आप की बदमाशियोंके....
In reply to केजरीवाल, जेल मधुन राज्यशकट हाकू शकतील का? by मुक्त विहारि
In reply to केजरीवाल by चंद्रसूर्यकुमार
In reply to असहमत by सर टोबी
मद्य धोरणात शिथिलता आणल्यामुळे नेमकं सरकारचे कसे काय नुकसान झाले आहे आणि अजूनही सक्त वसुली संचालनायला आरोपपत्र दाखल का करता येत नाही यात काही कोडं असण्यापेक्षा सूड भावनाच आहे याबद्दल काहीही शंका नाही.माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही गुन्हेगारी स्वरूपाच्या केसमध्ये तपास पूर्ण झाल्यावर आरोपपत्र दाखल करतात. त्यापूर्वी नाही. तपास चालू असताना आरोपीविरूध्द वरकरणी (म्हणजे मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात टिकेल इतपत) पुरावा असेल आणि गुन्ह्याच्या तपासासंबंधी अधिक माहिती गोळा करायची (धागेदोरे वगैरे) असेल तर आरोपीला अटक केली जाते. तपास चालू असताना गरज पडेल तितका काळ आरोपीला तुरूंगात ठेवले जाते आणि त्यासाठी पुढच्या तारखेपर्यंत आरोपीला तुरूंगात ठेवणे गरजेचे आहे हे कोर्टाला पटवून द्यायची जबाबदारी तपासयंत्रणांची असते. जर आरोपीकडून नवी कोणतीही माहिती मिळायची शक्यता नाही असे तपासयंत्रणांना वाटत असेल तर मग त्या आरोपीच्या जामिनाला विरोधही केला जात नाही. मात्र आरोपी बाहेर राहून साक्षीदारांवर दबाव आणणे/ पुराव्यांबरोबर छेडछाड करणे वगैरे प्रकार करायची शक्यता असेल तर मात्र त्याला जामिन द्यायला तपासयंत्रणा विरोध करतात आणि त्याला जामिन देऊ नये असे कोर्टाला पटवून द्यायचा प्रयत्न करतात. मग आरोपपत्र दाखल झाल्यावर एकेक आरोपाबद्दल पुरावे कोर्टात सादर करून, साक्षीदार आणून, त्यांना प्रश्न विचारून तपासयंत्रणा आरोपीविरोधातील आरोपपत्रातील मुद्दे कोर्टाला पटवून द्यायचा प्रयत्न करतात. तेव्हा आरोपीचे वकिल साक्षीदारांची उलट तपासणी घेऊन आरोपपत्रातील आरोप कसे चुकीचे आहेत हे दाखवून द्यायचा प्रयत्न करतात. त्यानंतर आरोपपत्रातील सगळ्या मुद्द्यांवर ही प्रक्रिया पूर्ण पडली की मग कोर्ट आपला निकाल देते. माझ्या माहितीप्रमाणे गुन्हेगारी स्वरूपाच्या केसमध्ये अशी प्रक्रीया असते. यात काही चूक/त्रुटी असेल तर जरूर दाखवून द्यावे. दारू घोटाळ्यामध्ये आता के.चंद्रशेखर राव यांची कन्या कवितांपासून अनेक लोक सहभागी आहेत असा आरोप आहे. कविता माफीच्या साक्षीदार बनायची शक्यता आहे असेही बातम्यांमध्ये येत आहे. खखोदेजा. तसे झाल्यास सगळा तपास अधिक वेगाने पुढे सरकू शकेल. आणि मग आरोपपत्र लवकर दाखल करता येऊ शकेल. केजरीवालांना आरोपपत्र दाखल करायला उशीर का होत आहे असे कोर्टाने तपासयंत्रणांना