आप की बदमाशियोंके....

विकास's picture
विकास in राजकारण
18 Jan 2014 - 7:59 pm

"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्‍याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...

वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.

लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.

वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.

असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्‍या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.

व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.

प्रतिक्रिया

हुप्प्या's picture

22 Jan 2014 - 10:34 pm | हुप्प्या

मुख्य दुखणे हे दिल्ली राज्य सरकारच्या ताब्यात पोलिस यंत्रणा नाही हे आहे. त्यामुळे लोकांच्या सुरक्षेला बाधा येत आहे. निर्भया बलात्काराच्या वेळेसे शीला दिक्षितांनी हीच तक्रार मांडली होती.
केंद्रीय सरकार दिल्लीच्या जनतेला उत्तरदायी नाही. पण दिल्लीच्या जनतेच्या सुरक्षेच्या नाड्या मात्र त्यांच्या हातात. हा उफराटा कारभार बंद केलाच पाहिजे. ह्यालाच प्रजेच्या सुरक्षेचा गळा घोटणे म्हणतो मी.
तो कायदा मंत्री हे एक निमित्त आहे. तो राहिल वा जाईल. पण मुख्य व्याधी बरी व्हायलाच हवी.

चिगो's picture

22 Jan 2014 - 10:13 pm | चिगो

माफ करा.. पण

दिल्लीच्या स्थानिक प्रजेच्या सुरक्षेचा गळा घोटला तरी चालेल

म्हणजे काय हो? काँग्रेसी मुख्यमंत्री असतांना "जनतेच्या सुरक्षेत असलेली ढिलाई" ही सरकारची चूक आणि "आप"च्या काळात सरकारची चूक? आणि खरंच केजरीवाल "जनतेच्या सुरक्षेबद्दल" लढत होते की आपल्या उतावळ्या कायदेमंत्र्याचा आणि स्वतःचा ईगो जपत होते?

जो थोडाफार सरकारी अनुभव आहे त्यावरुन सांगतो, मालक.. जर रात्रीचे तमाशे करत बसण्याऐवजी जर कायदेमंत्र्यांनी "२४ तासात अमुकतमूक करा" असा आधिकारीक आदेश त्याच दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी दिल्ली पोलिसच्या अधिकार्‍यांना दिला असता, तर झकत काम करावं लागलं असतं पोलिसांना.. पण मग हिरो कसे झाले असते, नाही?

काय घडलंय ते पाहा. कारण कायदेमंत्री सांगतो आणि पोलिस अधिकारी ऐकतो अशी परिस्थिती असती तर आंदोलनाची गरजच नव्हती.

जयदीप सरदेसाईंनी हाच प्रश्न केजरीवालांना विचारला होता, सोमनाथ भारतींनी कायदा का हातात घेतला? त्यावर केजरीवाल म्हणतात की कोणतंही सेक्स किंवा ड्रग रॅकेट चालू आहे आणि पोलिसांना कल्पना नाही हे अशक्य आहे. आआपा सत्तेवर येण्यापूर्वीपासून त्या रॅकेटविषयी तक्रारी तिथल्या नागरिकांकडून येत होत्या. आणि केजरीवालांचा हा युक्तीवाद तर पटण्यासारखा आहे की सोमनाथ भारतींची त्या रॅकेटवाल्यांशी किंवा संबधित पोलिसांशी मैत्री न दुश्मनी. प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी ते अपरात्री धोका पत्करुन बाहेर पडले. आणि Cognizable Offence चा विषय वर झालेला आहेच, त्यांनी पोलिसांना संबंधित व्यक्तींना अटक करायला सांगितली तर पोलिस तिथून निघून गेले!

नाऊ कमिंग बॅक टू द पॉइंट, सदरहू पोलिस अधिकार्‍याविरुद्ध चवकशीचे आदेश दिलेले आहेत. याचा अर्थ आरोपात तथ्य आहे.

विकास's picture

23 Jan 2014 - 1:16 am | विकास

कारण कायदेमंत्री सांगतो आणि पोलिस अधिकारी ऐकतो अशी परिस्थिती असती तर आंदोलनाची गरजच नव्हती.

कायदेमंत्र्याचे काम हे कायदे करणे अथवा सुधारणे हे असते. कायदा हातात घेऊन वाट्टेल तसे वागणे नसते. तत्वतः पोलीसांची कुठलिही कृती ही केवळ एखादा मंत्री सांगतो म्हणून असू शकत नाही. कायदे मंत्री म्हणतो म्हणून तर नक्कीच नाही. हे म्हणजे मग रामाशेट्टीला अटक करू नकोस सांगणारे फोन येण्याची सुरवात आहे. आज काय अफ्रिकन आवडत नाहीत म्हणून त्यांना हाकलण्याच्या ऑर्डर्स तर उद्या अजून कोणी गोरी कातडी आवडली म्हणून त्यांना सोडण्याच्या... याला कायद्याचे राज्य म्हणता येणार नाही.

केजरीवाल म्हणतात की कोणतंही सेक्स किंवा ड्रग रॅकेट चालू आहे आणि पोलिसांना कल्पना नाही हे अशक्य आहे. आआपा सत्तेवर येण्यापूर्वीपासून त्या रॅकेटविषयी तक्रारी तिथल्या नागरिकांकडून येत होत्या.

"अशक्य आहे" असे म्हणणे हा केवळ तर्क आहे आणि केवळ स्वत:ला योग्य वाटणारे तेव्हढेच तर्क चालवत राज्य चालवणे म्हणजे हुकूमशाहीचे पहीले पाऊल आहे. भारतींनी त्यांच्याबरोबरच्या जमावाला त्या बायकांना पकडायला सांगितले. वर त्या "आपल्या आयाबहीणींसाठी खतरा आहेत" असे म्हणाले. "Nigerian girls and men all indulge in prostitution and drug trafficking and it is a threat to local ma, behen, beti (mothers, sisters and daughters)."हे कॅमेर्‍यावरती आले आहे. विचार करा, असे जमावाला पेटवून बायकांच्या मागे सोडायचे, जर काही त्या बायकांचे बरंवाईट झाले असते तर खोब्रागडेंच्या बाबतीत जे काही अमेरीकेने केले त्याबद्दल ओरडायची पूर्ण नैतिकता आपण घालवून बसलो असतोच पण एक मोठे आंतर्राष्ट्रीय प्रकरण झाले असते. तुम्हाला केजरीवाल आवडतात तर आवडूंदेत. पण म्हणून भलत्या गोष्टींचे समर्थन करणे जे चालू आहे ते समजत नाही.

