✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फ़िर तेरी कहानी याद आयी....!

व — वटवट, Fri, 05/30/2014 - 11:34
आता नाही तिला आठवायचं म्हटलं किच तिची आठवण येते हमखास... नाही आत.. नाही बाहेर.... मधल्यामध्ये अडकून राहतो श्वास.... भयानक घुसमट होते आणि अस्वस्थता पोहोचते शिगेला... कातरतेचा षड्ज लागतो आणि मल्हार पोहोचतो टिपेला... माझ्याच अंगणात आठवणी मग, दंगा मांडू लागतात ... दमून भागून गेल्यावर डोळ्यातून सांडू लागतात.. एक फुल पूर्णपणे फुलण्याआधीच सुकलेलं... एक आभाळ नं थकता माझ्यासाठीच झुकलेलं... कवितेच्या वहीवर तिनं लिहीलेलं माझं नाव... नक्षत्रंही पडतील फिकी जर केला त्याचा लिलाव... असं म्हणताच तिचं लाजणं अन चंद्र जायचा दमून... "चांदणं जाईल संपून रे राजा...!" म्हणायचा तोच वरमून... मग स्वप्नं जायची उधळून, पसरत जाणारी रात्र ... सर कोसळताना माझ्या डोक्यावर तिच्या हातांचं छत्रं.. आता तिचे हात केवढे... आणि पाउस केवढा.... तेवढ्यातल्या तेवढ्यात दरवळून जायचा तिच्या केसातला केवडा... बोटांमधून निथळणारं पाणी झटकत..... तिचं पुन्हा आडोश्याला जाणं खटकत.. "हे असं.. आभाळ कोसळताना त्यापासून चुकायचं नसतं... तर थेंबाथेंबामधलं त्याचं मागणं ऐकायचं असतं..." हे असं मी म्हटल्यावर.. "नाही बाबा आम्हाला असा पाउस ऐकता येत..! आणि कळतोय बरं तुझा अन पावसाचा मला भिजवण्याचा बेत" असं म्हणून ती आडोशाला तशीच आणि मी पावसात.. सोबतीला अगदी हिरमुसून गेलेली ती चांदरात... पाऊस पडला कि हे असलं तिचं आठवत रहातं पुन्हा पुन्हा.. नवीन रंग उजळवंत येतो तोच कॅनव्हास जुना जुना.. नौशादांच तेच गाणं मग उधळू लागतं अत्तराचा फाया... . . . "फ़िर तेरी कहानी याद आयी, फ़िर तेरा फ़साना याद आया..!" - © चेतन दीक्षित (अस्मादिक)

प्रतिक्रिया द्या
2165 वाचन

💬 प्रतिसाद (7)

वाटलं महेश भट्टच्या मोवी बद्दल लेख आहे....

आत्मशून्य
Fri, 05/30/2014 - 11:40 नवीन
पण निघाला माझ्यासाठी वटवट ;)
  • Log in or register to post comments

????

वटवट
Fri, 05/30/2014 - 11:47 नवीन
????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

सॉरी...

आत्मशून्य
Fri, 05/30/2014 - 11:55 नवीन
लेखन आवडले. - धन्यवाद असे लिहायचे विसरुन गेलो. नाय तर तुम्ही परत कशाला कवीता लिहाल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट

आता नाही करायची कविता म्हटलं

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/30/2014 - 16:19 नवीन
आता नाही करायची कविता म्हटलं कि ती होते'च खास... नाही आत.. नाही बाहेर.... घेऊ कधी गळफास.... भयानक मळमळते आणि मुरडा पडतो अंतर्मनाला... कातरत शब्द कविता होते आणि वाटतं अखेर....(ह्हा::::) श्वास सुटला... माझ्याच अंतर्मनात आठवणी मग, टांगा खेळू लागतात ... पिळवटून कल्पना गेल्यावर भसा...भस्स सांडू लागतात.. एक पान पूर्णपणे लिहिण्याआधीच चुरगाळलेलं... पेनाचं बोंडुक नं थकता माझ्यासाठीच पुढे चाललेलं... कवितेच्या वहीवर माझ्या तिनं केलेली च्याव च्याव... नावं ही ठेवलीयेत अशी,की सामोसा आणि वडापाव... असं ऐकताच तिचं चिडणं अन चंद्र जायचा बुडून... "असली बया नक्को रे बाबा...!" म्हणायचा तोच शरं-मून... मग कविताही जायची उडून, मच्छर मारणारी रात्र ... गुडनाइट लावताना मच्छरदाणित तिच्या हातचं पत्रं.. आता तिचे अक्षर केवढे... आणि माझा चष्मा केवढा.... सज्जन साधू तरी दिसायचा पिऊन तर्र्र बेवडा... डोळ्यांमधून झरणारं पाणी झटकतं..... बळच तिची अठवण काढणं..माझं मलाच खटकतं.. "हे असं.. कविता गाळताना त्यापासून शिकायचं नसतं... तर शब्दाशब्दांमधलं त्यांचं गाणं ऐकायचं असतं..." हे असं मी म्हटल्यावर.. "नाही ब्वॉ आम्हाला अश्या कविता करता येत..! आणि वळतोय बरं गुरं रानात,जणू नांगरतोय शेत" शब्दांची बैलं आडोशाला तशीच, मी काव्याच्या पावसात.. सोबतीला पूर्ण हिरमुसून गेलेली कविता मात्र अंधारात... मनात उबळ आली कि हे आठवत रहातं पुन्हा पुन्हा.. पेन लावलं कागदाला..एव्हढाच काssssssssय माझा गुन्हा??? :-/ नवोदितांच तेच (रड)गाणं मग उघडू लागतं जुन्या दप्तरांच्या वह्या... . . . "फ़िर तेरी कविता आयी, और मेरं मण बोंबल्या...अयाया..! अयाया..! अयाया..!" - ©हल्लीच शिक्षित (काहि उणे-काहि अधिक+) ;)
  • Log in or register to post comments

बैल, मच्छरदाणी, पेन, मुरडा

सूड
Fri, 05/30/2014 - 17:28 नवीन
बैल, मच्छरदाणी, पेन, मुरडा यांचा एकमेकांशी परस्परसंबंध कळला नाही. व्हर्जिनल कविता अधिक उजवी आहे विडंबनापेक्षा!! *mosking*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@अधिक उजवी आहे विडंबनापेक्षा!

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/30/2014 - 17:34 नवीन
@अधिक उजवी आहे विडंबनापेक्षा!! >>> आपला या वेळचा प्रतिसादही तसा बरा...च उजवा आहे,आपल्यापेक्षा!!! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आत्मुबुवा!

एस
Fri, 05/30/2014 - 17:04 नवीन
अयाया..! अयाया..! अयाया..!"
अरारारा... फुटलो आहे! ल्येच्च बेक्कार...! *yahoo*
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा