चित्रे आहेत. शार्दुलच्या सेल्फपोर्ट्रेट मध्ये डोळे कसले जिवंत आलेत. खरोखर अप्रतिम चित्रे!!
रामदास्,तुम्हाला कशाकशात गती आहे हो? तुमच्या प्रत्येक कथेचा विषय वेगळा असतो. प्रत्येक विषयावर ज्ञानही तेवढ्चं सखोल.बरं,कोणताही विषय हाताळताना तुम्हि कुठेही कमीही पडत नाही.कमाल आहे बा तुमची!!
खरचं, तुम्ही नक्कि कोणत्या फिल्ड मध्ये काम करता?
हा चित्रकलेतला 'शार्दूल' आहे अगदी नावाप्रमाणेच!
भन्नाट आहेत चित्रे! पोर्ट्रेट्स रंगवायला ज्याला जमतात त्याच्यासमोर मी नतमस्तक होतो तसा झालो.
आणि आपला लेख व चित्रांवरची टिप्पणी काय वर्णावी, ती ही तोडीस तोड, एक सुंदर मैफल अनुभवली!
अजून चित्रे येऊदेत.
चतुरंग
करत होतो की शार्दूलचं सेल्फ पोर्ट्रेट जसं आहे जवळजवळ तसंच एक चित्र मागे एकदा माझ्या पहाण्यात आलेलं आहे आणि थोडी शोधाशोध केल्यावर सापडलं बघा. किती साम्य आहे ह्या दोन चित्रात -
हे चित्र महान चित्रकार व्हिन्सेंट वॅन गॉ याचे सेल्फ पोर्ट्रेट आहे!
चतुरंग
दुव्याबद्दल धन्यवाद सुनीत!
सेल्फ पोर्ट्रेटप्रकारामधे साधारण सारखेपणा असला (कारण आरशात बघून काढल्यामुळे चित्राचे अवकाश आणि व्यक्तीचे प्रोफाईल ठराविक येते) तरीही ह्या दोन चित्रात मला त्याही पलीकडे जास्त साम्य जाणवले एकंदर चेहरेपट्टी, लाईट्-शेड, चेहेर्यावरचे भाव.
चतुरंग
हे पाहा पिकासोचे सेल्फ पोर्टेट
पिकासोचे हे सेल्फ पोर्ट्रेट पाहून मला तरी असे वाटले:
पिकासो महाशयांना कसल्या तरी अंमली पदार्थाचा (कोकेन, हेरॉइन वगैरे) ओव्हरडोस झाला असावा, आणि त्या अवस्थेत त्यांच्या मनात त्यांचे स्वतःचे जे चित्र उभे राहिले ते त्यांनी कागदावर चितारले असावे.
रामदासकाका. ..
लेख आवडला ... चित्रकला कधीच जमली नाही पण त्यावरचं वाचायला आवडलं.
तुम्ही लेखात 'योद्धा' ह्या चित्राबद्दल लिहिले आहे तो फोटो आहे का?
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
वा!!!!
रामदास, इतक्या सुंदर चित्रांचा आस्वाद सांगताना लेख (शब्दसंख्येमुळे) कमीच पडणार - ती काही त्रुटी नव्हे.
मला खास दिसले या चित्रांतील कंपोझिशन (घटकांची चित्रातली मांडणी).
वाट बघणार्या मुलीसाठी साधलेला चौकटीचा सफाईदार कर्ण! उजवीकडील निगेटिव्ह स्पेसच्या त्रिकोणाला छेदून आकार देणारे तिचे वाकलेले डोके, आणि माळेशी चाळे करणारा हात...
असेच काहीकाही बाकी चित्रांबद्दलही.
(पण गौरीगणपतीच्या भित्तिचित्रात छोट्या ताईच्या चेहर्यावरील भाव तितके आवडले नाहीत. भित्तिचित्रे मात्र थोडी बटबटीत असतातच, माध्यमच तसे, त्यामुळे फार तक्रार नाही.)
फारच सुंदर आहेत चित्रं.. प्रत्येक माध्यमामधले शार्दूलचे प्राविण्य दिसत आहे. मला ती वाट पाहणारी मुलगी.. आणि पारव्यांचं चित्र खूपच आवडलं!! असे फटकारे मारून पारवे दाखवणं अवघड आहे!
श्या असं काही पाहीलं की फार काहीतरी चित्रं-बित्रं काढावीत, काहीतरी क्रिएटीव्ह करावं असं वाटतं.. पण देवाने तितकी प्रतिभा नाही दिली! :(
एनिवे, अजुन असतील तर चित्रं आणि लेख येऊद्या.. तुम्ही दिलेल्या कविता देखील चित्राला साजेश्या आहेत!
सेल्फपोर्ट्रेट काय अप्रतिम आहे, व्वा! रामदास, या कलाकाराला मिपावर आणल्याबद्दल धन्यवाद. आणि 'अनार्कि' आधि नाहि ठेवलत ते बरं झालं. नाहितर कोणीतरी एम् एफ् हुसेन सारखा अगम्य चित्रकार वाटला असता!
चित्रे, त्यांचे रसग्रहण आणि सोबत दिलेल्या कविता/गाणी सारेच अप्रतिम. या चित्रकाराची ओळख करून दिल्याबद्दल, त्याला मिपावर येण्यास प्रवृत्त केल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
असेच म्हणतो ...
चित्र, त्यांचे काव्ययुक्त रसग्रहण ह्यावर अजुन काय प्रतिक्रीया लिहणार ?
केवळ अप्रतिम !
रामदाससाहेबांनी हा योग आणल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
या चित्रांची ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. आता शार्दूल कदम आणि ज्योत्स्ना कदम मिपासाठी लिहिणारही आहेत, ही अजून आनंदाची बातमी. त्याबद्दल आभार मानावेत तितके कमीच आहेत.
सुंदर. सर्वच चित्रे आवडली - विशेषतः मुलीचे चित्र.
शार्दुल आणि ज्योत्स्ना कदम लेखन कधी करतील त्याची वाट पाहते आहे. आणि ओळखही छान करून दिली आहे. कविता चपखल.
शार्दूलची पेंटिंग्ज अतिशय आवडली.....
विशेषतः पारवे आणि सेल्फ पोर्ट्रेट!!!!
मला एक सांगा रामदासजी, तुम्ही शार्दुलला प्रत्यक्ष पाहिलंय.....
हा सेल्फ पोर्ट्रेटमधला थोडासा तिरळेपणा! तो प्रत्यक्षात आहे काय?.....
असेल तर शार्दूल हा एक महान कलाकार आहे हे निश्चित!!!!!
कारण, त्याने ते लपवायचा प्रयत्न केलेला नाहीये........
अनार्की पेन्टिग आणि त्याखालची कविता ...दोन्ही उत्तम...
:).. ते योद्धा पेंटिंग सुद्धा पहायचं आहे...
..
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
अगदी खरं!
पहिल्या गणपतीच्या चित्रातील मागे टांगलेली चिमणावळ खूप मस्त आलीये. शार्दुलच्या सेल्फ-पोट्रेट मधले डोळे भन्नाट आलेत.
शार्दुलनी सदस्यत्व घेतलंच आहे.या लेखानंतरच लिखाण तोच करणार आहे.खास मिपासाठी.
सहीच. त्याच्याकडून चित्रकलेबद्दलची तांत्रिक माहिती आणि त्याने काढलेली चित्रे बघायला खूप आवडेल.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
हा एकच शब्द आहे माझ्याकडे या चित्रांचं वर्णन करायला... आणि चित्रांचं रसग्रहण तितकंच छान...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
भन्नाट आहेत पेंटींग्ज.
जबरदस्त आवडली. खास करुन, वाट पाहणारी तरुणी आणि सेल्फपोर्ट्रेट जास्तच.
टेक्निकल गोष्टी काही कळत नाहीत म्हणा, पण एकुणातच असलेलं चित्र आणि त्याचा इफेक्ट प्रचंड भावला.
हां, ते अनार्की इतकंसं नाही कळलं,उकल करुन सांगितल्यामुळं समजलं.
त्याविषयीची माहिती न वाचता आधीच चित्र पाहिल्यावर मला सगळ्यात प्रथम ते तरस दिसलं आणि मग दृष्टीहीन चेहरे.
ह्यामध्येही काही सायकॉलॉजिकल थिअरीज आहेत काय?
बाकी, गौरीगणपतीच्या चित्रातले बारकावे नेहमीप्रमाणेच छान.
शार्दुलनी सदस्यत्व घेतलंच आहे.या लेखानंतरच लिखाण तोच करणार आहे.खास मिपासाठी.
ही तर फारच उत्तम बातमी!
चित्र आणि चित्रकाराची ओळख आवडली. सगळीच चित्रे झकास आहेत,त्यात आणि सेल्फ पोर्टेट फारच छान!
स्वाती
रामदासजी,
उत्तम लेख....शार्दूलरावांची चित्रं तर फारच भारी...पण ते योद्धा नावाचं चित्र कुठे आहे? तुम्ही एवढं वर्णन केलय, उत्सुकता लागलीये ते चित्र पहायची!
(अवांतरः हे तुमचं नाव लिवताना आम्हाला अभिषेकीबुवांच्या दरबारी कानड्यातल्या अंतर्याची सम आठवते, हेच शब्द....रा म दा स जी, जी वर सम....अफलातून)
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
वा! वा! शार्दुलची चित्रे आणि रामदासांचे रसग्रहण - दोन्ही लाजवाब.
मला रेनी ईव्हनिंगमधला सूर आवडला.
पिजन्सही कमाल आहे. (पिजन्सला उभ्या घड्या पडल्या आहेत काय? असे चुकचुकत वाटले.)
पुढच्या लेखांकांच्या प्रतिक्षेत आणि शार्दुलचेही मिपावर स्वागत...
शार्दुल कदम हातात ब्रश घेऊन जन्मलेला जिनियस चित्रकार दिसतो. त्यात जे.जे. च्या मास्टर्सची भर!
आमाला यातल काही कळत नाही. जी चित्रे फोटोच्या जवळ पोहोचतात त्याला आम्ही भारी म्हणतो. आमच्या एका मित्राचा मुलगा ( कुलभुषण खिलारे) हे असले उद्योग करतो. खरं तर त्याला पेंटिंग्ज ची कुठली ही कौटुंबिक पार्श्वभुमी नाही. वडिल एआरडिई मध्ये सायंटिस्ट व आई शिक्षिका ;पण हा फाईन आर्टस का काय ते करतो आहे. आम्हाला त्यान पेंटिग्ज दाखवल्यावर आम्ही याची मानच उंच का? हे रंगाचे फरकाटे असे का? हिच्या पाठीवर काय चमकतेय? इथ रंग ओघळला कि काय? असे प्रश्न विचारुन आमचे अज्ञान प्रकट करीत असतो.
त्याच्या चित्राला प्रदर्शनात पुण्यात म्हणे २५ हजार रु मिळाले. आम्च्या दृष्टिने अरे बापरे? येवढी किंमत भेटतीय?
प्रकाश घाटपांडे
हेच शार्दुलच्या सर्व चित्रांचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे असे मला वाटतेय.
१)गणपती पूजनाच्या चित्रात तर कमालीची रंगसंगती जमलेय. चित्रातले तपशीलही मस्तच आहेत. मात्र स्त्रियांचे चेहरे जवळपास सारखेच वाटताहेत. गौरी आणि मुलगी ह्यांच्या चेहर्यात कमालीचे साम्य दिसतेय. इथे त्याला प्रगतीला अजून वाव आहे.
२)मानसी आणि टेबलाच्या आधाराने उभी असलेली मुलगी ह्यामध्ये रंगांच्या छटांमधून उत्तम व्यक्तिरेखा उभ्या राहिलेत.
३) स्वत:चे व्यक्तिचित्र उत्तमच आलंय. इथेही त्याने रंगांचा वापर अतिशय खुबीने करून प्रकाश आणि अंधाराचा खेळ उत्तमपैकी उभा केलाय. त्यातूनच चेहर्यावरचे भाव अप्रतिमपणे व्यक्त होतांना दिसताहेत.
४) ह्या चित्रात तर नुसत्या कुंचल्याच्या फटकार्यातून एक अफलातून कलाकृती जन्माला घातलेय. मला हेच चित्र सर्वात आवडले. बसलेली,उडणारी कबुतरं,दूरवर दिसणारे पांढरे शुभ्र मिनार आणि मधलं पाणी....आणि आसमंत..सगळंच लाजवाब आहे.
५) पावसाळी संध्याकाळही उत्तम!
६) अराजकाचं चित्र मात्र मला नाही आवडलं.
७) योद्धा देखिल नाही आवडला.
एकूण काय तर...शार्दुलच्या हातात जी जादू आहे त्यात प्रामुख्याने तो योजतो ती परिपूर्ण अशी रंगसंगती. ह्यातूनच तो अतिशय सुरेख वातावरण निर्मिती करतो. मात्र त्याला व्यक्तिचित्रणात बरीच मेहनत घ्यावी लागेल असे वाटतेय.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
प्रतिक्रिया
नेहेमीप्रमाणे
फारचं सुंदर!!
सुंदर..!
हेच म्हणतो
क्या बात है !!!!!!
मानसी
धन्य झालो रामदास!
आपला लेख व
हेच म्हणतो..
मगाचपासून विचार
सेल्फ पोर्ट्रॅट्स्
विकीच्या
हे पाहा
मला वाटतं
योद्धा ...?
सुंदर कंपोझिशन
फारच सुंदर
फार सुंदर चित्र आहेत
मस्त चित्रे!
सु-रेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
धन्यवाद
+१
फारच
व्वा!
अनार्की
धन्यवाद रामदास काका!
अप्रतीम...
स्पेलबाऊंड.....
चित्र छान आहे
व्वा!
सर्वच
रामदासजी, उ
जिनियस
पेंटिंग्ज
योद्ध्याचे चित्रं.
कमालीची जिवंत रंगसंगती!
सुंदर