टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..!
प्रेषक दात्यांचा अभिजीत ( गुरू, ०८/०७/२००८ - १०:५७) .
बरं झालं असतं "ओएसओ" जर बघितला नसता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..
डोळ्यांमधल्या अजब अदा राहून राहून छळणार.
दिलाचे पतंग आणि किती श्वासावरती जळणार.
जग सुनं सुनं होणार पिक्चर सरता सरता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..
युवराजसोबत फ़िरते ती अन ढोणीसोबत दिसते.
क्रिकेटमधले तिला सांगा नक्की किती कळते !
क्रिकेट,बॉलीवुड तेवढंच खरं बाकी गोंधळ नुसता.
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..
या जन्मी जर नाही जमलं पुढच्या जन्मी बघू.
आपण सुद्धा तेव्हा ओम कपूरसारखं जगू.
"दि एन्ड" नाही, पिक्चर अजून बाकी आहे दोस्ता,
डोळ्यांसमोर तीच आता दिसणार उठता बसता..!
-- अभिजीत दाते
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


हम्म्म्...ओ
हम्म्म्...ओएसओ च्या स्टोरी मध्ये दम नसला तरी दिपिका खरेच सुंदर दिसते. आपल्याला तर जाम आवडली ती.
अभिजित
अभिजित मित्रा ,
मस्त आहे कविता.....आवडलि मला........अश्याच हलक्या फुलक्या कविता करत रहा
ही कविता अन दीपिका सारख्याच!
ही कविता अन दीपिका सारख्याच!|
-चांगल्या पण जरा जास्त लांब!
बाकी जीतराव , मित्रा जिंकलस!
चंपक 'गुप्ते'