पत्रिका एक बघणे....

ज्ञानव's picture
ज्ञानव in काथ्याकूट
28 Nov 2013 - 10:12 am
गाभा: 

खालील विषयावर तज्ञांकडून माहिती हवी आहे.

जर जन्मवेळ, ठिकाण, जन्म तारीख दिली तर पत्रिका मांडून भविष्य कथन करता येते (हा ढोबळ भाग आहे खोलात शिरून वाद विवाद अपेक्षित नाही) म्हणजे विद्या, संतती, धन-संपत्ती, गंडांतर येईल नाही येईल वगैरे वगैरे.
पण जर मृत्यू समय, मृत्यू तारीख, मृत्यू ठिकाण दिले तर त्या माणसाचा पुनर्जन्म होईल का?, केव्हा होइल?, कि होणारच नाही वगैरे सांगता येते का ?

तसेच,

दि : १/११/१९६७
वेळ: : ९.४५ सायंकाळी
स्थळ : mumbai

वरील माहिती वरून मृत्यूची दिनांक, वेळ, स्थळ, प्रकार (नैसर्गिक, अपघात, आत्महत्या वगैरे )कुणी सांगू शकेल का?

इथे तज्ञांनी सकारण, सोदाहरण आणि मला पामराला समजेल अशा अतांत्रिक पद्धतीने मार्गदर्शन करावे हि विनंती.

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Nov 2013 - 11:08 am | पैसा

दि : १/११/१९६७
वेळ: : ९.४५ सायंकाळी
स्थळ : mumbai

ही कसली वेळ आहे हो? नै, म्हणजे मला त्यातलं कै कळतं अशातला भाग नै, पण माहितगार सांगू शकतील.

ज्ञानव's picture

28 Nov 2013 - 11:16 am | ज्ञानव

ती जन्म वेळ आहे.
कारण त्याखाली मृत्यू संदर्भात फलादेश विचारला आहे.

पैसा's picture

28 Nov 2013 - 11:19 am | पैसा

एखाद्या माणसाची मरण्याची वेळ आणि ठिकाण सांगितलं, अगदी पत्रिका दिली, फक्त नाव लपवलं तर ज्योतिषी लोक मृत्यूचे कारण आणि वय सांगू शकतील का?

ज्ञानव's picture

28 Nov 2013 - 11:31 am | ज्ञानव

मलाही त्यातले फारसे काही कळते असे नाही. पण कुतूहल म्हणूनच हा धागा विणण्याचा प्रयत्न केला आहे. ज्योतिषी सांगतीलच काही बाही.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Nov 2013 - 11:41 am | प्रकाश घाटपांडे

पैसा ताई पत्रिका ही जन्मवेळचा नकाशा असल्याने वय सांगता येईल पण मृत्यूचे कारण सांगता येणे अवघड आहे. . आम्ही याविषयी प्रयोग केले आहेत. एका गृहस्थाच्या मुलाने तरुणवयात अमेरिकेत आत्महत्या केली. आम्ही त्याची प्रथितयश ज्योतिषाने बनविलेली कुंडली एका ठाण्याच्या ज्योतिषाला त्याच्या मागणीवरुन पाठविली. त्यासोबत जन्मवेळ, जन्मस्थळ व जन्मतारीख ही पाठविली. आम्ही सगळी माहिती खरी दिली व फक्त मृत्यू हा कसा व १९८० ते १९९० या काळात कुठल्या वर्षी झाला असेल एवढेच विचारले. त्याला ज्योतिषाने तयार केलेली कुंडली पाठविली. ती कुंडलीसुद्धा चुकीची निघाली. त्याने ती स्वत: तपासून नवीन बनविली व त्यावरुन एक वर्ष दिले ते मृत्यू वर्षाच्या जवळपाससुद्धा नव्हते. सदर आवाहन हे धनुर्धारी मे २००० चा अंक या ज्योतिषांच्या व्यासपीठावरच मांडले गेले होते.
( उधृत ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद)

पैसा's picture

28 Nov 2013 - 11:46 am | पैसा

वाटलंच होतं. तुम्ही प्रत्यक्षात पुरावा दाखवल्यामुळे अगदी "हा सूर्य आणि हा जयद्रथ" समोर आहे. धागाकर्त्याने तुमचे इथले लेख वाचले तरी त्यांना बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळून जातील! धन्यवाद!

म्रुत्यु ची वेळ आणी कारण त्रोटक पणे सांगता येते . पण ठाम पणे कुणी सांगत नाही .
एखाद्या व्यक्तीला त्याची अंतीम वेळ आणी कारण सांगणे ज्योतीषशास्त्रात बसत नाही असे वाचलय .

प्रकाश घाटपांडे's picture

28 Nov 2013 - 11:51 am | प्रकाश घाटपांडे

ज्ञानव; गंमत म्हणुन सुद्धा या फंदात पडू नका. अज्ञातात आनंद माना. अशा प्रश्नांमुळे स्वतःचे व कुटुंबाचे मनस्वास्थ बिघडलेली केस आम्ही अनुभवली आहे

ज्ञानव's picture

28 Nov 2013 - 2:11 pm | ज्ञानव

सल्ल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
पण इथे विश्वास / अविश्वास हा मुद्दा नसून जे कुणी ह्या विषयातले तज्ञ आहेत त्यांनी सांगावे कि जन्म कुंडली पाहून जसे मृत्यूचे भाकीत करता येते तसे मृत्यू कुंडली मांडून पुनर्जन्माबद्दल कुणी सांगू शकते का ? ज्योतिष हे थोतांड आहे कि नाही ह्या हि फंदात मला पडायचे नाही कारण कुणाचे मत परिवर्तन करण्याइतकी कुवत माझ्यात नाही.

पण जे कुणी ह्या विषयातले जाणकार आहेत त्यांनी माझ्या वरील मुद्द्यांबाबत विवेचन करावे एवढेच मला वाटते.
ज्यांना ज्योतिष थोतांड आहे असे वाटते आणि थोतांड नाही असे वाटते त्यांच्याशी माझे काहीच वाद विवाद नाहीत. ज्याला त्याला मत स्वातंत्र्य नक्कीच आहे.

पण गंभीरपणे मुद्दा लक्षात घेऊन वरील मुख्य धाग्याबाबतीत कुणीतरी आपली मते मांडावीत.

अग्निकोल्हा's picture

28 Nov 2013 - 3:39 pm | अग्निकोल्हा

.

चित्रगुप्त's picture

28 Nov 2013 - 4:36 pm | चित्रगुप्त

नेमके काय विचारायचे आहे, आणि ते जाणून घेण्यामागे हेतु काय आहे?
हे समजले तर एक चांगले ज्योतिषी आहेत, त्यांना विचारून बघता येईल.
....पुनर्जम असतो, असे इथे गृहित धरलेले आहे, तसे समजा नसलेच, तर?

ज्ञानव's picture

28 Nov 2013 - 4:50 pm | ज्ञानव

गर्भित हेतू असे काही नाही.
जसे जन्म कुंडली वरून मृत्यू काढतात तसे मृत्यू कुंडली वरून पुनर्जन्म केव्हा होईल? इतके साधे....हेतू असा काही नाही केवळ उत्सुकता शमवणे.
पुनर्जन्म असतो असे एकदा का गृहीतच धरले आहे तर तसे नसलेच तर ह्याबाबत कसा विचार करणार...जे वर मांडलाय त्यावर तुमचे ज्योतिषी काय सांगतात ते लिहा जमल्यास इतकेच म्हणू शकतो.

पण ज्योतिष्विद्या हे सांगु शकतात का? कारण त्याविषयी तरी ज्योतिष विद्येला मर्यादा आहेत असे ऐकुन आहे.

अग्निकोल्हा's picture

28 Nov 2013 - 11:05 pm | अग्निकोल्हा

अनुभव घेतलाय का ?

अनिरुद्ध प's picture

29 Nov 2013 - 11:48 am | अनिरुद्ध प

माझ्या वाचनानुसार्,ज्योतिष विद्येला मर्यादा आहेत्,पण उच्च अध्यात्मिक पातळी असलेल्या व्यक्तिना याविषयीची कल्पना असते,त्यामुळे त्याना पशुपक्षी यान्च्या भाषेचे ज्ञान असते,त्यामुळे फक्त पोपट्च काय ईतर प्राण्यावरुन सुद्धा भविष्य सान्गता येते असे ऐकुन आहे.

कारण पोपट बोलत नाही तो फक्त कार्ड उचलून देतो ज्यावर मनुक्षाला समजेल आशा भाषेत उत्तर लिहलेले असते.

अनिरुद्ध प's picture

29 Nov 2013 - 5:05 pm | अनिरुद्ध प

बोलत नाहीत? मी स्वता बोलणारे पोपट बघीतले आहेत्,जे शिकवलेली वाक्य बोलतात.

कधी?

अनिरुद्ध प's picture

29 Nov 2013 - 5:23 pm | अनिरुद्ध प

अगोदरच 'नाही' असे उत्तर दिले आहे.(आणि ज्यान्ची अध्यात्मिक पातळी उन्च असते ते माझ्यामते रस्त्यावर पोपट घेवुन लोकांचे भविष्य सान्गत बसत नाहीत.)

तर मी "अनुभव" विचारला होता....

अनिरुद्ध प's picture

30 Nov 2013 - 1:16 pm | अनिरुद्ध प

व्य नि केला आहे,उगाच व्यक्तिगत गैरसमजासाठी धाग्याची दिशाभुल नको.

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2013 - 11:50 am | टवाळ कार्टा

सगळ्यांनाच समजुदेकी

सुहास..'s picture

29 Nov 2013 - 12:02 pm | सुहास..

छान !!

आता काही नवीन धागे येवु द्यात

१ ) लोणी एक पावाला लावणे
२ ) कळफलक एक बडविणे
३ ) नाष्टा एक करणे
४ ) बॅन्डविड्थ फुकाची वापरणे
५ ) नाडी एक आवळणे
.
.
.
.
सो ऑन !!

ब्रंम्हवंदीय मित्रावर्यांना जास्तीची कामे न लावणारा
समटाईम्स अनिसवाला वाश्या

प्रसाद गोडबोले's picture

29 Nov 2013 - 8:52 pm | प्रसाद गोडबोले

५ ) नाडी एक आवळणे

आवळणे ?? छ्या: भलतीच निराशा केली राव तुम्ही .... जरा कल्पनाशक्तीला आवळा ...

