विंडोजमधील क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर

येकटा मऱ्हाटी मानुस's picture
येकटा मऱ्हाटी मानुस in तंत्रजगत
3 Dec 2014 - 10:08 am

बऱ्याचदा आपण क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर बद्दल ऐकतो, पण ते नक्की काय असतं असा प्रश्न पडतो. तर आज आपण विंडोजमधील क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर यांची माहिती घेउ.

क्रॅपवेअर म्हणजे तुमच्या पीसीमध्ये तुमच्या कळत अथवा नकळत इंस्टाल झालेले प्रोग्राम्स. उदा. ब्राउझरमधील टूलबार्स, पीसी चालू झाल्यावर आपोआप सुरु होणारे काही बिनकामी प्रोग्राम्स आणि सर्वात भयानक, ब्राउझरमधील सेटींग बदलणारे प्रोग्राम्स. या क्रॅपवेअरचा तुम्हाला कसलाही फायदा होत नसतो. उलट यांतील काही प्रोग्राम्स तुमची गोपनीय माहिती मिळवून इतरांना विकण्याचा धोका असतो.

ब्लोटवेअर म्हणजे असे सॉफ्टवेअर्स ज्यांचा उपयोग कदाचित तुम्हाला होऊ शकतो, परंतु ते तुमच्या इच्छेविरुद्ध इंस्टाल केलेले असतात. उदा. नवीन पीसी घेतल्यावर सोबत येणारे मोफत अँटी-व्हायरस, निरो सारखे ३० दिवस चाचणी अवस्थेतील सॉफ्टवेअर्स आणि पीसीमध्ये सुरुवातीपासूनच असलेले बिनकामी सॉफ्टवेअर्स. बहुतेक ब्लोटवेअर तुमच्या पीसीवर सुरुवातीपासूनच इंस्टाल केलेले असतात. हे ब्लोटवेअर मोबाईलवर सुद्धा सापडतात. मोबाईलवरील ब्लोटवेअरचे उत्तम उदाहरण म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस ४. या फोनवरील ६ जीबी जागा (१६ जीबी पैकी) या ब्लोटवेअरमुळे वाया गेलेली आहे. तसेच मोबाईलवरील हे ब्लोटवेअर तुम्हाला काढून टाकणेही सहज शक्य होत नाही.

सर्वच क्रॅपवेअर किंवा ब्लोटवेअर सॉफ्टवेअर्स सुरुवातीपासूनच इंस्टाल केलेले नसतात. काही ब्लोटवेअर हे दुसऱ्या सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून इंस्टाल होतात. आता तुम्ही म्हणाल पीसीसोबत मोफत अँटी-व्हायरस येतोय, सॉफ्टवेअर्स येत आहेत, हे तर चांगलचं आहे की, पण तसे नाही. हे ब्लोटवेअर सॉफ्टवेअर्स, सुविधांच्या बाबतीत पिछाडीवर असतात. जास्तीत जास्त एक वर्षांपर्यत त्यांची वैधता असते, आणि बाजारातील इतर सॉफ्टवेअर्सच्या तुलनेने त्यांना रॅम आणि सीपीयूची जास्त शक्ती लागू शकते. त्यामुळे कोणताही सॉफ्टवेअर विचार करूनच इंस्टाल करावा.

दुसरा प्रश्न असा पडतो की, जर हे सुरुवातीपासूनच इंस्टाल केलेले ब्लोटवेअर सॉफ्टवेअर्स जास्त रॅम आणि सीपीयू शक्ती वापरून पीसीचा वेग कमी करतात, तर पीसी तयार करणाऱ्या कंपन्या हे ब्लोटवेअर कशाला इंस्टाल करतात?
याची दोन करणे आहेत. एक म्हणजे ब्लोटवेअर सॉफ्टवेअर्स त्यांच्या उत्पादनाचे वैशिष्ट्य असू शकते. असे वैशिष्ट्य सर्वांनाच उपयोगी पडत नाही. दुसरे कारण म्हणजे ब्लोटवेअर सॉफ्टवेअर्सवाली कंपनी पीसी तयार करणाऱ्या कंपनीला सॉफ्टवेअर इंस्टाल करण्यासाठी पैसे देते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे “नॉर्टन अँटी-व्हायरस”. नॉर्टन अँटी-व्हायरस तयार करणारी कंपनी ही गिगाबाईट, इंटेल सारख्या मदरबोर्ड बनवणाऱ्या कंपन्यांना नॉर्टन अँटी-व्हायरस सीडीवर टाकण्यासाठी पैसे देते. नॉर्टन अँटी-व्हायरसची काही दिवसानंतर वैधता संपते, आणि पीसी वापरणाऱ्याला तो विकत घ्यायची वेळ येते. नॉर्टन अँटी-व्हायरसची सवय पडल्याने काही वापरकर्ते आपसूकपणे जास्त किमतीने हा अँटी-व्हायरस खरेदी करतात. बाजारातील इतर स्वस्त आणि मस्त अँटी-व्हायरस प्रोग्रामकडे पहायची तसदीही घेत नाहीत.