नाऊ कमिंग बॅक टू द पॉइंट, सदरहू पोलिस अधिकार्‍याविरुद्ध चवकशीचे आदेश दिलेले आहेत. याचा अर्थ आरोपात तथ्य आहे.

तसेच सोमनाथ भारतींच्या विरोधातील आरोपातपण तथ्य आहे हे तुम्हाला मान्य आहे का? नसल्यास का नाही आणि असल्यास त्यांच्या बाबतीत काय करावे असे आपले म्हणणे आहे?

हे तुम्हाला मान्य आहे का?

केजरीवाल या व्यक्तीची मानसिकता आणि (पराकोटीचा राजकीय भ्रष्टाचार आणि उद्दाम प्रशासन अशा देशासमोरील) अत्यंत बिकट परिस्थितीत प्रश्न सोडवण्याची त्याची क्षमता या दृष्टीनं मी या सर्व प्रसंगांकडे पाहतो.

मी कोणत्याही पार्टीचा समर्थक नाही कारण कलेक्टीव (मॉब) सायकलॉजी हा माझा विषय नाही. तस्मात आआपाच्या प्रत्येक सदस्याच्या वर्तणूकीवर भाष्य करण्यात आणि पर्यायानं समर्थन करण्यात मला काही एक रस नाही.

केजरीवालांच्या मानसकितेच्या अभ्यासावरनं केवळ एक गोष्ट मी सांगू शकेन की सोमनाथ भारती जर सत्तेच्या हव्यासापायी अनावश्यक साहस करत असेल तर केजरीवाल त्याचं समर्थन करणार नाही.

चिरोटा's picture

23 Jan 2014 - 1:46 pm | चिरोटा

यापुढे दिल्लीतले उच्च पोलिस अधिकारी असल्या रॅकेटकडून पैसे घेताना दहा वेळा विचार करतील्.लोकांनाही तेच हवे आहे.

चिगो's picture

23 Jan 2014 - 4:08 pm | चिगो

सदरहू पोलिस अधिकार्‍याविरुद्ध चवकशीचे आदेश दिलेले आहेत. याचा अर्थ आरोपात तथ्य आहे.

अरे बापरे ! असे असते, होय? मी उगाचच "इनोसंट टिल प्रुव्हन गिल्टी" असं मानत चाललो होतो.. असो. पुन्हाएकदा आपापला चष्मा.. जर चौकशीचा आदेश आरोप सिद्ध करत असेल, तर भारतींविरुद्धही आता चौकशी होणारच. म्हणजेच ते आरोपी आहेत.

मी पुन्हा म्हणतो, संक्षी.. केजरीवाल ही पिडलेल्या, त्रासलेल्या लोकांची आशा आहे. म्हणूनच त्यांना एवढे यश मिळाले. आता ते यश ते आपल्या योग्य, परिपक्व वागण्याने पचवतात की आक्रस्तळेपणापायी लोकांना "झक मारली आणि निवडून दिले" असं वाटायला लावतात, हे त्यांच्यावर निर्भर आहे. त्यांना शष्प फरक पडत नाही, हे जाणूनही सांगतो की माझ्या त्यांना सदिच्छाच आहेत. पण सॉरी, मी ब्लाईंडमध्ये खेळत नाही.. :-)

सकृद्दर्शनी तथ्य असल्याशिवाय साधी तक्रार सुद्धा दाखल होत नाही ही वस्तुस्थिती आहे.

जर किर्की एक्सटेंशनमधे गैरप्रकार चालूच नसते तर आआपाला सरकारनं केंव्हाच फाट्यावर मारलं असतं. त्यामुळे प्रश्नाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. हेतू योग्य आहे, अंमलबजावणीत संयम हवा होता. (अर्थात, पक्षानं त्याविषयी त्यांना समज दिली आहे)

आता ते यश ते आपल्या योग्य, परिपक्व वागण्याने पचवतात की आक्रस्तळेपणापायी लोकांना "झक मारली आणि निवडून दिले" असं वाटायला लावतात, हे त्यांच्यावर निर्भर आहे.

उलट आहे. लोकांसाठी प्राण पणाला लावून काम करण्यात `आपण झक मारली' असं जोपर्यंत केजरीवालांना वाटत नाही तोपर्यंतच बदलाची आशा आहे. तुमच्या सारख्यांच्या आणि मिडीयाच्या, `हेतू पेक्षा कार्यपद्धती महत्त्वाची " असल्या वृत्तीनं (जी प्रत्येक प्रतिसादातून दिसतेयं), त्यांना तसं वाटू नये इतकीच प्रामाणिक इच्छा आहे.

नाही तर स्वतःला काही करायला नको पण किमान जनजागृती होतेयं, नवी आशा निर्माण होतेयं, तिला खोडा घातला आणि काम करणार्‍यालाच धडे शिकवून नामोहरम केला की पुन्हा प्रस्थापितांचा स्टेटस को कायम.

विकास's picture

24 Jan 2014 - 5:12 pm | विकास

अंमलबजावणीत संयम हवा होता. (अर्थात, पक्षानं त्याविषयी त्यांना समज दिली आहे)

पक्षाने अंमलबजावणीचे समर्थनच केले आहे. त्यात त्यांना चूक वाटले नाही की बेकायदेशीर वाटलेले नाही. हीच तर दुर्दवी गोष्ट आहे. फक्त जेटली/साळवे ना जे काही बोलले गेले आहे (थुंकू, पब्लीकचा मार खातील वगैरे) त्या संदर्भात समज दिली आहे

चिगो's picture

25 Jan 2014 - 2:54 pm | चिगो

उचलली जीभ अन् लावली टाळ्याला..

नाही तर स्वतःला काही करायला नको

माझ्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मी कोण आहे, काय/कुठे/कसे काम करतो ह्याबद्दल काहीही माहिती नसतांना केवळ स्वतःचा न्यायाधिशी कंड शमवण्यासाठी समोरच्यावर बोट ठेवायचे का? मला मिपावर न्यायाधिशगिरी करण्याची गरज नाहीय. ते काम मी प्रत्यक्ष केलंय आणि त्यासाठी किती विवेकवृत्ती लागते ह्याची कल्पना आहे, तेव्हा आवरा स्वतःला..

