द सिक्रेट- नवीन अंधश्रद्धा ?

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in काथ्याकूट
2 Dec 2014 - 3:55 pm
गाभा: 

अंधश्रद्धा या सर्व समाजांमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळतात . म्हणजे भारत हा साप -हत्ती चा आणि मागासलेला देश आहे असे मानणाऱ्या युरोपिअन देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये पण अंधश्रद्धा भरभरून आढळतात . भारतात भानामती आणि अंगात येणे वैगेरे प्रकार होत असतील तर गोऱ्या लोकांमध्ये उडत्या तबकड्या , परग्रहवासी आणि dooms day वैगेरे विज्ञानाचा मुलांमा दिलेल्या अंधश्रद्धा जोरात आहेत . याचा एक दणकून पुरावा म्हणजे २१ नोव्हे . २०१२ च्या निमित्ताने उडालेला धुरळा . जग आता नष्ट होणार म्हणून अनेक लोकांची पळापळ सुरु झाली होती . शेवटी नासा ला मध्ये पडून हे धादांत खोटे आहे असे निवेदन द्यावे लागले होते . तरी पण तो दिवस उलटे पर्यंत अनेक लोकांनी आपले 'जिझस ' पाण्यात बुडवून ठेवले होते . तर सांगायचा मुद्दा हा कि खरच अंधश्रद्धा या बाबतीत खरच 'काळ -गोर ' (No pun intended ) करता येत नाही .

मला 'द सिक्रेट ' या प्रकरणाचा शोध 'चित्रलेखा ' मासिक वाचताना लागला . चित्रलेखाने चक्क या विषयावर कवर स्टोरी केली होती . काय आहे हे प्रकरण ? Rhonda Byrne या लेखिकेने हे पुस्तक लिहिले आहे . याच विषयावर एक फिल्म पण आहे . तू नळी वर तिचा काही भाग उपलब्ध आहे . तर या पुस्तकात Rhonda ने एक नियम मांडला . 'The Law of Attraction ' (आकर्षणाचा नियम ?). Rhonda च्या मते हा नियम फ़क़्त काही ठराविक लोकांनाच माहित होता . यात मोठमोठे महाराजे , कलाकार , सेनानी आणि मानवी इतिहासाला वळण देणार्या व्यक्तींचा समावेश होता . पण Rhonda च्या मते हा मानवी जीवनाला वेगळे वळण देणारा आणि मानवाच्या सगळ्या आशा आंकाक्षा पूर्ण करणारा नियम तिला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून तिने हे पुस्तक लिहिले होते . हा The Law of Attraction 'असे सांगतो कि माणूस हा सकारात्मक विचारांच्या मदतीने आपल्याला पाहिजे ते म्हणजे भरपूर संपत्ती , प्रेम , सुदृढ तब्येत वैगेरे मिळवू शकतो . वर वर तर हे विधान /नियम निरुपद्रवी आणि खर वाटू शकत . पण ग्यानबाची मेख अशी आहे कि या नियमाला पूर्ण पुस्तकात वैज्ञानिक नियमांचं अधिष्ठान देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे . त्यासाठी Placebo Effect च्या मागचे कार्यकारण भाव आणि Quantum Physics चे नियम याचे दाखले देण्यात आले आहेत . म्हणजे एका साध्या नियमाला तो एक त्रिकालाबाधित नियम आहे असे सिद्ध करण्याचा खटाटोप . म्हणजे या पुस्तकात वजन कसे कमी करावे किंवा घातक रोगांपासून The Law of Attraction ' वापरून मुक्ती कशी मिळवावी यावर वेगळे प्रकरण आहे . त्यावर अनेक तज्ञांनी टीका केली . म्हणजे सकारात्मक विचार करणे हि चांगली गोष्ट आहे पण दुर्धर रोगाच्या शेवटच्या टप्प्यात असणारा माणूस The Law of Attraction ' वापरून बरा होऊ शकतो का ? अनेक वैज्ञानिक आणि Medical Experts नी हे पुस्तक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईक याना खोटी आशा लावते अशी टीका केली आहे .

साहजिकच या पुस्तकावर आणि The Law of Attraction ' वर टीकेची राळ उडाली . अनेक लोकांनी यावर टीका केली आहे कि या नियमावर विसंबून राहणारे आणि प्रत्येक समस्येवर 'Instant Solution ' शोधू पाहणारे लोक आपल्या आयुष्यातील समस्येच्या root cause पर्यंत जाण्याच टाळतात आणि हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे .आता या पुस्तकातल्या Quantum Physics च्या दाखल्या बद्दल Rhonda Byrne ने विज्ञान या विषयाचा कधी अभ्यास पण केला नव्हता . तरी पण तिच्या दाव्यानुसार The Law of Attraction ' वापरून अतिशय क्लिष्ट अशा Quantum Physics चे नियम समजून घेतले . तिच्या या दाव्यावर सडकून टीका होणारच होती आणि तशी ती झाली देखील .

शिवाय आपल्यासोबत घडणारया सर्व वाईट घटना आपणच नकारात्मक विचार करून आपल्याकडे आकर्षित करून घेतो हा The Law of Attraction चा व्यत्यास पण तितकाच धोकादायक . म्हणजे दिल्ली बलात्कार प्रकरणातील बलात्कारित मुलीने नकारात्मक विचार करून तो बलात्कार ओढवून घेतला होता का ? किंवा लातूर मध्ये झालेल्या भूकंपात मरण पावलेल्या किंवा सर्वस्व गमावलेल्या लोकांनी हा भूकंप नकारात्मक विचार करून घडवून आणला होता का ? साहजिकच victim असणाऱ्याला दोषीच्या पिंजर्यात हा नियम उभा करतो .