वचने किं दरिद्रता ? बोलताना कशाला कल्पनादारिद्र दाखवायचे ;)

प्रसाद गोडबोले's picture

29 Nov 2013 - 5:15 pm | प्रसाद गोडबोले

माझ्या अभ्यासानुसार ,

दि : १/११/१९६७
वेळ: : ९.४५ सायंकाळी
स्थळ : mumbai

सदर व्यक्ती ऑलरेडी डेड आहे .... किंव्वा जिवंत असेल तर लवकरच मृत्यु योग आहे ...ॐ फट् स्वाहा: :D

अव्यक्त's picture

29 Nov 2013 - 5:59 pm | अव्यक्त

श्री प्रकाशजी , आपल्या सारखा एखादा अभ्यासू ज्योतिषी जो ठाण्यात राहतो (आपल्या ओळखीचा) अचूक होरा असलेला नाव व पत्ता देता का? आपण कुठे राहता ठाण्यात का ?हात दाखवून अवलक्षण करीन म्हणतोय…

प्रकाश घाटपांडे's picture

30 Nov 2013 - 8:24 am | प्रकाश घाटपांडे

माझ्या परिचयाचे कुणी नाही. पण ठाणे डोंबिवली ही ज्योतिषांसाठी सुपीक भूमी आहे. मी पुण्यात राह्तो

पुतळाचैतन्याचा's picture

29 Nov 2013 - 9:13 pm | पुतळाचैतन्याचा

मृत्यू केव्हा झाला आणि कसा झाला हे ढोबळ्मानने सांगता येइल…ग्रह स्तिथी काही वेळा निश्चित्पणे सांगू शकते ….उदा. अपघाती(आग, पाण्यात बुडून वगेरे), शांतपणे…कुंडली पाहणे हे डेटा अनालिसिस सारखे आहे ….फ़ार वर्षांनी आणि अनुभवांनी नीट सांगता येते….धोण्डोपन्त (मुंबई) किंवा श्रीराम भट(पुणे) यांना विचारा.

टवाळ कार्टा's picture

30 Nov 2013 - 9:32 am | टवाळ कार्टा

मुंबैवालेतर कानातले झुमके हरवले तरी पत्रिका बघुन सांगतात कुठे मिळतीलते ;)

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2013 - 10:30 am | अत्रुप्त आत्मा

कारण त्यांन्ना मुंबैची कुंडली माहीत असते! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

अनिरुद्ध प's picture

3 Dec 2013 - 5:00 pm | अनिरुद्ध प

असा अनुभव नाही ,परन्तु प्रष्णकुन्डली मांडुन हरवलेल्या गोष्टीचा शोध घेता येतो असे ऐकुन आहे.

सतिश गावडे's picture

11 May 2017 - 8:46 am | सतिश गावडे

तुम्ही शोध घेण्याच्या गोष्टी करत आहात; मंत्रजपाने हरवलेल्या गोष्टी आपोआप मिळतात.

कंजूस's picture

1 Dec 2013 - 11:05 am | कंजूस

Planet's Position at Birth
Time
Planet Sign Degree Lord Nakshatra Pad Lord S. Lord Position
Asc Gemini 11 30 42 Mer Ardra 2 Rah Sat
Sun Libra 15 09 12 Ven Swati 3 Rah Ket Deb
Mon Libra 07 06 10 Ven Swati 1 Rah Rah Com
Mar Sagittarius 13 41 16 Jup P.Asadha 1 Ven Ven
Mer(R) Libra 15 04 07 Ven Swati 3 Rah Ket Com
Jup Leo 08 37 17 Sun Magha 3 Ket Jup
Ven Leo 28 47 30 Sun U.Phalguni 1 Sun Mar
Sat(R) Pisces 13 27 20 Jup U.Bhadrapada 4 Sat Rah
Rah(R) Aries 04 32 51 Mar Ashwini 2 Ket Mon
Ket(R) Libra 04 32 51 Ven Chitra 4 Mar Ven
Ura Virgo 04 02 31 Mer U.Phalguni 3 Sun Sat
Nep Scorpio 00 06 36 Mar Vishakha 4 Jup Mon
Plu Leo 28 40 01 Sun U.Phalguni 1 Sun Mar

ज्ञानव's picture

1 Dec 2013 - 10:32 pm | ज्ञानव

कुंडली बरोबर मांडली आहे.

सतिश गावडे's picture

11 May 2017 - 8:47 am | सतिश गावडे

इंटरनेट वापरता येणारा कुणीही हे करु शकतो. अशी कुंडली मांडून देणार्‍या वेबसाइट ढीगाने आहेत.

कंजूस's picture

1 Dec 2013 - 11:13 am | कंजूस

ज्ञानव ,

१)मृत्युचे कारण पोटाचे आजार अथवा उंचावरून पडणे .
२)कुंडली मोक्ष दाखवत नाही .
३)जातकाची स्वत:चीच इच्छा बाकी आहे काही परोपकार करण्याची .

ज्ञानव's picture

1 Dec 2013 - 12:25 pm | ज्ञानव

वरील माहिती वरून मृत्यूची दिनांक, वेळ, स्थळ, प्रकार (नैसर्गिक, अपघात, आत्महत्या वगैरे )कुणी सांगू शकेल का?<< मी ह्यात जास्त इंटरेस्टेड आहे.

तसेच पुनर्जन्माचे आणि मृत्यू कुंडलीचे काही नाते आहे का ? म्हणजे जर जन्म कुंडली पाहून मृत्यू सांगतात तर मृत्यू कुंडली पाहून पुनर्जन्म (केव्हा, कुठे )असे काही सांगता येते का?

जर येते तर कसे ? काय तर्क आहेत त्यामागे ?

ज्ञानव's picture

1 Dec 2013 - 12:27 pm | ज्ञानव

वरील माहिती वरून मृत्यूची दिनांक, वेळ, स्थळ, प्रकार (नैसर्गिक, अपघात, आत्महत्या वगैरे )कुणी सांगू शकेल का? <<< मी ह्यात जास्त इंटरेस्टेड आहे.

तसेच पुनर्जन्माचे आणि मृत्यू कुंडलीचे काही नाते आहे का ? म्हणजे जर जन्म कुंडली पाहून मृत्यू सांगतात तर मृत्यू कुंडली पाहून पुनर्जन्म (केव्हा, कुठे )असे काही सांगता येते का?

जर येते तर कसे ? काय तर्क आहेत त्यामागे ?

अग्निकोल्हा's picture

1 Dec 2013 - 12:43 pm | अग्निकोल्हा

हा प्रकार मी प्रथमच ऐकत आहे. जन्मकुंडलि माहीत आहे. त्यावरून पुन्हा पुनर्जन्म कुंडली मांडने सारखे कोम्प्लिकेषन फक्त नाडी ग्रन्थच सोडवतात. ओक साहेबांना बोलवा

पुनर्जनमाचे भाकिताबद्दल काय आधार आहे त्याची कल्पना नाही .
शिवाय याचा पडताळा कसा घेणार ?
खरोखरच याचाच अमूक ठिकाणी जन्म झाला हे कसे ठरणार ?

ज्ञानव's picture

1 Dec 2013 - 10:17 pm | ज्ञानव

मागील जन्मीचे संचित सांगणारे मी पहिले आहेत त्यामुळे पुनर्जन्म ते मानतात प्रश्न असा आहे कि मृत्यूची वेळ कळल्यावर पुनर्जन्म किती वर्षाने होईल हे कुणी सांगू शकते का? मुळ धाग्यात दिलेल्या जन्म वेळेनुसार मृत्यू कधी कुठे कसा होईल हे तुम्ही सांगू शकता का ? असे मी म्हंटले आहे. परंतु दुर्दैवाने कुणीही मूळ प्रश्न काय हेच पाहत नाही आहे.

पुतळाचैतन्याचा's picture

1 Dec 2013 - 8:56 pm | पुतळाचैतन्याचा

मृत्यू झाला असायची शक्यता दाट आहे. तुला राशीची साडेसाती चालू आहे. अपघाताची शक्यता सर्वात जास्त. फेब. १३ ते सप्टे. १३ च्या मध्ये अपघात झाला का ? आणि गुडघ्याला मार लागला असायची शक्यता आहे. बायको मीन राशीची आहे का? लग्न, शिक्षण आणी मुले यात अडथळे होते का? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास कुंडली बरोबर आहे हे सिद्ध होईल आणि नीट सांगता येईल.

ज्ञानव's picture

1 Dec 2013 - 10:08 pm | ज्ञानव

@ पुतालाचैतान्या जी
१) बायको किंवा नवरा मीन नाही.
२) अपघात झालेला नाही.
३)लग्न शिक्षण मुले सामान्य काहीही प्रोब्लेम नाही

@सर्वांसाठी
कृपया धागा नीट वाचवा हि विनंती आहे.

प्रसाद गोडबोले's picture

2 Dec 2013 - 6:26 pm | प्रसाद गोडबोले

तुमचे लोकेशन दहिसर , मुंबई असे गृहित धरुन आणि धाग्याची जन्मवेळ 28/11/2013 - 10:12 धरुन कुंडली मांडली असता
हा धागा बरेचसे लोक फाट्यावर मारतील व आपल्या धाग्यात विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळणार नाही असे स्पष्ट दिसत आहे

:D

ज्याची पत्रिका आहे तो माणूस तापट स्वभावाचा दिसतोय.

प्रभाकर पेठकर's picture

2 Dec 2013 - 3:58 pm | प्रभाकर पेठकर

जन्म पत्रिकेवरून अचूक मृत्यू तारीख आणि कारण कोणी सांगितल्याचे माझ्या आयुष्यात मी पाहिलेले नाही. खुद्द ज्याचा मृत्यू होतो त्याला मृत्यूपूर्वी कांही काळ तशी भावना (आपला मृत्यू समिप आल्याची) निर्माण होण्याची शक्यताही असू शकते आणि तशा कथा ही ऐकलेल्या आहेत. कांही अंशी अशा गोष्टीचा जवळून अनुभवही घेतला आहे. पण म्हणतात नं, ' आप मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.' त्यामुळे मला स्वतःला तसा अनुभव आला (आणि हातात वेळ असेल ...) तर मी नक्कीच मिपावर तसा तपशिल डकवून नंतरच प्राण सोडेन.
मला वाटतं माझ्या कुटुंबियांप्रती असणारी माझी सर्व कर्तव्य पार पडल्यावर मी केंव्हाही मरायला तयार असेन. मृत्यूची वेळ कशाला जाणून घ्यायची. कांही कारणाने मृत्यू समिप आहे अशी परिस्थिती निर्माण झाली (जसे, कॅन्सर, एडस वगैरे) तर कुटुंबियांप्रती आपली कर्तव्यपूर्तीसाठी हाती असणारा वेळ जाणणे एव्हढेच त्याला महत्व आहे. अन्यथा, मृत्यू कधी आहे हे शोधून काढण्याच्या भानगडीत पडू नये.

