मँगो मलई लड्डू/लाडू

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
8 Sep 2014 - 2:26 pm

डिस्क्लेमरः पाकृत टिन्ड मँगो पल्प/प्युरे वापरलाय. हापुस आंब्याचा सीजन निदान आता तरी संपलाय.

ladoo 1

वेल खरं तर बाप्पाच्या आगमनाआधी हि पाकॄ द्यायची होती पण राहून गेली. पण हरकत नाय...एकदा ट्रायल बेसीस वर करुन बघा. जमली/आवडली तर पुढल्या वेळेस करुन दणक्यात पेश करा. वेल हे लाडू म्हणुन छान तर लागतातच पण हेच सारण मोदकात भरुन मँगो मलई मोदक करुन बाप्पाला जरा वेगळ्या पद्धतीचे मोदक पेश करा.

साहित्यः
१. पनीर - ४०० ग्रॅम
२. आंब्याचा रस/पल्प - १ बाउल
३. बदाम स्लाईस/पिस्ता काप/पिस्ता पावडर - २ चमचे प्रत्येकि
४. नेस्ले मिल्कमेड - आवडिनुसार कमी/जास्त
५. खायचा कलर - २ ते ३ थेंब
६. केवडा किंवा रोझ ईसेन्स - १/२ चमचा (ते हि नसेल तर आपली वेलची पुड)
७. साजुक तुप - २ चमचे (पनीर पॅन मधे लागु नये म्हणुन)

ladoo 2

कॄती:
१. फ्रोजन पनीर क्युब्स वापरणार असाल तर थोडया वेळ गरम पाण्यात घालुन ठेवा जेणेकरुन मउ होतील. आता हलक्या हाताने एक साधारण ८-१० मि. पनीर मळुन घ्या जेणेकरुन त्यात असणार्‍या सगळ्या गुठळ्या मोडल्या जातील

ladoo 3

२. आता मंद आचेवर एका नॉन्स्टिक पॅन/वोक/कढईत साजुक तुप तापलं कि पनीर, मँगो पल्प आणि मिल्कमेड एकत्र करुन हळुवार सतत ढवळत रहा. एक ७-८ मि. त्यात खायचा रंग, केवडा ईसेन्स, बदाम-पिस्ता काप घाला. बदामाचे काप हलकेच हाताने चुरडून घ्या.

ladoo 4 ladoo 5

३. आता कडेने तुप सुटुन मिश्रणाचा गोळा झाला कि ताटात काढुन गार करत ठेवा.

ladoo 6 ladoo 7

४. एक ५ मि. मिश्रणावरुन १ चमचा पिस्ता पुड घाला

ladoo 8 ladoo 9

५. गोळा पुर्ण थंड झाला कि हव्या त्या आकारात लाडू वळा

ladoo 10

६. वरुन चिमुट चिमुट पिस्ता पावडर घालुन मँगो मलई लड्डू पेश करा

ladoo 11

टिपः पनीर असल्यामुळे हे लाडू सतत फ्रिज मधेच ठेवा आणि खायला द्यायच्या आधी एक १५-२० मि. बाहेर काढुन, रुम टेम्परेचरला येउन द्या. माओ मधे हलके गरम करुन देणार असाल तर उरलेले लाडू परत फ्रिज मधे शक्यतो ठेवु नका. कदाचीत चव उतरेल. (अर्थात ह्या सगळ्या शक्यता लाडू उरले तर :D

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Sep 2014 - 2:34 pm | माम्लेदारचा पन्खा

आव्डेश.....

मधुरा देशपांडे's picture

8 Sep 2014 - 2:39 pm | मधुरा देशपांडे

आहाहा...सहीच फोटो आणि मस्त पाकृ.

प्यारे१'s picture

8 Sep 2014 - 2:47 pm | प्यारे१

दीपकबाबा पनीरवाले,

मस्तच.

जीव जाता जाता राहिला त्या पिस्त्याच्या अस्ताव्यस्त पडलेल्या पावडरीमुळं.
ती नीट पसरवली असती तर नक्कीच गेला असता.
(शेफ लोक्स, क्षमस्व. पण तुम्हाला छान छान म्हणायला हात आखडतो. खुस्पटं काढावीशी वाटतात. मुख्य कारण जळजळ ) मात्र लाडू खाऊन बघितल्यावर थेट स्वर्ग ह्यात शंकाच नाही.

आता येच तू डोंबोलीला

दिपक.कुवेत's picture

8 Sep 2014 - 6:59 pm | दिपक.कुवेत

एखाद विकेंड या ईकडे उडत उडत. मस्त कट्टा करु.

मुक्त विहारि's picture

8 Sep 2014 - 9:21 pm | मुक्त विहारि

पण आपल्या कुवैत कट्ट्याचे फोटो मिपावर नको टाकायला...

