ऐश्वर्य

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
5 Dec 2013 - 2:53 pm

एकत्रित असलेली काही नि:स्वार्थी नाती आणि काही वेळा काही मित्र/ मैत्रिणी ;
काळागणिक संवेदना अन् नाते विसरून व्यवहारी बनतात, अशाच काही व्यवहारी
लोकांच्यात; एकट्या पडलेल्या एका नि:स्वार्थी मनाचे चित्रण मांडण्याचा; प्रयत्न.

दिवस आजवरले, असे रंगलेले
नात्यांच्या गोडीतले, असे मौजलेले ll १ ll

कळीकाळ बदललेले, सारेच बेरंगलेले
व्यवहार मनी कोरलेले, ते नातेच निर्ढावलेले ll २ ll

संस्कार उध्वस्तलेले, पैशास धास्तावलेले
संवेदन मनातले, दिवसागणिक संपलेले ll ३ ll

देह सुबत्ती हरवलेले, मन धुंदीत लपेटलेले
त्यांच्या लेखी पटावरले, सारे गणित बदललेले ll ४ ll

त्यांच्या गटात न बसलेले, मी मलाच पाहिलेले
सारे पैशात तोललेले, नाते असे दुरावलेले ll ५ ll

जुने चित्र स्मृतीतले, या घटकेस बदललेले
काळानेच मला वाटले, फासे असे फेकलेले ll ६ ll

क्षण जिव्हारी लागलेले, मनावरी फार बेतलेले
त्यांच्या नजरेत पाहिले, फक्त ऐश्वर्य दाटलेले ll ७ ll

www.saarthbodh.com

जीवनमान

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Dec 2013 - 6:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुमचे आडनाव "लेले" आहे का हो?