निसर्गकन्या : लावणी

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
22 Jul 2014 - 10:27 pm

निसर्गकन्या : लावणी

चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली
मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली
पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली
भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली

आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली .... ॥धृ०॥

हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली
मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली ...... कोरस

निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
उगवती वल्लरी जशी, कांती लुसलुशी, अंग सुकुमार
वनी विहरली, दिशांत फिरली, तरूवर पिंगण घाली .... ॥१॥

श्रावणाची सर, चाळविते उर, हवा खट्याळ पदराला नेते दूर
वाजले कंगण की कोकिळेची कुहु, पैंजणाच्या सवेला मैनेचा सूर
चिमणी-पाखरू, हरिण-कोकरू, फेर धरी भोवताली .... ॥२॥

आसक्त नजर तीक्ष्ण ती, ‘अभय’ बोलकी, अधर अनिवार
खुणवती पापणी प्रिया, पाश द्यावया, बाहु अलवार
शोधीत भिरभीर, बघुनी दूरवर, मनीच पुलकित झाली .... ॥३॥

                                                       - गंगाधर मुटे ‘अभय’
------------------------------------------------------------------------

अभय-काव्यवाङ्मयशेतीवाङ्मयकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2014 - 11:33 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआअ..............म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.......
धूंन्न्न्न्न्न्न्न्न्दददद.....चीं..............ब जाहलो.........!!!

गंगाधर मुटे साहेब , मस्त सुंदर लावणी. तुमच्या कविता नेहमीच चांगल्या व वाचनीय असता. फार सुरेख लावणी / कविता.

शुचि's picture

24 Jul 2014 - 9:23 pm | शुचि

सुंदरच!!!

कविता१९७८'s picture

25 Jul 2014 - 5:36 pm | कविता१९७८

छान