माझ्या एका मित्राच्या आजाराचे कॅन्सर असे निदान झाले. त्याचा पहिला प्रश्न डॉक्टरांना होता, 'डॉक्टर, माझ्या हाती किती वेळ आहे?, पाच वर्षे?' डॉक्टर म्हणाले,' नक्कीच जास्त वेळ आहे, काळजी करू नका.' त्यावर 'किती काळ हाती आहे हे का जाणून घ्यायचे आहे (जसे, कुटुंबाची काळजी. एकुलता एक मुलगा लहान होता) हे डॉक्टरांना सांगून पुन्हा विचारणा केली असता विचार करून डॉक्टर म्हणाले, 'कॅन्सरच्या वाढण्याचा आत्तापर्यंतचा अल्प वेग पाहता, अजून १५ वर्षे आहेत असे मी म्हणू शकतो. पण मी ब्रह्मदेव नाही. कमी जास्तही असू शकेल.' असो. त्या नंतर त्या मित्राने आयुष्यात प्लॅन केलेल्या गोष्टी तातडीने पूर्ण करायला घेतल्या. मस्कत सोडून कॅनडात स्थायिक झाला. मुलाचे शिक्षण पूर्ण होवून मुलाला कॅनडात नोकरी लागली. त्याचे (जरा लवकरच) लग्न लावून दिले, नातवालाही खेळवले. शेवटी जेंव्हा ६ महिने राहिले. तेंव्हा त्याने स्वतःच्या दहनविधीची वगैरे सोय कॅनडातील एका संस्थेत करुन, सर्व मित्रांना, परिचितांना 'शेवटचा' ईमेल पाठवून कळत/नकळत झालेल्या चुकांबद्दल माफी मागून, शेवटचा श्वास घेतला.

पुनर्जन्माबद्दल म्हणता येईल की 'आप मरे तो दुनिया डुब गयी।' तेंव्हा चिंता कशाकरिता? समजा, पुनर्जन्म आहे, अमूक एक दिवशी आहे हे समजले तरी त्या व्यक्तीला मागचा जन्म आठवणार आहे का? मग त्या व्यक्तीच्या पुनर्जन्माबद्दलचे आपले एकतर्फी द्यान काय कामाचे?

उत्तरे मिळाली तरी त्याच्या सत्यतेची हमी कोण देणार (त्या ज्योतिषाव्यतिरिक्त)? ह्या माहितीचा माझ्या आजच्या आयुष्यात (वर लिहीलेला मर्यादित उपयोग सोडून) उपयोग काय? केवळ कुतुहलापोटी त्यावर विचार-चर्चा करण्यात वेळ घालविण्यापेक्षा आहे त्याच आयुष्याचे सोने करण्यासाठी काय करता येईल ह्यावर विचार आणि कृती करण्यासाठी वेळेचा वापर करणे जास्त सयुक्तिक होईल असे वाटते.

सुबोध खरे's picture

2 Dec 2013 - 6:40 pm | सुबोध खरे

क्या बात है? सोळा आणे सत्य

प्रकाश घाटपांडे's picture

2 Dec 2013 - 8:00 pm | प्रकाश घाटपांडे

वा क्या बात है! अगदी उत्तम प्रतिसाद! एक प्रश्न विचारावासा वाटतो. तुमच्या मित्राचे व्यक्तिमत्व सश्रद्धतेकडे झुकणारे होते कि अश्रद्धते कडे? साधारण पणे कल कळतो.
...<<अतिरेकी अश्रद्ध <<अश्रद्ध<<......०........>>सश्रद्ध>>अतिरेकी सश्रद्ध>>...

प्रकाश घाटपांडे's picture

2 Dec 2013 - 8:04 pm | प्रकाश घाटपांडे

-----अतिरेकी अश्रद्ध------ अश्रद्ध .......० ......सश्रद्ध------अतिरेकी सश्रद्ध------

प्रभाकर पेठकर's picture

2 Dec 2013 - 8:15 pm | प्रभाकर पेठकर

तुमच्या मित्राचे व्यक्तिमत्व सश्रद्धतेकडे झुकणारे होते कि अश्रद्धते कडे? साधारण पणे कल कळतो.

प्रश्न नीट कळला नाही. आपल्या अगदी जवळच्या मित्राची अशी ईमेल आली की तो सश्रद्ध आहे की अश्रद्ध ह्यावर विचार करता येतच नाही. डोळे पाण्याने आणि मन त्याच्या सोबत व्यतित केलेल्या क्षणांच्या आठवणीत बुडून जाते. मेंदूची कवाडे बंद होतात. एक बधिरावस्था येते. असो. कोणालाही असा अनुभव येऊ नये, एवढीच इच्छा.

तसेही, मृत्यू समिप आल्यावर सश्रद्ध आणि अश्रद्ध शब्दांना किती महत्व उरते?

प्रकाश घाटपांडे's picture

2 Dec 2013 - 8:29 pm | प्रकाश घाटपांडे

प्रश्नाचा उद्देश असा की तुमच्या विचारांचा भावनांचा तुमच्या निर्णयप्रक्रियेवर परिणाम होत असतो. एखाद्या कठीण प्रसंगात तो जे वागतो त्याचा त्याच्या व्यक्तिमत्वाशी संबंध असतो. एखाद्या प्रसंगा मुळे/ परिस्थितीमुळे त्याच्या व्यक्तिमत्वात बदल होउ शकतो. श्रद्धा ही शॉक अबसॉर्बर सारखी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर काम करते. माणूस बदलत असतो. एक उत्सुकता म्हणुन मी विचारले.

तसेही, मृत्यू समिप आल्यावर सश्रद्ध आणि अश्रद्ध शब्दांना किती महत्व उरते?

खर आहे व मान्यही आहे. पण एक गोष्ट आठवली. बी प्रेमानंद अखेर च्या दिवसात जेव्हा मृत्युशय्येवर होते त्यावेळी काही लोकांना ते अस्तिक झाल्याचे वाटले. ही अफवा असल्याचे रॅशनॅलिस्ट लोकांनी नंतर सांगितले. त्यांच्याकडून आपण अजूनही देवावर विश्वास ठेवत्॑ नसल्याचे लिहून घेतले.

ज्ञानव's picture

3 Dec 2013 - 8:56 am | ज्ञानव

विचारांचा, भावनांचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या भौतिक यशापयशाचा परिणाम तुमच्या निर्णय प्रक्रियेवर पडत असतो...कदाचित असे असेल हे.

... महाराष्ट्रातील पुरोगाम्यांचे प्रेरक, बी प्रेमानंदांची अशी अवस्था व्हावी...?
...जी विचाधारा आयुष्यभर उराशी बाळगली, त्याच्या विपरीत अंतिम समयी प्रत्ययाला आले? शेवटच्या क्षणी एखाद्याची मृत्युपत्रावर बळजबरीने स्वाक्षरी करवतात वा मिळवतात तशी अनुयायांच्या प्रेमाखातर त्यांच्यावर वेळ यावी ! हे अतीच झाले.
... अशी बळजोरा-जोरी करावी लागली म्हणून त्यांचे मतपरिवर्तन झाले असावे, हे इतरांचे म्हणणे खरे वाटू लागते. हा परिणाम तर उलटा झाला.
आता पकाकाका तुम्हीच म्हणता म्हणून ... तुम्ही म्हणतात ते खोटे असेल असे म्हणायची इथे वावरणाऱ्या पुरोगाम्यांची कोणाची टाप नाही... तरीही हार्ड कोअर रॅशनॅलिस्ट असे झालेच नाही, असूच शकत नाही असे दावे करून आपल्याला बदनाम न करोत म्हणजे मिळवली.

विविध प्रकरणांमुळे शरपंजरी, घायाळ पडलेल्या महाराष्ट्र शासनाला ते सत्तेवरून जाण्याआधी जादूटोणा बिलावर सही करायला भाग पाडणारे प्रयत्न पाहून मराठी जनतेला तसे वाटले तर नवल नाही..

मृत्युन्जय's picture

5 Dec 2013 - 11:01 am | मृत्युन्जय

तसा प्रश्न सोपा आहे पेठकर काका. साधारणपणे अश्रद्ध लोकांची अशी श्रद्धा असते की अश्रद्ध लोक मानसिकरीत्या कणखर असतात कारण ते त्यांच्या अडचणींचे निवारण होण्यासाठी देवावर अवलंबुन नसतात तर स्वतःच्या अडचणी स्वतःच सोडवतात. या केसमध्ये तुमचा मित्र अश्रद्ध असेल तर या अनुमानाला पुष्टी मिळेल कारण तो मित्र खुपच धीरोदात्तपणे मृत्युला सामोरा गेला.

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2013 - 12:06 pm | प्रभाकर पेठकर

आपल्या अगदी जवळच्या मित्राची अशी ईमेल आली की तो सश्रद्ध आहे की अश्रद्ध ह्यावर विचार करता येतच नाही. डोळे पाण्याने आणि मन त्याच्या सोबत व्यतित केलेल्या क्षणांच्या आठवणीत बुडून जाते. मेंदूची कवाडे बंद होतात. एक बधिरावस्था येते.

माझ्या प्रतिसादातील वरील विधाने ह्याच मुद्द्यावर प्रकाश टाकणारी आहेत. थोडक्यात तो अश्रद्ध की सश्रद्ध हा विचारच माझ्या मनाला कधी शिवला नाही.

साधारणपणे अश्रद्ध लोकांची अशी श्रद्धा असते की अश्रद्ध लोक मानसिकरीत्या कणखर असतात कारण ते त्यांच्या अडचणींचे निवारण होण्यासाठी देवावर अवलंबुन नसतात तर स्वतःच्या अडचणी स्वतःच सोडवतात.

मानसिकरित्या कणखर असतात असा अश्रद्धांचा समज असतो वगैरे तुम्ही म्हणताय तसे असेलही, मी नाकारात नाही. पण मला वाटतं अश्रद्ध व्यक्ती नुसत्या श्रद्धेपोटी एखादी गोष्ट मान्य करण्याऐवजी तर्काच्या कसोटीवर उतरणार्‍या गोष्टींना जास्त मानतात.