तुमच्या सारख्यांच्या आणि मिडीयाच्या, `हेतू पेक्षा कार्यपद्धती महत्त्वाची " असल्या वृत्तीनं

पुन्हा एकदा समजावून सांगतो. पहा विचार करुन जमल्यास.. "आंदोलक" केजरीवालांना कार्यपद्धतीबद्दल गरज नव्हती / नाही. "मुख्यमंत्री" केजरीवालांना हेतूइतकीच कार्यपद्धती बघायला पाहीजे. कारण की त्यांनी संविधानाची शपथ घेतलीय, ज्यानुसार "कायद्याचे राज्य" (रुल ऑफ लॉ) महत्वाचा असतो. कायद्यानुसार "कार्यपद्धती" महत्त्वाची असते. त्याकरीता कायदे/विधानही आहेत. उदा. क्रिमीनल प्रोसिजर कोड, सिवील प्रोसिजर कोड.. प्रोसिजर म्हणजेच कार्यपद्धती !

असो. जर गंड कुरवाळणे हा समान धागा/ चष्मा काढून बघितल्यास कळेल, की मी केजरीवालांकडून फक्त थोड्या राजकीय परिपक्वतेची अपेक्षा करतोय. त्यांच्या हेतूसाठी आणि यशासाठी माझ्या सदिच्छाच आहेत आणि राहतील..

जाता जाता: आजच्या "राष्ट्रीय मतदाता दिवस" आणि उद्याच्या "प्रजासत्ताक दिना"साठी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.. गणतंत्रदिन चिरायु होवो..

प्यारे१'s picture

26 Jan 2014 - 2:13 am | प्यारे१

___/\___
सोनार, सोन्याचा भाव काय आजचा?

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

त्यांच्या हेतूसाठी आणि यशासाठी माझ्या सदिच्छाच आहेत आणि राहतील?

अशी मखलाशी करुन काय उपयोग? तुम्हाला बहुदा विस्मरणाचा त्रास आहे कारण तुमचा पूर्वीचा निष्कर्श हा होता :

पण त्यांच्या एकंदरच वागणूकीवरून मला वाटतंय की त्यांना सरकार चालवणे किंवा लोकांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचा ईगो सुखावत "मी बघा किती निस्पृह, सच्चा माणूस आहे" हेच दाखवत बसण्यात रस आहे.

इगोइस्ट माणसाला दुसर्‍याच्या साध्या वागण्यात आणि कामात सुद्धा इगो दिसतो पण तेवढी समज यायला वेळ लागेल.

चिगो's picture

26 Jan 2014 - 12:33 pm | चिगो

इगोइस्ट माणसाला दुसर्‍याच्या साध्या वागण्यात आणि कामात सुद्धा इगो दिसतो पण तेवढी समज यायला वेळ लागेल.

अभिनंदन.. मिपावर का होईना, आयुष्यात न्यायाधिशगिरी करायला मिळाली तुम्हाला.. सरकार चालवण्यासाठी आणि जनसेवेसाठी "मुख्यमंत्री" केजरीवालांना (विस्मरणाचा त्रास विस्मरुन) ;-) माझ्या शुभेच्छा..

अर्धवटराव's picture

22 Jan 2014 - 10:18 pm | अर्धवटराव

केजरीवालांच्या कृतींना सपोर्ट करायला दिग्विजयी लॉजीक वापरणं यापरतं उपहास नाहि.
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा प्रजासत्ताक दीन साजरा का करावा? जात व्यवस्था, धर्म व्यवस्था, सततच्या परकीय आक्रमकांनी लादलेल्या व्यवस्था, जगात विज्ञानाचा सूर्य तळपत असताना देशाला अधोगामी ज्ञानाकडे नेणार्‍या व्यवस्था.. इ. सर्व मोडीत कढणार्‍या प्रजासत्ताकाचा उत्सव का सेलीब्रेट करावा? शेजारी शत्रुराष्ट्र उपग्रहांना नष्ट करणारं तंतज्ञान विकसीत करुन बसलं असताना आपण आपल्या सैन्यशक्तीचं प्रदर्शन का करावं? आपण पृथ्वीवर एकटेच नांदु शकत असताना उगाच मित्रराष्ट्रांच्या प्रतिनीधींना आपल्या समारंभांना आमंत्रीत करायची अवदसा आपल्याला का आठवावी?

दळभद्री विचारांच्या इतक्या ओंगळवाण्या प्रदर्शनाचं मनोरंजनात्मक मुल्य किती? केजरीवालांनी हेच मुल्य कॅश करायला हा आटापीटा केला असावा काय?

विनोद१८'s picture

23 Jan 2014 - 12:12 am | विनोद१८

मा. अर्धवटराव
.वर 'हुप्प्याला' दिलेले उत्तर जरा नीट वाचा, आय होप यु विल रेडि टु थिंक ???

बाकी गेली ६७ वर्षे झाली तरी ( जात व्यवस्था, धर्म व्यवस्था, सततच्या परकीय आक्रमकांनी लादलेल्या व्यवस्था, जगात विज्ञानाचा सूर्य तळपत असताना देशाला अधोगामी ज्ञानाकडे नेणार्‍या व्यवस्था.. इ. ) सर्व प्रकाराना जे जबाबदार आहेत त्यान्च्याकडुन त्याची उत्तरे मागावित.

( शेजारी शत्रुराष्ट्र उपग्रहांना नष्ट करणारं तंतज्ञान विकसीत करुन बसलं असताना आपण आपल्या सैन्यशक्तीचं प्रदर्शन का करावं? ) याला काय म्हणावे ?? आपली अग्नी मिसाइल, उपग्रह व अवकाश तन्त्र यातली प्रगती याबद्दल आपल्याला काही माहीती नाही असे दिसते.

