डिस्क्लेमर-
मूळ धाग्याच्या लेखिका शुचिताई यांचे बद्दल पूर्ण आदर असून त्या धाग्याची थट्टा / विडंबन करण्याचा अजिबात हेतु नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करतो .
तर माझ्या बायको-पोलर डिसॉर्डर ची कथा एकुणात अशी आहे -
वयाच्या २० व्या वर्षी आम्ही सर्वप्रथम प्रेमात पडलो. इतरांप्रमाणेच आम्हालाही ती इन्द्राची परी वगैरे वाटू लागली. मग तिच्या भावाकडून "प्रसाद" खाल्ला तरीही काही ती मनातून जाईना !मग आम्हाला मनोवैद्यकाकडे धाडण्यात आले. त्याची औषधे घेवुन जरा सुस्थितीत आलो तर पुन्हा एका चंचलेशी नेत्रपल्लवी सुरू झाली! असे करता करता ३-४ नवयौवनाना विचारुन झाले तरी डाळ शिजेना ,म्हणून मग कन्टाळून हिमालयाचा रस्ता धरला!
तेथे हिमालयात बाबा योगीनाथ यांच्या दर्शनाचा योग आला, मग त्यानी ४/६ महिने तिथेच आश्रमात ठेवून घेतले. त्यावेळी त्यानी जो उपदेश केला तो अजून स्पष्ट लक्षात आहे...
बालका... मनुष्यजातीत दोन भेद आहेत . स्त्री व पुरुष. आपल्या पूर्वजानी २१व्या शतकाचे भविष्य आधीच लिहून ठेवले आहे ... जेव्हा चित्रे बोलू लागतील , पुरुष स्त्रियाप्रमाणे व स्त्रिया पुरुषाप्रमाणे केस वाढवतील व कपडे घालतील , आणि भ्रष्टाचार्/अनाचार्/अनैतिकता वाढेल तेव्हा समजावे की हा धर्म-ग्लानीचा काळ आहे. पुरुष स्त्रीचा गुलाम होइल आणि आपली बुद्धी ,स्वातन्त्र्य आणि शूर-वीरता गमावून बसेल . यास्तव सावधान वत्सा, हा काळ खरेच कठीण आहे!
आता या घटनेला वीसेक वर्षे उलटली . पण अजुनही माझ्या मनात विचार येतो, खरेच स्त्रियाण्चे सौन्दर्य आणि मोह अशा तत्सम गोष्टीपायी पुरुष जमात आपले भव्यदिव्य बुद्धिवैभव विसरून गेली आहे का? अन्य शब्दात , पूर्वीच्या लोकांपेक्षा हल्लीचे लोक स्त्रीच्या अधिक आहारी जात आहेत का ? मनुष्याची बुद्धी ही जर तो एकटा किंवा स्वतन्त्र राहिला ,तर अधिक तल्लखपणे काम करते का?की प्रेम /लग्न /संसार यातील तडजोडी यामुळे त्याची एकूण कार्यक्षमता किंवा बुद्धीक्षमता यामध्ये कुठेतरी तडजोड होते आहे का? पुरुष स्त्रीचा गुलाम झाला आहे का?
समस्त पाशवी शक्तींची या धाग्यावर कडक नजर असणार हे ग्रुहीत धरलेच आहे , पण यात कुठेही स्त्रियांचा अपमान करण्याचा उद्देश नसून एका निराळ्या अँगलने आयुष्याकडे बघण्याचा प्रयत्न आहे, एवढेच !
वाचने
18673
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मूळ धाग्याच्या लेखिका शुचिताई
अहो काय नो प्रॉब्लम ?
In reply to मूळ धाग्याच्या लेखिका शुचिताई by शुचि
आधी वाटलं माझ्या बायकोची
In reply to अहो काय नो प्रॉब्लम ? by आत्मशून्य
आधी वाटलं माझ्या बायकोची डिसोर्डर नामक हां आपल्या यज्मानांनी टाकला म्हणून घाइन्ने उघडलाअगदी हाच ईच्चार करुन येथी आल्तो... पण कसल काय.... बेचव जिल्लब्बी... :(जम्या नही.
बात कुछ हज़म नही हुयी !!
आज सूडशी सहमत...
In reply to बात कुछ हज़म नही हुयी !! by सूड
निराळा विचार आहे !सविस्तर
पुरुष स्त्रीचा गुलाम झाला आहे
+१
In reply to पुरुष स्त्रीचा गुलाम झाला आहे by राजेश घासकडवी
अतिशय सहमत
In reply to +१ by बॅटमॅन
नॉञ...!
उर्मि आल्याशिवाय लिहु नका
हाहाहा
In reply to उर्मि आल्याशिवाय लिहु नका by कंजूस
शुचि
In reply to हाहाहा by शुचि
अजून र्हायलं... पिठात..पाणी
In reply to उर्मि आल्याशिवाय लिहु नका by कंजूस
(No subject)
In reply to अजून र्हायलं... पिठात..पाणी by अत्रुप्त आत्मा
आता घ्या भोगा !
"पगला गजोधर" ड्वैडी??
In reply to आता घ्या भोगा ! by पगला गजोधर
नाही जमले. आणि कितीही
जिलबी कच्ची आणि कडू पडली आहे.
छ्या, मला वाटलं खरंच वहिनींना
काहितरी लोचा ट्विस्ट असेल या
काय हे? आधीच्या धाग्याची
अरेच्चा!
साफ गंडलाय धागा.