उच्च दर्जाचे हेल्मेट ची सक्ती, असावी/नसावी ?

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
27 Nov 2014 - 8:14 pm
गाभा: 

आजचा फिल ह्यूजचा मृत्यूदिवस हा क्रिकेटसाठी अतिशय दु:खद दिवस आहे. मिपाकरांतर्फे मी, 'ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो' अशी प्रार्थना करतो.

सामन्यादरम्यान बाऊन्सर डोक्यावर आदळल्याने जखमी झालेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्युज याचे आज सकाळी निधन झाले. अवघ्या २५ वर्षांचा ह्युज शेफिल्ड शिल्ड सामन्यादरम्यान मंगळवारी बाऊन्सर लागून व तो बेशुद्ध पडला. त्याच्यावर सेंट व्हिन्सेंट इस्पितळात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर तो कोमात गेला होता. गेल्या दोन दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता, मात्र आज त्याचे निधन झाल्याने ही झुंज अपयशी ठरली. दरम्यान ह्युजने सामन्यादरम्यान घातलेले हेल्मेट जुने तसेच हलक्या दर्जाचे होते, असे हेल्मेट बनविणारी कंपनी ‘मासुरी’ने स्पष्ट केले असून,

त्यामुळे क्रिकेटमध्ये सुरक्षेच्या उपायासाठी, आता मैदानातील सर्वच खेळाडूंना (फलंदाज + जवळचे सर्वच क्षेत्ररक्षक यांना), त्यांची इच्छा वा नसो, त्यांनी 'उच्च दर्जाचे हेल्मेट ची सक्ती', ICC ने करावी का ? किंवा सक्ती करू नये व खेळाडूंना तो निर्णय घेऊ द्यावा ?

प्रतिक्रिया

बाबा पाटील's picture

27 Nov 2014 - 8:34 pm | बाबा पाटील

दुपारी नेट मध्ये सराव करताना,एक बाउन्सर बॅटच्या हँडलची कड घेवुन हेल्मेटच्या जाळीवर एवुन आदळला,नशिब चांगले होते.एक क्षण डोळ्यापुढे दोन्ही लेकी आल्या होत्या.सो सेफ्टी फस्ट्,साला शरीराचे ओरिजनल स्पेअर पार्ट कुठल्या दुकानात मिळत नाहीत हो.

असो,

आपल्याला काय?

मुळात आम्ही त्या स्वार्थी खेळापासूनच दूरच आहोत.तेच बरे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Nov 2014 - 8:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रमण लांबाला क्षेत्ररक्षण करतांना चेंडू लागला तो ज्या जागेवर क्षेत्ररक्षण करत होता तिथे त्याने हेलमेट घालायला हवं होतं त्याची बेफिकिरी तिथे आडवी आली.

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2014 - 9:01 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यामुळे क्रिकेटमध्ये सुरक्षेच्या उपायासाठी, आता मैदानातील सर्वच खेळाडूंना (फलंदाज + जवळचे सर्वच क्षेत्ररक्षक यांना), त्यांची इच्छा वा नसो, त्यांनी 'उच्च दर्जाचे हेल्मेट ची सक्ती', ICC ने करावी का ? किंवा सक्ती करू नये व खेळाडूंना तो निर्णय घेऊ द्यावा ?>>> ??????? „सदर विषया वरील चर्चा इथे का आणि कशाला????

खटपट्या's picture

27 Nov 2014 - 11:45 pm | खटपट्या

अरेरे ! मला वाटलं परत पुण्याच्या हेल्मेट सक्तीवर धागा निघाला की काय ?

स्वीत स्वाति's picture

28 Nov 2014 - 11:24 am | स्वीत स्वाति

अगदी ! मलाही तसेच वाटले .

हाडक्या's picture

28 Nov 2014 - 4:31 pm | हाडक्या

अहो, तेच आहे हो.. नीट पहा परत.. ;)

पगला गजोधर's picture

22 Jul 2016 - 1:33 pm | पगला गजोधर

खड्यांची सक्ती करा..
चौकटराजा - Fri, 22/07/2016 - 13:02

सरकारने एखाद्या रस्त्यावर इतकया इतक्या मापाचे इतके इतके खड्डे असलेच पाहिजेत असेच टेण्डर काढावे. रोज चार पाच
म्रुत्यू झाले की सक्ती न करताच सर्व हेल्मेट घालायला लागतील.

अशीच सोय आयुर्विमा, गाडीचा विमा, घराचा विमा, टीव्हीचा विमा, पासपोर्टचा विमा, रेशनकार्ड , क्रेडिट कार्ड , आधार कार्ड चोरीला जाण्याची शक्यता, मधुमेह बी पी होण्याची शक्यता , मूल न होण्याची शक्यता , आगीचा विमा, परदेश प्रवासात विमान
रद्द होण्याचा विमा अशी दोन उत्तरे असलेल्या सर्वा॑ची भिति समाजाला घालावी. सर्वीस सेक्टर फोफावून मजबूत सर्वीस टेक्स सरकारला मिळेल.

मुळात कोणत्याही हेल्मेटची रचना तांत्रिक अंगाने पाहिल्यास असं दिसेल की वरून एखादी वस्तू पडल्यास तो आघात आतल्या कापडी पट्ट्यांवर पसरवला आणि झेलला जातो परंतू क्रिकेट या खेळात आघात डाव्या उजव्या कानशिलाकडून होतो त्यामुळे तसले वेगळे हेल्मेट बनवायला हवे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Nov 2014 - 8:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कानशिलाच्या बाजूने जी जाळी असते तिथे जाळी रुंद आणि मागे मानेपर्यन्त पाहिजे. तोंडावर येणारा चेंडू हुक मारतांना, किंवा ऑन साइड आडव्या ब्याटीने मारतांना तो फटका जर चेंडुवरुन नजर हटली तर थेट कानाशिलावर चेंडू येण्याची शक्यता असतेच असते.
खाली हनुवटीवर मी अनेकांच्या हनुवटी फुटलेल्या पाहिल्या आहेत.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

28 Nov 2014 - 8:34 am | कंजूस

या निमित्ताने क्रिकेट कोचिंगवरही(कराटे वगैरेसध्दा) चर्चा होणे गरजेचे आहे.वेगळा धागा वगैरे.

सुनील's picture

28 Nov 2014 - 8:47 am | सुनील

पण मी काय म्हणतो, जर अंडरआर्म बोलिंग करायचा नियम केला तर सुंठीवाचूनच खोकला जाईल की!

त्यातून कुणाला ओवरआर्म बोलिंग करायचीच असली तर, बॉल बॅट्समनपर्यंत पोहोचेतोवर किमान दोन टप्पे पडले पाहिजेत, असा उपनियम करता येईल!

आधी प्रत्येक मिपाकराला हेल्मेट सक्ती करायला पायजे. *wink*
भले दुचाकी चालवत नसो किंवा क्रिकेट खेळत नसो.
मंजे भलतेच डोक्यावर पडल्या सारखे केच्याके धागे काढाणार नाहीत. *dash1*

टवाळ कार्टा's picture

28 Nov 2014 - 10:36 am | टवाळ कार्टा

=))

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Nov 2014 - 11:08 am | माईसाहेब कुरसूंदीकर

गजोधरा, अरे त्यांचे ते बघून घेतील. मी म्हणेन की ह्यापुढे रबरी चेम्डूच वापरावा.

चिंध्यांचा चेंडू त्याहुन बरा की ^_~ हेल्मेट नको,सक्ती नको अाणि धागाही =))

चौकटराजा's picture

28 Nov 2014 - 12:21 pm | चौकटराजा

शेवरीच्या कापसाचा चेंडू हवा !

तिमा's picture

28 Nov 2014 - 11:23 am | तिमा

नुकत्या चालायला लागलेल्या बाळांनाही हेल्मेटसक्ती केली पाहिजे. त्यामुळे कितीतरी टेंगळे व खोका पडायच्या वाचतील.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Nov 2014 - 1:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पुण्यातल्या बाळांनाही ? कारण 'सरकारने आमचे प्रबोधन करावे, आम्हाला टेंगूळ आले तर सरकारचे काय नुकसान होते?आमचे आई-वडिल बघुन घेतील. अन्यथा आम्ही सुप्रिम कोर्टात जाऊ" असे म्हणतील.

बॅटमॅन's picture

28 Nov 2014 - 4:42 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

माईसाहेब १, पुणेकर ०.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Nov 2014 - 8:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

माईसाहेब, या प्रतिसादानंतर तुम्ही पुण्यात पायी फिरतानाही हेल्मेट घालून फिरावे असा सल्ला देत आहे.

माईसाहेब ही तुमची सिक्सर अगदी मैदानाच्या बाहेर गेली आहे.
पुण्यातली बाळं..... :) अजुन हसतोय ....

अजया's picture

28 Nov 2014 - 5:06 pm | अजया

माई,माई _/\_
=))

विनायक प्रभू's picture

28 Nov 2014 - 6:03 pm | विनायक प्रभू

हेल्मेट कसे घालावे ह्याचे प्रशिक्षणाची सक्ती असावी.

सूड's picture

28 Nov 2014 - 6:50 pm | सूड

हे बाकी खरं हो !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Nov 2014 - 8:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

नक्कीच. पण त्या प्रशिक्षणाअगोदर सगळ्या शरिराचा CT किंवा MRI scan करून मेंदूची जागा नक्की करावी. म्हणजे हेल्मेट शरीराच्या कुठल्या भागावर आणि कसे घालावे हे शिक्षण देणे शक्य होईल. :) ;)

काळा पहाड's picture

29 Nov 2014 - 2:19 pm | काळा पहाड

पुण्यातल्या लोकांना मग नी पॅडची सक्ती करावी लागेल.

माझीही शॅम्पेन's picture

29 Nov 2014 - 11:05 am | माझीही शॅम्पेन

खरतर पुण्यातील तीन पैकी एका लठ्ठ बाळासाठी वेगळ्या प्रतीची हेल्मेट हवीत के नकोत ह्या साठी वेगळा धागा काढावा...
.
.
.
अवांतर :- कोणचही मृत्यू हा वाईटच पण मृत्यू कसा येतो ह्या पेक्षा कोणाला येतो ह्यावर TRP ठरते काय , भारतात रोज हेल्मेट न घातल्यानी किवा रेल वे रुळ ओलांडताना कितीतरी ज़ण नाहक मरत असतात !

आता अंपायरला पिंजऱ्यात ठेवायचे का ?

यसवायजी's picture

30 Nov 2014 - 10:47 pm | यसवायजी

कशाला हेल्मेट आणी कशाला पिंजरे?? मी तर म्हणतो, त्यापेक्षा व्हर्च्युअल क्रिकेट खेळवा. किंवा सिम्युलेटरवर. :D