पाश्चात्य लोकांकडून आलेलं सगळ भारी अस मानून चालणार्या आपल्याकडे पण या पुस्तकाचा खप चिक्कार वाढला आहे . माझे काही मित्र पण यात आले . ते कायम आम्ही सध्या किती आनंदी आहोत आणि सकारात्मक आहोत हे दाखवत असतात आणि कुठलाही प्रश्न शेयर करायला गेल कि Think Positive ' चा डोक्यात जाणारा सल्ला देतात . इतकेच नाही तर आम्ही द सिक्रेट वाचल आहे हे status of symbol समजणाऱ्या लोकांचा संप्रदाय आपल्याकडे पण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे . अनेक बापू -महाराज -साध्वी यांचे संप्रदाय कमी होते कि काय म्हणून यात या नवीन cult ची भर . आता तर The Law of Attraction चे दाखले अनेक महाराज लोक पण आपल्या प्रवचनात द्यायला लागले आहेत . हा नियम वापरून प्रबोधन करणार्या Motivational Speakers चे तांडे पण तैयार झाले आहेत . हो आणि ते Speakers आपल्या प्रबोधनासाठी भरभक्कम फी आकारतात . The Law of Attraction वापरून पैसे
कमवत नाहीत . यालाच विरोधाभास म्हणतात कि काय ?

प्रतिक्रिया

स्पा's picture

2 Dec 2014 - 4:24 pm | स्पा

रोचक

योगी९००'s picture

2 Dec 2014 - 4:41 pm | योगी९००

हा सिक्रेट व्हिडीओ आमच्या ऑफिसमध्ये as a part of training म्हणून सुद्धा दाखवला होता...

ओम शांती ओमचा "किसी चीझ को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलानेकी कोशिश करती है" हा डायलॉग "The Secret" व्हिडीओ पाहून आठवला...!!

सतिश गावडे's picture

2 Dec 2014 - 4:56 pm | सतिश गावडे

किसी चीझ को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलानेकी कोशिश करती है

हा संवाद आम्ही "प्यार अगर सच्चा हो तो पुरी कायनात..." असा वाचला/ऐकला आहे :)

लाबंलचक डॉयकॉल आहे तो .
चिज पासुन प्यार पर्यंत सगळ मिळत.

बॅटमॅन's picture

3 Dec 2014 - 12:49 pm | बॅटमॅन

डॉयकॉल

कुठल्यातरी गोळी किंवा रेचकाचे नाव वाटले.

मला तर हा प्रकार "असेल हरी तर देईल खाटल्यावरी" असा वाटला

सतिश गावडे's picture

2 Dec 2014 - 5:03 pm | सतिश गावडे

"द सिक्रेट" अतिशय विनोदी पुस्तक आहे. वेळ जात नसेल तर वाचण्यास हरकत नाही.

स्पा's picture

2 Dec 2014 - 5:59 pm | स्पा

गावडे काकाशी सहमत

सतिश गावडे's picture

2 Dec 2014 - 6:21 pm | सतिश गावडे

स्पा पुतण्या, माझं एक निरिक्षण आहे.

आपल्याकडच्या एकाहून एक सरस अशा खुळचट कल्पनांवर विश्वास असणारे "द सिक्रेट" हा "त्यांच्याकडील" खुळचट प्रकार म्हणून पाश्चिमात्यांना हसतात.

आहे की नाही गंमत. :)

आपल्याकडच्या एकाहून एक सरस अशा खुळचट कल्पनांवर विश्वास असणारे "द सिक्रेट" हा "त्यांच्याकडील" खुळचट प्रकार म्हणून पाश्चिमात्यांना हसतात.

हा हा , जे ब्बात

खुळचट कल्पनांवर विश्वास असणारे

बाकी कर्म करत रहा,फळाची अपेक्षा धरू नका सारख्या कल्पनांवर विश्वास असणे , आणि काहीच कर्म करू नका ,फळ मिळेल या काल्पेवर हसणे यातला फरक कळत नसणार्यांची आम्हाला ज्याम मौज वाटते

हाडक्या's picture

2 Dec 2014 - 8:23 pm | हाडक्या

अगदी अगदी.. एकच वाक्य घेऊन आख्खे पुस्तक लिहू शकणारा लेखक नक्की ईंजिनिअर असावा बहुतेक.

सतिश गावडे's picture

2 Dec 2014 - 8:50 pm | सतिश गावडे

*lol*

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2014 - 10:01 am | टवाळ कार्टा

\m/

होकाका's picture

6 Dec 2014 - 7:05 pm | होकाका

I have experienced the truth in The Secret. Many times. Sorry. Unable तो type in marathi on mobile.

वेल्लाभट's picture

2 Dec 2014 - 5:08 pm | वेल्लाभट

हेहे. तुमचं विश्लेषण आवडलं. मी हे पुस्तक वाचलंय. या पुढचंही बिहाइंड द सिक्रेट का कायतरी असं पुस्तकही वाचलंय. पहिलं कुतुहलाने, एका मित्राने सुचवलं म्हणून. दुसरं नाईलाजाने, गिफ्ट मिळालं म्हणून. पण मुळातच मला सेल्फ-हेल्प किंवा पॉसिटिव्हिटीचा भडिमार करणारी पुस्तकं जमत नाहीत. डोक्क्यात जातात. आग लागलीय तरीही 'विझेल, विझेल' असा विचार करत बसायला हे लेखक सांगतात. त्यामुळे मी नादाला लागत नाही.

