पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
14 Jul 2014 - 10:51 pm

मितानताईने दिलेले पाकातले चिरोटे बघून तोंडाला पाणी सुटलेय :) . त्यात पाकातल्या पुर्‍या व चिरोटे म्हणजे विकपॉईंट आहे . ताईने दिलेल्या पाककृतीला आम्ही पाकातले चिरोटे म्हणतो आणि रवा-मैद्याच्या किंवा कणकेच्या पुर्‍यांना साखरेच्या पाकात घोळवून तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे पाकातल्या पुर्‍या . मग काय पाकातल्या पुर्‍या खाऊन किती किती महिने झाले आठवतदेखील नाही, म्हट्ले आज बनवूनचं टाकू, जीभेचे चोचलेच म्हणा हवं तर ;)

माझी आई आमरस घालून पुर्‍या करते व त्या पाकात घोळवते, अनायसे घरात आमरसाचा टिन होताच (हो हो आता आम्हाला कुठे मिळतोय हापूस आंबा...असो ) मग विचार केला इतर साहित्य ही घरात आहेच तर मग होऊन जाऊ दे :)

.

साहित्यः

१ वाटी मैदा
१/२ वाटी पेक्षा जरा कमी बारीक रवा
अंब्याचा रस मैदा भिजवण्यापुरता लागेल तसा (ताजा आमरस ही वापरू शकता)
३/४ वाटी साखर (प्रमाण आमरसाच्या गोडीवर ठरवावे किंवा आपल्या आवडीनुसार)
१/२ वाटी पाणी
१/२ टीस्पून वेलचीपूड
१/४ टीस्पून जायफळपूड
केशराचा काड्या
१/२ टीस्पून लिंबाचा रस
१ टेस्पून बदाम +पिस्ता+काजू तुकडे सजावटीसाठी
३टेस्पून तेल
पुर्‍या तळण्यासाठी तेल / तूप

.

पाकृ:

एका भांड्यात मैदा,रवा एकत्र करावे. त्यात ३ टेस्पून तेलाचे कडकडीत मोहन घालावे.
चांगले मिक्स करुन घ्यावे.
आमरस थोडा थोडा करून मैद्यात घालावा व नीट मिक्स करावे.
पीठ चांगले घट्ट मळून घ्यावे व झाकून १५-२० मिनिटे ठेवावे.
१५-२० मिनिटांनंतर पीठ चांगले कुटून घ्यावे किंवा रवा-मैदा चांगला मळून घ्यावा.
मोठी जाडसर पोळी लाटून हव्या त्या आकाराच्या, लहान-मोठ्या पुर्‍या कातून घ्याव्यात.

.

दुसरीकडे तेल / तुप गरम करत ठेवावे.
वेगळ्या पातेल्यात साखर + पाणी+ लिंबाचा रस + वेलचीपूड + जायफळपूड+ केशर काड्या एकत्र करून गॅसवर ठेवावे.
साखरेचा दोन तारी पाक तयार करा.
तळणीत अलगद पुर्‍या सोडून मंद आचेवर तळून घ्याव्या.
पुर्‍या तळल्याबरोबर कोमट पाकात घालून मुरत ठेवा.
दुसर्‍या पुर्‍या तळून झाल्या की आधीच्या पाकातल्या पुर्‍या निथळून ताटात काढून ठेवा.

.

सर्व पुर्‍यांवर बदाम +पिस्ता+काजूचे तुकडे लावून सजवावे.
सणासुदीला पक्वान्न म्हणून बनवता येतात.
नेहमीच्या पुर्‍यांपेक्षा आमरस घालून केलेल्या पुर्‍या वेगळा प्रकार म्हणून छान लागतो.
पुर्‍या फार जाड लाटायच्या नाही नाहीतर त्या चिवट होतात.
अशाच प्रकारे कणकेच्या ही पाकातल्या पुर्‍या करता येतात.

.

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

14 Jul 2014 - 11:04 pm | सुहास झेले

णो कमेंट्स... नेहमीप्रमाणे खल्लास !!!

Maharani's picture

14 Jul 2014 - 11:04 pm | Maharani

Bhannat ga sanika... *ok*

भिंगरी's picture

14 Jul 2014 - 11:39 pm | भिंगरी

पाहुन तोंडाला पाणी सुटले.

मुक्त विहारि's picture

14 Jul 2014 - 11:51 pm | मुक्त विहारि

तुम्ही एक तर आम्हाला (समस्त मिपाकरांना) जेवायला तरी बोलवा,

किंवा

तुम्ही भारतात कधी आणि कुठे येत आहात?

ते तरी कळवा....म्हणजे त्याप्रमाणे आम्ही सगळे (समस्त मिपाकर) त्या दिवशी आणि त्या ठिकाणी हजर होतो.

(आयला नुसता छळवाद मांडलाय ह्यांनी)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jul 2014 - 12:19 am | अत्रुप्त आत्मा

मेलोssssssssss...!!! *i-m_so_happy*
सानिकातायनी वरकडी केलीन त्या चिरोट्यांवर! :D

आता मला अत्ताच्या अत्ता पायजेत !!! http://www.sherv.net/cm/emoticons/cook/hungry-kids.gif

मुक्त विहारि's picture

15 Jul 2014 - 12:28 am | मुक्त विहारि

आता त्या भारतात आल्या की, डोंबोलीला कट्टा करू.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Jul 2014 - 2:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

हे राहीले :)

मुक्त विहारि's picture

18 Jul 2014 - 11:06 pm | मुक्त विहारि

डोंबोलीला लावायचे सोडले आहे.

कारण सध्या आम्ही यानबू (सौदी अरेबिया) इथे आहोत.

उद्या जर चंद्रावर गेलो, तर चंद्र हेच मध्यवर्ती ठिकाण असेल.

जावूदे,

उगाच सानिका ताईंच्या धाग्यावर अवास्तव गप्पा नकोत.

स्वाती दिनेश's picture

15 Jul 2014 - 12:27 am | स्वाती दिनेश

मस्तच...
पाकातल्या पुर्‍या आजी नेहमी करायची.. आमरसातल्या पाकातल्या पुर्‍या माहित नव्हत्या.. भन्न्नाट लागत असणार...
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2014 - 1:06 am | प्रभाकर पेठकर

ठिक आहे.... हेही करून पाहू.

तुझे कौतुक करायला शब्द नाहीत म्हणून नेहमीचा प्रतिसाद समजावा. फोटू सुरेख आलाय. आमरस घालून पुर्‍या करतात ही माहिती नवीन आहे. मी अजूनही तुला इकडे रहायला बोलावतीये. ये, माझी सख्खी शेजारीण बनून रहा. ;)

शुचि's picture

15 Jul 2014 - 1:16 am | शुचि

तिरडी उचला रे!!! :D

रेवती's picture

15 Jul 2014 - 1:19 am | रेवती

शुभ बोल मामी म्हटलं तर मांडवाला आग लागली!

प्यारे१'s picture

15 Jul 2014 - 1:28 am | प्यारे१

त्या मूळच्या कोकणातल्या पण लहानपणीच पुण्यात नि सध्या भारताबाहेर स्थायिक झालेल्या असाव्यात. ;)

प्यारे१'s picture

15 Jul 2014 - 1:19 am | प्यारे१

कातून केलेल्या पुर्‍या नामंजूर...
झाकणीनं केलेल्या पुर्‍या, चाकूनं कापून केलेली वरणफळं/चकोल्या, मजा नाय राव!

बाकी ते प्रेझेन्टेशन वगैरेला १०० पैकी १०१ मार्क आहेतच.

गणपा's picture

15 Jul 2014 - 1:56 pm | गणपा

तीट लावल्या बद्दल प्यारे काकाला वाहाशु. ;)

बाकी पहिला फोटो पाहुन पुढे जाताच आलं नाही. जीव तिथच घुटमळतोय अजुन.

प्यारे१'s picture

15 Jul 2014 - 2:23 pm | प्यारे१

खिक्क!
वा शु म्हण अथवा काहीही म्हण.
तुला, सानिका, दीपक, पेठकर काका, स्वाती दिनेश आणि तमाम मिपा बल्लवाचार्यांना सुट्टी देणार नाही.
रेझिंग बार रे भौ, बाकी काही नाही. तुम्ही स्वतःच सवयी लावल्यात आम्हाला. बाकीच्यांना 'सूट' आहे. ;)

(एकतरी 'मास्टरशेफ' बनायला नको का? अमूल मास्टरशेफ ऑफ इन्डिया मध्ये एकसारखा कांदा कापणं हा चाचणीचा भाग होता. सो..... करना पडता रे बाबा!)

