पंक, पाकळी, पाखी, पाखरु, आणि ऋग्वेदातील पाकः
अवयावांना अंग असा उल्लेख येतो. बसलेल्या व्यक्तीच्या मांडीचा वरचा भागास अंक म्हणतात संदर्भ. पंखड़ी असा शब्द हिंदीत फुलाच्या पाकळी साठी वापरला जातो पंकज हा शब्द विशीष्ट फुलासाठी वापरला जातो. पंकज हे फुल चिखलात/दलदलीत उगवत म्हणून पंक म्हणजे चिखल अथवा दलदल अशास्वरूपाची व्युत्पत्ती वाचण्यात येते पण पंख, पंखा आणि पंखडी हे शब्द पाहीले कि पंक म्हणजे चिख्खल हे स्विकारणे मला व्यक्तीशः जरा जड जाते.
नदीत गाळ इत्यादी साचून जमीनीचा भाग टोक पुढे जाते (नदी मागे सरकते) यास हिंदीत पाँग असा शब्द आहे (संदर्भ). पाक हा शब्द अन्न शिजवणे (पिक,पक्व असा उत्पत्ती क्रम असल्यास कल्पना नाही) आणि इतर भाषेत पवित्र या अर्थानेही येतो. पण पाकीट या रोजच्या शब्दाकडे पहा पाकीट याच शब्दात कुणाला अन्न साठीचे लागणारे पैसे आणि पावित्र्य असा संबंध दिसला तर मुळीच हरकत नाही; पण व्यक्तीशः मला पाकळी प्रमाणे बाहेर येणारा पण झाकणारा भाग हि अर्थ छटा यातन व्यक्त होते असे वाटते. एवढेच नाही मराठी व हिंदीत पाख आणि पाखी हे शब्द आहेत जे पंख अथवा पाकळी सदृश्य गोष्टींना सुद्धा वापरले जाताना दिसतात. मराठीत धान्य पाखडणे या शब्दाचीही आठवणे येते. मराठीत एकपाखी घर म्हणजे एक उतरते छत असलेले घर, दुपाखी म्हणजे दोनबाजूनी उतरती छते असलेली घरे चौपाखी म्हणजे चार बाजूनी उतरते छत असलेली घरे. (संदर्भ मोल्सवर्थ). मराठीतला 'पाकोळी' हा शब्द आठवतो का ? पुर्वी मला या शब्दाचा कोळी (कातीण) या शब्दाशी संबंध असेल असे का कोण जाणे वाटायचे पण पंखेरू/पाखरू हा शब्द आणि पाख पाखी या मराठी/हिंदी शब्दांकडे बघीतले की पाकोळी शब्दातील 'पाक' हा त्याच्या पंखांबद्दल आहे असे वाटते. मग पक्षी>पंछी या शब्दांच्या उत्पत्तीचा स्रोत नजरे समोर येतो. पण पाक/पाख हा शब्द नुसता वापरला जात असेल तेव्हा कदाचीत त्याचा अर्थ दोन भागांपैकी एक भाग असाही होत असेल कारण; ऋग्वेदात पाक हा शब्द दिसतो तो कोणत्या अर्थाने येतो ते माहीत नाही (ऋग्वेदात वर्ष आणि युग या संकल्पनांचा उल्लेख येत असलातरी महिन्यांच्या नावांचे उल्लेख कमी आहेत असे वाचून आहे) पण भारतीय कालगणनेत महिन्याच्या (मास) पंधरवड्यांना पक्ष असा शब्द येतो जसे कृष्णपक्ष शुक्लपक्ष इत्यादी पण हा पक्ष शब्द प्रथमदर्शनी तरी ऋग्वेदात नसावा (किंवा मला दिसला नसावा, पण ऋग्वेदात चंद्र=सोम आणि त्याचे लहान होत जाणे याची कदाचीत नोंद असावी अत्री ऋषी कदाचीत सुर्यग्रहणांची वगैरे त्या काळात निरीक्षणे करत असावेत) पण नंतरच्या एतरीय ब्राह्मणात पक्ष हा शब्द पाहवयास मिळतो व रामायणातही आढळतो असे दिसते. मराठीत पक्ष आणि हिंदीत पाख हे शब्द पंधरवडा म्हणजे महिन्याचा एक भाग या अर्थाने रूळल्याचे दिसते.
*पाकः पृच्छामि मनसाविजानन्देवानामेना निहिता पदानि । वत्से बष्कयेऽधि सप्त तन्तून्वि तत्निरे कवय ओतवा उ ॥५॥ - ऋग्वेद: सूक्तं १.१६४ *स्वयं यजस्व दिवि देव देवान्किं ते पाकः कृणवदप्रचेताः । यथायज ऋतुभिर्देव देवानेवा यजस्व तन्वं सुजात ॥६॥ -ऋग्वेद: सूक्तं १०.७असे पाकः या शब्दाचे दोन उल्लेख मला ऋग्वेदाबद्दलच्या आंतरजालीय शोधात आढळले. संस्कृत जाणकारांकडून पाकः हा शब्द ऋग्वेदात कोणत्या अर्थाने येतो आहे हे माहिती करून हवा आहे. अर्थात हि माहिती सर्व साधारण उत्सुकता म्हणून हवी आहे. धागा लेख काढण्या मागचा मुख्य उद्देश मात्र जरासा वेगळा होता इतर काही शोध घेताना मी योगा योगाने मराठीतील पाख आणि पाखी या शब्दांपर्यंत पोहोचलो. मला जुन्या/प्राचीन मराठी साहित्यातीलतील पाक / पाख आणि पाखी या शब्दांचा अंतर्भाव असलेले लेखन अंश हवे आहेत (सहज कल्पना असल्यास ते कोणत्या अर्थाने येतात या सहीत). सध्या खाप्रे डॉट ऑर्ग हे संकेतस्थळ बंद असल्यामुळे एकतर आपणास ठाऊक असलेल्या शब्द वापरावर अधारीत अथवा संत साहित्य इत्यादी जुन्या साहित्यावर आधारीत माहिती देण्यातील सहकार्यासाठी जाणकारांचा मी आभारी असेन. * संस्कृत अथवा ऋग्वेदीय उल्लेखांत त्रुटी (मी विषयाचा संस्कृतचा अभ्यासक नसल्यानुळे त्या तशा असू शकतात) असल्यास चु.भू.दे.घे. * शुद्धलेखन विषयक अवांतर चर्चा या धाग्यात टाळून, मी विनंती करेन तशा विकी प्रकल्पात शुद्धलेखन विषयक लेखन आणि साहाय्य पुरवणे अधिक ऊपयूक्त ठरू शकेल. अनुषंगिक अवांतरा व्यतरीक्त इतर अवांतर चर्चा टाळण्यासाठी धन्यवाद. * आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पाक / पाख आणि पाखी या
व्युत्पत्ती
मला तुमचा हेवा वाटतो राही...
पॉकेट हा उघड उघड परकीय शब्द
हा संदर्भ जोडावयाचा राहीला
श्रीपद नव्हे
मराठी विकिपीडियावर
एका गृहिणिच्या
http://www.ancientvedas.com
सवयं यजस्व दिवि देव देवान किं
युजानो हरिता रथे भूरि