विनोद१८

अर्धवटराव's picture

23 Jan 2014 - 12:21 am | अर्धवटराव

यु वॉण्टेड टु गिव्ह धिस सेम रिप्लाय ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2014 - 12:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला वाटतं की वरच्या प्रतिसादाचा रोख उपरोधिक आहे ! :)

आनन्दा's picture

23 Jan 2014 - 2:01 pm | आनन्दा

+१
अर्धवटरावांना समजण्यात गल्लत होते आहे

माहितगार's picture

23 Jan 2014 - 11:09 am | माहितगार

प्रजासत्ताक दिनाच्या परेड प्रत्यक्षात खूप कमी वेळाची असते.मध्ये कोणतेही भपकेबाजी अथवा देशाला न परवडणार्‍या खर्चीक बाबी असतात हे म्हणणे वस्तुस्थितीस धरून नाही.तिथे राष्ट्रपती आणि पंतप्रधान राजकीय पक्षीय भूमीकेतून बसलेले नसतात एका सार्वभौम देशाच प्रतिनीध्त्व करत असतात.देशाची सैन्यदले देशाच्या राष्ट्रप्रमूखाच्या आणि पंतप्रधानांच्या मार्फत देशाला मानवंदना देत असतात. राष्ट्राभिमान जागृत होण्यास राहण्यास संधी मिळते

देशातील केवळ काही राज्यांना (आलटून पालटून) आणि राष्ट्रीय संस्थांना आपली प्रगती अथवा सांस्कृतीक प्रदर्शन करण्याची संधी मिळते.इतर वेळी लोकांच लक्षही जात नाही त्या राज्यांच्या संस्थांच्या संशोधकांच्या कार्याच कौतूक होत.विवीधतेतून एकता हा संदेश देण्याचा प्रयत्न असतो.स्वातंत्र्य लोकशाही राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जात असतो.

राष्ट्राभिमान न जागवलेली प्रजा सुरक्षेबाबत कमी दक्ष राहील जास्त भ्रष्ट होईल.सुरक्षेचे आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न आहेत म्हणून राष्ट्राभिमान जागवणारी कृती बंद करण्याचे आवाहन मला सुयोग्य वाटत नाही.स्वांतत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हि सेक्यूलर सेलिब्रेशन्स आहेत . एकवेळ इतर सोहोळे केले नाहीत तर चालतील स्वांतत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन आवर्जून सेलिब्रेट केले पाहिजेत

उलटपक्षी एखाद्या ठिकाणी सुरक्षेची स्थिती गंभीर झाल्यास ध्वजसंचलन करण्याची पद्धत असते.इतर ठिकाणी सोडा राष्ट्राच्या राजधानीत सुद्धा तुम्ही एक ध्वजसंचलन धड करू शकला नाहीत तर ती कोणत्याही राष्ट्राच्या सक्षमते बद्दल अत्यंत वाईट संदेश जातो. कोणत्याही एका राज्याचा मुख्यमंत्री उठतो आणि प्रजासत्ताक दिनाच ध्वज संचलनाला आव्हान देतो ............आणि कार्यकर्ते नेता काहीही बोलला तरी समर्थन करण्याची जुनीच राजकीय संस्कृती नवीन राजकीय पक्षात जपणार असतील तर हा तथाकथीत वेगळा असलेला राजकीय पक्ष खराच वेगळा आहे का जुनच औषध नवीन बाटलीत भरून दिल जात आहे हा माझ्यातरी अल्पबुद्धीला प्रश्न पडतो आहे.

राष्ट्रीय गोष्टींमध्ये पक्षीय अभिनीवेश दूर ठेऊन पहाण्यास शिकले पाहीजे.केवळ पक्षीय अभिनीवेशातून कुणी आपल्या राजकिय नेत्याच्या कोणत्याही कृतीच समर्थन करत असेल आणि ते करताना राष्ट्राच्या अभिमानाचा विसर पडत असेल तर ती आदर्श स्थिती नव्हे.या बाबतच्या भूमीका पुन्हा तपासून पाहिल्या जातील तो सुक्षण आपल्या सर्वांच्या भाग्यात यावा हि मनोमन शुभेच्छा. आणि या निमीत्ताने येत्या प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा.

पैसा's picture

23 Jan 2014 - 11:34 am | पैसा

देशाची सैन्यदले देशाच्या राष्ट्रप्रमूखाच्या आणि पंतप्रधानांच्या मार्फत देशाला मानवंदना देत असतात.

त्याचबरोबर राष्ट्रपतीसुद्धा सगळ्या देशातील नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून सैन्याचा कार्यक्रम संपेपर्यंत उभे राहून सैनिकांना मानवंदना देतात. सैनिकी तसेच नागरी शौर्यपदके यादिवशी देऊन सैनिक आणि नागरिकांचा सन्मान केला जातो. हे सगळे थांबवावे असे कोणाला वाटले तर निदान सैन्याबद्दल त्याला आदर वाटतो का याबद्दल सहजच शंका निर्माण होते.

अनिरुद्ध प's picture

23 Jan 2014 - 12:42 pm | अनिरुद्ध प

+१ सहमत

हुप्प्या's picture

24 Jan 2014 - 2:09 am | हुप्प्या

प्रजासत्ताक दिन हा नक्की कशाचे प्रतीक आहे? भारताने प्रातिनिधिक लोकशाही स्वीकारल्याचे का भारत ही एक सैनिकी महासत्ता असल्याचे? शेकडो रणगाणे आणि शस्त्रास्त्रे मिरवल्याने आपण प्रजासत्ताक असल्याचा संदेश कसा जातो बरे? हा काही सेना गौरव दिवस वगैरे नाही. मग शस्त्रास्त्र परेड वगैरे खूळे कशाला? आणि सगळे दिल्लीत तरी कशाला?

परिस्थिती गंभीर झाल्यास ध्वजसंचलन केले जाते ते सैन्यच करते हे मान्य. तिथे दंगलखोरांवर वचक बसावा हा उद्देश असतो. पण अशा कार्यक्रमाचे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात काय प्रयोजन ? वचक? कुणावर आणि का?