आमची बायको, घरांत घेणार नाही.

आणि बिना फोटो कट्टा आपल्याला जमत नाही.

त्यामुळे मी आणि माझी बायको, दोघेही येतो.

तसा कुवैतचा विसा लगेच मिळतो, असे ऐकिवात आहे...

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2014 - 12:53 am | प्रभाकर पेठकर

करा करा आपापसात कट्टाबिट्टा करा. मी कोंबडंच कापतो तुम्हा दोघांच्या नांवाने.

दिपक.कुवेत's picture

9 Sep 2014 - 11:21 am | दिपक.कुवेत

तुम्हि कशाला कट्टि करताय?? तुम्हि पण ऑलवेज वेल्कम कि!!! मुवि, बोला मग कधी येताय सपत्नीक??

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2014 - 2:10 pm | प्रभाकर पेठकर

ये हुवी न बात। त्या निमित्ताने कुवेत पाहणेही होईल.

मुक्त विहारि's picture

9 Sep 2014 - 9:36 pm | मुक्त विहारि

ऑक्टोबर मध्ये अजिबात शक्य नाही तर फेब्रुवारी मध्ये थालंडला जायचे असल्याने, ह्या ६ महिन्यांत तरी शक्य नाही.

पुढच्या वर्षी बघू.

कवितानागेश's picture

8 Sep 2014 - 2:49 pm | कवितानागेश

फार दिवसांनी पनीरला चान्स मिळाला!
यम्मी दिसतायत लाडू. :)
बाकी पन्खा पयला. मी दुसरी.

फोटो आणि पाकृ दोन्ही अप्रतिम...

प्रभाकर पेठकर's picture

8 Sep 2014 - 3:53 pm | प्रभाकर पेठकर

अतिशय देखणे आहेत हे लाडू. चविष्ट तर असणारच. करून खाऊ घालेन कोणाला तरी.
खायचा रंग वापरण्यापेक्षा, अस्सल केशर वापरण्याचा सल्ला मी देईन.

दिपक.कुवेत's picture

8 Sep 2014 - 4:56 pm | दिपक.कुवेत

केशर नक्किच चव वाढवेल पण केशर भिजत घालुनहि म्हणावा तसा रंग उतरत नाहि अर्थात केशर क्वालीटिवर पण अवलंबुन असतं म्हणा.

सानिकास्वप्निल's picture

8 Sep 2014 - 7:06 pm | सानिकास्वप्निल

खायचा रंग वापरण्यापेक्षा, अस्सल केशर वापरण्याचा सल्ला मी देईन.

असेच म्हणतेय.

केशराचा रंग छान खुलतो मी पण केशराचा वापर रंगासाठी व स्वादासाठी करतेच.

बाकी मँगो मलई लाडूबद्दल काय बोलायचे ते तर अप्रतिम दिसत आहेतचं, तोंपासु :)
साधारण संदेश सारखा प्रकार वाटतो, पनीर शिजवून घेतले आहे ना म्हणून.

ही पाकू आमच्यासाठी. धन्यवाद .

प्रचेतस's picture

8 Sep 2014 - 4:04 pm | प्रचेतस

मस्तच

सुहास झेले's picture

8 Sep 2014 - 4:17 pm | सुहास झेले

खल्लास !!!

भिंगरी's picture

8 Sep 2014 - 4:34 pm | भिंगरी

हे असं दाखवून जीव जाळता राव तुम्ही.
हे टीन मधले पल्प काही आम्हाला पचनी पडत नाहीत
आणि आम्ही काही 'मोदी'नाही की आम्हाला पाकिस्तान मधुन आंबे येतील.

दिपक.कुवेत's picture

8 Sep 2014 - 4:58 pm | दिपक.कुवेत

आंब्यासाठि "मोदिं" ना कशाला मधे आणताय. जरा पुढिल मौसम येइस्त कळ काढा किंवा पल्प न घालता करा...हाकानाका!!!

भिंगरी's picture

8 Sep 2014 - 6:12 pm | भिंगरी

एव्हडी जोरात कळ आलीये,ती पुढच्या मोसमापर्यंत राहील का?

दिपक.कुवेत's picture

8 Sep 2014 - 6:47 pm | दिपक.कुवेत

कळीवरचं औषध आपल्या मिपा फेम आयुर्हितांना विचारावं लागेल.

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म

शिद's picture

8 Sep 2014 - 4:35 pm | शिद

ज ब रा ट!

_/\_

मदनबाण's picture

8 Sep 2014 - 5:29 pm | मदनबाण

आह्ह... :)

मदनबाण.....