सिक्रेट पुस्तकाच्याही अधीन होणारे लोक हं'च माझ्यामते. असं होत असेल तर कामधंदा सोडून बसेल हो सगळं जग. हवीय कशाला मेहनत आणि कष्ट? येतोय की पैसा.... जस्ट विश इट फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हार्ट. ..... हह! वायझेडगिरी.

गंमत म्हणून वाचायला हरकत नाही अगदी वाचायचच असेल तर. पण बघा; पॉझिटिव्ह विचारालाही प्रॅक्टिकॅलिटीच्या मापकाने मापून मगच मनात जागा द्यावी. मग सिक्रेट असं काहीच नाही.

विजुभाऊ's picture

2 Dec 2014 - 5:48 pm | विजुभाऊ

बरोबर आहे. नुसता कृतीशिवाय पॉझीटीव्ह विचार म्हणजे डे ड्रिमिंग आहे. गोष्टीतल्या शेखचिल्ली ने तरी दुसरे काय केले होते.
कृतीशील रहाण्यासाठी पॉझिटीव्ह विचार हवेतच. पन त्यांचे हवेत इमले नकोत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Dec 2014 - 6:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा हा काही आशियायी लोकांचा मक्ता नाही. माणूस इथून तिथून सारखाच ! पाश्च्यात्य अंधविश्वास किंवा अंधश्रद्धांची पाश्च्यात्यांनीच सांगितलेली पोतंभरून उदाहरणे इथे सापडतील. मुख्य म्हणजे ही उदाहरणे सागरातील केवळ एक थेंबच आहेत ! ;)

जोपर्यंत कर्माचा त्याग न करता positive विचार केले जात आहे तोपर्यंत त्यात काही वाईट वाटत नाही. पण नुसतेच त्यावर अवलंबून राहू नये.

चंद्रनील मुल्हेरकर's picture

2 Dec 2014 - 7:26 pm | चंद्रनील मुल्हेरकर

what the bleep do we know आणि down the rabbit hole या नावे दोन डॉक्युमेंट्री आहेत. अत्यंत फालतु व खोटी गोष्ट अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडल्याने हा कल्ट पसरला आहे.
( मी साधारणतः 2009ला या कल्टविषयी वाचले होते. दिड दशकापासुन एँजोलिना ते ऐश्वर्यापर्यंत अनेकींची कामना मी केली आहे. लॉ ऑफ एट्रेक्शननुषार माझ्या कामना पुर्ण व्हायला हव्यात पण त्या झाल्या नाहीत. त्याअर्थी हा लॉ खोटा समजायला हर्कत नसावी.)

हाडक्या's picture

2 Dec 2014 - 8:56 pm | हाडक्या

मी साधारणतः 2009ला या कल्टविषयी वाचले होते. दिड दशकापासुन एँजोलिना ते ऐश्वर्यापर्यंत अनेकींची कामना मी केली आहे. लॉ ऑफ एट्रेक्शननुषार माझ्या कामना पुर्ण व्हायला हव्यात पण त्या झाल्या नाहीत. त्याअर्थी हा लॉ खोटा समजायला हर्कत नसावी.

यावर पठडीतले तयार उत्तर म्हणजे, "तुम्ही तेवढ्या तीव्रतेने त्या गोष्टींची कामनाच केली नव्हती. (म्हणजे अभिषेकने तुमच्यापेक्षा जास्त तीव्रतेने केली होती बहुदा ;) ) "

फोलपणा कळून ही आपल्या धारणांची भलामण करु पाहणार्‍या कल्टबद्दल एक मानसशास्त्रीय लेख वाचला होता इथेच मिपावर(अत्ता सापडत नाहीये.) त्यात या तर्‍हेच्या वागणुकीची कारणमिमांसा कळते.

चंद्रनील मुल्हेरकर's picture

2 Dec 2014 - 9:38 pm | चंद्रनील मुल्हेरकर

तीव्रता????? अहो एँजोलीना आणि ऐश्वर्याला बघुन रोमारोमात जे दाटुन यायचे ते तीव्रतेत मोजताच येणार नाही, पण जौंद्या ,इतके डीटेल नाय सांगु शकत :-P

बॅटमॅन's picture

3 Dec 2014 - 12:50 pm | बॅटमॅन

समजले =)) =)) =))

आपल्याला अनेक मिपाकरांची मूक संमती आहे. =))

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2014 - 1:16 pm | टवाळ कार्टा

एँजोलीना आणि ऐश्वर्याला

नावे कदाचित बदलतील...पण भावना त्याच ;)

बॅटमॅन's picture

3 Dec 2014 - 1:38 pm | बॅटमॅन

अगदी अगदी....अशा भावना डीटेलमध्ये सांगण्याची आदर्श जागा म्हणजे मचाक. मिपाचा हा विभाग सुरू जाहल्यास बाकी प्रतिसाद एकदम भरभरून मिळेल. ;)

या मागणीस बॅट्यास अनुमोदन.. रच्यकने, मचाक सध्या थंड पडलेले दिसतेय. आता दुसरीकडे बाजार भरतो की बाजारच उठलाय हे काय माहीत नाही.

जेपी's picture

5 Dec 2014 - 9:29 am | जेपी

अगदी अगदी....अशा भावना डीटेलमध्ये सांगण्याची आदर्श जागा म्हणजे मचाक. मिपाचा हा विभाग सुरू जाहल्यास बाकी प्रतिसाद एकदम भरभरून मिळेल
फक्त बोलाची कढी,कुनी पुढाकार घेत नाय.

काय केलं पायजे ते बोला की मग. मागणी करून झालीये कधीच, किती तरी वेळा.