शिवाय सश्रद्ध आणि अश्रद्ध ह्या दोन टोकांच्या अवस्थांमध्ये मनाचे अनेक रंग असतात. जसं माझं स्वतःचं आहे. मी पूर्ण सश्रद्धही नाही आणि पूर्ण अश्रद्धही नाही. ईश्र्वरावर श्रद्धा असावी. ती मनोबळ वाढविणारी असते. पण एखाद्या समस्येत ईश्वर सर्वकांही ठिक करेल असे म्हणून हातावर हात ठेवून बसणे मला पटत नाही पराकोटीचे प्रयत्न करीत राहणे मला योग्य वाटते. 'प्रयत्नांती परमेश्वर' ह्याचा अर्थ पराकोटीचे प्रयत्न करीत राहा आणि शेवटी परमेश्वर यश देईलच हा विश्वास बाळगा, हा आहे.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यावर मिपावर आधीच बरेच चर्वितचरण झालेले आहे तेंव्हा इथेच आटोपतो.

सुहासदवन's picture

6 Dec 2013 - 6:01 pm | सुहासदवन

अगदी अगदी परफेक्ट

प्रसाद गोडबोले's picture

2 Dec 2013 - 8:24 pm | प्रसाद गोडबोले

मला वाटतं माझ्या कुटुंबियांप्रती असणारी माझी सर्व कर्तव्य पार पडल्यावर मी केंव्हाही मरायला तयार असेन

माथा प्रंपंचाचे ओझे | घेवुन म्हणे माझे माझे |
बुडताही न सोडे फुजे | अभिमाने ||

कैची माता कैचा पिता | कैची बहीण कैचा भ्राता |
कैची मित्र पुत्र वनिता | कळत्रादिक ||

हे तो सारी मायेची | अवघी सोयरीक सुखाची |
हे तुझे सुख दु:खाची| सांगाती नव्हेती |

येच क्षणी मरोनि जासी | तरी रघुनाथी अंतरलासी |
माझे माझे ,म्हणतोसी | म्हणोनिया ||
.
.
.
.
.

येवं इतुका वेढा लावली | ते मायाचि खेळे येकली |
ते मायेनेच वारली | पाहिजे माया ||

असो.
अवांतरा बद्दल क्षमस्व .
पुनःस्मरण करुन दिल्याबद्दल धन्यवाद :)

प्यारे१'s picture

2 Dec 2013 - 8:34 pm | प्यारे१

हे 'आत' पक्कं हवं दादा!
दाखवण्यासाठीची ही गोष्ट नव्हे. समोरच्या माणसात रघुनाथ नाही का काय?

समोर माणूस असला की माणसातल्या रघुनाथाला नि समोर माणूस नसला की आपल्यातल्या आत्मारामाला भजा.
काम होतंय. :)

अवांतराबद्दल मी सुद्धा क्षमस्व .

प्रभाकर पेठकर's picture

2 Dec 2013 - 8:38 pm | प्रभाकर पेठकर

माथा प्रंपंचाचे ओझे | घेवुन म्हणे माझे माझे |
बुडताही न सोडे फुजे | अभिमाने ||

कैची माता कैचा पिता | कैची बहीण कैचा भ्राता |
कैची मित्र पुत्र वनिता | कळत्रादिक ||

हे तो सारी मायेची | अवघी सोयरीक सुखाची |
हे तुझे सुख दु:खाची| सांगाती नव्हेती |

येच क्षणी मरोनि जासी | तरी रघुनाथी अंतरलासी |
माझे माझे ,म्हणतोसी | म्हणोनिया ||
.
.
.
.
.

येवं इतुका वेढा लावली | ते मायाचि खेळे येकली |
ते मायेनेच वारली | पाहिजे माया ||

मी सर्वसामान्य माणूस असल्याकारणाने 'मोह-माये'पासून अलिप्त नाही.

विटेकर's picture

5 Dec 2013 - 3:04 pm | विटेकर

मी सर्वसामान्य माणूस असल्याकारणाने 'मोह-माये'पासून अलिप्त नाही

यावर श्री पेठकर काकांना लिहावी अशी माझी समज नाही पण मला जे समजले ते मांडायचा प्रयन करतो.
मोह - माये पासून अलिप्त व्हावे हे अपेक्षित नाहीच . त्याचा विवेकाने उपभोग घ्यायलाच हवा. धन्यो गॄहस्थाश्रम असेच म्हटले आहे. मोह- मायेत ( शारिरिक उपभोग या अर्थाने आणि संसारात गुंतणे असे.. ) वाईट काहीच नाही. लग्न करणे , वंश वाढवणे , संगोपन करणे यात चुकीचे काहीच नाही . फक्त त्यात अडकून पडणे आणि तेच सर्वस्व मानणे यात गडबड आहे.
"जो त्रिविध तापे पोळला| तोच परमार्थांचा अधिकारी भला" असे समार्थांनी म्हटले आहे. ( त्रिविध ताप - अध्यात्मिक , अधिभौतिक आणि अधिदैविक- जगातील सारी दु: खे यात सामावली आहेत ) असे त्रिविध तापाने पोळणे संसारात पडल्यानेच होते ,नि: संगाला कशाला ताप होईल ? असा तापाने पोळून निवलेला च परमार्थाचा अधिकारी आहे.
प्रशन असा आहे की माणसे पोळून निघतात पण निवतात का ? " निवणे" हा समर्थांचा आणखी एक शब्द- मनाच्या श्लोकात अनेकवेळा आला आहे.
---निवाला मनी लेंश नाही तमाचा ...||५०||
--- विदेहीपणे सर्व काया निवाली ...||२०१||
--- निवला हरु ते मुखी नाम घेता...||९४||
--सदा प्रेमळु भक्तिभावे निवाला||१०६||
असं "निवणं" जेव्हा होते तेव्हा कशाचेच काही वाटत नाही.. पण निवायलां नकार दिला आणि ।त्त धरुन बसलो की प्रश्न निर्माण होतात !
वरच्याच समासातील एक ओवी अशी आहे...( प्यारे यांचा प्रतिसाद)
तुवां भोगिल्या पुनराव्रुत्ती | ऐसे मायबापे किती ||
स्त्री- पुत्र कन्यादिक| लक्षानुलक्ष ||
कर्मयोगे एके मिळाली| त्या तू आपली मानिली |
कैसे रे पढतमूर्ख !
हे पहिल्यांदा वाचले तेव्हा अंतर्बाह्य हादरलो होतो !! कशाचा मोह अन कसली माया ?

ह्याबाबत ओव्या आणखी आहेत त्या म्हणजे:

प्रपंच मुळी नासका| विवेके करावा नेटका| नेटका करिता फिका| होत जातो||
आधी प्रपंच करावा नेटका| मग घ्यावे परमार्थ विवेका| येथे आळस करु नका| विवेकी हो||

अजून देखील आहेत. बघून सांगतो.

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2013 - 8:48 pm | प्रभाकर पेठकर

मुळात ही प्रतिसाद चर्चा माझ्या ह्या वाक्यापासून सुरु झाली. >>मला वाटतं माझ्या कुटुंबियांप्रती असणारी माझी सर्व कर्तव्य पार पडल्यावर मी केंव्हाही मरायला तयार असेन. <<
कर्तव्यांनाही मर्यादा आहेच. ती अमर्याद नाहीत. तेंव्हा त्यालाही पूर्णविराम आहेच.

>>> फक्त त्यात अडकून पडणे आणि तेच सर्वस्व मानणे यात गडबड आहे.<<<

कर्तव्ये मर्यादीत आहेत आणि त्याला पूर्णविराम आहे म्हंटल्यावर त्यापासून स्वतःची सोडवणूक करणे मलाही अपेक्षित आहेच. फक्त ही कर्तव्ये पार पाडताना अध्यात्म्याच्या जास्त मागे लागून वैराग्य येऊ नये असे मला वाटते. अडकून पडणे, तेच सर्वस्व मानणे आणि मुलभूत कर्तव्ये पार पाडल्यावर स्वतःला मनाने ह्या संसारातुन मुक्त करणे ह्या तिन वेगवेगळ्या अवस्था आहेत. आपण कळत-नकळत कुठली स्विकाराता ह्यावर वरील विवेचन लागू व्हावे.

मी सर्वज्ञ नाही, जे कांही ज्ञान इतरांकडून मिळेल ते मला हवेच असते पण जड अध्यात्मापासून मी दूर राहणेच पसंद करतो. असो.

प्रसाद गोडबोले's picture

6 Dec 2013 - 2:26 pm | प्रसाद गोडबोले

फक्त ही कर्तव्ये पार पाडताना अध्यात्म्याच्या जास्त मागे लागून वैराग्य येऊ नये असे मला वाटते.

उलट कर्तव्ये पार पाडत असतानाच अध्यात्म हवे वैराग्य हवे ...

ॐ ईशा वास्यमिदँ सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्।
तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्यस्विद्धनम्॥१॥

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे॥२॥

विटेकर's picture

6 Dec 2013 - 2:33 pm | विटेकर

असच म्हणेन !

निर्लेप जगता आले तर त्यासारखी मजा नाही. ( लोक असे जगू शकतात , आजूबाजूला नजर टाकली तर सहज लक्षात येईल, फक्त तो निर्लेपपणा अगतिकतेतून यायला नको , स्वयं स्वीकृतीतून हवा.)त्याऐवजी दु: खे कुरवाळण्याचे व्यसन आपण लाऊन घेतो.दु:ख नको म्हणताना , दु:खालाच कवेत घेतो.
पेठकर काका , तुम्हाला विओध करायचा म्हनून नव्हे पण अध्यात्म जड वगैरे काही नसतं , सोप्पच तर असते. चतुर लोकांनी स्वार्थासाठी त्याचा बागूलबुवा केला आहे. मतिमंद ते साधना योग्य होती !

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2013 - 4:49 pm | प्रभाकर पेठकर

उलट कर्तव्ये पार पाडत असतानाच अध्यात्म हवे वैराग्य हवे ...

पटलं नाही. संसारात असताना येणारे वैराग्य जीवनसाथीवर अन्यायकारक असते. संसाराची आणि वैराग्याची प्रत्येकाची व्याख्या प्रकृतीनुरूप बदलत जाते. संसारात असताना सर्व गोष्टींचा समरसून आस्वाद घ्यावा. वानप्रस्थाश्रमात संसारात राहून मोहमायेतून मन काढून घ्यावे आणि संन्यासाश्रमात (जो संसारात राहून, इतर कुटुंबियांसमवेत) आजकालच्या जगात मला अवघड वाटतो आहे, सर्वसंग परित्यागाची अपेक्षा आहे. असो.
त्यामुळे संसारात सर्व गोष्टींचा समरसून आस्वाद घेताना वैराग्य ह्या दोन टोकाच्या अवस्था संभवत नाहीत. हे, अर्थात, माझे मत आहे, आपले वेगळे असू शकते.

