डांबरी रस्त्यावर

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
25 Jul 2014 - 11:55 am

लांबच लांब डांबरी रस्त्यावर
घरंगळत जाणारे पावसाचे पाणी
कुठेतरी जाऊन थांबत असेलच
कदाचित, तिथेच तू भेटशील..
--
तुला ते पाणी भेटल्यावर
मी सोडलेली कागदाची नाव
तुला सापडली असेलच त्यावर
त्या नावेत तुझ्यासाठी
माझी स्वप्नं पाठवली आहेत
एखाद्या तरी स्वप्नाने तुला
घायाळ केले असेलचं...
--
त्या नावे पाठोपाठ
नारळाच्या करवंटीत
चार चाफ्याची फुलं पाठवली आहेत
सकाळी घराच्या मागच्या आंगणात
सापडली तेव्हा
तुझ्या स्मिताचा सुगंध आठवला
--
तुझ्यापर्यंत पोहचतांना
किती चिमुकले भवरे पार केले असतील
त्या नावेने कुणास ठाऊक
पण तुला सापडली कि जप तिला
तशी ती नाव खुप भक्कम आहे
पण पाणी एकाजागी थांबत नसतं
आणि नावेला कुठेतरी किनार्‍याला
लागणं गरजेचं असतं
--
लांबच लांब डांबरी रस्त्यावर
घरंगळत जाणारे पावसाचे पाणी
कुठेतरी जाऊन थांबत असेलच

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२४/०७/२०१४)

कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

एस's picture

25 Jul 2014 - 11:57 am | एस

तशी ती नाव खुप भक्कम आहे
पण पाणी एकाजागी थांबत नसतं
आणि नावेला कुठेतरी किनार्‍याला
लागणं गरजेचं असतं

तुमची कविता भेटली. तूर्तास इतकेच.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jul 2014 - 12:09 pm | अत्रुप्त आत्मा

*good*

स्पा's picture

25 Jul 2014 - 12:19 pm | स्पा

क्या बात मिकेश

लय भारी

संजय क्षीरसागर's picture

25 Jul 2014 - 12:24 pm | संजय क्षीरसागर

कविता आवडली.

संदीपच्या या दिलकष ओळी पाहा:

पडेना पापणी पाहून ओलेती तुला,
कसा होता नि नव्हता व्हायचा, पाऊसही
तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा, पाऊस ही.

कवितानागेश's picture

25 Jul 2014 - 2:21 pm | कवितानागेश

:)

सूड's picture

25 Jul 2014 - 2:25 pm | सूड

नेहमीप्रमाणेच छान!!

psajid's picture

25 Jul 2014 - 2:29 pm | psajid

एकदम आवडली !
"तुला ते पाणी भेटल्यावर
मी सोडलेली कागदाची नाव
तुला सापडली असेलच त्यावर
त्या नावेत तुझ्यासाठी
माझी स्वप्नं पाठवली आहेत
एखाद्या तरी स्वप्नाने तुला
घायाळ केले असेलचं..."

या ओळी तर खूपच छान

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jul 2014 - 2:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

हिच कविता दुसर्‍या कोणी लिहिली असती तर आवडली म्हणुन प्रतिसाद दिला असता.

हा आमचा मि.का. नाही.

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jul 2014 - 2:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

हिच कविता दुसर्‍या कोणीही लिहीली असती तर कदाचीत "आवडली" असा प्रतिसाद दिला असता.

हा आमचा मि.का. नाही.

पैजारबुवा,

प्यारे१'s picture

25 Jul 2014 - 2:51 pm | प्यारे१

>>> हा आमचा मि.का. नाही.

अगदी असंच म्हणायचं होतं. म्हणूनच बरीचशी आवडली म्हटलंय खाली.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Jul 2014 - 3:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कदाचित तुम्ही म्हणता ते बरोबर असेल.
खास फर्माईशवर हि कविता अत्यंत सोपी करण्यात आली आहे.
काही काही वेळेस काही इलाज चालत नाही. :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jul 2014 - 3:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

लब्बाड

प्यारे१'s picture

25 Jul 2014 - 2:39 pm | प्यारे१

बरीचशी आवडली...

वेल्लाभट's picture

25 Jul 2014 - 2:55 pm | वेल्लाभट

क्क्या बात !

इनिगोय's picture

25 Jul 2014 - 2:58 pm | इनिगोय

स्वप्नांची नाव आवडली.
फक्त चाफ्याच्या फुलांचं कडवं किंचीत उणं पडलंय..

फिझा's picture

29 Jul 2014 - 10:35 am | फिझा

छछान......॥!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2014 - 11:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेहमी प्रमाणेच सुंदर....!


त्या नावे पाठोपाठ
नारळाच्या करवंटीत
चार चाफ्याची फुलं पाठवली आहेत
सकाळी घराच्या मागच्या आंगणात
सापडली तेव्हा
तुझ्या स्मिताचा सुगंध आठवला

इथे मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क टाकलेत. :)

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

31 Jul 2014 - 9:12 am | किसन शिंदे

सरांच्या म्हणण्याला दुजोरा. हे कडवं खासच!

बाकी मला हे विचारायचंय की, तुला हे सगळं सुचतं केव्हा आणि कुठे?

रुमानी's picture

31 Jul 2014 - 3:26 pm | रुमानी

खरचं मस्तच...!
कसे काय जमते हो तुम्हाला हे..! :)

चाणक्य's picture

31 Jul 2014 - 12:41 am | चाणक्य

पहिल्या चार ओळीतच जीव गेला आपला तर...

पाषाणभेद's picture

31 Jul 2014 - 9:07 am | पाषाणभेद

एकदम झकास

मदनबाण's picture

31 Jul 2014 - 10:28 pm | मदनबाण

छान !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil }

सुहास..'s picture

4 Aug 2014 - 10:44 am | सुहास..

खासच !!