विचारल्याचे मी तरी कधी वाचले नाही. तेव्हा आरोपपत्र दाखल करायला उशीर होत आहे असे कोर्टालाही अजून तरी वाटले आहे असे दिसत नाही. केजरीवालांना अटक करून १५-२० दिवसच होत आहेत. तेव्हा आरोपपत्र दाखल करायला उशीर का हा प्रश्न बराच लवकर विचारत आहात असे वाटत नाही का? दुसरे म्हणजे तथाकथित दारू घोटाळा झाला आहे अशी पहिली तक्रार कोणा भाजप नेत्याने नाही तर दिल्लीतील काँग्रेस नेते चौधरी अनिल कुमार यांनी केली होती. त्यानंतर तपास सुरू झाल्यावर पैशाचा ट्रेल आम आदमी पक्षापर्यंत जातो हे वरकरणी तरी तपासयंत्रणा कोर्टात मांडू शकल्या. आता पक्ष ही कोणी व्यक्ती नाही. त्यामुळे शिक्षा करायची तर ती पक्षाला करता येणे शक्य नाही तर ती पक्ष चालविणार्यांना करावी लागेल. त्यामुळे मग पक्ष चालविणार्यांना आरोपी का करत नाही हे कोर्टाने विचारले त्यातून पुढे सिसोदिया आणि केजरीवालांपर्यंत तपासाचे धागेदोरे गेले. हे सगळे बातम्यांमध्ये आले आहे. तिसरे म्हणजे जर दिल्ली सरकारचे धोरण पूर्ण निर्दोष होते तर मग ते मागे का घेतले गेले? की ते प्रकरण आपल्यावर शेकणार हे लक्षात आल्यावर मागे घेतले गेले? चौथे म्हणजे आपण काहीही चुकीचे केलेले नाही आणि आपल्याकडे लपविण्यासारखे काही नाही अशी केजरीवालांची खात्री होती तर मग इतकी समन्स त्यांनी का धुडकावली? गुजरात दंगल प्रकरणी मोदींनाही असे तपासयंत्रणांकडून समन्स आले होते. आपण पूर्ण निर्दोष आहोत आणि आपण काहीही चुकीचे केले नाही अशी त्यांची खात्री होती त्यामुळे कसलेही आढेवेढे न घेता मोदी त्या समन्सप्रमाणे तिथे हजर झाले होते. तिथून बाहेर आल्यावर 'मी तपासयंत्रणांशी पूर्ण सहकार्य करणार आहे' असे ते म्हणाल्याचा व्हिडिओही उपलब्ध आहे. ज्या मोदीनामाचा केजरीवाल सतत जप करत असतात त्या मोदींकडून इतकेही ते शिकले नाहीत? तुम्हाला या सगळ्यात सूडबुध्दीची कारवाई दिसते त्याप्रमाणेच केजरीवालांनी इतक्यावेळा समन्स धुडकावल्यामुळे त्यांच्याकडे काहीतरी लपविण्यासारखे आहे असे मला वाटते.
दिल्ली सरकारची आहे त्याच कर रचनेमध्ये राहून आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि शिक्षण, आरोग्य, आणि मोफत वीज अशा योजना सरकार राबवू शकतेदिल्लीची आर्थिक स्थिती चांगली वाईट कशीही असली तरी राज्यकर्त्यांना त्यामुळे भ्रष्टाचार करायचे लायसेन्स मिळते का? दिल्लीची आर्थिक स्थिती कशी आहे हा पूर्ण वेगळा आणि पूर्णपणे असंबंधित मुद्दा झाला. प्रश्न हा की दारूधोरण प्रकरणात दिल्ली सरकारच्या खजिन्याचे नुकसान करून तो पैसा पक्षासाठी वापरला गेला आहे का- म्हणजे या प्रकरणी भ्रष्टाचार झाला आहे की नाही.