संसार स्वप्रयत्नानं आटोपता घ्यावा लागतो. तो तसा घेतला नाही तर माणूस संपला तरी संसार संपत नाही.
२५ पर्यंत ब्रह्मचारी, ५०-५५ पर्यंत गृहस्थ, ५५- ७० वानप्रस्थ असं अपेक्षित आहे. तसं प्लॅन करणं आवश्यक आहे.
आसक्ती/ भोगाची अथवा विरक्ती/ त्यागाची भावना ही आतमध्ये असावी लागते. दाखवण्यासाठी नाही. अगदी हिमालयात गेलात तरी खाणं, पिणं, झोपणं, नैसर्गिक विधी असतातच. प्राण्याचं भय असणारच, हल्ली सरकारचा परवाना देखील लागतो म्हणे काही ठि काणी. त्यामुळं बाहेर कुठं न जाता आहे तिथेच मनातल्या मनात कंपार्ट्मेंटस करावेत.
एखादी गोष्ट जमत नाही म्हणून न करणे हा आणखी वेगळा विषय आहे. तिकडे नको शिरायला.
पण संसार उत्तम सुरु आहे म्हणून सातत्यानं त्याचाच विचार करणं, अनावश्यक ढवळाढवळ करणं हा विषय कधीतरी बंद व्हायला हवा. कर्तव्ये करत असताना अपत्या विषयीची 'अनाठायी' काळजी निरुपयोगी असते. ह्याउप्पर ती आपल्या संभाव्य दुर्लक्षाला, स्वतःची पत कमी करण्याला कारणीभूत ठरणारी असते. इथे वैराग्य कामी येतं. थोडं स्वीच ऑफ स्वीच ऑन करता यायला हवं. समोर पती/पत्नी असताना तिच्यावर रसरसून प्रेम करणं ही गीतेमधली विभूती आहे. 'धर्माSविरुद्धो कामोSहं' (धर्माविरु द्ध नसलेला काम मी आहे. म्हणजे पतीपत्नी मधले संबंध. )
मुळात वैराग्याच्या कल्पना चुकीच्या आहेत. सचिन तेंडुलकर खूप विरागी माणूस आहे असं म्हटलं तर चालेल का? जीवनात करता येण्यासारख्या अनेक चैनीच्या गोष्टी न करता त्या वेळेत सराव करणं हे वैराग्यच आहे. तसं वैराग्य ध्येयपूर्तीसाठी आवश्यक आहे. मुलाविषयीचा अनाठायी विचार न करता आपलं काम करणं हे वैराग्यच आहे. ते तितपत योग्य नि आवश्यक आहे.
असो. विषय भरकटतोय. थांबतो. मतं वेगळी असणार आहेत्च.

कर्तव्ये पार पाडताना अध्यात्म जमेल का?
उदा: मुलगा शाळेत जाणार आहे. त्यासाठी सकाळपासून तयारी करुन डबा दिला. त्याच्या वयोगटानुसार त्याला तयारी करुन दिली. हे कर्तव्य. इथे ते संपतं.
मुलगा शाळेत जाताना गरज नसताना त्याला शाळेपर्यंत सोडणं, त्याच्या इतर मित्रांच्या आईवडलां बद्दल गॉसिप कर, बाईच्या साड्या बघ हे न करता मुलगा शाळेत गेला आहे हे पाहून आपण आपल्या उद्योगाला लागून आपलं काम व्यवस्थित करणं हे अध्यात्माचंच अंग आहे. ह्यानं मन मोकळं राहतं. मुलगा शाळेत नीट पोचला असेल का? एखाद्याबरोबर मारामारीच करत असेल का? मग येताजाता आणखी काही होईल का? हे जे आत सुरु अस्तं ते टाळणं जमावं. व्याप सुरु राहून उपद्व्याप थांबले के बरंचसं काम भागतं. (अशानं मिपा बंद पडेल म्हणा ;) )
अध्यात्म म्हणजे फार वेगळं काही नाही.

ज्ञानव's picture

3 Dec 2013 - 8:53 am | ज्ञानव

एका प्रश्नाला आलेले प्रतिसाद म्हणजे कालीडोस्कॉपिक व्ह्यूज सारखे वाटतात. भविष्य ज्योतिष आणि त्या अनुषंगाने येणारे आस्तिक नास्तिक प्रतिसाद मी बर्याच वेळेला एन्जोय करतो. कारण ज्यांचा विश्वास आहे ते कसे बरोबर आहे ते सांगतात

उदाहरणार्थ १)विश्वास नसणारी माणसे म्हणतात : पत्रिका पाहून माणूस जिवंत आहे कि मेलेला हे तुम्ही सांगू शकता का ?
विश्वास असणारी माणसे म्हणतात : नुसता एक्सरे पाहून पेशंट जिवंत आहे कि नाही ते डॉक्टर सांगू शकतात का?

पण इथे घाटपांडे साहेबांचे म्हणणे मला पटते कारण जोपर्यंत एखाद्या माणसाला ह्या जगातल्या त्याच्या सुक्ष्मेतेची आणि त्याहूनही एकटेपणाची तीव्र जाणीव(ज्योतिषी म्हणतील आहो म्हणजे शनी आलाच इथे, माझ्यासारखा माणूस म्हणेल नाही हो हि कर्म आहेत त्याची.....इथून नवीन वाद सुरु होतो) एखादी परिस्थिती करून देत नाही जी फक्त स्मशानातच होते (पण दुर्दैवाने तिथेही लोक लग्नाला भेटल्यावर जश्या गप्पा मारतात तसे गप्पा मारत उभे असतात. तो तिथे जाळण्याच्या तयारीत असतो.) तोपर्यंत वाद घालणे उत्तम.

पण माणूस हॉस्पिटलमध्ये मेला कि डॉक्टर चुकले असे म्हंटले जाते संपूर्ण मेडिकल नाही.मग ज्योतिष किंवा भाकीत चुकले असे म्हंटले जाते ज्योतिषी नाही असे का असे प्रश्न मला पडतात.

माझी जात कुळी घाटपांडे साहेबांच्या चिकित्सा मंडळाची आहे. मी खूप चिकित्सक आहे. पण त्यासाठी मी बर्याच ज्योतिषांना भेटतो प्रश्न विचारतो. त्यावरून त्या माणसाबद्दल कळते कि किती खोलात आहेत महाशय कारण तर्क मांडतांना ते गडबडतात असा माझा अनुभव आहे. विज्ञानाला पर्याय नाही हे माझे ठाम मत आहे.

खास घाटपांडे साहेबांसाठी इथे एक किस्सा देतो.

कोकणात कसाल म्हणून एक गाव आहे तिथे परुळेकर नावाचे महाराज आहेत(कदाचित तुम्ही भेटलाही असाल आता पर्यंत) ते पत्रिका, हात काहीच पाहत नाहीत कारण ते जन्मांध आहेत. मी २-३ वेळा त्यांना भेटलो आहे. माझ्याबरोबर असलेल्या माणसांच्या आयुष्यातल्या घटना त्या माणसांने तंतोतंत सांगितल्या त्यांनी बरेच काही माझ्याबाबतीत जे माझ्या स्वभावामुळे मी कुणाशीही शेअर करत नाही असे प्रसंग सांगितले. उदाहरणार्थ माझी धाकटी बहिण तिच्या वयाच्या ३-४ महिन्यात गेली (त्यांनी कुणी लहान मुल दगावलंय का तुमच्या घरात असे विचारले नाही धाकटी बहिण असा उल्लेख केला) हि गोष्ट खुद्द माझ्या बरोबर असलेल्या बायकोलाहि तेव्हाच कळली.....हे प्रसंग माझ्या आयुष्यात दोन -तीन वेळा आले. इथे माझ्यासारखा पामर हतबल होतो कि हे ह्यंना कसे कळले ? ह्याचे मागील विज्ञान काय ते मला शोधता येत नाही.

मी वर उल्लेख केला आहे तरी पुन्हा पुन्हा लिहीन कि माझा ज्योतिष किंवा ज्योतिषी किंवा ज्योतिष मानणारे आणि ना मानणारे ह्यांच्या बद्दल काहीच वाद नाही ज्याला त्याला आपले मत आहे. प्रतिसाद देताना सर्व वाचून समजून प्रतिसाद यायला हवे होते पण सर्व सभासद ज्योतिष थोतांड आहे हेच म्हणत राहिले

बाकी कुतूहल हे विकासाचे मूळ आहे तो भौतिक विकास असेल किंवा वैचारिक आणि कर्तव्य ती कुणाला चुकली आहेत?

असो वरील पत्रिकेची वेळ खुद्द माझीच आहे.
मी अजून "जिवंत" आहे.
मी अजिबात तापट नाही उलट शांत आणि मनात दाबून ठेवणारा आहे. (लग्नी मिथुन आणि लग्नेश बुध सप्तमात म्हणजे वायू तत्वाच्या तुळेला ह्याचा परिणाम माझ्या बुद्धीवर जास्त आहे. त्यात बुधाच्या व्ययात हर्शल आणि हर्षलाच्या व्ययात शुक्र - गुरु.....मान्यवरांना उमजेलच मला काय म्हणायचे आहे ते.)
कुठलाही अपघात आजपर्यंत मला किंवा माझ्यामुळे झाला नाही.
मृत्यू मी बरेच जवळून पहिले आहेत त्यातही वडलांचा मृत्यू माझ्या मनाला प्रचंड वेदना देऊन गेला आजही ती वेदना तितकीच तीव्र आहे.
आणि जन्म ते मृत्यू ह्या प्रवासात मृत्यूचे प्रचंड कुतूहल आहे.(का? ह्याचा एक वेगळा धागा होऊ शकेल)
एखादे थोतांड आहे किंवा नाही हे सांगताना तत्वज्ञानाचा आधार घेतला जातो त्यापेक्षा विज्ञानाचाच दाखला किंवा आधार द्यावा असे वाटते.

असो आपण सर्वांनी जे काही प्रतिसाद दिलेत त्याबद्दल धन्यवाद.

ज्ञानव's picture

3 Dec 2013 - 9:18 am | ज्ञानव

(लग्नी मिथुन आणि लग्नेश बुध पंचमात म्हणजे वायू तत्वाच्या तुळेला ह्याचा परिणाम माझ्या बुद्धीवर जास्त आहे. त्यात बुधाच्या व्ययात हर्शल आणि हर्षलाच्या व्ययात शुक्र - गुरु.....मान्यवरांना उमजेलच मला काय म्हणायचे आहे ते.)
स्थान चुकले तर मारतील माझे ज्योतिषी मित्र....

प्रभाकर पेठकर's picture

3 Dec 2013 - 4:05 pm | प्रभाकर पेठकर

ज्योतिष आणि विज्ञानावतिरिक्त अजून एक गोष्ट अस्तित्वात आहे ज्याला 'आतला आवाज' किंवा 'इंट्यूशन' म्हणतात. हे प्रत्येका जवळ असतेच पण ज्याच्या बाबतील ह्याची तिव्रता पराकोटीची असते (तशी का असते ह्याला तार्किक उत्तर नाही) अशा माणसाला समोरच्या माणसाच्या आयुष्यातील (किंवा भूत - भविष्यातील) गोष्टी 'दिसतात'.
अशा एका व्यक्तीला मी स्वतः भेटलो आहे. त्यांना 'दादा महाराज निंबाळकर' म्हणायचे. (आता ते हयात नाहीत). त्यांनी माझ्या आणि माझ्या मित्रांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी (घडलेल्या - घडणार्‍या) सांगितल्या होत्या. त्या पैकी ८०% खर्‍या निघाल्या.
आमची भेट मस्कतमध्येच माझ्या एका मित्राच्या घरी झाली. आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. आम्ही एकूण १०-१२ मित्र बसलो होतो. कांही जण भविष्य विचारत होते ते सांगत होते. मधे मधे माझ्याकडे पाहात होते. अचानक मला म्हणाले, 'तुम्हाला कांही विचारायचे आहे का?' माझा भविष्य कथनावर विश्वास नसल्याने (किंवा फार मर्यादीत स्वरूपात असल्याने) मी नकारार्थी मान हलवत म्हंटले, 'नाही मुद्दामहून विचारावे असे कांही नाही. पण तुम्हाला कांही सांगावेसे वाटत असेल तर जरूर सांगावे.'
अर्धा मिनिट माझ्याकडे पाहात विचार करून ते म्हणाले, ' तुमची जी कार आहे ती खुप जुनी आहे. (८१चे मॉडेल होते) ती तुम्हाला खुप त्रास देते आहे. एक तर ती दुरुस्त करून घ्या किंवा विकून टाका.'
नेमकी त्याच दिवशी मी माझी कार इंजिनच्या दुरुस्तीसाठी गॅरेजला पाठवली होती. मला वाटले एखाद दुसर्‍या मित्राजवळ मी कधी बोललो असेन आणि त्याने चुकली वगैरे केली असेल शिवाय आजच कार गॅरेज मध्ये मेजर दुरुस्तीसाठी गेली आहे हा निव्वळ योगायोग असावा.
पण ते पुढे म्हणाले, 'त्या मेकॅनिकला गाडीचे ब्रेक तपासायला सांगा. तुम्ही ती गाडी कशी थांबवता मला समजत नाही.'
गाडीचे ब्रेक नीट लागत नव्हते हे माझ्या व्यतिरिक्त ह्या जगात कोणालाच माहित नव्हते. मी माझ्या बायकोजवळही कधी ह्या विषयावर बोललो नव्हतो. तेंव्हा एकतर आर्थिक समस्या होती आणि ती उगीच घाबरून गेली असती. ब्रेकपॅड झिजले असावेत. ब्रेक थेट फ्लोअरपर्यंत दाबावा लागायचा आणि मुंबईतील जुनी डबलडेकर थांबावी असा आवाज यायचा.
दुसर्‍या दिवशी सकाळी मी गॅरेजमध्ये जाऊन मेकॅनिकला भेटलो आणि ब्रेक बद्दल सांगितले. नंतर ऑफिस मधे गेलो. (तेंव्हा नोकरीत होतो). संध्याकाळी आल्यावर मेकॅनिकला भेटलो तेंव्हा त्याने गाडीची चारही चाके उघडून ब्रेक नामक यंत्रणेचा कोथळा बाहेर काढून ठेवला होता. मी त्याला विचारले, 'काय परिस्थिती आहे ब्रेकची?' मेकॅनिक म्हणाला, 'साहेब, ह्यात ब्रेक नामक कुठली गोष्टच नाहीए. (पॅड आणि डिस्क दोन्ही झिजून गेल्या होत्या). तुम्ही हे अवजड धूड कसे थांबवायचा हेच मला समजत नाहीए.. इथे दोन्ही, आयुष्यात एकमेकांना कधीच न भेटलेल्या, पाहिलेल्या, व्यक्तींचे शब्दही सारखेच होते.
नोकरीबाबतही मी त्यांना विचारले की, 'मला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे. मी काय करावे असे तुम्हाला वाटते? नोकरी की व्यवसाय?' त्यावर ते म्हणाले 'तू आयुष्यात व्यवसायच करणार.' शेवटी तेच खरे झाले.
अशा त्यांच्या खुप कथा आहेत. एक वेगळा धागा होईल. पण ते स्वतः सुद्धा सांगायचे. मला भविष्य (फलज्योतिष, हस्तरेषा पत्रिका वगैरे वगैरे जे म्हणतात ते) कळत नाही. मी अगदी तुमच्या सारखाच सर्वसामान्य माणूस आहे. फक्त मला अचानक कांही गोष्टी 'दिसू' लागतात. ती व्यक्ती समोर असावी, किंवा त्या व्यक्तीचे छायाचित्र असावे किंवा त्या व्यक्तीचे हस्ताक्षर पाहावयास मिळावे. दरवेळी हुकमी सर्व कांही दिसते असेही नाही. कधी दिसते कधी नाही दिसत. पण जेंव्हा मला दिसते आणि मी बोलू लागतो तेंव्हा मला मध्येच प्रश्न विचारून डिस्टर्ब करू नका. माझी लिंक तुटली तर पुन्हा जुळेलच असे नाही.
(ते कोणाकडूनही एकही पैसा घेत नसत.)

दूसरे एक तामिळी गृहस्थ भेटले होते. (अजूनही हयात आहेत). त्यांनी मला एका कागदावर माझे नांव लिहायला सांगितले. नंतर कांही आकडेमोड करून एका फुलस्कॅप पेपरवर ते लिहू लागले. जवळ जवळ १० मिनिटे ते लिहीत होते. खोलीत आम्ही फक्त दोघेच होतो. शेवटी त्यांनी तो कागद बाजूच्या टीपॉयवर ठेवला आणि बोलायला सुरुवात केली. मी कुठल्या व्यवसायात आहे वगैरे विचारले. नंतर माझा आर्थिक भूतकाळ आणि वर्तमानकाळ ह्याबद्दल तंतोतंत माहिती दिली. तसेच आजच्या व्याधी, आईच्या आजच्या व्याधी (आई भारतात होती) आई आणि बायकोचे संबंध (सासू-सुन), दोघींचे स्वभाव विशेष, मुलाचा स्वभाव, इ.इ. परिपूर्ण माहिती तंतोतंत सांगितली. हे सर्व बरोबर आहे का ते विचारलं. मी होकारार्थी मान हलविली. त्या नंतर त्यांनी तो कागद माझ्या हाती दिला. माझे नुसते नांव विचारून त्यांनी जे जे लिहीले होते ते सर्व आमच्या नंतरच्या संभाषणाचा गोषवारा होता. आईच्या अंतकाळातील आरोग्याबद्दलही त्यांनी १००% बरोबर भविष्यकथन केले होते.

सर्व कांही तसेच घडले.

अजूनही माझा भविष्यावर विश्वास नाही पण ह्या दोन अवलीयांनी माझी बोलती बंद केली होती.

ह्या जगात कांही घडणार्‍या गोष्टी आपल्या आकलनापलिकडच्या असतात त्यालाच कदाचित आपण चमत्कार म्हणत असू.

(धागाकर्ता हा माझा सख्खा लहान भाऊ आहे. त्याला वरील गोष्टी माहीतही आहेत. आज सर्व मिपा सदस्यांसाठी इथे मांडल्या एवढेच.)

यशोधरा's picture

3 Dec 2013 - 6:02 pm | यशोधरा

हा प्रतिसाद आवडला.

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2013 - 6:24 pm | टवाळ कार्टा

त्यांना भेटता येइल का??

प्रभाकर पेठकर's picture

3 Dec 2013 - 8:28 pm | प्रभाकर पेठकर

होय. नक्की भेटता येईल. माझ्या एका ओळखितल्या गृहस्थांच्या मार्फत माझी भेट झाली होती. त्याच्याकडे चौकशी करून सांगतो कुठे आणि कसे भेटता येईल ते. त्यांनी त्यांचा इमेल पत्ताही दिला होता. तो माझ्याकडून हरवला. असो.
ते शुल्क आकारतात. म्हणजे अमूक इतके द्या असे सांगत नाहीत. पण त्यांची अपेक्षा असते. मी भेटलो होतो (६-७ वर्षांपूर्वी) तेंव्हा मी एका लिफाफ्यात १५००/- रुपये घालून दिले होते. (त्यांच्या हाती नाही तर, ते बसले होते त्या शेजारच्या टिपॉयवर मी ठेवले होते.) ते कांहीही मागत नाहीत. राजीखुशीने तुम्हाला कांही द्यायचे असेल तर द्यावे.

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2013 - 8:56 pm | टवाळ कार्टा

चालेल...व्यनी कराल का

वाटाड्या...'s picture

4 Dec 2013 - 11:00 pm | वाटाड्या...

प्रतिसाद आवडला. रुचलाही. काही कळत नाही पण जेव्हा अश्या गोष्टींची वेळ येते तेव्हा ज्योतीषी पैसे का बरं घेत असावेत? पोटासाठी ज्योतीष सांगणारे पैसे मिळत आहेत म्हणुन किती खरं किंवा सांगत असावेत आणि पोटासाठी न सांगणारे पैसे का मागत असावेत असा प्रश्न नेहेमी पडतो. एकदा पैसे घेतले की काहीतरी सांगणे आलेच पण पैसे न घेता भविष्य बरोबर येवो न येवो तेवढी जबाबदारी (नैतीक का होइना) राहु शकत नाही असम वाटतं. तुम्हाला काय वाटतं?

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2013 - 1:41 am | प्रभाकर पेठकर

हा त्यांच्या व्यवसायाचा भाग असतो. पैसे घेतले काय किंवा नाही घेतले काय. जर भविष्य बरोबर आले तर प्रसिद्धी (आणि त्या पाठोपाठ पैसा) मिळत जाते. भविष्य चुकीचे सांगितले की प्रसिद्धीला ओहोटी लागते (पैशांचा स्रोतही आटतो) त्यामुळे भविष्य अचूक सांगणे ही व्यावसायिक गरज असते.
वैद्यकिय व्यवसायात कसे प्रत्येक रुग्णाला बरे करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. ज्या डॉक्टरच्या हाताला गुण असतो त्याची चलती असते ज्याच्या हाताला गुण नसतो तो माशा मारत बसतो.

