✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

" त्या अनोळख्याने माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Tue, 07/29/2008 - 08:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7243 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/29/2008 - 12:09 नवीन

"म्हणूनच मी सदानंदी आहे"

मी एकदा एरिक नावाच्या माझ्या फ्रेंच मित्राला विचारलं, "काय रे तू कायम एवढा उत्साही, आनंदी कसा काय असतोस? तुला कधी रागावलेलं पाहिलं नाही मी! तु कधी कोणाला वाईट म्हणत नाहीस! हे कसं काय?" त्याने मला ही गोष्ट सांगितली. तो एकदा बसमधून कुठेतरी चालला होता. त्याला डाव्या बाजूची खिडकी मिळाली होती (फ्रान्समधे उजव्या बाजूने गाड्या चालवतात.) त्याच्या शेजारी जी अनोळखी तरुण मुलगी होती तिलाही खिडकी हवी होती. याने तिला खिडकीची जागा दिली आणि स्वतः आतल्या बाजूला बसून झोपी गेला. त्याला जाग आली तर बसला मोठ्ठा धक्का बसून बस थांबली होती, शेजारची मुलगी खाली पडली होती, डाव्या बाजूला एका प्रचंड मोठ्या ट्रकने धडक देऊन बसचा डावा पत्रा संपूर्णपणे कापला होता. डाव्या खिडकीतले प्रवासी जबर जखमी झाले होते आणि ती मुलगी .... तिच्या डोक्याचा संपूर्ण चेंदामेंदा होऊन ती जागीच गेली होती. "माझं आयुष्य माझं नाही," एरिक बोलत होता, "ती छान होती, तिने थोडा हट्ट केला, आणि मला काय वाटलं कोण जाणे! एवढ्या सुंदर, तरुण मुलीला आपण जागा द्यायची नाहितर काय बुद्रुक चेहेय्राच्या खडूस माणसाला, असा मतलबी विचार करून मी तिला जागा दिली होती. ४ तासाच्या प्रवासात, एखाद तास झोप काढू आणि नंतर तिच्याशी गप्पा मारण्यात, फ्लर्ट करण्यात वेळ चांगला जाईल असं माझं गणित होतं. आणि हे काय झालं बघ? आज मी तिचं उरलेलं आयुष्य जगत आहे, माझं तर त्या दिवशी अपघातातच संपलं. तिला दुखवलं नाही म्हणून मी आज जिवंत आहे. आता जेवढं मिळालंय तेवढं मी अशा पद्धतीने जगायचा प्रयत्न करतो की त्यातून दुसय्राला झाला तर आनंदच होईल. दुसय्राला दुखवून मला काय मिळणार?" मला माहित असलेल्या वात्रट, गमत्या एरिकच्या जागी एक वेगळाच एरिक मला दिसायला लागला होता!
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Tue, 07/29/2008 - 13:11 नवीन

छान

एषगोय, तुम्ही सांगितलेल्या बसचा अपघात मी स्वतः अनुभवला आहे पण मी थोडक्यात बचावले होते आणि मग जवळ बसलेल्या बाबांशी माझ्या तत्व आणि अध्यात्मावरच्या गप्पा अगदी झकास रंगल्या होत्या. खूपच क्वचित ते असे मनापासून भरभरून बोलतात, चर्चा करतात.. त्यादिवशी का कोण जाणे पण ते अगदी गप्प गप्प बसून होते. अचानक कलाटणी मिळून हव्या तशा गप्पा सुरू झाल्याने अगदी छान वाटले होते. अर्थात रात्री डायरी लिहिताना वेगळाच विचार मनात पिंगा घालत होता.. पत्रा चिरून पायाला नुसती जखम होण्यापेक्षा जर माझा अख्खा पायच चिरला गेला असता तर? एरीकचा सकारात्मक दृष्टीकोन खूप आवडला. तसे विचार प्रत्यक्षात अंगिकारणे खूप अवघड असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/29/2008 - 15:57 नवीन