स्रुजा's picture

15 Jul 2014 - 1:38 am | स्रुजा

वाह ! किती दिवस टिकतात ? प्रेझेन्टेशन आणि बाकी सगळ्याला मनापासून दाद !

दिपक.कुवेत's picture

15 Jul 2014 - 10:36 am | दिपक.कुवेत

मुळात टिकण्यासाठि ह्या अश्या टेम्टींग पुर्‍या उरायला तर हव्यात ना!!! *new_russian* मी तर येता जाता एक एक गट्ट्म करीन....

सुबोध खरे's picture

15 Jul 2014 - 11:58 am | सुबोध खरे

+१११

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2014 - 12:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

असल्या पुर्‍या ताटात जास्तीत जास्त १ मिनीट आणि पोटात (जठरात) एक ते दीड तास टिकतात ! :)

नंदन's picture

15 Jul 2014 - 5:14 am | नंदन

पहिला फोटो पाहूनच ऊर्ध्व लागला. चित्रगुप्ताच्या पट्टेवाल्याला पाहून नुकताच धरणीतलावर परतलो आहे :)

साती's picture

15 Jul 2014 - 7:33 am | साती

काय सुरेख दिसतायत पुर्या.
वाह!
इतक्या टम्म फुगल्यात की पाणीपुरीलाही वापरू शकतो.

अजया's picture

15 Jul 2014 - 8:07 am | अजया

हाय........
याहुन जास्त शब्द सुचत नाहीत. हे त्या फोटुमुळे झाले आहे.

अगं, काय हे! नको हे अत्याचार! *stop*

ब़जरबट्टू's picture

15 Jul 2014 - 9:28 am | ब़जरबट्टू

मस्तच.. काय ते प्रेझेन्टेशन.. खायचे टेंशनच येणार अश्याने तर...आवडेश :)

इरसाल's picture

15 Jul 2014 - 9:35 am | इरसाल

नहीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई!

सविता००१'s picture

15 Jul 2014 - 10:19 am | सविता००१

आता मला याहून काही सुचतच नाहीये............

दिपक.कुवेत's picture

15 Jul 2014 - 10:34 am | दिपक.कुवेत

पाकृ, प्रेझेंटेशन आणि पहिला/शेवटचा फोटो हे पाकृच्या नावाप्रमाणेच गोग्गोड आहे. आमरस घालुन पाकातल्या पुर्‍या हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला आणि तो चविष्ट असणार ह्यात शंकाच नाहि. चला आता आमरसाचा टिन आणणे आले (हो हो आता कुठे मिळतोय हापूस आंबा...असो )

त्रिवेणी's picture

15 Jul 2014 - 11:23 am | त्रिवेणी

*beee*

वा वा वा.. पाकातल्या पुर्‍या खाल्ल्या होत्या. आता ह्या पुर्‍या खाऊन बघायलाच पाहिजे. मस्त फोटो एकदम.

मितान's picture

15 Jul 2014 - 11:40 am | मितान

काय खलास फोटो !
अप्रतिम !!!
आजच करणार *smile*

खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!! काय टेंम्प्टींग दिसतात आहे पुर्‍या!! :)

पिलीयन रायडर's picture

15 Jul 2014 - 12:39 pm | पिलीयन रायडर

........

स्पा's picture

15 Jul 2014 - 12:45 pm | स्पा

वारल्या गेलो आहे...

जासुश's picture

15 Jul 2014 - 1:01 pm | जासुश

मी सहसा प्रतिसाद देत नाही ..फक्त वाचून घेते तुझया रेसिपी ....काय भारी दिसताय पुर्‍या...असे वाटताय लॅपटॉप मधून उचलून घेऊ पुरी...तुला सलाम...

मी हा पदार्थ कधी खाल्ला नाहीए..त्यामुळे एक सांग हा पुर्‍या कश्या व्हयला हव्यात मौ कडक की आपल्या नेहमीचा पुर्‍या असतात तश्या च ..कारण तू रवा वापरलय ..

सानिकास्वप्निल's picture

15 Jul 2014 - 3:26 pm | सानिकास्वप्निल

रवा- मैद्याच्या पुर्‍या असल्यामुळे खुसखुशीत होतात. रवा तसा कमी प्रमाणात वापरलाय , पुर्‍या पाकात मुरत ठेवल्या की त्या खाताना मऊ लागतात. अगदीच कडक नाही तळायच्या (पाणी-पुरीसाठी लागणार्‍या पुर्‍यांसारख्या).

कणकेच्या पुर्‍या केल्या तर त्या थोड्यावेळाने मऊ होतातच.

कातून केलेल्या पुर्‍या पण अशा टम्म फुगलेल्या बघून तुमच्या पाककौशल्याचा हेवा करावा तितका कमीच!!

हे आमरसाचे वेरीयेशन उत्तम आहे
असेच अननसाचेही वेरीयेशन चांगले लागावे असा कयास आहे.

आभार!

कवितानागेश's picture

15 Jul 2014 - 3:21 pm | कवितानागेश

आहा!!!!

जाम म्हणजे जामच भारी. तोंडाला असं पाणी सुटलं आहे ना विचारता सोय नाही. *crazy*

आज घरी संकष्टीनिमित्त काहीतरी गोडधोड करुन खावं लागेल असं वाटतंय, त्याशिवाय चैन पडणार नाही.

पाकॄ १ नं. *good*

कातुन केलेल्या पु-या कातील दिसतात, पहीला फोटो फारच देखणा आलाय. छान पाकृ. नेवैद्याला करणं अवघड दिसतयं, कारण तोवर रहायला पाहीजे ना ताटात.

भाते's picture

15 Jul 2014 - 8:40 pm | भाते

प्रतिक्रिया देणे शक्य नाही आहे.

भाते's picture

15 Jul 2014 - 8:40 pm | भाते

प्रतिक्रिया देणे शक्य नाही आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2014 - 9:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सास्वच्या धाग्यावर प्रतिसाद लिहिणं सोडलं आहे.

-दिलीप बिरुटे

अप्रतिम...पुढे शब्द संपले ग...

मधुरा देशपांडे's picture

16 Jul 2014 - 1:39 pm | मधुरा देशपांडे

शब्द संपले

प्रभो's picture

16 Jul 2014 - 1:35 pm | प्रभो

मस्त!!!

पियुशा's picture

16 Jul 2014 - 2:34 pm | पियुशा

लाजवाब !!

सानिकास्वप्निल's picture

16 Jul 2014 - 3:07 pm | सानिकास्वप्निल

प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे खूप आभार :)

देवी आमच्या नेत्रकमलास अपार कष्ट देण्याचे हे व्रत आपण सातत्याने करत आहात,तरी आमच्या जिव्हेस काही तरी प्रसाद मिळावा याची कॄपा करुन सोय करावी ! ;)

आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Jul 2014 - 7:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पा.कृ. आणि फोटो "खल्लास" आहेत. बाकी ह्या तेलात किंवा तुपात विरघळत नाहीत ना? बाकी डाएटींगला सुरुंग लावल्याबद्दल नेहेमीप्रमाणे तीव्र णीषेध. :)!!

स्पंदना's picture

18 Jul 2014 - 9:09 pm | स्पंदना

मस्ताड पाकृ! अन खुसखुशीत प्रतिसाद!

सुधीर's picture

18 Jul 2014 - 9:17 pm | सुधीर

शब्द नाहीत. अप्रतिम!

आयुर्हित's picture

18 Jul 2014 - 11:34 pm | आयुर्हित

हाये रामा ये क्या हुवा, क्यु ऐसे हमे सताने लगे,
पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या हो सामने, हम काबु मे कैसे रहे?

sweetest thing in life!

मनापासुन धन्यवाद.

अप्पा जोगळेकर's picture

19 Jul 2014 - 5:05 pm | अप्पा जोगळेकर

खल्लास. करुन पाहणार.