आत्ताची स्वाक्षरी :- दिल ये जिद्दी है... :) Mary Kom

त्रिवेणी's picture

8 Sep 2014 - 5:46 pm | त्रिवेणी

मिश्रण गॅसवर ठेवल्यापासून पूर्ण आटेपर्यंत साधारण किती वेळ लागतो.
साधारण वडी, पाक आणि लाडू करायची अजुनही हिम्मत नाही होत. जर करताना बिघडवलीच पाककृती तर काय करावे हे सांगुन ठेवा म्हणजे आयत्यावेळेस धावपळ होणार नाही.

दिपक.कुवेत's picture

8 Sep 2014 - 6:24 pm | दिपक.कुवेत

साखरेच्या पाकाची वगैरे भानगड नसल्यामुळे मिश्रणाचा गोळा एक साधारण १५-२० मि. होतो (गॅसवर ठेवल्यापासुन) आणि गरम असताना लाडू कदाचीत वळले जाणार नाहित सो गार झाल्यावरच वळा. एवढं करुनहि जर वळले गेले नाहि तर "मँगो मलई हलवा" म्हणुन वरुन अजुन ड्राय फ्रुट्स घालुन/चांदिचा वर्ख वगैरे लावुन सर्व करा.

जर ताजा पल्प वापरला तर मिल्कमेडची गोडी पुरेल की साखर घालावी लागेल?
लाडू मस्तच!

दिपक.कुवेत's picture

8 Sep 2014 - 6:30 pm | दिपक.कुवेत

साखर हि असतेच म्हणुन मिल्कमेड असुन शक्यतो साखरेची गरज भासत नाहि. शीवाय ताजा आब्यांच्या रसाची गोडि + प्रचंड गोड असलेलं मिल्कमेड ह्याने साखरेस आपोआप फाटा मिळतो. हां पण ताजा रस एकदा मिक्सर मधे फिरवुन गाळुन घे जेणेकरुन खाताना रेषा/धागे तोंडात येणार नाहित.

वाह! एकदम भारी फोटू आहेत.

सखी's picture

8 Sep 2014 - 9:18 pm | सखी

भारीच दिसतात लाडु. याचप्रमाणे वड्या वगैरे पण चांगलच लागेल/दिसेल असं वाटतयं.

मस्त झालेली. हि बघ...

barfi 1

मनिष's picture

9 Sep 2014 - 12:38 am | मनिष

मस्त!!! :-)

स्पंदना's picture

9 Sep 2014 - 10:10 am | स्पंदना

पाणी सुटलं तोंडाला.
परवाच तुमचा दुधी-सोडा रस्सा केला होता.
आता हे करुन पहावं म्हणतेय.

दिपक.कुवेत's picture

9 Sep 2014 - 11:33 am | दिपक.कुवेत

नक्कि करुन बघ. सगळ्यांना आवडतील अशी आशा करतो.

इरसाल's picture

9 Sep 2014 - 10:21 am | इरसाल

ह्याला पण बॅन करा मिपावरुन !........

किसन शिंदे's picture

9 Sep 2014 - 10:53 am | किसन शिंदे

वेल ;-) हे लाडू खायला घातलेस तरच चांगले म्हणतो, अन्यथा नाही. :P

दिपक.कुवेत's picture

9 Sep 2014 - 11:24 am | दिपक.कुवेत

हम्म्...आता बुवांनी मनावर घेतलं तर सगळ्यांना खायला मिळतील की. मी ऑडर्र घेईन हो...

सविता००१'s picture

9 Sep 2014 - 11:42 am | सविता००१

आता तू इथे ये आणि खाउ घाल आम्हा सगळ्यांना हे लाडू

स्त्रिच्त नो तो स्वीत्स!!

दिपक.कुवेत's picture

9 Sep 2014 - 7:27 pm | दिपक.कुवेत

बरं मग?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2014 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान.

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2014 - 12:49 am | अत्रुप्त आत्मा

डेझर्ट सम्राट दीपक भाऊ की ..... जय!

पैसा's picture

10 Sep 2014 - 9:54 am | पैसा

मी आताच मोदकाला विचारत होते वजन किती कमी केलंस म्हणून. आणि तू...

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2014 - 10:08 am | अत्रुप्त आत्मा

@अरे दुष्टा!>>> =)) .. =)) .. =))

दिपक.कुवेत's picture

10 Sep 2014 - 10:47 am | दिपक.कुवेत

मग फिकिर नॉट.....पळता पळता हे लाडू खा म्हणजे खायचाहि आनंद आणि कॅलरी बर्न (जळणं शब्द अरा अतीरंजीत वाटतो) केल्याचं समाधान......हाकानाका!!!

दिकु च्या रेशीपी मी वाचतच नाय. बनवताच येत नाय तर वाचुन उपेग.
डायरेक्ट प्रतिसादवर क्लिक करतो आणी त्यावरच समाधान मानतो.

पाकृ वर आणतोय हो.....

यशोधरा's picture

8 Jun 2016 - 2:40 pm | यशोधरा

अरे, अरे! काय हे दुष्टा!