>>>...एरीकचा

>>>...एरीकचा सकारात्मक दृष्टीकोन खूप आवडला. तसे विचार प्रत्यक्षात अंगिकारणे खूप अवघड असते. हेच म्हणतो...... ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 07/29/2008 - 22:16 नवीन

डोळ्या मधले आसूं सुकती

अदिती, तुझी ही गोष्ट वाचून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. आयुष्य किती क्षणभंगूर असतं.निसर्गाने मानवला ओंजळी भरभरून निर्मितीची क्षमता देली,पण नक्की भविष्य कसं समजावं ही कला दिली नाही.अर्थात तसं न देण्यातही त्याचा काही उद्देश असावा. नाहितर तो मानव जेव्हडा सुखी तेव्हडाच किंबहूना थोडा जास्तच दुःखी झाला असता. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
भ
भाग्यश्री Wed, 07/30/2008 - 04:04 नवीन

हे असं कसं

हे असं कसं होतं कुणास ठाऊक.. आमच्या बिल्डींग मधे राहणारे एक काका, आणि त्यांचा १८-१९ चा मुलगा बसने शिर्डीला निघाले.. आणि इतक्या वेळ खिडकी पाशी बसलेला अमोलदादा उठून शेजारी बसला, आणि काका खिडकीपाशी.. सेम स्टोरी.. शेजारून ट्रकने धडक दिली.. डोक्याचा पार चेंदामेंदा.. अमोलदादाच्या पोटात काचा गेल्या.. पण काका तिथल्या तिथेच गेले.. :( मी ८-९ वर्षांची होते, आणि आईबाबांनी कितीही दटावलं असलं तरी मी काकांची बॉडी पाहायचा मुर्खपणा केला होता.. अजुनही ते डोळ्यासमोरून जात नाही.. आणि आयुष्य किती क्षणभंगूर आहे ते जाणवते..! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/30/2008 - 12:22 नवीन

... आणि

... आणि आयुष्य किती क्षणभंगूर आहे ते जाणवते..! स्वतःच्याच घरात पहिलाच मृत्यू पाहिला आणि मलाही तेवढंच जाणवलं. लोकं माझ्यावरच्या "जबाबदारी"बद्दल बोलत होते, पण मला समजत होतं एवढंच की आत्ता अहे ते खरं! जेवढं जमेल तेवढं एन्जॉय करायचं. आपल्या दु:खी चेहेय्रानी इतर दु:खी होतात आणि आपल्या हसण्यानी आनंदी! एरीकनी मला पुन्हा त्याची आठवण करून दिली. म्हणून मिपाचा आनंद लुटा ... हसा आणि हसवा! :-) (आनंदी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
व
वेदश्री Tue, 07/29/2008 - 13:15 नवीन

मस्त

मस्त लिहिलं आहे, कांताकाका ! लहान रेघेशेजारी मोठी रेघ काढणार्‍या बिरबलाची आठवण आली. असे लिहित रहा. पुढील लेखनास शुभेच्छा. >मला वाटतं,मी माझे डोळे उघडे ठेवून सर्वांकडे पाहत असावं.आणि त्यांच्या बुध्दितून शिकावं. मलाही असेच वाटते. :)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 07/29/2008 - 22:22 नवीन

आभार

वेदश्री, तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार. "मला ही असेच वाटते" मालवणीत "माका ही असांच वाटतां" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री
च
चतुरंग गुरुवार, 07/31/2008 - 01:21 नवीन

अंतर्मुख करणारे अनुभव आणि प्रतिक्रिया!

चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/31/2008 - 08:41 नवीन

अंतर्मुख

अंतर्मुख करणारे अनुभव आणि प्रतिक्रिया! हेच म्हणतो..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/31/2008 - 09:02 नवीन

असेच

अंतर्मुख करणारे अनुभव आणि प्रतिक्रिया! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सतोष Sun, 01/11/2009 - 21:16 नवीन

पत्रकार होन्यसाट

मा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा