माणुसकी

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
19 Nov 2014 - 2:18 pm

लहान असताना आयुष्य म्हणजे काय ते माहीतही नव्हतं
आजूबाजूचे सगळे करतील तेच आणि तसंच करायचं
कधी कौतुक व्हायचं कधी दटावणी ….
रोज खूप वेगवेगळी स्वप्न बघायचो
कधी डॉक्टर तर कधी भाजीवाला ….
कोण होणार तू? ह्या प्रश्नाला माझं ठरलेलं उत्तर…."कारकून"
अंदाज नव्हता तेव्हा त्याच्या अर्थाचा …आवडायचे म्हणून म्हणायचं !
मग म्हणायचे आधी माणूस हो ….
वय वाढतच होतं…. आजूबाजूचे तेच पण त्यांच्या अपेक्षा बदलू लागल्या
लहान मुलाचं रुपांतर स्पर्धेच्या घोड्यात झालं होतं …
पाठीवर दप्तराच खोगीर आणि डोक्यावर लादलेल्या अपेक्षा
दबतच गेली सगळी स्वप्न त्याखाली ….रोज…. बदलून गेलं सगळंच
नाही झुगारता आलं ते सगळं कारण आजूबाजूचे माझेच होते… नाही कसं म्हणू त्यांना?
सहन करायची सवय तिथूनच लागली… सगळं मनात ठेवायचं …
'शूर मुलं कधीच रडत नसतात' हे आणखी एक डोक्यात ठोकलं गेलं
प्रसंग विसरले गेले पण शिकवण कायम राहिली
एक एक यत्ता जात राहिल्या…एक दिवस सुशिक्षित म्हणून शिक्का बसला
प्रगती पुस्तकांची रास लागली पण खरी प्रगती कुठे झाली ?
माणूस म्हणून कसं वागायचं हे लहानपणी शिकवलं होतं
पण तरीही शिवाजी शेजाऱ्याच्या घरी जन्माला यावा ही तो घरच्यांची इच्छा !
आपण बरं आणि आपलं काम बरं हेच सांगण्यात आलं सतत
आज ही हृदयद्रावक प्रसंग दिसला की काळीज पिळवटून निघतं सुरुवातीला
मग परत तेच ठसवलेले विचार आणि डोक्याचा भुगा
काढता पाय घेतला जातो तिथून पण मन त्याची पाठ सोडत नाही
बदलावंसं वाटतंय स्वतःला पण जोखड अजूनही आहेच मनात
मग फक्त बहिणाबाईचे ते शब्द आठवत राहतात ….
"धावा ऐकून न आडला त्याले पाय म्हणू नाही"

मुक्तकसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

19 Nov 2014 - 9:55 pm | प्रकाश१११

आपण बरं आणि आपलं काम बरं हेच सांगण्यात आलं सतत
आज ही हृदयद्रावक प्रसंग दिसला की काळीज पिळवटून निघतं सुरुवातीला
मग परत तेच ठसवलेले विचार आणि डोक्याचा भुगा
काढता पाय घेतला जातो तिथून पण मन त्याची पाठ सोडत नाही
बदलावंसं वाटतंय स्वतःला पण जोखड अजूनही आहेच मनात....सुरेख

स्पंदना's picture

20 Nov 2014 - 3:52 am | स्पंदना

"धावा ऐकून न आडला त्याले पाय म्हणू नाही"

काय लिहुन गेली ही बाई!! खरच!!
पण आजकाल त्या थोडा बदल करावा लागतो
"धावा ऐकुन न काढला त्याले पाय म्हणु नाही"

बहुगुणी's picture

20 Nov 2014 - 4:51 am | बहुगुणी

काय लिहुन गेली ही बाई!! खरच!!

+१

अपर्णा: तुमचं "धावा ऐकुन न काढला त्याले पाय म्हणु नाही" हे व्हर्जनही खासच!

मा. पं,: लेखन आवडलं.

मदनबाण's picture

20 Nov 2014 - 9:46 am | मदनबाण

रचना आवडली...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }

रेवती's picture

20 Nov 2014 - 4:44 am | रेवती

छान लिहिलयत.

खटपट्या's picture

20 Nov 2014 - 6:06 am | खटपट्या

वा पंखा साहेब !!

अत्रुप्त आत्मा's picture

20 Nov 2014 - 9:40 am | अत्रुप्त आत्मा

@"धावा ऐकून न आडला त्याले पाय म्हणू नाही"-- जबरदस्त !