पैसे न घेता भविष्य सांगणारे हौशी, समाजकार्य करण्याच्या उद्देशाने भारीत वगैरे असू शकतात.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Dec 2013 - 5:58 pm | प्रकाश घाटपांडे

प्रतिसाद आवडला.
माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... प्रश्नोत्तरातून सुसंवाद पुस्तकाच्या मनोगतात माझी भुमिका मांडली आहेच. तसेच दुसर्‍या आवृत्त्ती च्या निमित्ताने काही भर त्यात घातली आहे. मृत्यू या एका गोष्टी मुळे जगात अनेक तत्वज्ञान निर्माण झाली. ज्योतिषात मृत्यु चे भाकित सांगू नये असा संकेत आहे. सांगता येते कि नाही हा परत वेगळा मुद्दा आहे. बाकी आपले भविष्य आपल्या जिनोम मधे लिहिलेले असतेच. त्याप्रमाणेच आपली मनो शारिरिक वाढ होत असते असो तो वेगळा विषय आहे. पण आपले भविष्य आपल्या हाती हे देखील वैज्ञानिक सत्य नाही. गोफ जन्मांतरीचे हे डॉ सुलभा ब्रह्मनाळकर यांचे पुस्तक वाचताना ते जाणवते.

मला ई मेल अड्रेस मिळेल का ? आभारी आहे..

प्रभाकर पेठकर's picture

4 Dec 2013 - 10:47 am | प्रभाकर पेठकर

शोधतो आहे. मिळाला की टाकतो इथेच.

प्रभाकर पेठकर's picture

4 Dec 2013 - 7:19 pm | प्रभाकर पेठकर

ईमेल आय डी कांही मिळाला नाही. पण कांही संपर्क क्रमांक सापडले आहेत. ते पुढील प्रमाणे.

नांव - श्री. शिवकुमार.

दूरध्वनी क्रमांक - +९१ ४८४-२७८५०६६
भ्रमणध्वनी क्रमांक - +९१ ९३८८८९१६४७

अर्जुन's picture

4 Dec 2013 - 11:35 pm | अर्जुन

आभार !!

चौकटराजा's picture

4 Dec 2013 - 1:22 pm | चौकटराजा

ज्योतिषाचा छंद व मटक्याचा नक्की फॉर्मुला शोधणे हे दोन्ही छंद सारखेच आहेत. माझ्या वडिलांनी निववृतीनंतर पाच सहा वर्षे पहिला केला मी तीन चार महिने दुसरा केला.
तात्पर्य - मृत्यू ही एक घटना आहे. निसर्गातील परिहार्य असे ते एक रूपांतर आहे. जे कधी ना कधी तरी होणारच त्याची
तारीख अगोदर काढून काय मिळणार.
तात्विक रित्या - जो पर्यंत जगण्यात मजा आहे तो पर्यंत मरण्यात हशील आहे.

चौकटराजा's picture

4 Dec 2013 - 1:24 pm | चौकटराजा

परिहार्य ऐवजी अपरिहार्य असे वाचावे .

प्रभाकर पेठकर's picture

4 Dec 2013 - 1:53 pm | प्रभाकर पेठकर

भौतिक जबाबदार्‍यांच्या विविध टप्प्यांवर त्या त्या जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पडल्या/पाडल्या असतील तर, शेवटी मन कांहीसे शांत असावे. पण जर ह्या जबाबदार्‍या पार पाडण्यात आपण काळाच्या मागे पडलेले असू तर, 'मृत्यू अचानक आपल्याला गाठेल' अशा काळजीपोटी 'तो' कधी आपल्याभेटीला येणार आहे ह्याची भितीयुक्त उत्सुकता लागून राहते.

तरीपण, तरीपण, मृत्यूचे भाकित जाणून घेण्याचा प्रयत्न करू नये, ह्याच पक्क्या मताचा मी आहे

अग्निकोल्हा's picture

5 Dec 2013 - 2:53 am | अग्निकोल्हा

एक कोमन फ़ॉर्म्युला आहे. बरेच जणांना माहिती असेल.

असो!

मट्क्यात 1ते9 या एकेरी अन्कावरही पैसे लावता येतात व आपण लावलेला आकड़ा लागला तर एक रुपयाचे आठ रूपये मिळतात. मग आता यात हमख़ास यशाचा मार्ग सोपा आहे. केवळ एकाच ठरवलेल्या आक्ड्यावर रोज पैसे लावत जायचे आज ना उद्या आपण निवडलेला आकडा हमखास लागणार फक्त एक मेख आहे जोपर्यंत आपण ठरवलेला आकडा लागत नाही पैसे आदल्या दिव्शिपेक्षा डबल करत जायचे ज्या दिवशी मटका लागेल आता पर्यन्त गुन्तवलेले सर्व पैसे परत मिळुन वरती भरगोस नफा मिळेल......

मग ? आहे आठ दिवस गुंतवनुकिचि तयारी? एकदम सिस्तिमेटिक इन्वेस्टमेंट प्लान ?

अग्निकोल्हा's picture

5 Dec 2013 - 2:55 am | अग्निकोल्हा

एक कोमन फ़ॉर्म्युला आहे. बरेच जणांना माहिती असेल.

असो!

मट्क्यात 1ते9 या एकेरी अन्कावरही पैसे लावता येतात व आपण लावलेला आकड़ा लागला तर एक रुपयाचे आठ रूपये मिळतात. मग आता यात हमख़ास यशाचा मार्ग सोपा आहे. केवळ एकाच ठरवलेल्या आक्ड्यावर रोज पैसे लावत जायचे आज ना उद्या आपण निवडलेला आकडा हमखास लागणार फक्त एक मेख आहे जोपर्यंत आपण ठरवलेला आकडा लागत नाही पैसे आदल्या दिव्शिपेक्षा डबल करत जायचे ज्या दिवशी मटका लागेल आता पर्यन्त गुन्तवलेले सर्व पैसे परत मिळुन वरती भरगोस नफा मिळेल......

मग ? आहे आठ दिवस गुंतवनुकिचि तयारी? एकदम सिस्तिमेटिक इन्वेस्टमेंट प्लान ?

चौकटराजा's picture

5 Dec 2013 - 8:47 am | चौकटराजा

या साळंचे आम्ही येच येम आहोत. एक आकडा २३ दिवस न आल्याचीही उदाहरणे आहेत.
पाठसे सीख- संसारावरून नांगर फिरवायचा नसेल तर लक्षांत राहू द्या कोणतेच पर्म्युटेशन कोम्बेनेशन जूगारात आणि जगण्यातही हमखास यश देण्यासाठी त्रिकालाबाधित नसते. काही प्रमाणात मेहनत, काही प्रमाणात नशीब व काही प्रमाणात
समाधान हे बरेचसे काम करून जाते.

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2013 - 10:01 am | प्रभाकर पेठकर

एक आकडा २३ दिवस न आल्याचीही उदाहरणे आहेत.

कितीही दिवस आकडा न येऊ दे. रोज आकड्यावर लावायची रक्कम आदल्या दिवसाच्या दुप्पट करत गेल्याने तेविसाव्या दिवशी गुंतवलेली रक्कम भरभक्कम असेल आणि मिळणारा परतावा त्याच्या प्रमाणात असल्याने मागचे सर्व नुकसान भरून निघून वर भरगोस फायदा होईल असा दावा वरील प्रतिसादात केला आहे. त्यात तथ्य असावे असे दिसते आहे.

म्हणजे पहिल्या दिवशी १ रुपयाने सुरुवात केली तर आणि दर दुसर्‍या दिवशी आजच्या दुप्पट रक्कम त्याच आकड्यावर लावली तर २३व्या दिवशी ४१ लाख, ९४ हजार, ३०४ रुपये लावावे लागतील आणि २३ दिवसापर्यंतची गुंतवणूक होईल ८३ लाख, ८८ हजार, ६०७ रुपये. आता तेविसाव्या दिवसाच्या (४१ लाख, ९४ हजार, ३०४ रुपये) ८ पट रक्कम मिळणार असेल तर ती होते ३ करोड, ३५ लाख, ५४ हजार, ४३२ रुपये. त्यातून गुंतवणूक (८३ लाख, ८८ हजार, ६०७ रुपये) वजा केल्यास निव्वळ फायदा उरतो २ कोटी, ५१ लाख, ६५ हजार, ८२५ रुपये.

मटका केंद्र कुठे आहे? त्याचा पत्ता/फोन मिळू शकतो का?
:)

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2013 - 12:10 pm | प्रभाकर पेठकर

नाही नं! केंव्हाच बंद झाली (असं मला वाटतं).
नाहीतर आम्ही काय मूर्ख आहोत का इमानेइतबारे नोकरी-धंद्यात गुंतून पडायला?

प्यारे१'s picture

5 Dec 2013 - 12:36 pm | प्यारे१

हे तर लईच्च (रतन)खत्री आहे राव!

हाय का आव्वाज!

या दाव्याला गँबलर्स फॉलसी/रुईन म्हणतात. वरकरणी बरोबर वाटले तरी शेवटी तो हरतोच. कसे ते पाहू. प्रोबॅबिलिटी थिअरीमधील एक लै जुना रिझल्ट यामागे आहे. त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण खालीलप्रमाणे.

समजा एक जुगारी आहे आणि जुगार सुरू करण्याअगोदर त्याच्याकडे क्ष रुपये आहेत.

प्रत्येक वेळेस बेट जिंकण्याची प्रोबॅबिलिटी समजा ५०% असली तर तो एक तर सरळ जिंकत तरी जाईल नैतर हरत तरि जाईल. प्रत्येक बेटमध्ये हरण्याची प्रोबॅबिलिटी काढली तर ती ०.५ + ०.२५ + ०.१२५ +.............असे करत शेवटी १ जवळ येते, त्यामुळे कधी ना कधी तो ब्रोक होणार हे निश्चित आहे.

समजा बेट जिंकण्याची प्रोबॅबिलिटी अजून जास्त असली- उदा. ६०%- तर असे होणार नाही. पण जुगाराची रचना करणारे लोक असे होऊच देणार नाहीत, कारण तसे असेल तर त्यांचा धंदा बसेल, बाजार उठेल.