पुन्हा एकदा पुस्ती जोडतो की सर्व तयारी झाल्यावर कार्यक्रम रद्द करा असा केजरीवाल यांचा आग्रह समर्थनीय नाहीच. पण प्रजासत्ताक दिनाच्या नावाखाली जे काही चालते ते इतके वर्ष चालले आहे ना मग पुढेही चालू द्या असे अंध समर्थन मला मान्य नाही. यंदा भारताची आर्थिक स्थिती फार चांगली नसल्यामुळे ह्या वेळेस प्रजासत्ताक दिन अगदी साधेपणाने साजरा करणार आहे असे कुणी पंतप्रधान म्हणाला तर त्याने भारताचे नाक कापले जाईल असे मला वाटत नाही. उलट सरकारी उधळपट्टी कमी करण्याचाच उचित संदेश जाईल. कुणीतरी तसे केले तर बरे!
असल्या दिखाऊ परेड वगैरे पेक्षा २४ तास वीज, २४ तास पाणी, सपाट रस्ते, निकोप अर्थव्यवस्था, कायद्याचे राज्य ह्या गोष्टी भारत महासत्ता असल्याचा संदेश जास्त प्रभावीपणे देतात असा माझा विश्वास आहे. असो.

माहितगार's picture

23 Jan 2014 - 12:51 pm | माहितगार

इंडियन एक्सप्रेस मध्ये 'आप की पोलीस' शीर्षकाने एक माहितीपूर्ण लेख आला आहे.अनिरुद्ध नागर या लेखकाची ओळख The writer is programme officer, police reforms at the Commonwealth Human Rights Initiative, Delhi अशी दिली गेली आहे

त्यातील काही ठळक मुद्दे

....in matters of policing, the priority is not political expediency; it is the common man’s right to a professional police service.

The National Police Commission, in its review of policing in India from 1979-81, categorised police tasks into three areas: investigative, preventive and service oriented. It stated that while the executive may provide direction to the police on the latter two tasks, the investigative tasks of the police are beyond any kind of intervention by the executive. In other words, decisions about who to investigate, search, question, detain, arrest and prosecute are decisions for the police alone to make.

The chief minister’s demand for the suspension of police officials disregards the internal system already in place. The Punjab Police Rules, 1943, applicable in Delhi, place suspension, promotion and transfer in the domain of the supervisory ranks.

In 2006, the Supreme Court, in the Prakash Singh case, called for the establishment of a State Security Commission (SSC) to do just this. Crucially, the chief minister of Delhi is a member of the SSC. Therefore, even while Delhi Police remains under the Union government, he has the ability to provide policy inputs for better policing. While a security commission for Delhi was set up in 2012, it has only met five times. It comes as no surprise then that it has failed to fulfil its mandate. Ensuring that the SSC meets regularly will go some way to remedying the present situation.

आपच्या काही चुका होत असतील, पुढे देखील अनेक होतील. पण सद्य स्थितीत आप हाच सर्वोत्तम पर्याय आहे असे मला वाटते. त्याची कारणे दोन :

१. स्वच्छ निवडणूक लढवण्याची तयारी
२. निर्णयांमध्ये लोकांना सहभागी करण्याची तयारी

ह्या दोन गोष्टी अशक्य आहेत अशी समजूत झाली असताना आपने पहिली पूर्णपणे आणि दुसरी काही अंशी करून दाखवली. भाजप किंवा कॉंग्रेस ह्यामधील एकाला निवडणे म्हणजे त्यातल्या त्यात कमी वाईट निवडणे आहे. आप हा सध्यातरी एक सकारात्मक पर्याय आहे.पुढे त्याचे काय होईल हे ठाऊक नाही. शेवटी मनमोहन सिंग किंवा जॉर्ज फर्नांडीस सारख्या स्वच्छ समजल्या जाणार्या लोकांना भ्रष्टाचारात सामील झालेले आपण पाहिले आहे. पण तरीही मी आशावादी आहे. कदाचित काही चांगले घडेलही. उम्मीद पे दुनिया कायम है. म्हणून सध्यातरी आप पक्षाला पूर्ण पाठींबा.

विवेकपटाईत's picture

24 Jan 2014 - 9:37 pm | विवेकपटाईत

१. दिल्ली दोन प्रकारची आहे. एक दक्षिण दिल्ली आणि स्वर्गाचा भाग म्हणजे एन डी एम सी (दिल्लीचे दाखविण्याचे दात)
२.दिल्लीची १.७५ कोटी जनता अनिधिकृत कोलोनीत राहते. अर्थात दिल्लीच्या रिंग रोड च्या बाहेर.
३. अधिकांश भाडेकरू १०० चौ. फीट च्या खोल्यात राहते. ते ही एक ते २ वर्ष पेक्षा जास्त नाही, भाड्याची कुठलीही पावती नाही मिळत. प्रत्येक खोलीत एक विजेचे मीटर असते. (मकान मलिक ने लावलेले निजी मीटर). तो एका युनिट साठी ८-१० रु प्रती युनिट घेतो. शिवाय तो स्वत:च्या नावावर आणि घरच्यांच्या नावावर प्रत्येक फ्लोर साठी वेगळ मीटर घेतलेले असते. सारांश दिल्लीच्या भाडेकरू किंवा गरीब माणसाला काही ही फायदा नाही , फायदा फक्त श्रीमंत मकान मलिक लोकांना.

२. दिल्लीत कुठल्या ही वस्तीत बिना विजेचे मोटार लावल्या शिवाय नळाला पाणी येत नाही. अनिधिकृत कॉलोनीत पाणी देण्याची कुठली ही सुव्यवस्था नाही. न पाण्याच्या टाक्या आहेत न पाण्याची साठवणूक करण्याच्या टेंक. उद: मी राहत असलेल्या बिंदापूर या कॉलोनी पंखा रोड पासून १ किमी आत आहे. २० वर्ष आधी पाणी येत होते. आज इथली जनसंख्या कमीत कमी २० पट वाढली असेल. जुन्या ४ इंचाच्या पाण्याच्या पाईप नी पाणी इत पर्यंत येतो. गेल्या दोन वर्षांपासून पाण्याचा एक थेंब ही आमच्या कॉलोनी पर्यंत पोहचत नाही. धुवणे, भांडी अंघोळ सबमर्सिबल (लोक इथे मिळून सबमर्सिबल लावतात) आणि टेन्करचे पाणी पिण्या साठी. हीच परिस्थिती संपूर्ण बाह्य दिल्लीत आहे. . जिथे पाणी येतो तिथे एका खोलीचे भाडे ४००-५००० रुपये असे असते. अर्थात गरिबांना याचा काही ही फायदा नाही. वर्षाचे १५०० कोटी पाण्यात जाणार. त्या पेक्षा प्राण्याच्या प्रबंधन करण्यास ही रकम खर्च जास्त चांगले असते. शिवाय ६६६ लिटर पाणी मोफत आणि १ लिटर ही जास्त झाल्यास वर्षाचे ११,००० रुपये लागतील (पाण्याचे भाव १५% वाढविले ) जिथे लोक विजेची चोरी करतात. पाण्याची का नाही करणार शिवाय पाण्याच्या लाईनीत करंट ही नसतो. अर्थात जल बोर्ड जे आधीच नुकसानीत असतो आणखीन नुकसान वाढेल. लोकांना पाणी ही मिळणार नाही. बाह्य दिल्लीत आपला जागा ही मिळाल्या नाहीत. गावातले लोक मूर्ख नसतात हेच खर. खर म्हणजे ही पार्टी श्रीमंत मकान मालिकांची, प्रापर्टी डीलर लोकांची आहे. फायदा श्रीमंतांनाच.