मृत्युन्जय's picture

3 Dec 2014 - 2:13 pm | मृत्युन्जय

त्याचे काय झाले असेल की ऐश्वर्या आणि एँजोलीना यांच्या रोमारोमात चंद्रनील मुल्हेरकरांचा विचार केल्यावर अश्या तीव्र भावना दाटुन येत नसतील. त्यामुळे या बाबतीत त्यांचे पोझिटिव्ह व्हाइब्स कमी पडले असावेत.

पिंपातला उंदीर's picture

2 Dec 2014 - 9:08 pm | पिंपातला उंदीर

@हाड्क्या अगदि अगदि. हेच म्हणार होतो

पिंपातला उंदीर's picture

3 Dec 2014 - 9:23 am | पिंपातला उंदीर

प्रतिक्रिया दिल्यबद्दल धन्य्वाद

योगी९००'s picture

3 Dec 2014 - 9:33 am | योगी९००

शिवाय आपल्यासोबत घडणारया सर्व वाईट घटना आपणच नकारात्मक विचार करून आपल्याकडे आकर्षित करून घेतो हा The Law of Attraction चा व्यत्यास पण तितकाच धोकादायक . म्हणजे दिल्ली बलात्कार प्रकरणातील बलात्कारित मुलीने नकारात्मक विचार करून तो बलात्कार ओढवून घेतला होता का ? किंवा लातूर मध्ये झालेल्या भूकंपात मरण पावलेल्या किंवा सर्वस्व गमावलेल्या लोकांनी हा भूकंप नकारात्मक विचार करून घडवून आणला होता का ? साहजिकच victim असणाऱ्याला दोषीच्या पिंजर्यात हा नियम उभा करतो .

माझ्यामते भुकंप, बलात्कार किंवा अपघात अशा ठिकाणी हा लॉ अप्लाय होत नाही असे यांचे म्हणणे आहे. तुमचे करीअर, तुमचे ध्येय अशा ठिकाणी तुम्ही सकारात्मक विचार करून प्रयत्न केले तर यश मिळते असे या लॉ चे म्हणणे असावे.

हा The Law of Attraction 'असे सांगतो कि माणूस हा सकारात्मक विचारांच्या मदतीने आपल्याला पाहिजे ते म्हणजे भरपूर संपत्ती , प्रेम , सुदृढ तब्येत वैगेरे मिळवू शकतो प्रयत्न करू नका ..नुसताच विचार करा असे कोठेही या लॉने सांगितलेले नाही.

मोठमोठ्या लोकांनी, राजे महाराजे यांना हा लॉ माहित होता म्हणजे त्यांनी सकारात्मक उर्जा पसरवायचा प्रयत्न केला. युद्ध किंवा मोठे प्रकल्प सुरू करताना एखादे सकारात्मक भाषण देऊन सैनिकात उत्साह जागृत करण्याचे तंत्र ह्याच लॉ ने आले असावे.

पिंपातला उंदीर's picture

3 Dec 2014 - 10:17 am | पिंपातला उंदीर

सकारात्मक विचार करा हि शिकवणूक आपल्या अनेक संतांनी पण दिली आहे . इतर अनेक पुस्तकात पण हे येउन गेले आहे . प्रश्न तिथे सुरु होतो जिथे त्याला काहीतरी चमत्काराचे गुण लावून वर त्याला वैज्ञानिक नियमांचं अधिष्ठान देण्याचा प्रयत्न होतो .

पिंपातला उंदीर's picture

3 Dec 2014 - 10:24 am | पिंपातला उंदीर

माझ्यामते भुकंप, बलात्कार किंवा अपघात अशा ठिकाणी हा लॉ अप्लाय होत नाही असे यांचे म्हणणे आहे. तुमचे करीअर, तुमचे ध्येय अशा ठिकाणी तुम्ही सकारात्मक विचार करून प्रयत्न केले तर यश मिळते असे या लॉ चे म्हणणे असावे

मला अस वाटत नाही . इथे Rhona Byran त्सुनामी च्या घटने बद्दल काय म्हणते ते पाहा .

The hundreds of thousands killed in the Asian tsunami, the thousands who died on 9/11, the millions put to death in the Holocaust? Are we simply to assume it was all their own fault?

Byrne sounds rather weary as she skirts round this subject in her book but, basically, her answer is an extraordinary yes.

"By the law of attraction, they had to be on the same frequency as the event," she says, allowing only a small concession: "It doesn't necessarily mean they thought of that event."

http://terribletruth-beautifullie.blogspot.in/2009/06/yes-secret-does-bl...

मुळात हा सगळा लेखच वाचनीय आहे

योगी९००'s picture

3 Dec 2014 - 10:31 am | योगी९००

मला एवढचं कळलं पुस्तक वाचून आणि व्हिडीओ पाहून..

की जर आपण ह्या लॉ वर विश्वास ठेवला, तर आपण जास्तीत जास्त सकारात्मक विचार करू आणि हळुहळु त्या गोष्टीची आस लागून आपणच त्यादृष्टीने योग्य तेवढेच कष्ट घेऊ. अशा कष्टामुळे आणि dedicated efforts मुळे आपल्याला यश मिळण्याची शक्यता जास्तच असते..पण मूळात लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन चा शब्दशः अर्थ घेतला तर तुम्ही म्हणता ती अंधश्रद्धाच आहे.

मी फक्त सकारात्मक विचार करुन पोट कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघुया जमतं का ते. :)

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2014 - 10:01 am | टवाळ कार्टा

कोणाचे?

स्वतःचेच. वाढवायचे असेल तर.......

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2014 - 3:16 pm | अत्रुप्त आत्मा

@टवाळ कार्टा
कोणाचे? >>> =))))))

मृत्युन्जय's picture

3 Dec 2014 - 11:01 am | मृत्युन्जय

मला सिक्रेट सारखी पुस्तके मुळात वाचायला आवडत नाही. अशी पुस्तके त्याच गोष्टी सांगतात ज्या आपल्याला माहिती असतात पण आपण काही कारणाने आचरणात आणत नाही. त्यामानाने ती पुस्तके आवडतात जी Execution किंवा implementation (इंग्रजी शब्दांसाठी क्षमस्व. एकदम मराठी शब्द सापडले नाहित) शिकवतात ती आवडतात. त्यामुळे डेल कार्नेजीची काही पुस्तके आवडतात.

पण एक गोष्ट मात्र खरी की सिक्रेट मध्ये काही चांगल्या गोष्टी नक्की सांगितल्या आहेत. बी पोझिटिव्ह हा अ‍ॅटिट्युड योग्य नक्कीच आहे. सकारात्मक विचारांचा योग्य परिणाम होतो हे म्हणणे खटकण्याजोगे नक्कीच नाही.

कलंत्री's picture

3 Dec 2014 - 11:38 am | कलंत्री

अमंलबजावणी, कार्यकृती कार्यक्रम, कर्ता इत्यादी

पिंपातला उंदीर's picture

3 Dec 2014 - 2:47 pm | पिंपातला उंदीर

अवांतर -ज्या डेल कार्नेजी ने अनेक लोकाना आपल्या पुस्तकातून प्रेरणा दिली त्याने आयुष्याला कंटाळून आत्महत्या केली होती असा प्रवाद आहे

मृत्युन्जय's picture

4 Dec 2014 - 12:59 pm | मृत्युन्जय

अरेरे. लोका सांगे तत्वज्ञान मधलाच प्रकार की हा. पण त्याची पुस्तके मात्र खुप छान आहेत.

असा प्रवाद आहे

म्हणजे खात्रीशीर बातमी नाही काय ही?

पिंपातला उंदीर's picture

4 Dec 2014 - 4:09 pm | पिंपातला उंदीर

काहि लोक अस म्हनतात काहि लोक तस. : )

http://kingsley2.wordpress.com/2003/11/25/did-dale-carnegie-commit-suicide/

विटेकर's picture

3 Dec 2014 - 1:01 pm | विटेकर

बेम्बट्या ....

तस्मात कुंभार हो... गाढवास तोटा नाही !

रायनची आई's picture

3 Dec 2014 - 5:25 pm | रायनची आई

आमच्या नात्यातच एक सद्स्या आहेत ज्या पूर्णपणे अशा पॉझिटिव थिन्किन्ग वाल्या पुस्तकान्च्या आहारी गेल्या आहेत..अगदी त्याना सान्गितल की आज खूप ट्राफिक होत..तरी त्या म्ह्णतात की ऑफिस मधून निघण्यपूर्वी विचार करायचा आज ट्रफिक लागणार नाही तर खरच लागत नाही..

अत्रन्गि पाउस's picture

4 Dec 2014 - 3:35 pm | अत्रन्गि पाउस

आणि कुठलाही प्रश्न शेयर करायला गेल कि Think Positive ' चा डोक्यात जाणारा सल्ला देतात

अगदी खरंय ....

१. बायकोने भाजी खारट केली... थिंक पॉजीटीव्ह... हॉटेलमधून पार्सल आणा.

२. बायकोने भाजी न करता आमटी केली... थिंक पॉजीटीव्ह... हॉटेलमधून पार्सल आणा.

३. बायकोने आज खिचडी केली....थिंक पॉजीटीव्ह... हॉटेलमधून पार्सल आणा.

४. बायकोने आज बटाटे वडे आणि चिंचेची चटणी केली...थिंक पॉजीटीव्ह...लसणीची चटणी विकत आणा.

५. मुद्दा क्रमांक १ ते ४ रिपीट झाल्यास , व्यनि करणे....

टवाळ कार्टा's picture

4 Dec 2014 - 9:42 pm | टवाळ कार्टा

५ व्या दिवशी बायको म्हणेल आज हॉटेलातच जाउ ;)

मुक्त विहारि's picture

4 Dec 2014 - 11:23 pm | मुक्त विहारि

म्हणूनच म्हणालो....व्यनि करा...

मी येतोय फेब्रूवारीत, तुला आता बाबांकडे न्यायलाच हवे...

थिंक पॉझीटीव्ह रे बाबा....

खटपट्या's picture

5 Dec 2014 - 12:54 am | खटपट्या

बायको आवडत नाही.......थिंक पॉझीटीव्ह........?

तो परत एकदा वाचा...

आणि

थिंक पॉझीटीव्ह मध्ये नकारार्थी शब्द नकोत...

आता तुमचेच वाक्य बघा, "बायको आवडत नाही......."

ह्यात "नाही" हा नकारार्थी शब्द आलाच.

खटपट्या's picture

5 Dec 2014 - 1:59 am | खटपट्या

ओके,

बायकोला सोडून दुसरी बाई आवडते....थिंक पॉझीटीव........?

मुक्त विहारि's picture

5 Dec 2014 - 4:28 am | मुक्त विहारि

बटाटेवड्यांबरोबर चिंचेची चटणी खाणारी बायको, पुण्याची असण्याची शक्यता जास्त.

त्यामुळे दुसरी बायको करायचा विचार पण मनांत आणू नका.(उगाच कुठले तरी कलम लावून तुम्हालाच जीव नकोसे करून सोडेल.)

आता,

खटपट्या पण अ‍ॅड झाला...

