चूकीचे ( गझल )

मी बोललो " हे वाटले चूकीचे "
"मी बोललो" हे जाहले चूकीचे

होतात कोठे वाद बोलण्याने..
अंदाज मी हे बांधले चूकीचे

जे घावले त्याच्यात अर्थ मिळेना
मी शोधले ... ते दाखले चूकीचे

ओटीत गाथा आज ओतल्या तू
रे हाय!! का ?...मी वेचले चूकीचे..

- आनंदा
आनंद माने, सोलापूर

माझे गायक

माझे गायक मित्र सुबोध साठे यांनी ही गझल गायली आहे ती ऐकण्यासाठी इथे क्लिक करा..

वा..

छान आहे गझल..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/