नारकोन्डम बेट

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
27 Jun 2014 - 2:07 pm

नारकोन्डम बेट -- हे अंदमान बेट समूहातील सर्वात दूर आणि पूर्वेकडे असलेले एक छोटेसे बेट आहे. पहा http://en.wikipedia.org/wiki/Narcondam_Island#mediaviewer/File:Narcondam...
हे बेट एका मृत किंवा निद्रिस्त ज्वालामुखीच्या शिखरामुळे तयार झालेले असून उत्तर अंदमान च्या बेटांपासून ते ११४ किमी दूर आहे. या बेटाला दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत. हे पूर्वेच्या समुद्रात या आगामी लेखमालेतील एक पुष्प असून लेखमाला येत्या काही दिवसात लिहिण्याचा विचार आहे. या बेटावर अंदमान पोलिसांची एक चौकी बांधली आहे
याची पार्श्वभूमी अशी कि बांगला देशात कॉक्स बाजार येथे आंतर राष्ट्रीय दहशतवाद्यांचा गुप्त शस्त्रास्त्र बाजार आहे तेथून देशोदेशींचे दहशतवादी चीनी बनावटीची शस्त्रास्त्रे जगभर पाठविण्यासाठी एक केंद्रबिंदू म्हणून याचा वापर केला जात असे. येथून तस्कर लोक शस्त्रास्त्रे वेगवेगळ्या दहशतवादी गटाना पाठवीत असत. यात मिझो नागा पासून लिट्टे आणि अल कायदा पर्यंत सर्व दहशतवादी येतात. फार काय आपल्या छत्तीस गड, तेलंगण,गडचिरोली येथील माओवादी यांनादेखील. या कॉक्स बाजार मधून समुद्रमार्गे मच्छी मारी होडक्यातून दहशतवादी शस्त्रास्त्रे बंगालच्या उपसागरातून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असत. त्यांना नारकोन्डम बेट हे एक भेटीचा बिंदू(transit point) म्हणून सोयीचा झाला होता तेंव्हा या बेटावर मनुष्यवस्ती नव्हती. याकारणास्तव भारत सरकारने तेथे अंदमान पोलिसांची एक चौकी तयार केली. तेथे अंदमान पोलिसांच्या २५ जणांची एक तुकडी एका सब इन्स्पेक्टर च्या नेतृत्वाखाली ४५ दिवस तळ ठोकत असे. त्यांच्या कडे एक व्हेलर बोट, एक जनरेटर, एक वायरलेस सेट, बंदुका आणि त्यांना लागणारे समान अशा गोष्टी असत. दिवसात जनरेटर वरील दोन तास वीज सोडले तर काहीही नसे. लोक आपले विजेरीवर चालणारे ट्रान्झीस्टर करमणुकीसाठी वापरतात. बाकी सकाळी उठल्यापासून रात्री पर्यंत करण्यासाठी काहीच नसे. ते लोक तेथील जंगलात आणि समुद्रकिनार्यावर सकाळ दुपार संध्याकाळ केंव्हाही गस्त घालत असत आणि बाकी आपला स्वयंपाक करणे पत्ते व्होली बॉल खेळणे क्यारम खेळणे असे काही तरी करून आपले ४५ दिवस काढत असत.
दुसरे कारण
हे बेट म्यानमारच्या कोको बेटाच्या अगदी जवळ आहे आणि तेथे चीनी सरकार भारतीय नौदलाच्या आणि वायुदलाच्या हालचालींवर टेहेळणी करण्यासाठी तळ बांधत आहे असा भारताला बराच काळ संशय आहे. चीनच्या म्हणण्याप्रमाणे ते तेथे म्यानमार(ब्रम्ह देश) साठी नागरी विमानतळ बांधत आहेत. यासाठी भारत सरकार तेथे एक रडार स्टेशन बांधणार आहे ज्यामुळे चीनी विमाने जहाजे आणि पाणबुड्या यांच्यावर जवळून टेहेळणी करणे शक्य होईल.
नारकोन्डम बेटाच्या सात चौरस किमी क्षेत्रावर एक अत्यंत दुर्मिळ असा शिंगचोच्या पक्षी राहतो जो जगात कुठेच आढळत नाही.त्याच्या नैसर्गिक अधिभागावर अतिक्रमण होऊ नये म्हणून बरेच दिवस त्या रडार स्टेशन ला पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळत नव्हती ती आता मिळालेली आहे http://en.wikipedia.org/wiki/Narcondam_hornbill#cite_note-16
http://economictimes.indiatimes.com/environment/developmental-issues/gre... .
असो
नमनाला घडाभर तेल घालून झाले.
नौदलात असताना १९९८ साली मी तटरक्षक दलाच्या वज्र जहाजावर वैद्यकीय अधिकारी म्हणून होतो. एम डी( क्ष किरण शास्त्र) झाल्यावर पाच वर्षांनी परत मला तेथे नियुक्त केले गेले. एका जहाजावर जेथे फक्त चाळीस निरोगी सैनिक असतात अशा ठिकाणी केवळ तेथे हेलीकोप्टर उतरते म्हणून एक वैद्यकीय अधिकारी ठेवला जातो म्हणून. असो आयुष्यात काहीच न करणे याचा एक वेगळा अनुभव आला. साधारण महिन्याभरात मी १५( पंधरा फक्त) रुग्ण बघत असे.
तटरक्षक दलाच्या गस्ती जहाज वज्र वर माझी नियुक्ती होती आणि जहाजाला अंदमान निकोबार बेटांच्या आसपास गस्त घालण्यासाठी पाठविलेले होते. आम्ही पोर्ट ब्लेयर वरून संध्याकाळी निघालो.रात्रभर इकडेतिकडे गस्त घालत पहाटेला उत्तरेकडे एक बैरन आयलंड(वैराण बेट-अक्षरशः)च्या बाजूने जात होतो. http://en.wikipedia.org/wiki/Barren_Island_(Andaman_Islands) या बेटावरचा ज्वालामुखी मधून मधून जागृत होतो त्यामुळे त्या बेटावर मानवी वस्ती नाही. १९९४-९५ मध्ये त्याचा स्फोट झाला होता आणि आम्ही गेलो त्यावेळी त्यातून थोडासा धूर फक्त येत होता. हे बेट सोडून आम्ही पुढे निघालो. सकाळी साधारण नउ च्या सुमारास मला कॅप्टन ने विचारले काय डॉक्टर नारकोन्डम बेटावर जाणार काय? मी नाही तरी काहीच करत नव्हतो त्यामुळे मी लगेच होकार दिला. मग आणखी कोण जाणार आहे त्याची विचारणा झाली आमचा इलेक्त्रिकल अभियंता प्रेम कुमार आणि चार नौसैनिक असे सहा जण आम्ही रबरी बोटीत बसून त्या बेटावर जायचे असे ठरले. नारकोन्डम बेट म्हणजे समुद्रातून बाहेर आलेला एक पर्वताचा सुळकाच आहे आणि त्याच्या बाजूचा समुद्र फार उंच सखल आहे त्यामुळे आमचे जहाज बेटापासून एक किमी त्रिज्येच्या वर्तुळात बेटाला फेर्या घालत होते. तेथील समुद्र नेहेमीच खवळलेला असतो
कॅप्टन( कमांडर प्रीत पाल सिंग) मला म्हणाले डॉक्टर ते पोलिस अगदीच एकटे आहेत आणि त्यांना काही लागली तर वैद्यकीय मदत देत आली तर पहा.म्हणूनच मी तुला विचारले तू जाशील का? तू हो म्हणालास ते मला छान वाटले. मी एक औषधाचा खोका प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन एका नौसैनिकाला सामाना बरोबर दिला. मी कॅप्टनला विचारेल बेटावर काय आहे तर ते म्हणाले हे २५ जण सोडून तेथे दुकान बाजार काहीच नाही जंगलच आहे. म्हणून मी फक्त आपला गणवेश घातला पाकीट पैसे केबिन मध्येच ठेवले. ओळखपत्र (साखळीला अडकवलेले असते)गळ्यात घातले बूट घातले आणि तयार झालो. आमच्या बोटीवरून ती सहा फुटाची जेमिनी( रबरी बोट) पाण्यात उतरवली. आम्ही दोराच्या शिडीवरून जेमिनीत उतरलो. मी हलका ( वजनाने) म्हणून मला पुढे डावीकडे बसवले. तीन जण डावीकडे तीन जण उजवीकडे असे आम्ही बसलो. मागच्या नौसैनिकाने मोटार चालू केली आणि आम्ही नारकोन्डम बेटाकडे कूच केले. दहा पंधरा मिनिटात आम्ही बेटाजवळ पोहोचलो वायरलेस सेट प्रेम कुमार कडे होता तो दर पाच मिनिटांनी कॅप्टनला आपली जागेबद्दलची परिस्थिती वर्णन करत होता. शेवटी जेमिनीचे पुढचे टोक बेटाला टेकले. आता जेमिनीची मोटार वर घेऊन जेमिनीला जमिनीवर घ्यायचे होते. पण मागून येणाऱ्या लाटा इतक्या जोरदार होत्या कि जेमिनीमध्ये पाणी भरायला लागले. मी पुढच्या टोकावरून बेटावर उडी मारली तर जेमिनी मागे सरकल्यामुळे उडी दोन फुट पाण्यात( गुढघ्याच्या वर) गेली. मी जेमिनी खेचून मागच्यांना सांगू लागलो कि अरे जोरात ढकला. तर सर्वात मागचे नौसैनिक म्हणाले सर आमचे पाय टेकलेले नाहीत आम्ही पाण्यात पोहत आहोत.(जेमिनीची लांबी ६ फुट असते म्हणजे जमिनीपासून फक्त सहा फुटावर ७-८ फुट खोल पाणी होते) जोर कुठून लावू? या गोंधळात जेमिनीत पाणी भरतच होते त्यात प्रेम कुमारच्या वायरलेस सेटमध्ये पाणी शिरले आणि तो बंद झाला. मग मी आणि पुढे असणार्या नौसैनिकाने पाण्यात उतरून जोर लावून जेमिनीला जमिनीवर आणले. तोवर आम्ही सगळे समुद्राच्या पाण्याने नखशिखांत भिजलो होतो. सगळ्यांच्या बूट पैन्ट शर्ट मध्ये पाणी घुसून जड झाले होते. आता प्रेम कुमार वायरलेस सेट चालू होतोय का ते पाहू लागला. पण त्यात पूर्ण समुद्राचे पाणी शिरल्याने त्याचे सर्व प्रयत्न वाया गेले.त्याच्या घड्याळात पाणी शिरून ते बंद झाले होते खिशातील पाकीट आणि पैसे भिजले. मी ओळख पत्र सोडून काहीच आणले नव्हते त्यामुळे मला त्यातल्या त्यात बरं वाटत होतं आता तो टेन्शन मध्ये आला. मी म्हटले काय झाले तर तो म्हणाला सर आता आम्ही परत येतो आहे हे जहाजाला कसे कळवायचे? मी म्हटले जाऊ दे नंतर बघू.
क्रमशः

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 Jun 2014 - 2:16 pm | प्रचेतस

उत्कंठावर्धक

मुक्त विहारि's picture

27 Jun 2014 - 2:39 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

अजया's picture

27 Jun 2014 - 2:40 pm | अजया

मग पुढे?...

यशोधरा's picture

27 Jun 2014 - 2:43 pm | यशोधरा

वाचते आहे..

प्रभाकर पेठकर's picture

27 Jun 2014 - 2:49 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर, ओघवते वर्णन. प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याचा भास होतो. अभिनंदन.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2014 - 3:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सुरुवात ! या असल्या तुमच्या (डॉ खरेंच्या खर्‍या आयुष्यातल्या) कथा वाचायला नेहमीच खूप मजा येते. त्यातही अशी अनवट आणि विशेष म्हणजे स्ट्रॅटेजिकली महत्वाच्या ठिकाणाची गोष्ट म्हटल्यावर उत्सुकता प्रचंड चाळवली गेली आहे.

त्यामुळे या गोष्टीतली ठिकाणे जालावर धुंडाळली नसती तरच नवल ! तो नकाशा (तुमची परवानगी गृहीत धरण्याचे धाडस करून) टाकत आहे...


(मूळ नकाशा जालावरून साभार)

पुढचे भाग लवकर लवकर टाका हेवेसांन :)

सुबोध खरे's picture

27 Jun 2014 - 3:24 pm | सुबोध खरे

वा एक्का साहेब,
आमच्या केकवर आयसिंग लावून त्याची खुमारी वाढवल्याबद्दल अनेक धन्यवाद.

