मी अनुभवलेला सह्याद्री

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in भटकंती
18 Jun 2014 - 11:36 pm

सह्याद्रीतील गेल्या कित्येक वर्षातील भटकंतीच्या मोजक्या प्रकाशखुणा ;-

01
कोकणकडा - हरिश्चंद्रगड

02
पावसाळ्यातील हरिहर

03
संजीवनी माची - राजगड

04
सागरगड आणि वानरटोक

05
कोकणकड्याचा भाऊ शोभावा असा कुलंगच्या पाठचा कडा आणि खोरं

06
ढगांची दुलई - कुलंगच्या माथ्यावरुन - कोपर्‍यातील टोक कळसूबाई

07
तोरण्यावरचा सूर्योदय

08
नळीची वाट

09
साधले घाट

10
कोकणकडा - बेलपाड्यातून

11
बागलाणचे राजे - सालोटा आणि साल्हेर

12
परशुराम मंदीर - साल्हेर

13
नाणेघाट

014
पेठ

015
सरसगड

016
कळसूबाईच्या माथ्यावरील मंदीर

017
शिवछत्रपतींचे सिंहासन - रायगड

18
केदारेश्वर मंदीर - पुरंदर

19
कोकणकडा

20
नकटा

21

022

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

18 Jun 2014 - 11:39 pm | मुक्त विहारि

आवडले...

खटपट्या's picture

18 Jun 2014 - 11:41 pm | खटपट्या

सर्व फोटो अतिशय सुन्दर !!!

ढगांच्या दुलईत फारच छान .साधले घाटाबद्दल थोडक्यात लिहा .कुठुन कुठे जातो ?

स्पार्टाकस's picture

19 Jun 2014 - 7:34 am | स्पार्टाकस

साधले घाट हरिश्चंद्रगडाचा शेजारी असलेल्या कलाडगडाच्या जवळून खाली उतरतो. माळशेजच्या पायथ्याशी असलेल्या बेलपाडा (वालीवरे) या गावातून सह्याद्रीवर चढाई करून घाटावर पोहोचण्यासाठी असलेल्या ३ वाटांपैकी एक म्हणजे साधले घाट. (दुसर्‍या दोन वाटा म्हणजे हरिश्चंद्रगडावर जाणारी नळीची वाट आणि बेलपाड्याहून माळशेजच्या गाडीरस्त्याला समांतर खिरेश्वरला चढणारी पायवाट). हरिश्चंद्राच्या नगर जिल्ह्यातील पायथ्याशी असलेल्या पाचनई आणि इतर गावातील लोक कोकणात उतरण्यासाठी आणि मुंबईच्या दिशेने येण्यासाठी कधीकधी साधले घाटमार्गे पदयात्रा कडून बेलपाडा आणि पुढे सावर्णे गाठतात. पावसाळ्यात या मार्गाने खाली उतरणे ही एक कसरत असते.

प्रचेतस's picture

19 Jun 2014 - 9:35 am | प्रचेतस

तो साधले घाट नसून सादडे घाट आहे.
घाटाच्या पदरात अर्जुनसादड्याची झाडी भरपूर असल्याने ह्या घाटवाटेला सादडे घाट नाव पडले. त्याचाच अपभ्रंश हल्ली साधले म्हणून होत असतो.

एस's picture

19 Jun 2014 - 1:03 pm | एस

मलाही कळेना साधले घाट कुठला ते. मग प्रकाश पडला. :-)

अजया's picture

19 Jun 2014 - 8:06 am | अजया

मस्त फोटो. ढगांची दुलई पांघरलेली शिखरं अप्रतिम ! रौद्रसुंदर कोकणकडा सुद्धा आवडलाच .

यशोधरा's picture

19 Jun 2014 - 9:09 am | यशोधरा

फोटो आवडले.

प्रभाकर पेठकर's picture

19 Jun 2014 - 10:28 am | प्रभाकर पेठकर

सुंदर. तुमच्या आठवणींच्या खजिन्यातील प्रकाशचित्र अप्रतिम आहेत.
ही मंदीरं एवढ्या उंचावर, वस्तीपासून दूर का बांधली जातात? काही समजत नाही.
व्यवसायानिमित्त भारतापासून, महाराष्ट्रापासून इतकी वर्षे दूर राहिल्याने ऐन उमेदीच्या काळातही गड, दूर्ग आणि सह्यपर्वत रांगांना भेट देण्याचा योग आला नाही. आता, पायी गड किंवा डोंगरकडे चढणे जमणार नाही. पण इच्छा प्रबळ आहे.

प्रभाकरजी,
पूर्वी यवनांच्या भीतीने , ती तोडफोड करीत असल्याने मंदिरे उंचावर आणि दुर्गम जागेत बांधली असावीत .त्यामुळे दगड फोडायला का इतक्या लांब जा ? असा विचार यवन करीत असणार.
आणि त्यात आपला भाबडेपणा.....कि देव जितक्या दुर्गम ठिकाणी , दर्शनासाठी त्रास होणार तेवढी भक्ती अधिक...!!!

प्रचेतस's picture

14 Jul 2014 - 12:46 pm | प्रचेतस

यवन म्हणजे ग्रीक.

एकच सुधारणा सुचवतो...आपण शिवछत्रपतींची समाधी म्ह्णुन टाकलेला फोटो,हा राजदरबारातील सिंहासनाच्या जागेवर बसवलेल्या मेघडंबरी चा आहे.....समाधी चा फोटो खाली डकवत आहे...Shivchatrapati Samadhi..बाकी सर्व फोटो उत्तम्..शुभेच्छा!

