सरडा- काही क्षणिका काही म्हणी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
7 Sep 2014 - 11:27 am

महाराष्ट्रात सरड्यांचे अच्छे दिन आलेले आहे, सरडे या झाडावरून त्या झाडावर उडी मारीत आहे.

(१)

जेंव्हा त्यांच्या झाडावर होता
तेंव्हा सरडा भ्रष्टाचारी होता.

जेंव्हा सरडा अमुच्या झाडावर आला
आमच्याच सारखा इमानदार झाला.

(२)

जिभेच्या स्वाद पायी
मधुर फळांची मैत्री जोडी.

अहंता स्वताची त्यागुनी
सरडा झाला रंगनिरपेक्षी.

काही म्हणी:

  1. जिथे सरडा, तिथे सत्ता
  2. उंदीर आणि सरडा, बुडते जहाज सोडती
  3. सरडा येई घरा, तोच दिवाळी दसरा
  4. सरड्याचे अनुकरण करा, सत्तेचे सुख भोगा.
काहीच्या काही कविताविडंबन

प्रतिक्रिया

पोटे's picture

7 Sep 2014 - 5:28 pm | पोटे

नरुकाकानी किती सरडे पाळले आहेत?

प्रसाद गोडबोले's picture

8 Sep 2014 - 12:44 pm | प्रसाद गोडबोले

मनुकाकांनी , शरुकाकानी , नारुकाकांनी किंवा पुरुकाकांनी जितके सरडे पाळले आहेत ना त्या पेक्षा नक्कीच कमी *lol*

दिपक.कुवेत's picture

7 Sep 2014 - 6:56 pm | दिपक.कुवेत

ईस रंग बदलती दुनीया में सरडोंकि नियत ठिक नहि....

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Sep 2014 - 10:13 am | माम्लेदारचा पन्खा

ई का था ससुरा ?