एस's picture

27 Jun 2014 - 3:52 pm | एस

वाचतोय. पुढचा भाग लवकर टाका. जास्त उत्सुकता ताणू नका. :-)
नारकोंडम हॉर्नबिल ची माहिती इथे.

अनुप ढेरे's picture

27 Jun 2014 - 3:36 pm | अनुप ढेरे

छान सुरुवात

लय लय आणि लयच भारी, डॉक लवकर पुढील भाग टाका आणि मोठे टाका ;)

बॅटमॅन's picture

27 Jun 2014 - 4:01 pm | बॅटमॅन

लेखन लैच उत्कंठावर्धक. एक्कासाहेबांच्या नकाशीकरणामुळे अजून नीट समजले.

रेवती's picture

27 Jun 2014 - 4:55 pm | रेवती

मग पुढे काय झालं? जाणून घेण्यास उत्सुक आहे.

सौंदाळा's picture

27 Jun 2014 - 5:02 pm | सौंदाळा

थरारक
डॉक, पुभाप्र

कंजूस's picture

27 Jun 2014 - 5:05 pm | कंजूस

छान .पण एक शंका .
आता गुगल मैप्स आणि विकि मधून बऱ्याच गोष्टी उघड झाल्यात .तरीही संरक्षण
दलांतून बाहेर पडल्यावर माहिती सांगण्यावर उघड करण्यावर कर्मचाऱ्यांवर किती बंधन असते ?

मृत्युन्जय's picture

27 Jun 2014 - 5:47 pm | मृत्युन्जय

खुपच उत्कंठावर्धक. पुढचा भाग फारच लव्कर टाका

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Jun 2014 - 6:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

अनुभव मस्त...म्हणजे एकदम थरारक

एस's picture

27 Jun 2014 - 11:13 pm | एस

जर प्रत्येक परिच्छेदानंतर एक ओळ सोडून खालचा परिच्छेद लिहिला तर लेख अजून वाचनीय होतील असे वाटतेे. :)

नंदन's picture

27 Jun 2014 - 11:48 pm | नंदन

उत्कंठावर्धक लेख. पुढील भागांची वाट पाहतो.

प्यारे१'s picture

27 Jun 2014 - 11:54 pm | प्यारे१

उत्कंठावर्धक...

खटपट्या's picture

28 Jun 2014 - 1:07 am | खटपट्या

जबरी !!!
पु. भा. प्र.

खतरनाक! लवकर पुढे काय झालं ते सांगा.

पैसा's picture

28 Jun 2014 - 9:28 am | पैसा

अतिशय थरारक!

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Jun 2014 - 10:57 am | लॉरी टांगटूंगकर

जरासं खुसपट, लेख लहान झालाय. क्रमशः संपल्यावर वाचायचं ठरवलं होतं, पण काय रहावलं गेलं नाही. :)
पुभाप्र

जोशी 'ले''s picture

28 Jun 2014 - 12:55 pm | जोशी 'ले'

उत्कंठावर्धक... लवकर टाका पुढचा भाग

आतिवास's picture

28 Jun 2014 - 1:57 pm | आतिवास

उत्कंठावर्धक!

विनोद१८'s picture

28 Jun 2014 - 3:14 pm | विनोद१८

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

भाते's picture

30 Jun 2014 - 7:52 pm | भाते

वाचुनच अंगावर काटा आला. अप्रतिम!
पुढे काय… ह्याच्या प्रतिक्षेत.

एक्का काका,
तुमच्या नकाशामुळे समजले हे ठिकाण कुठे आहे ते! धन्यवाद.

सुबोध खरे's picture

4 Jul 2014 - 2:48 pm | सुबोध खरे

एक पुरवणी
बेटाला भेट देण्याचे कारण -- नारकोंडम च्या आसपासहून जाणारी तटरक्षक दलाची किंवा नौदलाची जहाजे तेथिल पोलिसांना सदिच्छा भेट दत असतात आणि त्यांच्या कडून काही गुप्त माहिती/ खबरी ज्या बिनतारी यंत्रणेवर पाठवता येणार नाही ती गोळा करून लष्कर/पोलिस मुख्यालयाला पाठवण्याचे काम करतात.