त्यामुळे कुठलीही बेट जिंकण्याची प्रोबॅबिलिटी ही इन एनी केस ५०% पेक्षा कमीच असते- त्याशिवाय त्यांना आपला धंदा चालवता येत नाही. आणि असे असेल तर जिंकणे निश्चित नसतेच, हरणे मात्र निश्चित असते.

त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे बेटिंग केल्यास कदाचित कुणीतरी जिंकेलसुद्धा-पण रिस्क ऑफ रुईन लै जास्त मोठी आहे शिवाय एकदातरी मोठा फटका बसणार हे निश्चित आहे.

प्रसाद गोडबोले's picture

5 Dec 2013 - 2:02 pm | प्रसाद गोडबोले

म्हणुन मटका लावण्या पेक्षा शेयर मार्केट खेळावे ...तिथे जिंकण्याची शक्यता अलबतच जास्त असते !! आणि आजकाल तिकडेही मुहुर्त काढुन आकडा लावतात म्हणे ...

नक्कीच एनी टैम जास्त असते !!

इरसाल's picture

5 Dec 2013 - 1:59 pm | इरसाल

२३व्या दिवशी ४१ लाख, ९४ हजार, ३०४ रुपये लावण्यासाठी कुठुन आणायचे ?

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2013 - 2:27 pm | प्रभाकर पेठकर

साहेब, फक्त २३ व्या दिवशी नाही. २३ दिवसांपर्यंत एकूण ८३ लाख, ८८ हजार, ६०७ रुपये तुमच्यापाशी असण्याची गरज आहे. तेही २३ दिवशी 'तो' आकडा येईल असे गृहीत धरल्यामुळे. 'तो' आकडा लवकर आला तर कमी पैसे लागतील आणि २३ दिवसांपेक्षा जास्त दिवस लागले तर, मेलात, ८३ लाख, ८८ हजार, ६०७ रुपयांपेक्षा अजून जास्त रुपये लागतील.

ही चर्चा आवडली ,सर्वांचे अभिप्राय वाचले .धन्यवाद .

ज्ञानव's picture

4 Dec 2013 - 1:48 pm | ज्ञानव

जन्म आणि मृत्यूची तारीख आधीच का शोधा (कदाचित दोन्हीकडे सुटका आहे म्हणून)

हा प्रश्न १००% बरोबर आहे पण इथे अप्रस्तुत आहे

हा धागा मूलतः त्या लोकांबरोबर चर्चा व्हावी ह्या हेतूने टाकला होता जे ज्योतिष बघतात फलादेश सांगतात
हं त्या मागचे कारण हे चिकित्सा किंवा कुतूहल किंवा विज्ञानाचे आणि ह्या विषयाचे काही जुळते का ते पाहणे हा आहे.
जोपर्यंत पाणी नाका तोंडाशी येत नाही तोपर्यंत माकडीण हि पिलाला पायाखाली घेत नाही अर्थात जेव्हा माणूस अतीव अडचणीत येतो (हि अडचण शब्दात समजणार नाही ....स्वच्छतेचे अति भोक्ते सुद्धा सार्वजनिक मुतारी नको म्हणतात आणि अतीव अडचण आलीकी आपलेच नियम धाब्यावर बसवून मुतारीत जाऊन येतात किंवा जाऊ कि नको माझे तत्व जगाला माहित आहे त्या पेक्षा होल्ड करू का? पण ते हि आरोग्यदायी नाही मग काय करू ह्या द्विधा मनस्थित जातात मला ती द्विधा परिस्थिती म्हणजे ढोंग वाटते.)तेव्हाच ज्योतिष ह्याद्वारे आधार शोधण्याचा प्रयत्न करतो.
ज्योतिषी हलकट असतीलही कारण त्या पठडीतल्या ज्योतिषांचे प्रमाण जास्त आहे. पण ज्योतिष थोतांड आहे किंवा आहेच असे म्हणणे कदाचित घाईचे होईल.

अनेक फसलेले फलादेश आहेत अगदी उद्या हा माणूस मारणार तुम्ही नातेवैकाना बोलून घ्या असे डॉक्टरानी सांगितले आणि नाही हा माणूस काही आज मरत नाही असे ज्योतिषाने सांगितले तेव्हा कधी डॉक्टर तर कधी ज्योतिषी बरोबर आले आहेत
प्रसुतीच्या डेट्स मेडिकल आणि प्रत्यक्ष ह्यात ६-७ किंवा जास्त दिवसाचा फरक आला आहे तर ज्योतिष द्वारे अगदी १ दिवसाचा फरक आला आहे
त्यामुळे कुठलीही गोष्ट एकदम बरोबर म्हणून वाहवत जाऊ नये तसे ती चूकच आहे हे म्हणण्याचा आतताईपणा हि करू नये.

तूर्तास हा धागा माझ्याकडून बंद करण्यात आला आहे.

ज्ञानव's picture

4 Dec 2013 - 1:51 pm | ज्ञानव

अनेक फसलेले फलादेश आहेत अगदी उद्या हा माणूस मारणार तुम्ही नातेवैकाना बोलून घ्या असे डॉक्टरानी सांगितले आणि नाही हा माणूस काही लवकर किंवा उद्या मरत नाही असे ज्योतिषाने सांगितले तेव्हा कधी डॉक्टर तर कधी ज्योतिषी बरोबर आले आहेत

असे वाचावे

उपास's picture

4 Dec 2013 - 8:08 pm | उपास

ज्ञानव तसेच पेठकर काकांचे प्रतिसाद वाचनियच आणि मननियही.
उत्सुकता शमनार्थ जोतिषाकडे जाणार्‍यांचे प्रमाणही बरेच आहे, पण ज्योतिषाच्या आहारी जाऊ नये ही खरंच.
कुणाचाही जन्म आणि मृत्युची वेळ आपल्या हातात नाही हे अनुभवलय. अगदी इंडक्षन/ सिझेरियनच्या तारीख ठरवून केलेल्या केसेस सुद्धा ऐनवेळी पुढे/ मागे होत असलेल्या पाहिल्यात. तस्मात, जे आहे ते स्विकारुन आनंदाने पुढे नाण्यात शहाणपणा :)

प्रकाश घाटपांडे's picture

9 May 2017 - 1:43 pm | प्रकाश घाटपांडे

शेवटी खरी माहिती काय आहे?

कुटस्थ's picture

11 May 2017 - 3:42 am | कुटस्थ

"पण जर मृत्यू समय, मृत्यू तारीख, मृत्यू ठिकाण दिले तर त्या माणसाचा पुनर्जन्म होईल का?, केव्हा होइल?, कि होणारच नाही वगैरे सांगता येते का ?"-->

ज्ञानवजी,
माझ्यामते मृत्यू स्थान वेळेवरून पुनर्जन्माची वेळ नाही सांगता येत. ज्योतिषशास्त्र हे कर्माधिष्टीत आहे. माणसाचा पृथ्वीवरील जन्म हा पूर्वजन्मात केलेली काही फळे ह्या जन्मात भोगण्यासाठी होतो. तसे ते भोगण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती निर्माण करून देण्याचे कार्य हे ग्रह करत असतात. कुंडली म्हणजे ग्रहांची केलेली मांडणी ज्यावरून फलादेशाचा अंदाज बांधता येतो. हि मांडणी करण्यासाठी आवश्यक घटक म्हणजे जन्मस्थळ आणि जन्मवेळ. त्यामुळे फलादेशाचा अंदाज बांधण्यास मदत करणारे हे ज्योतिषशास्त्र पृथ्वीवरील जन्मानंतर मदतीस येते.
हिंदू संस्कृतीतील वेद, शास्त्रे, पुराणे यातील मताप्रमाणे मानवी आत्म्याला ३ देहांची उपाधी लाभली आहे. स्थूलदेह, सूक्ष्मदेह, आणि कारणदेह. स्थूलदेह पडल्यानंतर सूक्ष्मदेहसहित आत्मा का सुक्ष्मलोकात जन्म घेतो म्हणजेच माणसाचा जसा स्थूलदेहसहित पृथ्वीवर जन्म होतो तसाच मृत्यूनंतर तो सुक्ष्मलोकात होतो. सुक्ष्मलोकात किती वर्ष राहायचे हे माणसाच्या सर्व जन्मातील केलेल्या कर्मावर अवलंबून असते. साधारणपणे जास्तीत जास्त हे आयुर्मान पृथ्वीवरील १००० वर्षाइतके असू शकते. (संदर्भ: Book Autobiography of a Yogi by Paramhansa Yogananda: Chapter 43: The Resurrection of Shri Yukteshvar).
कोणत्या कर्माचे फळ भोगायचे हे निश्चित झाले कि त्याप्रमाणे पृथ्वीवरील एखाद्या स्थानावर ग्रहस्थिती निर्माण झाल्यावर माणसाचा जन्म होतो. सध्याचे पृथ्वीवरील ज्योतिषशास्त्र हे कर्मविपाकाचे गणित करण्यास असमर्थ असल्याने पूर्वजन्म केंव्हा आणि कुठे होईल हे नाही सांगता येत. यदाकदाचित सुक्ष्मलोकात पृथ्वीवरील ज्योतिषशास्त्रप्रमाणे काही असल्यास सुक्ष्मलोकात मृत्यू कधी होईल असे सांगता येईल व त्यावरून साधारण ८-९ महिन्यांनी पृथ्वीवर जन्म असेल असे भाकीत करता येऊ शकेल :D
परंतु योगशास्त्रात अश्या काही क्रिया आहेत जेणेकरून आपण शोधात असलेल्या एखाद्या माणसाचा पुनर्जन्म झाला आहे किंवा नाही हे सांगता येऊ शकते.
अर्थात तश्या क्रिया केवळ अतिउच्च योग्यांनाच करता येतात व आपल्यासारख्या सामान्य माणसाला नाही हे सांगणे आलेच. Autobiography of a Yogi मध्ये योगानंदांनी थोडक्यात त्याचा संदर्भ दिला आहे (chapter २३). तो जरूर वाचावा.

बाकी मला पत्रिका पाहण्याचा अनुभव नाही. तुमच्या त्या प्रश्नावर जाणकार लोक प्रकाश टाकतीलच.

कुटस्थ's picture

11 May 2017 - 5:22 am | कुटस्थ

एक बदलः वर नोन्दवलेला (chapter २३) हा २३ नसुन chapter २८ अहे.

इरसाल कार्टं's picture

12 May 2017 - 10:51 am | इरसाल कार्टं

अजून पूर्ण वाचले नाही, आता आधी चॅपटर 28 वाचतो.