आता व्य.नि. वगैरे नकोच.डायरेक्ट बाबांचा सल्लाच देवू.

ठीकै !! येतो तुमच्या बाबांकडे. बघुया काय म्हणतात.

जेपी's picture

5 Dec 2014 - 9:43 am | जेपी

आता व्य.नि. वगैरे नकोच.डायरेक्ट बाबांचा सल्लाच देवू.
@मुवि- चालु करा.आमाला झाला फायदा सल्याचा. इतरांना पण होईल.

बटाटेवड्यांबरोबर चिंचेची चटणी खाणारी बायको, पुण्याची असण्याची शक्यता जास्त.

मुवि, तुम्हाला संधी मिळेल तिथे पुण्याच्या चिंचेच्या चटणीचा उद्धार करता.

पुण्याच्या चिंचेच्या चटणीने एखादी खोलवर जखम केली होती का तुम्हाला जी अजूनही भळाळून वाहते आहे? *lol*

मुक्त विहारि's picture

5 Dec 2014 - 9:52 am | मुक्त विहारि

तुम्ही एकदा आमच्याबरोबर बटाटेवडे आणि लसूण चटणी अधिक झेपत असेल तर लवंगी मिरच्यां खावून बघा.

मग काय ते ठरवा.

माणसाने चिंचेची चटणी न करता, गाभूळलेली चिंच आपल्या आवडत्या जोडीदारासमवेत खाण्यातली मज्जा वेगळीच.निदान आम्हाला तरी अशीच चिंच खायची सवय आहे.

टवाळ कार्टा's picture

5 Dec 2014 - 8:35 am | टवाळ कार्टा

=))

सुधीर's picture

5 Dec 2014 - 10:20 am | सुधीर

सिक्रेट वाचलं नाहीए. पण सारांष/ रिव्हू बरेच वाचलेत. त्यावरून गालिब आठवतो.
दिल को खुष रखने को ग़ालिब ये ख्याल अच्छा है।
"नुसता कृतीशिवाय पॉझीटीव्ह विचार म्हणजे डे ड्रिमिंग आहे." +१ टू विजूभाऊ...
सेल्समन/नेतेगिरी करायची असतील तर डेल कार्निगी चांगला वाटेल... डेल कार्निगी मोटीव्हेशनल पेक्षा मानवीय नातेसंबधातून स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा हे सांगणारा लेखक वाटतो. (मी फक्त हाउ टू विन... वाचून मत देतोय)

क्लिंटन's picture

5 Dec 2014 - 10:40 am | क्लिंटन

"नुसता कृतीशिवाय पॉझीटीव्ह विचार म्हणजे डे ड्रिमिंग आहे." +१ टू विजूभाऊ...

प्रत्यक्ष कृतीशिवाय सगळ्याच गोष्टी व्यर्थ आहेत.मग पॉझिटिव्ह थिंकिंग घ्या किंवा अन्य काहीही.स्वतःला कृती करायची नसेल किंवा कृती करण्यात काहीतरी कमी असेल म्हणून अपयश येत असले तर आपल्या अपयशाचे खापर इतरांवर फोडणारे लोक सर्वत्र आढळतात. अशा लोकांनी खापर फोडायला पॉझिटिव्ह थिंकिंग नसते तर दुसरे काहीतरी शोधून काढलेच असते.त्यामुळे अशा खापरफोड्यांना अजिबात गांभीर्याने घ्यायची गरज नाही.

मला वाटते की पॉझिटिव्ह थिंकिंग हा एक आपले आयुष्य चांगले बनवायला योग्य विचार आहे.तो पुढे कसा न्यायचा, अंमलात कसा आणायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे.मी स्वतः अशी अनेक पुस्तके वाचली आहेत आणि जमेल तितक्या प्रमाणात त्या गोष्टी अंमलात आणायचा माझा प्रयत्नही असतो.मला पाहिजे तसे यश मिळाले आहे का?नक्कीच नाही.पण याचा अर्थ पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये कमी नाही तर मीच कुठेतरी चुकत आहे.

एकूणच काही प्रतिसादांमधला पॉझिटिव्ह थिंकिंग या प्रकाराविरूध्दचा ब्लँकेट सूर खटकला.मला स्वतःला तर डेल कार्नेगी, नेपोलिअन हिल, वेन डायर, नॉर्मन व्हिन्सेन्ट पील, जोसेफ मर्फी इत्यादींची पुस्तके वाचायला नक्कीच आवडतात आणि ती मी वाचतो देखील.

(अंधश्रध्द) क्लिंटन

सुधीर's picture

5 Dec 2014 - 12:06 pm | सुधीर

सुटलेलं पोटं कमी करायचय असं म्हणणारे बरेच आढळतात. पण त्यासाठी लागणारी मेहनत करताना दिसत नाहीत. माझा रोख फक्त अशा विचार करणार्‍या वा बोलून दाखवणार्‍यांवर होता. अर्थात तुम्ही म्हणताय तसे, विचार करून कृती करणारीही माणसं असतात. तरीही म्हणावे तसे यश पदरी पडलेले नसते आणि त्याची कारणं नेहमी शोधावी लागतात.

बाकी, मला असं वाटतं "निगेटीव्ह थिंकींग चूकीचीच आहे" असही काही नाही. याऊलट निगेटीव्ह थिंकींगमुळे विरूद्ध शक्यतांचाही विचार करता येतो. पॉझिटीव्ह काय अन निगेटीव्ह काय, पण काय हवय, काय करायचय हा विचार महत्वाचा, कारण पहिली निर्मिती तिथेच होत असते. कृतीतून ती कशी साकार होईल यासाठीच सगळी दगदग माणसाची चालू असते असं मला वाटतं.