आता क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर म्हणजे काय हे तुम्हाला कळाले. ते पीसीमधून कसे काढून टाकायचे याच्याविषयी पुढील भागात माहिती घेऊ.

मी लिहिलेले काही लेख तुम्ही माझ्या ब्लॉगवर वाचू शकता.

प्रतिक्रिया

फोटोग्राफर243's picture

3 Dec 2014 - 10:57 am | फोटोग्राफर243

फार सुंदर लेख, आणि माहीती, पुढील भागाची वाट पाहतोय.

नन्दादीप's picture

3 Dec 2014 - 11:30 am | नन्दादीप

पुढील भागाच्या प्रतिक्षेत......

क्रॅपवेअर म्हणजे तुमच्या पीसीमध्ये तुमच्या कळत अथवा नकळत इंस्टाल झालेले प्रोग्राम्स. उदा. ब्राउझरमधील टूलबार्स, पीसी चालू झाल्यावर आपोआप सुरु होणारे काही बिनकामी प्रोग्राम्स आणि सर्वात भयानक, ब्राउझरमधील सेटींग बदलणारे प्रोग्राम्स. या क्रॅपवेअरचा तुम्हाला कसलाही फायदा होत नसतो. उलट यांतील काही प्रोग्राम्स तुमची गोपनीय माहिती मिळवून इतरांना विकण्याचा धोका असतो.
याला स्पायवेअर म्हणणे अधिक योग्य ठरेल.

मोबाईलवरील ब्लोटवेअरचे उत्तम उदाहरण म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस ४. या फोनवरील ६ जीबी जागा (१६ जीबी पैकी) या ब्लोटवेअरमुळे वाया गेलेली आहे. तसेच मोबाईलवरील हे ब्लोटवेअर तुम्हाला काढून टाकणेही सहज शक्य होत नाही.
फोन रुट केल्यावरच बोल्टवेअर काढुन टाकणे शक्य होते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे

मराठी_माणूस's picture

3 Dec 2014 - 11:57 am | मराठी_माणूस

सध्या माझ्या लॅपटॉप वर "browseburst" चा सतत मेसेज येतो आणि खुप जाहीरातीही दिसतात. काही उपाय आहे का?

मदनबाण's picture

3 Dec 2014 - 12:31 pm | मदनबाण

सध्या माझ्या लॅपटॉप वर "browseburst" चा सतत मेसेज येतो आणि खुप जाहीरातीही दिसतात. काही उपाय आहे का?
तुम्ही CNET’s download.com च्या साईट वरुन काही सॉफ्टवेअर डाउनलोड केले आहे का ? browseburst हे अ‍ॅडवेअर आहे. तुमच्या आयइ,फायर्फॉक्स्,क्रोम मधे याचे एक्स्टेंशन अ‍ॅड झाले असेल तर ते रुमुव्ह करा. कंट्रोल पॅनल मधे अ‍ॅडरुमुव्ह प्रोग्रॅम्स मधे जाउन याचा टुलबार प्रोग्राम {सॉफ्टवेअर /टुलबार} दिसत असेल तर तो अनइन्स्टॉल करा.
बाकी अधिक इकडे :- http://www.misalpav.com/comment/411442#comment-411442

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे

मराठी_माणूस's picture

3 Dec 2014 - 3:02 pm | मराठी_माणूस

सल्ल्याबद्दल धन्यवाद.
CNET वरुन काही download केल्याचे आठवत नाही. अ‍ॅड रीमुव्ह प्रोग्राम मधे "browseburst" ह्या नावाने एकही नोंद दिसत नाही, पण सी ड्राईव्ह वर त्याचे फोल्डर आहे. त्यात काही फाइल्स आहेत. ते फोल्डर डायरेक्ट डीलीट केले तर चालेल का ?

