दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही
लेखनविषय (Tags)
तुमच्या हृदयात फक्त एक दिलरुबा हवी, मग स्वर्ग आकाशाच्या पलिकडे नाही. तुमचं रोजचं आयुष्यच जन्नत आहे. तुमची दिलरुबाच तुमची परी आहे. फक्त नज़रिया बदलायचा अवकाश, एखादीनं तुम्हाला मोहवण्याचा अवकाश आहे.
सम्राट अकबर, युवराज सलीमला विचारतो, ‘या नाचिज़ अनारकलीत तू असं काय पाहिलंस’? अकबराला वाटतं, युवराजाच्या मेहेर नज़रेची आस असणार्या, सल्तनतेत इतक्या लावण्यवती आहेत की त्याचं मन बदलणं अवघड नाही. आणि सलीम अकबराला कमालीचं दिलकष उत्तर देतो, ‘जहांपनाह, अनारकलीको देखनेके लिए तो सलीमकी नज़र चाहीए’.
तुमची दिलरुबा दुनियेसाठी काय आहे यानं काही फरक पडत नाही. आणि तुम्ही युवराज आहात की सामान्य याचा इष्काशी काहीएक संबंध नाही. तुम्ही आणि तुमची दिलरुबा तारुण्याच्या ऐन बहरात आहात की आयुष्याच्या शेवटाला; तुम्ही सधन आहात की निर्धन, या कशाचा तुमच्या आणि तिच्या अनुबंधाला लगाम नाही.
ग्रेस म्हणतो, प्रेम म्हणजे काय? दोन डोळे समान, एक हृदय किमान!
या इष्काची नशा, तुमची दुनिया जन्नत करते. कधी कुणावर बेतहाशा प्रेम करुन पहा. आज, उद्या, केव्हाही. एक दिलरुबा तुमच्या हृदयात विराजमान करा आणि मेहदी हसनची ही दिलकश गज़ल तुमच्या रोमारोमात भिनेल. त्याची गज़ल तुमचा अनुभव होईल. आणि तुम्ही म्हणाल :
दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही
एक दिलरुबा है दिलमें जो हूरोंसे कम नही ।
हे मी तुम्हाला सांगत नाही, ती अस्तित्वाची किमया आहे. आज नाही, अनंत कालापासून सृष्टीनं ते रहस्य जपलंय.
बुलबुलनं फुलांना सांगितलं, फुलांनी बहरांशी हितगुज केलं आणि पौर्णिमेचा चंद्र तारकांना म्हणाला...
बुलबुलने गुलसे, गुलने ब-हा-रों-से कह दिया या स्वरावलीत, मेहदी हसनजींनी ख़र्जात कमालीची अदाकारी केलीये. आणि `इक चौदवीके चांदने' वर स्वर असा काही वर नेऊन पुन्हा, `तारोंसे कह दिया' वर अशी काही सम साधली आहे की त्या समेसरशी रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचते!
बुलबुलने गुलसे, गुलने बहारोंसे कह दिया
इक चौदवीके चांदने, तारोंसे कह दिया....
आणि मग अत्यंत मखमली आवाजात, रसिकांची दाद मनोमन स्विकारत, मेहदी हसनजी, जी काही सुरुवात करतात ती केवळ लाजवाब आहे. `दुनिया' या शब्दावर त्यांनी टाकलेलं वजन आणि जन्नत या शब्दाचं केलेलं आश्वासक उचारण, प्रत्येक रसिकाला नि:संशयपणे सांगतं की फक्त एक दिलरुबा हवी! आणि मग, `हूरोंसे कम नही' मधे पुन्हा, `हूरोंसे' वर टाकलेलं वजन, कलेजा खलास करतं.
दुनिया किसीके प्यारमे, जन्नतसे कम नही
एक दिलरुबा है दिलमें जो हूरोंसे कम नही ।
तू सौंदर्याची साम्राज्ञी आहेस, माझ्या (नज़रेनं तुझी एकेक अदा पहायचा अवकाश की) तू सौंदर्याचं संपूर्ण विश्व आहेस. आपल्या पारस्पारिक विश्वासचा, त्या अतूट अनुबंधाचा, तू प्राण आहेस. आपल्या इष्कामुळे तू इतकी खुलली आहेस की तुझ्या अंगोपांगात, प्रत्येक देहबोलीत एक शान आहे. आपल्यावर कुणी बेतहाशा प्रेम करतं ही भावनाच स्त्रीला इतकी सुखावून जाते की ती स्वतःच मोहोब्बतकी शान होते. तिची प्रत्येक अदा, तिचा डौल, प्रेमाच्या सुखावह आधारातून व्यक्त होतो. आणि प्रियकराला वाटतं की तिच्या सौंदर्याची दाहकता, तिचा सहवास, आपलं आयुष्य निव्वळ चांदणं करुन गेला आहे.
हार्मोनियमच्या काउंटर मेलडीज ग़ज़लेची उत्कटता क्षणोक्षणी वाढवत नेतात. ठेका तर इतका अप्रतीम आहे की तो हसनजी आणि हार्मोनियमच्या मखमली स्वरावलींवर, एखाद्या कमनीय युवतीच्या देहासारखा, त्या मखमलीला जरा सुद्धा धक्का न लावता, आवर्तनामागून आवर्तनं घेत राहातो.
तुम बादशा-ए-हुस्न हो, हुस्ने जहान हो
जाने वफ़ा हो और, मोहोब्बतकी शान हो
जलवे तुम्हारे हुस्नके, तारोंसे कम नही ।
_________________________
ती सहज हसली तरी दिसणार्या दंतपंक्ती मोत्यांची बरसात करुन जातात. आणि तीनं नज़र उचलून पाहिलं तर हृदयातल्या आकांक्षांच्या कळ्या उमलतात. तिच्या कुंतलांचा गंध पुष्पांची बरसात करुन जातो.
भूलेसे मुस्कुराओ तो, मोती बरस पडे
पलकें उठाके देखो तो, कलीयां भी हस पडे
खुशबू तुम्हारी जुल्फकी, फूलोंसे कम नही ।
______________________________
दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही
एक दिलरुबा है दिलमें जो हूरोंसे कम नही ।
या जगात ज्याज्या वेळी प्रेमाच्या रहस्याशी कुणी थबकेल, त्यात्या वेळी ही कालातीत ग़ज़ल त्याला आश्वासन देत राहील की `दुनिया किसी के प्यारमें जन्नतसे कम नही'. ही दुनियाच स्वर्ग आहे. आणि त्या मुहोब्बते-जन्नतच्या माहौलमधे, तो आणि त्याची दिलरुबा एक परिकथा बनून जगतील.
प्रतिक्रिया
बहोत खूब
अतिशय सुंदर वर्णन !!! मस्त
बहारदार लिहिलंय...
व्वाह संक्षी
छान लिहिलंय
सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे
संक्षीसेठ...गझल आणि अनुवादही भारीच.
डिबी, मनःपूर्वक धन्यवाद!
तेरी गलिया....
डिबी, पुनश्च आभार!
एक बात और!
स्सही रे स्सही.
प्रेम असं दहादा करता येत असतं का ?
क्या टॉपिक निकाला है संजयजी
घ्या आता दुसरी गझल.
नक्की!
वाह !
छान लेख....
सर्वांचे पुन्हा मनःपूर्वक आभार!
खूप छान … माझं लेखन वाचताना
अरे घ्याकी नवी गझल.