क्लिंटन's picture

5 Dec 2014 - 1:45 pm | क्लिंटन

पण त्यासाठी लागणारी मेहनत करताना दिसत नाहीत. माझा रोख फक्त अशा विचार करणार्‍या वा बोलून दाखवणार्‍यांवर होता.

ज्यांना काहीच करायचे नसते आणि नुसती बडबडच करायची असते अशा लोकांवर रोख होता हे मान्य.अशा लोकांना पॉझिटिव्ह थिंकिंग काय किंवा अन्य कोणतीही गोष्ट उपयोगी पडूच शकणार नाही.पण इतर काही प्रतिसादांमधून असे यश आले नाही म्हणून मुळातील पॉझिटिव्ह थिंकिंगच वाईट गोष्ट आहे हा सूर निघत आहे असे जाणवत आहे ते मात्र मला मान्य नाही.किंबहुना मी या विषयावर जी काही पुस्तके वाचली आहेत त्यात नुसते पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि थंड पडून रहा तुम्हाला पाहिजे ते मिळेल अशा स्वरूपाचे कधीही बघितलेले नाही. आणि तसे कोणत्या पुस्तकात लिहिलेले आढळले तर ते पुस्तक ताबडतोब रद्दीत फेकायच्या लायकीचे आहे हे पण नक्कीच.तेव्हा एखाद्या गोष्टीत नक्की काय संदेश आहे, नक्की काय करणे अभिप्रेत आहे, तसे खरोखरच १००% केले आहे का इत्यादी गोष्टींना फाट्यावर मारून रिझल्ट आले नाहीत ना म्हणजे मुळातली थिअरीच चुकीची आहे हा सूर मला अजिबात मान्य नाही.पण होते कसे की या प्रकाराला मोठ्या विज्ञाननिष्ठेचे वलय लावून कॉलर ताठ करणे नेहमीच सोपे असते.

बाकी, मला असं वाटतं "निगेटीव्ह थिंकींग चूकीचीच आहे" असही काही नाही.

म्हणजे परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास तर करायचा पण मला आयत्या वेळी काहीच आठवणार नाही अशा प्रकारचा विचार घातक नाही? :)

सुधीर's picture

5 Dec 2014 - 1:58 pm | सुधीर

हाहा :) एवढया टोकाचा नाही. प्लान ए, प्लान बी या हिशेबाने...

पिंपातला उंदीर's picture

5 Dec 2014 - 3:13 pm | पिंपातला उंदीर

सकारात्मक विचार करणे हि काहीतरी निरुपयोगी गोष्ट हे सांगण्याचा किमान या लेखाचा तरी उद्देश नाही . आक्षेप आहे तो या गोष्टीला वैज्ञानिक नियमांचं अधिष्ठान देण्याबद्दल . सध्या दिवगंत कलाकार कुलदीप पवार यांचे बंधू या गोष्टीवर भरघोस फीस देऊन प्रवचन देतात . त्यात हे सिक्रेट जणू कुठला तरी मोठा चमत्कार आहे असा काहीसा सूर असतो . तो खटकतो . सकारात्मक विचारसरणी ला कृती च जोड आवश्यकच आहे .

अन्या दातार's picture

6 Dec 2014 - 8:28 am | अन्या दातार

>>सध्या दिवगंत कलाकार कुलदीप पवार यांचे बंधू
सध्या?? अहो गेल्या २० वर्षांपासूनचा त्यांचा फुलफ्लेज धंदा आहे तो. जोडीला अगम्य चित्रकला, हस्तरेषा वगैरेही आहेच.

आगाऊ म्हादया......'s picture

8 Dec 2014 - 6:08 pm | आगाऊ म्हादया......

अत्यंत टाकाऊ पुस्तक आहे. सिनेमा पण. मला माझ्या मामीने दिल होत, इतकं डोक्यात जायला लागल कि शेवटी दिल माळ्यावर टाकून.
एक प्रसंग आठवला, माझ्या मित्राचा केमिस्ट्री हा विषय backlog होता. मला भेटला तेव्हा या पुस्तकाला शिव्याच घालत होता, कारण विचारल तर म्हणे मी बरबाद झालो , या पुस्तकासारखा वागलो, अभ्यास नाही केला पण खूप सकारात्मक विचार केले,आणि पुन्हा नापास झालो.
खरं सांगतो इतका डोक्यात गेला होता ना तो, असली लोक आहेत म्हणून चालतायत धंदे असल्या लोकांचे.

या पुस्तकासारखा वागलो, अभ्यास नाही केला पण खूप सकारात्मक विचार केले,आणि पुन्हा नापास झालो.

हे म्हणजे खूपच झाले.

पिंपातला उंदीर's picture

8 Dec 2014 - 7:22 pm | पिंपातला उंदीर

भारि प्रतिसाद

अमित खोजे's picture

18 Dec 2014 - 2:49 am | अमित खोजे

मला वाटते या 'थींक पॉझीटिव्ह' चा अर्थ लावण्यात काहीशी गल्लत झालेली दिसतीये. डेल कार्नेगीची आणि अशी तत्सम पुस्तकेही या 'थींक पॉझीटिव्ह' चा वापर करताना दिसतात याचे कारण म्हणजे 'थींक पॉझीटिव्ह' हि फक्त एक पहिली पायरी आहे. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करू लागता तेव्हा सर्वात प्रथम तुमच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांची गती कमी होते आणि ते तुम्हाला कमी छळतात. नंतर तुम्ही जे सकारात्मक विचार करत आहात त्यापासून प्रेरणा मिळून तुम्ही ते सकारात्मक विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करता येईल याचा विचार करू लागता. आणि मग या सकारात्मक विचारांमुळे त्याला अनुषंगून कृती करण्याची प्रेरणा मिळते. इथे हि कृती करण्याची पायरी महत्वाची आहे. कारण जो पर्यंत तुम्ही कृती करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही आणि 'असेल माझा हरी ..' परिस्थिती काही चुकणार नाही.

वरील प्रतिसादांमध्ये वाचलेली उदाहरणे जर खरी असतील तर मला वाटते 'थींक पॉझीटिव्ह' हि संकल्पना प्रत्यक्षात आणू इच्छिणार्यांना त्याच्या पुढच्या पायर्यांचे ज्ञान नसावे.

बाकी ध्वनिचीत्राफितीमध्ये पाहिल्याप्रमाणे सुरुवातीला हे काही तरी फार मोठे गुपित सांगत आहेत आणि तुम्ही आता अगदी सरसावून बसा; यासाठी पहिली बरीच मिनिटे खर्च केली आहेत. त्या मिनिटांनाच कंटाळून मी पहायचे सोडून बंद केली. जे काही सांगायचे आहे ते नीट सांगा ना राव. उगाच पहिले ह्यांनी हे सिक्रेट वापरले होते अन त्यांनी ते सिक्रेट वापरले होते पाल्हाळ लावत बसतात.
'Think and Grow Rich' मध्येपण - "आयुष्यात यशस्वी होण्याचे गुपित या पुस्तकात दडलेले आहे! फक्त जे ते गुपित जाणून घेण्यासाठी पूर्णपणे तयार असतील त्यांनाच लगेच सापडेल. आणि हे गुपित म्हणजे काही एखादी ओळ किंवा एखादा परिच्छेद नाही आहे. जे त्या गुपिताचा तन मन लावून शोध घेत आहेत त्यांनाच ते मिळेल. या गुपिताचा उपयोग करून मोठमोठे औद्योगिक अति श्रीमंत झाले आहेत .." वगैरे वगैरे

क्लिंटन's picture

18 Dec 2014 - 10:37 am | क्लिंटन

जे काही सांगायचे आहे ते नीट सांगा ना राव. उगाच पहिले ह्यांनी हे सिक्रेट वापरले होते अन त्यांनी ते सिक्रेट वापरले होते पाल्हाळ लावत बसतात.

हो ना.आपण सुध्दा पहिलीपासून बारावीपर्यंत उगीचच वेळ व्यर्थ दवडत असतो.आपले पोट भरता येईल अशा शिक्षणाला डायरेक्ट सुरवात केली पाहिजे.उगीचच शिक्षणाचे इतकी वर्षे पाल्हाळ कशाला लावतात काय माहित?

'Think and Grow Rich' मध्येपण - "आयुष्यात यशस्वी होण्याचे गुपित या पुस्तकात दडलेले आहे! फक्त जे ते गुपित जाणून घेण्यासाठी पूर्णपणे तयार असतील त्यांनाच लगेच सापडेल.

माझे तर 'Think and Grow Rich' हे अगदी ऑल टाइम फेव्हरेट पुस्तक आहे.त्यात उगीचच पाल्हाळ लावले आहे असे मला तरी कुठेच जाणवले नाही.आणि तसेही कुठल्याही पुस्तकात उगीच पाल्हाळ लावले असेल तर ते पाल्हाळ बाजूला ठेऊन पुढे जायचा ऑप्शन आपल्या सगळ्यांकडेच असतो.

बाकी अति विज्ञाननिष्ठ लोकांचा एक प्रॉब्लेम नक्कीच असतो.समोर न दिसणारी किंवा वैज्ञानिक पुराव्यांनिशी सिध्द करता न येणारी गोष्टही उपयुक्त असू शकते हे मुळातच त्यांना मान्य नसते आणि सुरवातच शंकेखोर मनाने केली तर रिझल्ट कदापि दिसणे शक्य नाही.

असो.

प्यारे१'s picture

18 Dec 2014 - 1:02 pm | प्यारे१

>>> बाकी अति विज्ञाननिष्ठ लोकांचा एक प्रॉब्लेम नक्कीच असतो.समोर न दिसणारी किंवा वैज्ञानिक पुराव्यांनिशी सिध्द करता न येणारी गोष्टही उपयुक्त असू शकते हे मुळातच त्यांना मान्य नसते आणि सुरवातच शंकेखोर मनाने केली तर रिझल्ट कदापि दिसणे शक्य नाही.

बाडीस ;)

पिंपातला उंदीर's picture

18 Dec 2014 - 8:43 am | पिंपातला उंदीर

@अमीत राव- मस्त प्रतिसाद

पैसा's picture

19 Dec 2014 - 12:41 pm | पैसा

पुस्तकात काय दम दिसत नै. पण चर्चा आवडली!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Dec 2014 - 8:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अश्या पुस्तकांकडे एक मार्गदर्शक म्हणुन पाहणारे बहुतांश लोक परिस्थितीने गांजलेले असतात. त्यातुन बाहेर पडायचा मार्ग सापडत नसताना अश्या एका संकल्पनेभोवती गोल गोल फिरवणार्‍या पुस्तकांचा त्यांना मानसिक आधार वाटला तर नवल नको वाटायला.
एका मर्यादेपर्यंत पॉसिटिव्ह असणं चांगलचं असतं पण त्याबरोबरचं कृतीशिल आणि कॅलक्युलेटिव्ह असणंही तेवढचं महत्त्वाचं आहे. नाहीतर अभिमन्यु व्हायला वेळं लागतं नाही.