अॅ अक्षराच्या लेखन वाचनातील समस्या आणि प्रमाणीकरण
आपण काही वेळा समस्यांनाही एवढे सरावलेले असतो कि नियमीत भेडसावणारी गोष्ट समस्या वाटेनाशी होते. अशाच काही अडचणी अॅ अक्षरा संबंधीत आहेत
१) ऄ (0904) ऎ (090E) (U+0944 ॆ) ऒ (U+091) (U+0948 ॊ) कंसातील युनिकोड क्रमांक कदाचीत जरासे वेगळे असू शकतील या युनोकोड चार्ट मध्ये म्ह्टल्या प्रमाणे देवनागरीत उपलब्ध केली जाणारी हि अक्षरे काश्मिरी बिहारी आणि दाक्षीणात्य (short e किंवा short o) उच्चारणे दाखवण्यासाठी उपयूक्त असू शकतील असे म्हटले आहे.
१ अ) ऄ (0904) ऎ (090E) (U+0944 ॆ) ऍ (090D) आणि मराठीचा अधिकृत अॅ (0972 ) यांच्या अभिप्रेत उच्चारणातील साम्य आणि भेद कोणते
१ ब) ऄ (0904) ऎ (090E) (U+0944 ॆ) ऒ (U+091) (U+0948 ॊ) हि अक्षरे काही अपवादात्मक कळफलक रचनात (किबोर्ड लेऑउट) मध्ये दिसून येतात. माझ्या मता प्रमाणे अपवादात्मक परिस्थितीत काश्मिरी बिहारी दाक्षीणात्य उचारणे दाखवण्यासाठी ती कॉपी पेस्टही करता येऊ शकतील. या अक्षरांचे मराठी कळफलकांवर असणे आणि काही गरजेच्या मराठी अक्षरांचे नसणे यामुळे काही लोकांच्या टंकनात समस्या उद्भवताना दिसतात तसेच मराठी कळफलकाच्या प्रमाणीकरणात अडथळा येतो असे वाटते. अर्थात हे माझे व्यक्तीगत मत झाले होता होईतो व्यापक सहमती साधता यावी म्हणून हा विषय येथे मांडत आहे. दुमत असल्यास कृपया सकारण नोंदवावे म्हणजे चर्चा करता येईल.
२ अ) ऍ (090D) हिंदी किंवा इतर कोणत्या भारतीय भाषेसाठी आहे का ? आणि या अक्षराचे मराठी कळफलकांवर असणे गरजेचे आहे का? कारण इनस्क्रिप्ट सारख्या महत्वाच्या कळफलकावर अॅ (0972 ) ची गरज असताना विनाकारण ऍ (090D) ने जागा अडवली आहे. त्यामुळे हि इनस्क्रिप्ट वाली मंडळी अ + ॅ = अॅ असे करून दुधाची तहान ताकावर भागवतात पण अॅ (0972 ) हा एक संघ अॅ आणि अॅ (अ + ॅ ) हे युनिकोडात वेगवेगळे असल्यामुळे शोध यंत्रात एकसंघ अॅ (0972 ) चा शोध घेताना अॅ (अ + ॅ ) असे लेखन केलेल्या अॅ ंचा तसेच त्या विरुद्ध प्रकारच्या शोधातही मराठी अॅ चे सर्व शोध आंतर्भूत होऊ शकत नाहीत.
२ ब) मराठी विकिपीडियावर वैश्विक टायपिंग सुविधे अंतर्गत (मायक्रोसॉफ्टच्या मदती शिवाय) जे क्वेरी/जावा अधारीत मराठी इनस्क्रिप्ट कळफलक उपलब्ध आहे किमान मराठी विकिपीडियावरच्या इनस्क्रिप्ट कळफलकात ऍ (090D) काढून बरोबर अधिकृत मराठी अॅ (0972 ) तांत्रीकदृष्ट्या शक्य होईल असे वाटते. तत्पुर्वी ऍ (090D) चा मराठी अथवा मराठी बोलींसाठी काही उपयोग असण्याची फारशी शक्यता नसल्याबद्दल दुजोरा हवा आहे.
२ क) कुणाकडे मायक्रोसॉफ्ट विंडोज ८ असल्यास त्याच्या मराठी इनस्क्रिप्टात सुद्धा अजूनही ऍ (090D) ने जागा अडवलेली आहे का याची माहिती हवी आहे.
२ ड) मायक्रोसॉफ्ट विंडोज संगणकांसोबत गेलेल्या अथवा भविष्यात वितरीत होणार्या मराठी इनस्क्रिप्टात सुद्धा अजूनही ऍ (090D) ने जागा अडवलेली आहे ती जागा बरोबर अधिकृत मराठी अॅ (0972 ) ला मिळवून देण्यासाठी आणि उपयोग कर्ते सजगते साठी काय करता येऊ शकेल. ?
२ इ) गमभन आधारीत मिपा आणि ऐसी या स्थळांवरही अधिकृत मराठी अॅ (0972 ) न वापरता अॅ (अ + ॅ ) असे लेखन केले जाते या मागची तात्वीक भूमीका कोणती की हे एक मागे पडलेले काम आहे.
३) खालील प्रकारची समस्या इतर कुणाला कधी जाणवते का ? हि समस्या आपल्या परिचयाची आहे का ? असल्यास ह्या समस्येचे शक्य निवारण काय असू शकेल ?
मराठी विकिपीडियावर ॲरिस्टॉटल नावाचा लेख आहे. यात अॅ या युनिकोडाक्षराची दोन वळण असावीत पण बहुधा युनीकोड संकेतांक एकच (बहुधा 0972) असावा कारण शोधयंत्रातून ती एक सारखे पणानेच शोधली जातात, हा सिंगल ॲ आहे, बहुधा अ + ॅ नव्हे कारण अ + ॅ = अॅ असेल तर बॅकस्पेसने ॅ वगळल्यास अ शिल्लक राहतो तसे ॲरिस्टॉटल लेखातील केसमध्ये होत नाहीए.
अॅरिस्टॉटल मधील अॅ ची दोन्ही वळण माझ्या सहीत बहुतांश लोकांना व्यवस्थीत दिसत असावीत, त्याच वेळी खालील चित्राप्रमाणे काही जणांना अडचण येते आहे. त्यांचा ब्राऊजर आणि ओएस ची कल्पना नाही, समजा ब्राऊजर आणि ओएस संबंधीत समस्या असतीतर एकच युनिकोड संकेतांक असलेल एक वळण दिसतय आणि एक वळण दिसण्यात समस्या येते आहे असे व्हावयास नको असे वाटते. समस्येचा ओळखण्यात/ अंदाजा बांधण्यात काही मदत मिळाल्यास हवी आहे.
समस्या येणार्याना अॅरिस्टॉटल लेख खालील प्रमाणे दिसतो.
समस्या येणार्याना अॅरिस्टॉटल लेख खालील प्रमाणे दिसतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्वॅप्स यांचा प्रतिसाद दुसर्या धाग्यातून आणला
उदा. इंटरनेट एक्स्प्लोरर
अगदी अॅ हे अक्षरही एॅ असे
युनिकोड रेंडरिंगच्या चुका असाव्यात.
अॅ चे गोंधळ
ठीक आहे.
ओह सॉरी मी दुवा न जोडण्याचा
माझ्या मते
जरासा फरक आहे ?
तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे