विखुरल्या वेदना येथे सुगंधासारख्या राणी

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
15 Apr 2014 - 11:49 am

तुझ्या न्यायालयी आता पुन्हा मी हारलो दावा
पुरेसा धूर्त मी नाही, कुठे जमला मला कावा

राज्ये ,तुझी सत्ता, तुझे हे कायदे सारे
अता माझ्याविरोधी तू हवा तो फैसला द्यावा

तुझ्या नावात रे दडला किती संहार हा देवा
अता सारे मवाली हे तुझा बघ बोलती धावा !

जणू की उंट हे सगळे पटावर खेळती युद्धे
कुणी येथे सरळ नाही, कुणी उजवा कुणी डावा !

विखुरल्या वेदना येथे सुगंधासारख्या राणी..
फुलांचा जन्म हा अवघा अता तू वेचुनी न्यावा

प्रतीक्षेतुन या सार्या युगे आली युगे गेली
तुझी वचने, तुझ्या शपथा : भरवसा काय सांगावा

डॉ.सुनील अहिरराव

गझल

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

16 Apr 2014 - 6:39 am | स्पंदना

र्‍या साठी शिफ्ट आर आणि मग य लावुन पाहा.
मला तुमच्या कविता अतिशय आवडतात.

शुचि's picture

16 Apr 2014 - 6:46 am | शुचि

विखुरल्या वेदना येथे सुगंधासारख्या राणी..
फुलांचा जन्म हा अवघा अता तू वेचुनी न्यावा

क्या बात है !!! हेच आर्जव देवाकडे करावसं वाटतं.

drsunilahirrao's picture

16 Apr 2014 - 10:07 pm | drsunilahirrao

अपर्णा अक्षय
खूप खूप आभारी आहे आपला. मी सध्या मोबाईलवरुनच पोस्ट करत असतो. त्यामुळे अजूनतरी 'र्या' हा असाच येतो.

drsunilahirrao's picture

16 Apr 2014 - 10:15 pm | drsunilahirrao

शुचि धन्यवाद.
अगदी हाच विचार शेर लिहतेवेळी मनात होता.
आर्जव: हेच की हा मनुष्यजन्माचा पसारा त्याने आता आवरुन घ्यावा.