मला नाही वाटत कि भ्रष्टाचार विरोधी चळवळीचे नुकसान केजरीवालांमुळे झाले आहे. ते झाले आहे अण्णा हजारे यांचं सूचक मौन, पीएम केअर आणि निवडणूक रोखे यांच्या बाबतीतली सरकार धार्जिणी गोपनीयता यांच्यामुळे.अण्णा हजारे इतके पॉवरफुल आहेत? युपीए सरकार असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे असे लोकांना वाटत होते म्हणून लोक तेवढ्यापुरते अण्णांच्या मागे उभे राहिले. आजही तसा भ्रष्टाचार होत असेल तर--- १. अण्णांच्या ऐवजी कोणीतरी दुसरा नाना उभा राहिल आणि अण्णा भ्रष्टाचाराला मूक समर्थन देत आहेत असे लोकांना वाटत असेल तर अण्णाही बाजूला पडतील. अर्थात ते तसेही कुठे पुढे आहेत हा पण प्रश्नच आहे म्हणा. २. जर सध्या तसा भ्रष्टाचार होत आहे असे लोकांना वाटत असेल तर कोणी मौन पाळू दे किंवा काही करू दे भ्रष्टाचारविरोधी चळवळीला लोकांचे पाठबळ मिळेल नाही का? आता तुम्हीच मान्य करत आहात की सध्या भ्रष्टाचारविरोधी चळवळ मागे पडली आहे. म्हणजे पुढीलपैकी एक अनुमान काढता येईल--- २अ. सध्याच्या सरकारमध्ये तसा भ्रष्टाचार होत आहे असे लोकांना वाटत नाही. प्रत्यक्ष भ्रष्टाचार होत आहे की नाही यापेक्षा अशा आंदोलनांच्या यशासाठी लोकांना तसे वाटते की नाही हा प्रश्न महत्वाचा. २ब. समजा तसा भ्रष्टाचार होत असला आणि लोकांनाही तसे वाटत आहे असे गृहित धरले तरी केजरीवाल स्वतःला भ्रष्टाचारविरोधी चळवळीचा नेता/ मसीहा किंवा जो कोणी असेल तो अशाप्रकारे प्रोजेक्ट करत आले आहेत (कट्टर इमानदार). तरीही त्यांना अटक झाल्यावर लोक रस्त्यावर आलेले नाहीत. दिल्ली राजधानी असल्याने तिथले वातावरण बर्यापैकी राजकीय असते. लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला तर तिथले लोक रस्त्यावर उतरतात हे आपण निर्भया प्रकरणात बघितले आहे. तेव्हा रस्त्यावर जितके लोक उतरले होते त्याच्या काही टक्काही लोक आता दिल्लीत रस्त्यावर आलेले नाहीत. संतापाचे कारण काहीही असले तरी लोकांच्या संतापाची तीव्रता आता अजिबात नाहीये. तसे असेल तर मग भ्रष्टाचारविरोधी चळवळीचा नेता म्हणून लोक केजरीवालांना मानत नाहीत असे का म्हणू नये?
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to पुरेपुर निरागासतेने भरलेला प्रतिसाद by सर टोबी
In reply to पुरेपुर निरागासतेने भरलेला प्रतिसाद by सर टोबी
पुरेपुर निरागासतेने भरलेला प्रतिसादओक्के. बरं वर दिलेल्या तांत्रिक मुद्द्यांमध्ये काही चूक असेल तर ते जरूर दाखवून द्या असे लिहिले होते. त्याविषयी काही न लिहिता नुसते पुरेपुर निरागसतेने भरलेला प्रतिसाद वगैरे र्हेटॉरीकला काय अर्थ आहे?
प्रत्येक सुनावणीला पुरवणी आरोपपत्र दाखल करुन खटला लांबवण्यावर सुप्रीम कोर्टाने नुकतेच ताशेरे ओढले आहेत.मुळात पहिलेच आरोपपत्र दाखल झालेले नसताना पुरवणी आरोपपत्र कुठून आले? तुम्ही म्हणत आहात तो प्रकार या दारू घोटाळ्यासंदर्भात नाही तर अवैध खाणकाम या दुसर्या वेगळ्या केससंदर्भात झाला आहे. त्या केसचा याच्याशी काय संबंध?
सत्ताधारी ज्या ज्या मुद्द्यांवर नाक वर करुन २०१४ पूर्वी बोलले त्या सर्व मुद्यांवर अत्यंत वाईट रीतीने पराभूत झाले आहेत. मग देशाची, महिलांची सुरक्षितता असो, आर्थिक परिस्थिती, रोजगार निर्मिती, परराष्ट्र धोरण असा कोणताही मुद्दा असो. परराष्ट्र धोरणात तर मोदींचे भारंभार दौरे आणि नेत्यांना मिठ्या मारणं याला सुशिक्षित देखिल भारताचा दबदबा असं समजतात.अहो इतके उतावळे का होत आहात? अजून १०-१२ दिवसात मतदानाला सुरवात होईल. दोन महिन्यात निवडणुकांची मतमोजणी होईल आणि निकालही हातात येईल. जर मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत वाट लावली आहे असे लोकांचे मत असेल तर लोक सरकारला सत्तेतून हाकलतील आणि लोकांचे तसे मत नसेल तर लोक मोदींना तिसरी टर्म देतील. ११८ महिने झेललंत आणखी दोन महिने कळ काढा. हत्ती गेला आणि शेपूट राहिले आहे. हा का ना का.