३. मोनो रेल चे ३ प्रोजेक्ट थंड्या बस्त्यात टाकले. (पैशे उधळल्या वर असेच होणार) श्रीमंत कार नी जातात. गरीब लोकांनाच मेट्रो किंवा बस लागते.

४. आम्ही इमानदार आहोत, हीच नारे बाजी करत अण्णांना मूर्ख बनविले व निवडणूक जिंकली. जर स्पष्ट बहुमत मिळाले असते तर इजिप्त सारखी अराजकता आतापर्यंत दिल्लीत पसरली असती.

दिल्लीची परिस्थिती इतकी वाईट असेल तर कुणीही आणि कसंही राज्य केलं तरी तिथे काहीही बदल होणार नाही असं दिसतं. तसं असेल (म्हणजे इतकं गाळात गेलेलं प्रकरण, आशेचा कोणताही किरण नाही आणि तुम्ही आआपाच्या विरोधात आहात तरी) आआपा बदल घडवू शकली तर ते कौतुकास्पद ठरेल.

बंडा मामा's picture

25 Jan 2014 - 6:58 pm | बंडा मामा

आम्ही इमानदार आहोत, हीच नारे बाजी करत अण्णांना मूर्ख बनविले व निवडणूक जिंकली. जर स्पष्ट बहुमत मिळाले असते तर इजिप्त सारखी अराजकता आतापर्यंत दिल्लीत पसरली असती.

बाकी प्रतिसाद विचार करण्यासारखा असला तरी हा मुद्दा फसला आहे, ज्यामुळे बाकिच्या प्रतिसादाची विश्वासहार्तताही कमी होते.

क्लिंटन's picture

25 Jan 2014 - 12:02 pm | क्लिंटन

आम आदमी पक्षाचे कर्तबगार, धडाडीचे, प्रामाणिक आणि अत्यंत सत्यवचनी कायदा मंत्री सोमनाथ भारती त्यांच्या जनतेविषयीच्या कळकळीसाठी सगळ्यांनाच माहित आहेत.दहा दिवसांपूर्वी त्यांनी न्यायाधीशांची बैठक बोलावून त्यांना न्यायदान कसे करावे याचे धडे दिले.जनतेविषयी इतके हृदयापासून वाटणारा मंत्री सापडणे कठिण आहे.हा अन्य कोणत्या तरी प्रकरणात न्यायालयाने त्यांच्यावर पुराव्यांमध्ये फेरफार केली यावरून ताशेरे ओढले म्हणून काय झाले. होते असे कधीकधी. शेवटी आआपसारखे प्रामाणिक लोक त्रिखंडात कुठेही मिळणार नाहीत.म्हणूनच संतश्रेष्ठ ह.भ.प श्री श्री श्री अरविंद केजरीवाल यांनी न्यायालय या प्रकरणी कसे चुकीचे याचे निरूपण केले.इतरांचे दु:ख हे आपलेच दु:ख समजणार्‍या सोमनाथ भारतींनी दिल्लीत खिडकी एक्स्टेन्शन भागात मध्यरात्री धाड टाकून म्लेंछ लोक दिल्लीमध्ये अनधिकृतपणे राहत आहेत आणि सर्व प्रकारच्या बेकायदा कामांमध्ये कसे सामील आहेत याचे प्रात्यक्षिकच दाखविले.तरीही पोलिसांनी बेमुर्वतपणे या सद्गुणांच्या पुतळ्याच्या अरे ला कारे करायची हिंमत दाखवली म्हणून केजरीवाल माऊलींनी दिल्लीच्या रस्त्यावरच ठाण मांडून आपल्यामागे विराट जनसमुदाय कसा आहे याचे प्रदर्शन केले. इतके प्रामाणिक राज्यकर्ते दिल्लीला मिळालेले असतानाही त्यांना कोणी प्रश्न विचारायचे धाडसच कसे करतो?दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षांनी चक्क त्याच भगवान शंकराच्या अवताराला प्रश्न विचारायचा उद्दामपणा दाखविला.केवढा हा घोर अपराध. आता धर्म बुडणार, पृथ्वीवर दैत्यदानवांचे राज्य येणार आणि मग ज्या 'आम आदमी' साठी आपण इतके धडपडत आहोत त्याचे पुढे काय होणार या चिंतेने या सोमनाथरायांना अगदी बेचैन करून टाकले.मग काय?ते गेले पतंग उडवायला.काय हिंमत यांना कोणी प्रश्न विचारेल? सतत पत्रकार परिषदा घेऊन आपली जनतेविषयीची तळमळ लोकांपर्यंत पोहोचविणे हे अशा विभूतींचे कार्यच असते.नाहीतर दुष्ट लोक यांच्याविषयी काहीबाही वाईट बातम्या पेरून लोकांचे मन यांच्याविषयी कलुषित करतात.आता बघा ना.गुजरातमध्ये मोदी की कोण दानव गेली अनेक वर्षे तितल्या जनतेवर अनन्वित अत्याचार करत आहे.खुद्द त्या दानवाने कोणाला पैसे देऊन खुद्द सोमनाथ भारतींच्या पत्रकार परिषदेत पाठविले!! विश्वास बसत नसेल तर हे वाचा. आता मात्र फारच झाले.वेळ आली आहे त्याच सोमनाथाचा तृतीय नेत्र उघडायची.