अ‍ॅड रीमुव्ह प्रोग्राम मधे "browseburst" ह्या नावाने एकही नोंद दिसत नाही
इतर कोणत्या नावाने वेगळे सॉफ्टवेअर दिसते आहे का ? कुठला टुलबार वगरै ? तसे असल्यास ते आधी अनइनस्टॉल करा. मग ब्राउजर मधली सगळी अ‍ॅडऑन्स्,प्लगीन सुद्धा चेक करा, मगच ते फोल्डर डिलीट करा.फोल्डर डिलीट केल्यावरही रजिस्ट्री मधील एन्ट्री तशाच राहतील... त्या सुद्धा डिलीट कराव्या लागतील. पीसी Spybot आणि Malwarebytes या सॉफ्टवेअरनी स्कॅन करा, ते रजिस्ट्री मधील एंन्ट्रीज आणि इतर ठि़काणच्याही फाइल्स काढुन टाकतील.
फोल्डर ऑप्शन मधे जाउन हाईड प्रोटेक्टेड ऑपरेटंग सिस्टीम फाइलचा ऑप्शन उनचेक करा. {हा परत चेक मार्क करायला विसरु नका.} मग खालील जागी BrowseBurst च्या काही फाईल्स दिसत आहेत का ते पहा,दिसल्यास डिलीट मारा.
%USERPROFILE%\temp\ BrowseBurst.exe
%AppData%\Protector-[ BrowseBurst].exe

आधी सिस्टीम वर दिलेल्या २ सॉफ्टवेअर्सनी स्कॅन करुनच मग डिलीट करण्याचा उध्योग करावा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे

येकटा मऱ्हाटी मानुस's picture

3 Dec 2014 - 4:01 pm | येकटा मऱ्हाटी मानुस

या लिंक वरील कृती करून पहा.
http://malwaretips.com/blogs/browseburst-virus-removal/

प्रसाद१९७१'s picture

3 Dec 2014 - 12:28 pm | प्रसाद१९७१

@येममा - माझ्या ब्राऊझर ला अश्याच कशानी तरी ग्रासले आहे. सातत्याने सारखे काहीतरी पॉप होते.
काही केले तरी जात नाहीये.

काय करायचे ते लवकर सांगा.

येकटा मऱ्हाटी मानुस's picture

3 Dec 2014 - 1:14 pm | येकटा मऱ्हाटी मानुस

malwarebytes ने संपूर्ण पीसी स्कॅन करा.
https://www.malwarebytes.org/

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2014 - 1:27 pm | टवाळ कार्टा

+१११११११

मदनबाण's picture

3 Dec 2014 - 12:38 pm | मदनबाण

nternet Explorer:

Open Internet Explorer, click the Gear icon or ‘Tools‘ -> 'Internet Options'.
Here, go to the 'Advanced' tab and click the 'Reset' button.
Go to the 'Reset Internet Explorer settings' -> 'Delete personal settings' and click on 'Reset' option.
Finally, click 'Close' and OK to save the changes.
Change your homepage.

Mozilla Firefox:

Open Mozilla Firefox, go to the 'Help' section -> 'Troubleshooting Information'.
Here, choose a 'Reset Firefox’ for a couple of times and 'Finish'.
Finally, change your homepage.

Google Chrome:

Click the Chrome menu button on the Google Chrome browser, select Settings -> Show Advanced Settings.
Here, look for 'Reset browser settings' button.
Click 'Reset' to complete this task.
हे करुन पहा शिवाय Spybot-S&D रन करुन पहा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे

विजुभाऊ's picture

3 Dec 2014 - 3:53 pm | विजुभाऊ

मला माझ्या मोबाईलवर "पॉकेट रागा " पूर्ण व्हर्जन इन्स्टाल करायचे आहे. विकत घ्यायची तयारी आहे.
मात्र हे सॉफ्टवेअर विकत घ्यायला गेल्यास डेबिट कार्डमधून उगाचच ५० रुपये कट होतात. ते गुगल स्टोअर्स कडे जमा होतात. मात्र सॉफ्टवेर इन्स्टाल होत नाही. असे दोन तीन वेळा झाल्यावर नाद सोडला.
तबला प्रो किंवा पॉकेट रागा इन्स्टालेबल असल्यास विकत घ्यायचे आहे. कोणाला माहिती असल्यास सांगणे

मदनबाण's picture

3 Dec 2014 - 3:59 pm | मदनबाण

@ इजुभाउ
खाली दिलेल्या दुव्यावर जाउन गुगलकडे या सॉफ्टवेअर / अ‍ॅप विषयी आधी तक्रार नोंदवा.

https://accounts.google.com/ServiceLogin?service=googleplay&passive=1209...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे