व्याकरणाचं आहे....

प्यारे१'s picture

9 Dec 2014 - 1:29 pm | प्यारे१

>>> नवलकोल खवुन घेतला आणि नवलकोल किसला हे दोन्हि बरोबर आहे

कृती वेगवेगळ्या आहेत.
व्यनि करण्याची दाट इच्छा होऊनसुद्धा आवरती घेत आहे. असो!

अवांतरः किसलेला नारळ आणि खवणलेला नारळ चवीला वेगळा लागतो. का?
फोडून खाल्लेल्या शेंगा आणि नुसत्या शेंगदाण्याच्या चवीत सुद्धा बदल असतो. का?
उकडलेला बटाटा कापून आणि कापून उकडलेला बटाटा वेगळा लागतो. का?
-मी कधीतरीच अरुण जोशी ;)

दिपक.कुवेत's picture

9 Dec 2014 - 1:44 pm | दिपक.कुवेत

मी वाट बघतोय. नुसत्या चवीच वेगळ्या असतात का?

छान दिसते भाजी अनन्न्या. मुवि आणि सविताने म्हटल्याप्रमाणे आमटी+भाताबरोबर भाजी कशी लागेल याची आता उत्सुकता लागुन राहीली आहे. बघु कधी चान्स मिळतो.

दिपक.कुवेत's picture

8 Dec 2014 - 7:07 pm | दिपक.कुवेत

आता ताणू नकोस. आण नवलकोल, कर भाजी, हाण आमटी+भाताबरोबर आणि टाक प्रतिसाद....हाकानाका!!!

अरे इथं मिळायला पाहीजे ना तुमचं ते नवलकोल का काय :)

दिपक.कुवेत's picture

8 Dec 2014 - 7:49 pm | दिपक.कुवेत

भारतात आलीस कि मग बघ करुन....

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2014 - 8:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही भाजी नवलकोल या भारतिय नावाबरोबरच Kohlrabi, German turnip, turnip cabbage किंवा नुसती turnip या नावाने जगभर मिळते.

सखी's picture

8 Dec 2014 - 8:05 pm | सखी

हो मी तेच म्हटले स्वता:ला पाकृ बघितल्यावर - कर्म माझं :)

धन्यवाद एक्काकाका - Kohlrabi हे नाव मिळालं विकीवर, बाकीची माहीती नव्हती, भाजी मिळाली तर नक्की करुन बघेन.

रेवती's picture

8 Dec 2014 - 8:29 pm | रेवती

आमच्या येथे सगळ्या दुकानांमध्ये कोलराबी म्हणून ही भाजी मिळते. चांगला फिकट पोपटी रसरशीत कंद मिळाला तरच आणायचा.

मधुरा देशपांडे's picture

8 Dec 2014 - 7:54 pm | मधुरा देशपांडे

मला कधीपासुन ही पाकृ हवी होती. भाजी कशी करायची हे माहिती नसल्याने मी नवलकोल कधीच आणला नाही. आता नक्की आणेन आणि करुन बघेन. धन्यवाद.

आजवर ही भाजी मोळी (व्हेज)कधी खल्लीच नाही. न म्हणायला आजी वाडीतला कोवळा नवलकोल काकडी सारखा कच्चा खायला द्यायची तो आवडायचा फार.
एरवी आमच्या घरी नवलकोल म्हटलं की जोडीला कोळंबी हवीच. :)
तप उलटलं नवलकोल खाऊन. :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2014 - 12:14 am | डॉ सुहास म्हात्रे

हे मात्र खरं, कोलंबी आणि नवलकोल एक खत्री काँबीनेशन आहे ! माझी आई ती पाकृ बनवण्यात स्पेश्यालिस्ट होती.

मात्र नीट केलेली नवलकोलची सुकी अथवा रस्सा भाजी पण भारी लागते.

शिद's picture

10 Dec 2014 - 8:59 pm | शिद

एरवी आमच्या घरी नवलकोल म्हटलं की जोडीला कोळंबी हवीच.

माझ्या घरी नवलकोलमध्ये सुके सोडे अथवा सुके बोंबील टाकून देखील कालवण करतात. एका मित्राकडे ह्यात काळे वाटाणे घालून केलेली भाजी देखील खाल्ली आहे.

अवांतर: आमच्या घरी ह्याला 'अटकोल' असं देखील म्हणतात.

हैश्शा! अटकोल म्हणजे काय हे कळलं. नुसतच नाव ऐकत होते.

नवलकोल आवडणारे इतके महाभाग पाहून नवल वाटल्या गेले आहे...

अनुप ढेरे's picture

9 Dec 2014 - 10:19 am | अनुप ढेरे

अगदी अगदी!

अदूदादू, मलाही असंच वाटायचं. पण ही खरच चविष्ट भाजी आहे. गेल्या दोनेक वर्षांपासून करतीये. तसेच ढेमसे (बहुतेक टिंडा म्हणतात पंजाबी लोक्स) या भाजीबद्दलही म्हणते. तीन ते चार वेळा खाल्लीये गेल्या दीड वर्षात. मी या भाजीला (न खाताच) नावे ठेवत असे. अजून हौसेनं करत नाही पण ही भाजी आवडू शकते हे समजले.

मुक्त विहारि's picture

9 Dec 2014 - 7:36 am | मुक्त विहारि

ढेमश्यांची रस्सा भाजी अप्रतिमच.

मस्त खसखस्, दाण्याचा कूट, तीळ, उगीच थोडीशी बडीशोप आणि भरपूर कांदा-सुके खोबरे, थोड्या लवंगा आणि मिरे, असे सगळे असलेला मसाला आणि त्यात असणारी ढेमसे आणि आमरस.... निव्वळ स्वर्गसूख.

का कुणास ठावूक पण ढेमसे म्हटले की आमरस आठवतो.

रेवती आज्जी... कशाला आठवण करून दिलीत?

आमचे मस्त सुखाचे दिवस सुरु होते.आता ढेमसे-ढेमसे करत दिवस मोजायला लागणार.

बाद्वे,

इथे कुणी ढेमस्याच्या भाजीची रेशीपी दिली नसेल तर ह्यावेळी भाजी केली तर नक्की देतो.

त्रिवेणी's picture

12 Dec 2014 - 5:38 pm | त्रिवेणी

बडीशोप आणि लवंगा वगळता सेम पध्द्त आहे या भाजीची.
ढेमसे म्हटले की आमरस आठवतो>>>>>>> आमच्याकडेही हे कोम्बो होते बर्याचदा. आमरसा बरोबर सुकी भाजी होते ह्.डाळ घालुन.

टवाळ कार्टा's picture

12 Dec 2014 - 7:47 pm | टवाळ कार्टा

चूकून हडळ घालून असे वाचले :(

मुक्त विहारि's picture

13 Dec 2014 - 4:15 am | मुक्त विहारि

बडीशेप एकदम थोडी घ्यायची. एका मध्यम ढेमश्यासाठी १/५ चमचा. किंवा १/४ किलो ढेमशे असतील तर, १ चमच्याहून थोडी कमी.बडीशेप भाजून घ्यायची.कच्ची बडीशेप मसाल्यात लवकर विरघळत नाही.

लवंगा मात्र एका ढेमश्याच्या मागे १ लवंग.

एकदा प्रयोग करून बघा.नाही आवडली तर पुढच्यावेळी नका वापरु.

अर्थात जोडीला आमरस असल्याने, गोड आणि तिखटाची मस्त जुगलबंदी होते.

विदर्भात असतांना दशहरी आमरस आणि ही भाजी, तर वलसाडला असतांना केशर आमरस आणि ही भाजी.

चिगो's picture

26 Dec 2014 - 12:07 pm | चिगो

विदर्भातल्या का तुम्ही? आमच्याकडेपण हरभर्‍याची डाळ घालून ढेमसाची भाजी करतात, कमी रश्श्याची..

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2014 - 12:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

ढेमसे उर्फ टिंडा उर्फ घोसाळे याची भजी पण चविष्ट होतात. पाकृ बटाट्यांच्या भज्यांसारखीच, फक्त बटाट्यांच्या ऐवजी घोसाळ्यांच्या काचर्‍या वापरायच्या, बस्स !

मुक्त विहारि's picture

10 Dec 2014 - 4:24 am | मुक्त विहारि

पण करून बघायला हरकत नाही.

ह्यावेळी (फेब्रूवारीत) भाजी तर करणारच आहे.त्यावेळी भजी पण करून बघतो.

ढेमसे उर्फ टिंडा उर्फ घोसाळे.....
माफ करा पण ढेमसे वेगळे आणि घोसाळे वेगळे ना.
घोसाळे उर्फ गिलके.

पिलीयन रायडर's picture

9 Dec 2014 - 9:20 am | पिलीयन रायडर

मी आयुष्यात ही भाजी कधी खाल्ली नाहीये.. इथे एवढे रसिक पाहुन ट्राय करेन...! आणि सध्या तरी अनन्याच्याच पद्धतीनी करेन..

पाकृ सोपी आणि सुटसुटीत आहे अनन्या!! मस्त!!

सविता००१'s picture

9 Dec 2014 - 11:04 am | सविता००१

द्याच हो ढेमश्याच्या रश्शाची पाकृ. मला हवीच आहे. बाकी ढेमशाला स्वतःची चव कुठे असते? चांगली लागते??????
सखी: आमटीभाताबरोबर खरच मस्त लागते नवल कोल ची भाजी. नवल कोल किसायचा. त्याबरोबर भिजवलेली हरभरा डाळ भरड वाटून जास्त तेलाची फोडणी करून भाजी केली ना, तर अजुन अफलातून. ती नुसतीच खायला भन्नाट.

बय्राचदा एखादी भाजी चांगली लागेल की नाही म्हणून आणलीच जात नाही. माहेरी शेती असल्याने दरवर्षी ही भाजी व्हायचीच.
यामध्ये आणखीही अनेक पाकृ. आल्यात प्रतिसादातून, त्यामुळे वेगवेगळे प्रकार करून पाहता येतील.
सर्वांना धन्यवाद!

पैसा's picture

9 Dec 2014 - 12:12 pm | पैसा

साधी सोपी पाकृ! नवलकोल खवून पण छान भाजी होते.

सस्नेह's picture

9 Dec 2014 - 1:04 pm | सस्नेह

बघणार करून !
सगळे प्रकार !

निलीमा's picture

9 Dec 2014 - 5:53 pm | निलीमा

भाजी कशी करायची हे माहिती नसल्याने मी नवलकोल कधीच आणला नाही. आता करुन बघेन. *dance4*

स्पंदना's picture

10 Dec 2014 - 4:34 am | स्पंदना

माझी अतिशय आवडती भाजी.
मी बर्‍याचदा नवलकोलचे तुकडे तूरडाळीबरोबर पाण्यात उकळुन घेते. डाळ बोटचेपी झाली की झालं.
मग त्याला मोहरी, जीरे, हिंग कढेपत्ता अन कांद्याची फोडणी!! वरुन थोडसं लसूण खोबरं, हवा असेल तर टोमॅटो. थोडासा रस असलेली ही भाजी बोटांनी चाखून चाखून खायची.
कधी कधी खिसून करते, त्यात तूरडाळ भिजवुन घालायची. मोहरी, जीरे हिंग मिरची कढेपत्त्याची फोडणी. ही घरात सर्वांना आवडते. कोथेंबीर मात्र भरपूर (मायंदाळी) असावी लागते.

भाजी पे़क्शा काप मस्त लागते!!!!

आज नवलकोल करणारे पण पाने कोवळी नसल्याने या पद्धतीने करतअ येणार नाही.

पहिला ढेमसे दिसतात कसे इथुन पाकृ पर्यंत सगळ सांग न्हायतर

आतिवासताईंचा अफगाणी लेख वाचून तुझं असं झालय अपर्णा. शांत हो. ;)
http://en.wikipedia.org/wiki/Tinda
या लिंकेवर तुला सगळी माहिती मिळेल. कृती भाजीची कृती वरील प्रतिसादात मुवींनी दिलीये ती बेष्ट आहे.

स्पंदना's picture

19 Dec 2014 - 3:11 am | स्पंदना

:))

त्या विकीला पिडून झाल होतं आधीच तरीही काही कळल नाही म्हणुन दंबुक काढली होती.
आता? आता तरी सांगणार की....

प्यारे१'s picture

19 Dec 2014 - 5:49 pm | प्यारे१

ढेमसे वरुन ढेसे आठवले.
ढेसे साधारण शेवग्याच्या शेंगासारखं असतंय दिसायला. तसाच पण तेवढा मऊ नसलेला गर असलेली ढेसे भाजी परतून बरी लागते.

मुक्त विहारि's picture

13 Dec 2014 - 4:23 am | मुक्त विहारि

ढेमसे नुसते आणून चालत नाही.

ह्या भाजीचे बरेच नखरे आहेत आणि ज्याम चवचाल भाजी आहे. जरा मसाला इकडे-तिकडे आणि तेलाचे प्रमाण इकडे-तिकडे झाले की चव तर बोंबलतेच आणि मग पावले परत एकदा भाजी मंडैकडे चाल करायला लागतात.

पा.क्रु. नक्कीच टाकणार. पण सध्या फोटो नाही आहेत.

बिना फोटो पा.क्रु., ह्यावेळी माफ करणार असाल तर नक्की देतो.

तुम्ही भारतात परतायला महिना, दीड महिना असेल तर वाट बघण्याची तयारी आहे. सफोटू पाकृ वेल्कमली जाईल. नो माफी. :) कारण तुम्ही जी पद्धत सांगाल ती वाखु साठवणार आहे.

मुक्त विहारि's picture

13 Dec 2014 - 6:57 am | मुक्त विहारि

फेब्रुवारी मध्ये भारतात येत आहे...

(स्वगत : मला पण ढेमसे-ढेमसे करत दिवस काढायला लावताय, आता तुम्ही पण पा.क्रु. कधी येणार म्हणून दिवस मोजा. डोंट वरी, फेब्रुवारीत नक्की फोटू सकट पा.क्रु. देतो.)

रेवती's picture

13 Dec 2014 - 8:30 pm | रेवती

धन्यवाद. स्वगताशी सहमत.

माझ्या नावडत्या भाज्यांपैकी एक...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dard Dilo Ke Kam Ho Jaate, Main Aur Tum Agar Hum Ho Jaate..

गौरी लेले's picture

19 Dec 2014 - 1:41 pm | गौरी लेले

मला बै अज्जिबात आवडत नाही ही भाजी ..

छान सोपी पाककृती अनन्न्या.सासुबाई करायच्या हि भा़जी.माझी फारशी करण्यात नाहि.आता या पद्धतीने करून पहाते.

कविता१९७८'s picture

22 Dec 2014 - 9:49 am | कविता१९७८

छान प्रकार वाटतोय करुन पहायला हवा.

सविता००१'s picture

22 Dec 2014 - 10:16 am | सविता००१

सुंदर झाली भाजी तुझ्या पद्धतीने पण.

आज नवलकोल अाणलेत.त्याचं काही खरं दिसत नाही.घाबरुन मान टाकुन पडलेत.चांगली झाली भाजी तर लिहिन इथे नाही लिहिलं तर समज वाट लावल्या गेली अाहे ^_~

मुक्त विहारि's picture

22 Dec 2014 - 12:13 pm | मुक्त विहारि

अशावेळी रस्सा भाजी करायची...

रस्सा झणझणीत बनवायचा.

हाकानाका...

अर्रर्र !!आमच्यासारख्यांच्या स्वैपाकातले एक शिक्रेट फुटलं !!

मुक्त विहारि's picture

22 Dec 2014 - 12:23 pm | मुक्त विहारि

अशी अजुन स्वैपाकातली बरीच शिक्रेट आहेत...

पण

संसार म्हटला की तितके चालायचेच.

उमा @ मिपा's picture

22 Dec 2014 - 11:21 am | उमा @ मिपा

अनन्या, आज केलीय ही भाजी. मस्त झालीय. :)
अजया... पाककृती उत्तम आहे, तू करणारेस... मग भाजी चविष्ट होण्यावाचून दुसरा क्काही पर्यायच नाही.

इरसाल's picture

22 Dec 2014 - 12:46 pm | इरसाल

नकोशा पाहुण्याला घालवायला ढेमश्याची भाजी बरी पडते !

मुक्त विहारि's picture

25 Dec 2014 - 2:13 am | मुक्त विहारि

तुम्ही आमच्याकडे आलात तर ढेमश्याची भाजी अजिबात करणार नाही.

प्रीत-मोहर's picture

22 Dec 2014 - 1:37 pm | प्रीत-मोहर

आज आमच्याकडेही नवलकोल...

कविता१९७८'s picture

22 Dec 2014 - 2:14 pm | कविता१९७८

आज बहीणीने तिच्या घरी करुन पाहीली, खुपच छान लागली म्हणे, आज संध्याकाळीच मी ट्राय करते.

मधुरा देशपांडे's picture

24 Dec 2014 - 6:31 pm | मधुरा देशपांडे

आज केली होती ही भाजी. मस्त झाली होती. :)

चिगो's picture

26 Dec 2014 - 12:24 pm | चिगो

आज ह्या पाकृमुळे बर्‍याच भाज्यांच्या, ज्या सध्यातरी आयुष्यातून बाद झाल्याहेत, त्यांच्या आठवणी जाग्या झाल्यात.
ह्यातल्या बर्‍याचश्या आता हिवाळ्यातच मिळतात.

१. तुरीच्या ओल्या/हिरव्या/कोवळ्या दाण्यांची आमटी. उन्हाळ्यात शेंगदाण्यांची पण करतात. पण ह्या आमटीसोबत भात हादडणे म्हणजे स्वर्गसुख.
२. वांग्याची पोपटीचे दाणे घालून केलेली भाजी. झणझणीत आणि मस्त..
३. वालाच्या शेंगाची सुकी भाजी.
४. ढेमसाची भाजी
५. तोंडल्यांची भाजी
६. काटोल्यांची भाजी.. काटोलं ही एक काटेरी फळभाजी.
७. झुणका / बेसन- मी आमच्याकडे तरी विदर्भात फक्त 'बेसन' हाच शब्द ऐकला होता. 'झुणका' शब्द झुणका-भाकर योजनेनंतरच ऐकला. ह्यात भरपुर कांदे घालून केलेलं बेसन (प्रवासासाठी बेष्ट), टोमॅटो (भेदरं) घालून केलेलं पातळ बेसन (आम्ही सरळ "लंबं बेसन" म्हणायचो, पातळ असल्याने). ह्या 'लंब्या'सोबत भात हादडणे हेपण स्वर्गसुख. आणि ताक घालून केलेलं 'ताकाचं बेसन' असे वेगवेगळे प्रकार आहेत.. पावसाळ्यात शेतात उगवणारी रानभाजी 'चिवळ' घालूनपण बेसन करतात..

असो. आता आठवडाभर गावी आहे. जमेल तेवढया ओरपून घेतो ह्यातल्या काही..