प्यारे१'s picture

25 Jan 2014 - 12:53 pm | प्यारे१

ऑ????
क्लिंटनशेठ, डिस्क्लेमर द्या की...

अवांतरः पूर्वी निवडणुका झाल्यावर मतमोजणीच्या वेळी योगेंद्र यादव निवडणूक विश्लेषक म्हणून यायचे.
सकाळपासून किंवा रात्रीपासूनच हा माणूस प्रत्येक मतदार संघाला 'सोलत' बसलेला दिसायचा.
उभे आडवे तिरपे छेद देत राजकारणाचे डाव नेमके काय, मतांचे आकडे असे का आले असावेत चे तर्क वगैरे वगैरे.
तेव्हा हा माणूस फार आवडायचा.
आता म्हणे आ आ प ची टोपी घालून इतरांना टोप्या वाटतात. आताही आवडतो पण त्याचा भूतकाळ आठवून.

क्लिंटन's picture

25 Jan 2014 - 1:22 pm | क्लिंटन

ऑ????
क्लिंटनशेठ, डिस्क्लेमर द्या की...

हा हा हा. वरील प्रतिसाद हा उपरोधाचा क्षीण प्रयत्न आहे. हा बघा दिला डिस्क्लेमर.

आता म्हणे आ आ प ची टोपी घालून इतरांना टोप्या वाटतात. आताही आवडतो पण त्याचा भूतकाळ आठवून.

हो अगदी असेच.

मी सोमनाथ भारतींच्या वागणुकीचा आणि वक्तव्यांचा निषेध करतो. मोदींविषयी मला काहीही म्हणायचं नाही कारण मुळात राजकारण ही दुसर्‍यावर सत्ता गाजवायची अत्यंत शूद्र मनोवृत्ती आहे असं माझं मत आहे. इट इज नॉट माय कप ऑफ टी.

मला अरविंद केजरीवालांमधे एक प्रामाणिकपणा दिसला म्हणून इथे प्रतिसाद दिले त्या व्यतिरिक्त त्यांची पार्टी किंवा त्यांच्या पक्ष आणि त्याही पुढे जाऊन पक्षाचा प्रत्येक सदस्य काय करतो किंवा कसं वागतो यावर चर्चा करण्यात मला रस नाही.

अरविंदनं माझं लक्ष वेधून घेण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यानं जनतेच्या विचारांची दिशा राजकारणाकडून प्रश्नसोडवणूकीकडे वळवली. देशाच्या गचाळ राजकारणात बदल करण्याचा हा अत्यंत विधायक प्रयत्न.

सदरहू सदस्यानं इथे दिलेला पहिला प्रतिसादा पाहा : :

केजरीवालांचा अहंमन्यपणा बघून birds of same feather flock together हे म्हणतात हे खरेच आहे हे समजून येते

याचा चाललेल्या चर्चेशी काय संबंध ? प्रतिसादाचा सूर सदस्यांच्या लांगूलचालनाचा प्रयत्न करणारी राजकीय मानसिकता दर्शवतो.

मोदी देखिल हेच करतायंत, ऐका :

आवाजातले निष्कारणचे चढ-उतार, अनर्थकारक हातवारे, उगीचची इमोशनल वाक्य आणि त्यातनं अत्यंत दर्जाहीन लांगूलचालनाचा प्रयत्न :

`अण्णा हजारेजीके महान आंदोलनकी पीठमें छुरा भोंक दिया` `उसकी (आंदोलनकी) बाल मृत्यू हो गई' `जो अण्णा के हो न सके वो आपके नही हो सकते' ये काँग्रेस को झाडू मारके साफ कर देंगे' `ये काँग्रेसकाही खेल है'

नरेंद्र मोदींची आजपर्यंत दखल घ्याविशी वाटली नाही कारण मला राजकारणात रस नाही. बट धिस स्पीच शोज द डट्रीएस्ट पोलिटीकल डिझायर आय हॅव एव्हर सीन.

बंडा मामा's picture

25 Jan 2014 - 6:56 pm | बंडा मामा

माझ्या मते हा ह्या ज्याच्या त्याच्या जडण घडणीचा, विचार क्षमतेचा प्रश्न आहे. मला वैयक्तिकरित्या वरील विडियोतील ऐतिहासिक नाटकातले संवाद म्हंटल्यासारखे केलेले आवेशपुर्ण भाषण आणि हातवारे अत्यंन दांभिक आणि ओंगळ वाटते. एखाद्याला ते भारावुनही टाकू शकते.

वेताळ's picture

25 Jan 2014 - 7:21 pm | वेताळ

एक महान आत्मा जन्माला आला आहे. त्याचे एक तत्व "देतोस का सांग नाहीतर इस्कटुन टाकिन"ह्यावर त्यांनी भर दिला आहे.मोदी चा उदय नाझीचा उदय आहे कि कजरीचा उदय नाझीचा उदय आहे ह्यावर खरतर चर्चा व्हायला हवी.

बंडा मामा's picture

25 Jan 2014 - 7:25 pm | बंडा मामा

अत्यंत चुकिची तुलना आहे. नाझी लोकं कधी त्यांच्या मागण्यांसाठी धरणं धरुन थंडित कुडकुड्त बसलेली दिसली नाहीत.

प्रदीप's picture

25 Jan 2014 - 9:06 pm | प्रदीप

अहो असं काय करता बंडामामा! नाझी वगैरे मंडळी जन्मली तीच थंडीचे लोकरी कपडे घालूनच. नाहीतर त्यांचा जर्मनीतील आणि नंतर पोलंड -रशियामधील थंडीपुढे टिकाव कसा लागला असता बरे? आणि तो हिमलर? त्याच्या बाबतीत वदंता अशी आहे की तो एकदा आघाडीवर भाषणास उभा राहिला, आणि थंडी अशी जबरदस्त म्हणाता, की त्याच्या तोंडातून बाहेर आलेल्या शब्दांचे 'बुडूक बुडूक' असे आवाज होत तात्काळ त्यांचे बर्फच होई! म्हणूनच त्याचे नाव 'हिम'लर असे पडले म्हणे!