स्पार्टाकस's picture

19 Jun 2014 - 10:49 am | स्पार्टाकस

फोटोंमधील गोंधळामुळे हे झालं. योग्य तो बदल केला आहे. मनापासून धन्यवाद !

नन्दादीप's picture

19 Jun 2014 - 10:56 am | नन्दादीप

निव्वळ अप्रतिम....

माधुरी विनायक's picture

19 Jun 2014 - 11:12 am | माधुरी विनायक

ढगांची दुलई... मस्त... भटकंती आणि प्रकाशचित्रे अप्रतिम आहेतच. पण ढगांची दुलई सारखी समर्पक आणि चपखल नावं दृश्यानुभवात भर घालणारी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jun 2014 - 11:35 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर चित्रे ! सह्याद्री तसा खूप फोटोजनीक आहेच पण पावसाळ्यातले त्याचे रूप एकदम साजिरे होते. त्याचे बरेच भाव तुम्ही छान पकडले आहेत.

फटू पाहून गारगार मस्त वाटलं.

धन्यवाद .आता यावर्षी हा सादडे घाट आणि सांधणदरीला हात लावून येईन म्हटतो .

एस's picture

19 Jun 2014 - 1:05 pm | एस

नाणेघाटाची प्रतिमा तर एकदम मस्त. धन्यवाद!

सुबोध खरे's picture

19 Jun 2014 - 2:46 pm | सुबोध खरे

आपली इतकी सुंदर प्रकाशचित्रे माझ्या संगणकावर चित्र म्हणून लावण्यास आपली परवानगी आहे काय?

स्पार्टाकस's picture

19 Jun 2014 - 7:03 pm | स्पार्टाकस

सुबोध,
तुम्हाला माझी छायाचित्रे आवडली याचा आनंद आहे. नि:संकोचपणे वापरा.

धन्या's picture

19 Jun 2014 - 5:14 pm | धन्या

अप्रतिम चित्रे !!!

अप्रतिम प्रकाशचित्रे. ढगांची दुलई दृष्ट लागावी अशी आहे. संजीवनी माची बघून मागल्या वर्षाअखेरच्या राजगडाच्या आठवणी जाग्या झाल्या. :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Jun 2014 - 7:51 pm | राजेंद्र मेहेंदळे

हरीश्चंद्र,कलाड्गड्,कुंजर,रतनगड आणि जोडुन अलंग,कुलंग,मदन्,कळसुबाइ असा ७-८ दिवसांचा जंबो ट्रेक करायची ईच्छा होतेय

स्पार्टाकस's picture

19 Jun 2014 - 8:51 pm | स्पार्टाकस

मी आणि माझ्या दोन मित्रांनी मिळून इगतपुरी ते लोणावळा असा ट्रेक केला होता १६ दिवसांचा.

इगतपुरी-कुलंग-मदन-अलंग-रतनगड-कात्राबाईची खिंड-कलाड-हरिश्चंद्र-नळीच्या वाटेने खाली सावर्णे-भैरव-नाणेघाटाने खाली उतरून सिद्धगड-भीमाशंकर-लोणावळा

घरी आल्यावर ४ दिवस पाय नावाचा अवयव आपल्याला असल्याचा पश्चाताप व्हावा असे दुखत होते.

प्रभू-प्रसाद's picture

20 Jun 2014 - 3:51 pm | प्रभू-प्रसाद

फोटो सुन्दर आहेत. फोटो व कलात्मकता दोन्ही आवड्ले.

किसन शिंदे's picture

20 Jun 2014 - 4:38 pm | किसन शिंदे

सर्वच्या सर्व फोटो जबराट आहेत. छत्रपतींच्या कृपेने यातल्या बहूतेक ठिकाणची माती हातांनी स्पर्श केली आहे. काही ठिकाणी अजूनही जायचं शिल्लक आहे. धुक्याच्या दुलईचा फोटो माझ्याकडे असाच्या असा आहे प्रतापगडावरच्या कडेलोट टोकावरून घेतलेला. टाकतो शोधून इथे.

पैसा's picture

20 Jun 2014 - 8:15 pm | पैसा

सगळेच फोटो अप्रतिम आहेत!

प्यारे१'s picture

22 Jun 2014 - 3:25 pm | प्यारे१

+१
अप्रतिम!

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Jun 2014 - 12:51 pm | माम्लेदारचा पन्खा

तुम्ही भाग्यवान आहात ….सह्यद्रिच्या अंगाखांद्यावर खेळून आलाय….

तुमच्या द्वारे आम्ही सुद्धा काल्पनिकरित्या बागडून आलो तिथे…. धन्यवाद !!

सुहास झेले's picture

21 Jun 2014 - 1:25 pm | सुहास झेले

सुपर्ब... सह्याद्रीबद्दल जितके बोलावे/पहाव//फिरावे....तितके कमीच :)

वेल्लाभट's picture

22 Jun 2014 - 1:14 pm | वेल्लाभट

केवळ खत्त्त्त्तरनाक !

वेल्लाभट's picture

22 Jun 2014 - 1:14 pm | वेल्लाभट

काय फोटो आहेत साहेब ! वाह !!!!

अर्धवटराव's picture

13 Jul 2014 - 2:16 am | अर्धवटराव

__/\__

अवांतरः
इतक्या सुंदर छायाचित्रांना तारीख नोंदीचे डाग खुप खटकले.

रेवती's picture

13 Jul 2014 - 2:59 am | रेवती

सुंदर चित्रे आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2014 - 7:38 am | अत्रुप्त आत्मा

*i-m_so_happy*