मलई पनीर / पनीर मलई

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
6 Aug 2013 - 10:24 am

Paneer

साहित्यः
१. अमुलचे पनीर क्युब्स - २०० ग्रॅम
२. चिरलेले कांदे - २ मध्यम
३. काजु/बदाम - १ चमचा प्रत्येकि (एच्छिक)
४. पेरभर आलं
५. लसुण पाकळ्या - २
६. हिरव्या मिरच्या - २
७. हळद - पाव चमचा
८. साखर - १/२ चमचा
९. तमालपत्र - २, जिरं - १/२ चमचा
१०. तेल - ४ पळ्या
११. भरडसर वाटलेली काळि मीरी - २ चिमुट
१२. फ्रेश क्रिम - १/२ कप
१२. चवीनुसार मीठ, सजावटिसाठि कोथिंबीर

कॄती:
१. अमुलचे पनीर क्युब्स थोडया वेळ गरम पाण्यात ठेवा म्हणजे मउ पडतील
२. काजु/बदाम उकळत्या पाण्यात एक ५ मि. घालुन बाहेर काढा. बदाम सोलुन घ्या
३. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत/पातेल्यात २ पळ्या तेल तापलं कि चिरलेला कांदा घालुन परता. कांदा साधारण लालसर झाला कि चिरलेल्या लसुण पाकळ्या/आलं आणि हिरव्या मिरच्या घालुन परता
४. एक ५-६ मि. गॅस बंद करा. मिश्रण थंड झालं कि काजु/बदामासकट मिक्सर मधे मुलायम पेस्ट करुन घ्या. गरज वाटल्यास वाटणात पाणी घाला
५. आता त्याच नॉनस्टिक कढईत २ पळ्या तेल तापलं कि १/२ चमचा जिरं, तमालपत्र घाला
६. जिरं तडतडलं कि वाटलेली पेस्ट घालुन परतत रहा. काजु/बदामा मुळे पेस्ट कदाचीत खाली लागेल तेव्हा लागेल तसं थोडं थोडं पाणी घालुन परतत रहा. एक ४-५ मि. पाव चमचा हळद घाला
७. हळदिचा कच्चा वास गेला आणि बाजुच्या कडेन तेल सुटु लागलं कि १/२ चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि फ्रेश क्रिम घालुन ग्रेव्हि सारखी करा. गरज वाटल्यास पाणी घाला
८. मउ झालेले पनीरचे क्युब्स ग्रेव्हित घालुन मंद आचेवर ग्रेव्हि उकळु द्या व एक ५-७ मि. गॅस बंद करा.
९. सर्व करण्याआधी करुन वरुन भरडसर वाटलेली काळि मिरी घाला
१०. बारिक चिरलेली कोथिंबीर पेरुन गरमा गरम मलई पनीरचा पोळि, फुलका किंवा नान बरोबर आस्वाद घ्या

अवांतरः मी कोंथिंबीरिच्या छोटया दांडया वापरलेत.....उगाच तेवढयावरुन वाद/चर्चा नको :D

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

6 Aug 2013 - 10:32 am | त्रिवेणी

काल अआनी सांगितल्याप्रमाणे जेवायला येताना आणायच्या पदार्थामध्ये अजुन एका पदार्थ अॅड झाला.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Aug 2013 - 8:38 pm | अत्रुप्त आत्मा

@अजुन एका पदार्थ अॅड झाला. >>> +१ http://www.easyfreesmileys.com/smileys/free-tongue-smileys-792.gif

मुक्त विहारि's picture

6 Aug 2013 - 11:45 am | मुक्त विहारि

झक्कास....

मदनबाण's picture

6 Aug 2013 - 11:52 am | मदनबाण

हापिसातुन फ्लिकर दिसत नसल्याने घरला जाउन पाकॄती डोळे भरुन पाहिन म्हणतो... बाकी पाकॄ पनीर ची असल्याने बाय डिफॉल्ट आवडली गेली आहे. :)

(मनसोक्त पनीर चापणारा);)

प्रभाकर पेठकर's picture

6 Aug 2013 - 12:06 pm | प्रभाकर पेठकर

पनीर आणि क्रिम असल्याकारणाने ही, कॅलरीज् पुष्ट, पाककृती बनवावी की नाही अशा दुविधेत पडलो आहे. तरीपण स्वतःचाच डोळा चुकवून एकदा तरी करून हादडली पाहिजे असा मोहमयी विचार मनाला कुरुवाळतो आहे.

कवितानागेश's picture

6 Aug 2013 - 8:05 pm | कवितानागेश

पनीर स्पेशालिस्ट आले का परत! ;)
पनीर थोडे परतून घेतले तर कसे लागेल?

पैसा's picture

6 Aug 2013 - 9:26 pm | पैसा

पाकृ मस्त! फटु कातिल!

हळद न घालता व्हाईट ग्रेव्ही कशी वाटेल? कारण पनीर अन मलई दोन्ही पांढरे आहेत.
एकुण चविष्ट दिस्ते आहे प्रकरण.

दिपक.कुवेत's picture

7 Aug 2013 - 2:48 pm | दिपक.कुवेत

माउ: पनीर थोडं परतवुन घ्यायला हरकत नाहि पण मग ते रबरासारखं लागणार नाहि याची काळजी घे. वरीलप्रमाणे जर नुसतच टाकलस तर खाताना एकदम मउसुत लागतं

अपर्णा: हो व्हाईट ग्रेव्हीच सुंदर दिसेल. हे माझ्या लक्षातच आलं नाहि

वाह नेहमीप्रमाणेच मस्त पाककॄती आणि फोटॉ. :)

आठवडाभर हापिसात बघुन त्रास होईल म्हणुन मुद्दामुन बघायचे टाळत होतो.
तरीही आत्ता जेवण झाल्यावर बघुनसुध्दा त्रास झालाच ओ!

सुहास्य's picture

11 Nov 2013 - 1:54 pm | सुहास्य

यम्मी ....:)