हे सरकार भ्रष्टाचारी आहे या बद्दलही कुणाच्याही, अगदी भाजप समर्थकांच्या मनातही शंका नाही.मी त्या कुणाच्याही पैकी नाही :) :)
In reply to केजरीवाल by चंद्रसूर्यकुमार
In reply to दिल्ली उच्चन्यायालयात केजरीवालांना दिलासा नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to तरुण मिपाकर by सर टोबी
तरुण मिपाकर दुपट्यात असण्याच्या काळातील अगदी बारीकसारीक माहितीयुक्त असा विद्वत्तापूर्ण वाटेल असा प्रतिसाद.इतर तरूण मिपाकरांचे माहित नाही पण माझा १९७६ मध्ये जन्मही झाला नव्हता :) बाकी प्रतिसाद विद्वत्तापूर्ण आहे की नाही मला माहित नाही आणि त्याची मला पर्वाही नाही. पण बहुतेक वेळेस माझ्या अशाप्रकारच्या प्रतिसादांमध्ये खोट काढणे तितके सोपे नसते कारण ज्या घटना झाल्या आहेत तशाच लिहिलेल्या असतात- म्हणजे लिहिलेल्या घटना सगळ्या verifiable facts असतात- कोणत्या सांगोपांगीच्या गोष्टी नव्हे.
एका सामान्य माणसाला फार तातडीच्या नसणाऱ्या गोष्टींसाठी खालच्या न्यायालयात जा असं सांगणं आणि जाणिवपूर्वक कालहरण करण्यासाठी खालच्या कोर्टात जा असं सांगणं यात फरक असावा ना?म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने प्रक्रीयेचा भाग म्हणून नाही तर जाणीवपूर्वक कालहरण करण्यासाठी खालच्या कोर्टात जा असे सांगितले आहे असा तुमचा दावा आहे का? असे नुसते हवेतले दावे करू नका हो. त्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ काहीतरी मुद्दे सादर करायची जबाबदारी दावा करणार्याची असते. नाहीतर असे दावे फारसे गांभीर्याने घेण्याजोगे नसतात. दुसरे म्हणजे आपल्या न्यायव्यवस्थेत तारीख पे तारीख ही एक वाईट गोष्ट आहे याविषयी दुमत नाही. पण जर सामान्य लोकांना त्या व्यवस्थेतून जावे लागत असेल तर मग राजकारण्यांविषयी त्याबाबतीत अपवाद का करावा? स्वतः केजरीवाल व्ही.आय.पी संस्कृती संपविणे हा एक उद्देश घेऊन राजकारणात आले होते ना? मग या बाबतीत व्ही.आय.पी ट्रीटमेंट का बरे द्यावी?
त्यातून वर्तमान सरन्यायाधीशांच्या सचोटीवर संशय घेण्यासाठी आणीबाणीतील यशवंतराव चंद्रचूड याचा एक उपधागा जोडला.वाटलंच होतं कोणीतरी हे लिहिणार. संजीव खन्नांचे काका हंसराज खन्ना आणि धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंतराव चंद्रचूड यांचा उल्लेख एक सापळा म्हणून केला होता. त्या सापळ्यात तुम्ही आपण होऊन चालत आलात :) एक तर हंसराज खन्ना आणि यशवंतराव चंद्रचूड यांनी त्या (म्हणजे ए.डी.एम जबलपूर विरूध्द शिवकांत शुक्ला) या केसमध्ये काय निकाल दिले होते ही एक verifiable fact आहे आणि त्याविषयी अनेकवेळेस अनेक ठिकाणी लिहिले गेलेही आहे. हंसराज खन्नांनी त्यावेळेस रामशास्त्री बाणा दाखवला होता हे त्यावरील माझे मत. आता इंदिरा सरकारला विरोध केला म्हणून तो रामशास्त्री बाणा का हा पण प्रश्न कोणीतरी विचारायच्या आधीच लिहितो- त्या केसमध्ये यशवंतराव चंद्रचूडांसारखा निकाल देणारे आणखी एक न्यायाधीश होते- पी.एन.भगवती. त्या पी.एन.भगवतींनी २०११ मध्ये एका मुलाखतीत बोलताना तो निकाल देताना आपण चूक केली असे मान्य केले होते. https://www.youtube.com/watch?v=qdq_c6qr17M . म्हणजे एका अर्थी हंसराज खन्ना बरोबर होते आणि आपण चुकलो असे भगवतींनी मान्य केले. तसे असेल तर तेव्हा प्रवाहाविरोधात जाणार्या खन्नांनी रामशास्त्री बाणा दाखवला असे म्हटले तर काय चुकले? आता यात सापळा कसा? तर तेव्हा रामशास्त्री बाणा दाखविणारे कोणी न्यायाधीश होते तसे यावेळेसही कोणीतरी असेल आणि केजरीवाल निर्दोष मुक्त होतील कारण या केसमध्ये मुळातच दम नाही असे तुम्हाला का वाटले नाही? की आपल्या नेत्याच्या बाजूतच काहीतरी खोट आहे ही भिती आहे? आपला नेता जर निर्दोष आहे अशी खात्री समर्थकांना तरी कुठून येणार म्हणा? कारण त्या नेत्याच्याच वर्तणुकीतून- इतक्या वेळा समन्स धुडकावण्यातून तशी खात्री दिसत नाही.
आता नोटबंदी वैध ठरवणारा निर्णय होईपर्यंत धनंजय चंद्रचूड यांची सचोटी बरी होती नाही का?अहो हा प्रश्न मला काय विचारत आहात? तो प्रश्न मोदी विरोधकांना विचारा.
तसेही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय पाहिल्यानंतर तेथे फक्त आदेश मिळतो जो कधी कधी आपल्याला सोयीचा असतो असंच म्हणावं लागते.याविषयी पास. बाकी र्हेटॉरीक सोडा आणि काही मुद्दे घेऊन या. आणि इतके उतावळेही व्हायची गरज आहे असे वाटत नाही. आपल्या अटकेला आव्हान देणारा अर्ज घेऊन केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात जातीलच. तेव्हा काय होते ते बघू आणि जो कोणता निकाल येईल तो सगळेच मान्य करू. काय म्हणता?
In reply to :) by चंद्रसूर्यकुमार
आपल्या अटकेला आव्हान देणारा अर्ज घेऊन केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात जातीलच. तेव्हा काय होते ते बघू आणि जो कोणता निकाल येईल तो सगळेच मान्य करू. काय म्हणता?काल सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांच्या आव्हान अर्जावर ईडीला उत्तर द्या अशी नोटिस बजावली. ईडीचे उत्तर आल्यावर पुढची सुनावणी २९ एप्रिलपासून करणार असे म्हटले. याचाच अर्थ त्यांना तातडीने दिलासा दिला नाही. केजरीवालांचा अर्ज पण ज्या कोर्टात गेला त्या कोर्टात तेच संजीव खन्ना एक न्यायाधीश आहेत. दुसरे न्यायाधीश दीपंकर दत्ता आहे. त्या दोघांनी त्यावर त्यांनी ही पुढील कार्यवाही केली. वर म्हटल्याप्रमाणे संजीव खन्ना स्वतंत्र बाण्याचे न्यायाधीश आहेत. आरोपीला अटक करता येणे हा आपला हक्क आहे असे ईडीने समजू नये अशा कानपिचक्याही त्यांनी ईडीला दुसर्या एका केसमध्ये दिल्या आहेत. यावरून असे वाटते की ८-९ वेळा समन्स धुडकावून केजरीवालांनी आपलीच बाजू कमकुवत करून घेतली आहे. कारण आता ईडी म्हणू शकेल की असे समन्स धुडकावल्यामुळे केजरीवाल तपासात सहकार्य करत नाहीत म्हणून त्यांना अटक करण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नाही. तो मुद्दा केजरीवालांच्या वकिलांना खोडून काढावा लागेल. जर केजरीवाल पहिल्याच समन्सच्या वेळेस तिथे गेले असते आणि लगेच ईडीने त्यांना अटक केली असती तर त्या परिस्थितीत ईडीचा हा मुद्दा खोडून काढणे केजरीवालांच्या वकिलांना त्या मानाने सोपे गेले असते. दुसरे म्हणजे कोणता खटला कोणत्या न्यायाधीशाच्या कोर्टात द्यायचा हा निर्णय सरन्यायाधीश घेत असतात. जानेवारी २०१८ मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा या बाबतीत पक्षपात करत आहेत असा आरोप करून रंजन गोगोई, मदन लोकूर आणि अन्य दोन न्यायाधीशांनी अभूतपूर्व अशी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा रंजन गोगोईंना समस्त जमात-ए-पुरोगामींनी डोक्यावर घेतले होते. पण त्याच रंजन गोगोईंनी राफेल आणि राममंदिर प्रकरणात आपल्या मनासारखा निकाल दिला नाही म्हणून ते त्यांच्या मनातून उतरले. पुढे त्यांना राज्यसभेवर नियुक्त केल्यावर मात्र ते जमात-ए-पुरोगामींच्या मनातून पूर्णच उतरले. धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश झाल्यावर ते पण आपल्या बाजूचे आहेत असे जमात-ए-पुरोगामींना वाटले असावे. पण त्याच धनंजय चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश व्हायच्या आधी राममंदिर प्रश्नावर जमात-ए-पुरोगामींना न आवडणारा निकाल दिला होताच. त्यानंतर ३७० कलम प्रकरणातही त्यांनी जमात-ए-पुरोगामींना न आवडणारा निकाल दिला. इलेक्टोरल बाँड प्रश्नावर मात्र त्यांना आवडणारा निर्णय दिला. आता केजरीवालांच्या याचिका नेमक्या संजीव खन्नांकडेच एकदा नाही तर दोनदा दिल्या आहेत. हे सगळे बघून धनंजय चंद्रचूडांच्या बाबतीतही जमात-ए-पुरोगामींच्या मनात चलबिचल सुरू झाली असावी असे म्हणायला जागा आहे.
In reply to केजरीवालांना तातडीने दिलासा नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to केजरीवालांना तातडीने दिलासा नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to केजरीवालांनी आपलीच बाजू कमकुवत करून घेतली आहे by सर टोबी
In reply to त्यांच्यासाठी अपवाद करून by सुबोध खरे
In reply to त्यांच्यासाठी अपवाद करून by अमरेंद्र बाहुबली
In reply to त्यांच्यासाठी अपवाद करून by अमरेंद्र बाहुबली
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
In reply to अस का लिहिलय ते सविस्तर लिहा. by अमरेंद्र बाहुबली
In reply to खुनशी जोडगोळी ने कुणाचा खून by सुबोध खरे
खुनशी जोडगोळी ने कुणाचा खून केलाय?केजरीवाल आणि सिसोदिया या खुनशी जोडगोळीने भष्टाचारविरोधी चळवळ, लोकाभिमुख प्रशासन वगैरे मुद्दे घेऊन कोणी भविष्यात राजकारणात आला तर त्यावर लोकांना विश्वास ठेवणे कठीण जाईल त्या अर्थी या खुनशी जोडगोळीने त्या चळवळीचा/विचाराचा खून केला आहे.
In reply to खुनशी जोडगोळी ने कुणाचा खून by सुबोध खरे
In reply to आणि खुनशी जोडगोळीची यामुळे by अमरेंद्र बाहुबली
सुप्रीम कोर्टाने कानफटावले त्यानाकधी? कुठे? पुरावे?
In reply to सुप्रीम by कांदा लिंबू
In reply to मी काही चुकीच लिहीलय असे वाटत by सुबोध खरे
In reply to मी अश्या देशात राहतो जिथे by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुम्ही स्वतः by वेडा बेडूक
In reply to अबा फसले. by कर्नलतपस्वी
In reply to मी अश्या देशात राहतो जिथे by अमरेंद्र बाहुबली
In reply to केजरीवालांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to काल रात्री मला स्वप्न पडले. by अमरेंद्र बाहुबली
In reply to काल रात्री मला स्वप्न पडले. by अमरेंद्र बाहुबली
In reply to पुढील सत्यापना... by कर्नलतपस्वी
In reply to काल रात्री मला स्वप्न पडले. by अमरेंद्र बाहुबली
In reply to काल रात्री मला स्वप्न पडले. by अमरेंद्र बाहुबली
In reply to काल रात्री मला स्वप्न पडले. by अमरेंद्र बाहुबली
In reply to देशातले लाखो रुपये खर्चून by अमरेंद्र बाहुबली
In reply to मूळ धागा काय आहे? प्रतिसाद by सुबोध खरे
In reply to राजकुमार आनंद यांचा राजीनामा by चंद्रसूर्यकुमार
In reply to गद्दार by अमरेंद्र बाहुबली
गद्दारचला, तुम्ही पण मान्य केलं की हा पक्ष गद्दार आहे म्हणून! देर आये दुरुस्त आये
In reply to राजकुमार आनंद यांचा राजीनामा by चंद्रसूर्यकुमार
केजरीवाल का iPhone अनलॉक कराने Apple के पास पहुंची ED, जानिए क्य