तुम्हाला माझ्या प्रतिसादातील 'थंडी' हा एकच शब्द दिसला वाटतं! असो..बाकी ट्रोलिंग चालू द्या

प्रदीप's picture

26 Jan 2014 - 7:33 am | प्रदीप

ट्रोलिंग वगैरे मी करत नाही. तुमचे सर्व प्रतिसाद नुसते उडते, वरवरचे आहेत. आणि तुमच्या उत्तरोतर बिझार होत गेलेल्या प्रतिसादांना माझे अजून बिझार उत्तर होते.

बंडा मामा's picture

26 Jan 2014 - 7:49 am | बंडा मामा

ट्रोलिंग वगैरे मी करत नाही

सगळे ट्रोल्स असेच म्हणतात. धन्यवाद!

नरेंद्र मोदींची तुलना एवढ्यात हिटलरबरोबर करणेही चुकीचे. ६० लाख मृत्यू आणि दोन हजार मृत्यूत काही फरक आहे कि नाही? एवढ्यात मोदींवर एवढे प्रेशर टाकलेत तर पर्फोर्मंस घसरेल ना त्यांचा.

बंडा मामा's picture

25 Jan 2014 - 10:05 pm | बंडा मामा

अर्थातच चुकिची आहे. इथे 'नाझी' आणणे हा मुद्दाच चुकिचा आहे.

विकास's picture

25 Jan 2014 - 10:25 pm | विकास

हे या चर्चेत अवांतर आहे पण फरक दाखवणे गरजेचे वाटते.

नरेंद्र मोदींची तुलना एवढ्यात हिटलरबरोबर करणेही चुकीचे. ६० लाख मृत्यू आणि दोन हजार मृत्यूत काही फरक आहे कि नाही?

हे विधान खोडसाळपणाने केले आहे का अजाणतेपणे माहीत नाही. ते तुम्हालाच माहीत... प्रश्न संख्या किती आहे याचा नाही तर कोणी केले आणि त्या हीन कृत्यास कोण जबाबदार होते हा आहे.

हिटलर ने ज्यूंच्या विरोधात सरकारी यंत्रणा तयार केली होती आणि त्या यंत्रणेने ६० लाख ज्यू आण ७० लाख जिप्सींना मारले. मोदी आणि भाजपा-संघ विरोधकांनी कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी २००२ च्या गुजरात दंगलीत सरकारी यंत्रणेने कुठल्याही समाजाविरोधात काही केल्याचे निष्पन्न झालेले नाही. किंबहूना त्याचा वापर करत स्वतःचे पोट भरणार्‍या टिस्टा सेटलवाड यांनी खोटे बोलल्याचे आणि आता पैशाची अफरातफर केल्याचे बाहेर आलेले आहे. दहा वर्षे जग एका बाजूला आणि मोदी दुसर्‍या बाजूला अशी अवस्था असताना देखील मोदींनी कधी अटकपूर्व जामीन घेतल्याचे ऐकीवात नाही. मात्र टिस्टा आणि त्यांच्या पतीराजांना जावेद आनंदना मात्र अटकपूर्व जामीन घेऊन रहावे लागत आहे. असल्या लोकांच्या म्हणण्यात केवळ स्वतःस सोयीचे म्हणून काहीही विश्लेषण न करता, आंधळेपणाने खरे म्हणणार्‍यां बुद्धीवादींच्या बौद्धीकतेची कीव करावीशी वाटते झालं... असो.

क्लिंटन's picture

25 Jan 2014 - 10:47 pm | क्लिंटन

मानले विकासराव तुम्हाला. अशा लोकांना ज्या चिकाटीने उत्तर देता हे बघून मलाही अशी चिकाटी कधीतरी मिळो असे खरोखरच वाटते :)

बंडा मामा's picture

25 Jan 2014 - 11:27 pm | बंडा मामा

त्यांच्या प्रतिसादाला लगेच सहमतीचे शेपुट लावायची चिकाटी तुमच्याकडेही कमी नाही. त्यानेच त्यांनाही हुरुप येत असावा :)

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Jan 2014 - 2:20 am | हतोळकरांचा प्रसाद

वैकक्तिक हल्ला!! अशाने विषय भरकट्तो!

बंडा मामा's picture

26 Jan 2014 - 7:38 am | बंडा मामा

वैयक्तिक हल्ला वगैरे काही नाही. तसा असता तर तो प्रतिसाद उडवण्या इतके इथले संपादक नक्कीच जागरुक आहेत. हा, थोडा खोडकर आहे पण मूळ प्रतिसादाच१ खोडकर असेल तर मीही स्वतःला थोडी खोडकरपणा करण्याची मुभा देतो.


मूळ प्रतिसाद; अधोरेखित उल्लेख पाहावा.
अशा लोकांना ज्या चिकाटीने उत्तर देता..

क्लिंटन's picture

26 Jan 2014 - 9:15 am | क्लिंटन

जाऊ द्या हो प्रसादराव. परत एकदा birds of same feather flock together असे म्हणायचा मोह आवरत नाही.अत्यंत अहंमन्यपणाबद्दल आजपर्यंत शेकडो वेळा विविध मिपाकरांकडून शाब्दिक ताडन झालेले एक सन्माननीय सदस्य आणि दुसरे एक तितकेच सन्माननीय सदस्य यांच्यात एकवाक्यता होत असेल तर ते birds of same feather झालेच की.अशा पक्षांविषयी काय बोलावे?शेवटी बोलणाऱ्याचे तोंड आपण धरायला जाऊ शकत नाही. एकेकाळी अशांचे लिहिणे मला फार लागत असे.पण आता (वयानुरूप :) ) परिपक्वता आली आहे.अशांना सांगणे एकच--"बोला हवे ते मला काय त्याचे पुरे जाणतो मी माझे बल".

धन्यवाद.

बंडा मामा's picture

26 Jan 2014 - 9:26 am | बंडा मामा

तुमच्या ह्या प्रतिसादावरुन तुम्हाला अजूनही विरोधी विचार तितकेच लागतात असे वाटते. तेव्हा परिपक्वतेकडे वाटचाल चालू ठेवा.

क्लिंटन's picture

26 Jan 2014 - 9:33 am | क्लिंटन

तुमच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

क्लिंटन's picture

26 Jan 2014 - 9:08 am | क्लिंटन

त्यांच्या प्रतिसादाला लगेच सहमतीचे शेपुट लावायची चिकाटी तुमच्याकडेही कमी नाही. त्यानेच त्यांनाही हुरुप येत असावा

सहमत आहे.