✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिठीत तुझ्या असताना...

ज — जेनी..., Mon, 05/05/2014 - 23:23
मिठीत तुझ्या असताना... ओठातल्या ओठात हसताना.. पापण्यांची होते फडफड श्वास श्वासांवर झेलताना... धुंद मी..बेधुंद तु असताना.. रती मी..मदन तु होताना... शहारतो श्वास माझा... ओठांशी ओठ बिलगताना... मोकळ्या केसातुन फिरताना... बटा गालावरच्या आवरताना... हळुच चोरली नजर मी चोळीची गाठ सुट्ताना.... ती नजर झेलताना.. तो श्वास पेलताना.. रोमांच उभे पाठीवर बोटांनी नाव कोरताना मज मी विसरुन जाते... क्षण भरभरुन जगते... सावली तुझी पांघरुन डोळ्यातली लाज लपवते... हा ऋतु रोज यावा.. हा स्पर्श रोज व्हावा.. सहवास मला तुझा असा रोज रोज घडावा... रोज रोज घडावा.....!!!

प्रतिक्रिया द्या
18447 वाचन

💬 प्रतिसाद (85)

मी पैला.

यसवायजी
Mon, 05/05/2014 - 23:41 नवीन
मी पैला. :))
  • Log in or register to post comments

विचारु? विचारु?

स्पंदना
Tue, 05/06/2014 - 07:47 नवीन
*stop* विचारु? विचारु? *diablo* काय केलं पयला येउन??? *ROFL* *dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ

यसवायजी
Tue, 05/06/2014 - 13:16 नवीन
गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ केली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

तरी नशीब, कोडाईकनाल, भूछत्र,

बॅटमॅन
Tue, 05/06/2014 - 14:18 नवीन
तरी नशीब, कोडाईकनाल, भूछत्र, इ. नव्हते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

काव्यरस : = गरम पाण्याचे

विजुभाऊ
Tue, 05/06/2014 - 01:26 नवीन
काव्यरस : = गरम पाण्याचे कुंड लेखनविषयः = धर्म. प्रतिक्रीया रस := ०<= ( ठार मेलेला)
  • Log in or register to post comments

काव्यरस : = गरम पाण्याचे कुंड

बाळ सप्रे
Wed, 05/07/2014 - 10:26 नवीन
काव्यरस : = गरम पाण्याचे कुंड याचा अर्थ स्थळ - hot water bath-tub असाही घेता येइल!! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मैने पुछा. क्या अनजान हो उन

विजुभाऊ
Tue, 05/06/2014 - 01:35 नवीन
मैने पुछा. क्या अनजान हो उन मुलाकातों से? जवाबमे सवाल आया कही से , ख्वाबो का भी कोई हिसाब होता है?
  • Log in or register to post comments

(No subject)

स्पंदना
Tue, 05/06/2014 - 07:48 नवीन
*give_rose*
  • Log in or register to post comments

उत्तेजक कविता.

प्रचेतस
Tue, 05/06/2014 - 08:39 नवीन
उत्तेजक कविता.
  • Log in or register to post comments

तसा विचार मी ही केला

स्पंदना
Tue, 05/06/2014 - 08:53 नवीन
तसा विचार मी ही केला पहिल्यांदा. पण मग तशी फार घसरली सुद्धा नाही आहे म्हणुन गप्प बसावं म्हंटल. तरीही जेनी तिन टिंबे यांना तुम्ही लिहीता छान, फक्त रोमान्स अन अश्लिल मधली धुसर रेषा लक्षात घ्या अशी विनंती. तश्या या जेनी ३टिंबे आजवर मिपाच्या इतिहासात बरच छान लिहुन गेल्या आहेत हे नम्रपणे नमुद नरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गुलाबी कविता

पैसा
Tue, 05/06/2014 - 09:22 नवीन
तांबड्या रंगाच्या छटा मिसळलेली गुलाबी कविता. वृत्त वापरायचं असेल तर "येक पे रैना! या गोड्डा बोलो या चतुर"
  • Log in or register to post comments

+१

सस्नेह
Tue, 05/06/2014 - 16:12 नवीन
अक्षरेसुद्धा गुलाबी झालीयेत लाजून !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लै भारी

जेम्स बॉन्ड ००७
Tue, 05/06/2014 - 09:50 नवीन
मोकळ्या केसातुन फिरताना... बटा गालावरच्या आवरताना... हळुच चोरली नजर मी चोळीची गाठ सुट्ताना.... खल्लास आपण.. आजपासुन आपण तुमचा पंखा जेनीबै.. (स्वगतः च्यायला, हि लग्नाळलेली मंडळी आमच्यासारख्या सिंगलांना जळवणं कधी थांबवणार आहेत काय माहीत?
  • Log in or register to post comments

ठ्ठो

बॅटमॅन
Tue, 05/06/2014 - 12:28 नवीन
ठ्ठो =)) जेनीबै अन जेम्सभौ दोघांचाही आपण फ्यान झालो पुनरेकवार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७

बाय द वे !

धर्मराजमुटके
गुरुवार, 05/08/2014 - 18:45 नवीन
बाय द वे ह्या गाठीवाल्या चोळ्या बाजारात अवेलेबल आहेत काय ? नाही फारच जुनी फ्याशन आहे म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७

जुन्या फ्याशनीच फिर फिरुन

प्यारे१
गुरुवार, 05/08/2014 - 18:58 नवीन
जुन्या फ्याशनीच फिर फिरुन बाजारात येतात. ८०-९० सेंमी मध्ये किती बदल होऊ शकतात असेही, नै का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

गरम पाण्याचे कुंड!!

कवितानागेश
Tue, 05/06/2014 - 13:15 नवीन
गरम पाण्याचे कुंड!! :)
  • Log in or register to post comments

बालिके-कुछ जम्या(च) नही (इस बार!)

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/06/2014 - 18:31 नवीन
वृत्त नाही..टेस्ट नाही रोम्यांटिझम मेला हो वेणी नव्हे..बॉब-कटाचा सैल होऊन सुटला 'बो!'
  • Log in or register to post comments

ग्रामीण भागातल्या एका

प्यारे१
Tue, 05/06/2014 - 18:53 नवीन
ग्रामीण भागातल्या एका प्रणयोत्सुक स्त्रीचे शहरी साहित्यिक मनोगत... जमलंय हो तीन टिंबं! (का कुणास ठाऊक अजंठा मधल्या काळंसावळं 'केलेल्या' सो कु(ज्यु) ची आठौण आली.)
  • Log in or register to post comments

मधुचंद्र पार्ट -२ इन पद्य का?

आनन्दिता
Wed, 05/07/2014 - 06:28 नवीन
मधुचंद्र पार्ट -२ इन पद्य का?? :)
  • Log in or register to post comments

पुढचेही भाग येउ द्या..

जेम्स बॉन्ड ००७
Wed, 05/07/2014 - 09:20 नवीन
*ROFL* असं असेल तर पुढचेही भाग लवकर येउ द्या ओ जेनीबै.. *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

मला आवडली कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/07/2014 - 10:42 नवीन
अजून येऊ दे...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 05/07/2014 - 17:54 नवीन
फारच..... असो.
  • Log in or register to post comments

ठार मेलो ही स्मायली कशी

विजुभाऊ
Wed, 05/07/2014 - 20:39 नवीन
ठार मेलो ही स्मायली कशी टाकायची कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

कपाळ आपटणारी चालेल का?

पैसा
Wed, 05/07/2014 - 22:45 नवीन
कपाळ आपटनारी चालेल का? *dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हा हा हा!!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 05/08/2014 - 03:30 नवीन
सासुबैंचं फुल्ल्टू शॉर्ट सर्किट!!!! *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पिढा काका सासुबैन्ना नै आवडली

जेनी...
गुरुवार, 05/08/2014 - 19:44 नवीन
पिढा काका सासुबैन्ना नै आवडली कविता :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

जावु दे

केदार-मिसळपाव
गुरुवार, 05/08/2014 - 20:44 नवीन
तु मनापासुन लिहिलीस ना मग झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

खरं तर...

पिवळा डांबिस
गुरुवार, 05/08/2014 - 03:40 नवीन
खरं तर स्मायली द्यायचीच झाली तर मी अश्या कवितेला अशी स्मायली देईन... *kiss3* [नीलकांताने पुरवलेली ही स्मायली नायतर आणखी कुठल्या धाग्यावर वापरणार? :) ]
  • Log in or register to post comments

रांगेत उभा असताना...

चिन्मय खंडागळे
गुरुवार, 05/08/2014 - 04:46 नवीन
रांगेत उभा असताना... पोटात प्रेशर असताना.. आतड्याची होते गुडगुड कंबर आवळून धरताना... बाहेर मी..आत तु असताना.. अवघडला मी..मोकळा तु होताना... गुदमरतो श्वास माझा... वाट तुझी बघताना... बंद दार उघडताच... चपळाईने घुसताना... हळुच चोरली नजर मी लाईन 'कट' करताना... त्या नजरा झेलताना.. त्या शिव्या पेलताना.. गुद्दे पडले पाठीवर घाईत दार लोटताना मज मी विसरुन जातो... क्षण भरभरुन जगतो... कडी दरवाजाची लावून पब्लिकच्या शिव्या खातो... हा मोका रोज यावा.. हा मुहूर्त रोज मिळावा.. नंबर माझा टायमात असा रोज रोज लागावा... रोज रोज लागावा.....!!!
  • Log in or register to post comments

हान तेच्या मारी!!

स्पंदना
गुरुवार, 05/08/2014 - 06:13 नवीन
हान तेच्या मारी!! *clapping* चिन्मय ही कविता वेगळी टाकुया का? स्वयंभू विडंबन आहे हे. म्हणजे मी ते चोरताना कस विडंबनात बसेल असा विचार करत होते बघा तोवर तुम्ही बरोबर नजर चोरलीत. खरच सांगा नविन धाग्यात टाकु या का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

(No subject)

यसवायजी
गुरुवार, 05/08/2014 - 08:00 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

(No subject)

जेनी...
गुरुवार, 05/08/2014 - 08:10 नवीन
*biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

@रांगेत उभा असताना...

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/08/2014 - 09:41 नवीन
@रांगेत उभा असताना... पोटात प्रेशर असताना.. आतड्याची होते गुडगुड कंबर आवळून धरताना...>>> Image removed. @बाहेर मी..आत तु असताना.. अवघडला मी..मोकळा तु होताना>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

हाहाहा!

पैसा
गुरुवार, 05/08/2014 - 12:21 नवीन
वृत्तातल्या गडबडगुंड्यासकट, टिंबांसहित घायकुतीला आलेले विडंबन! बुवांनी हल्ली काही टोळभैरवांना घाबरून मिपावर अशा करूण कविता लिहिणे बंद केले आहे. पण हा एकलव्य शिष्य बघून बुवा खूश होतील नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

कोण हो ते टोळभैरव?

प्रचेतस
गुरुवार, 05/08/2014 - 12:32 नवीन
कोण हो ते टोळभैरव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काय की ब्वॉ

पैसा
गुरुवार, 05/08/2014 - 12:36 नवीन
बुवाच यावर जास्त प्रकाश पाडतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

*biggrin*

प्रचेतस
गुरुवार, 05/08/2014 - 13:22 नवीन
*biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

@जास्त प्रकाश पाडतील! >>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/08/2014 - 19:20 नवीन
@जास्त प्रकाश पाडतील! >>> :-/ दु...दु...दु... :-/ Image removed. पै तै .. @हत्ती Image removed.अगोबा! :-/

थांबा....

मी आता परत दुकान चालू करतो! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ही ह्हा ह्हा हाहा!!!

बॅटमॅन
गुरुवार, 05/08/2014 - 22:36 नवीन
ही ह्हा ह्हा हाहा!!! ही ह्ही ही ह्ही ही ह्ही, हि & हि =)) स्मायली का लपविता =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

"फॉक्कन" आलेल्या या

बॅटमॅन
गुरुवार, 05/08/2014 - 12:22 नवीन
"फॉक्कन" आलेल्या या विडंबनामुळे मनःशांती, इ.इ.इ. सगळेच मिळाले. -बॅटू आगरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

काय सांगू! ओरिजिनल कविता

चिन्मय खंडागळे
गुरुवार, 05/08/2014 - 18:03 नवीन
काय सांगू! ओरिजिनल कविता वाचली तेव्हापासूनच हात शिवशिवत होते. पण विडंबन 'होतच' नव्हतं. शेवटी प्रतिभा काय आणि प्रेशर काय, यायची तेव्हाच येते. तोवर येरझार्‍या घालत राहण्याशिवाय पर्याय नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी अगदी बघा.

बॅटमॅन
गुरुवार, 05/08/2014 - 18:11 नवीन
अगदी अगदी बघा. अन हे खास तुमच्यासाठी. http://www.misalpav.com/node/8554
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

ब्रिटिश भाऊ दा जवाब नही!

चिन्मय खंडागळे
गुरुवार, 05/08/2014 - 18:42 नवीन
ब्रिटिश भाऊ दा जवाब नही! कुठे गेले हे सगळे थोर लोक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मुळ कवितेपेक्षा विडंबन उत्तम

शिद
गुरुवार, 05/08/2014 - 13:58 नवीन
मुळ कवितेपेक्षा विडंबन उत्तम जमले आहे... *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

अत्यंत गरम कविता !!!

खटपट्या
गुरुवार, 05/08/2014 - 08:58 नवीन
अत्यंत गरम कविता !!!
  • Log in or register to post comments

...

आत्मशून्य
गुरुवार, 05/08/2014 - 10:07 नवीन
मिठीत तुझ्या असताना... धिकताना तिकताना धिकताना... है धिकताना तिकताना तिकताना ...!
  • Log in or register to post comments

(No subject)

स्मिता चौगुले
गुरुवार, 05/08/2014 - 10:29 नवीन
*dash1*
  • Log in or register to post comments

जेनी आणि तीन टिंबे

दिपक.कुवेत
गुरुवार, 05/08/2014 - 10:54 नवीन
कविता आणि काव्यरस वाचुनच गरम पडलो (गार पडलोच्या धर्तिवर)......नावाला साजेशी कविता.
  • Log in or register to post comments

आणि हो प्रत्येकानी

दिपक.कुवेत
गुरुवार, 05/08/2014 - 10:56 नवीन
बेडरुम मधे (आपापल्याच) प्रिंट करुन लावावी अशी कविता. जेनी आज्जी अजुन येउदैत टिंबे...आय मीन आपल्या कविता
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा