मिसळपाव वरील माझे हे पहिलेच लिखाण,
चूक भूल माफ असवि.
च्याइला आई आणि मुलाच्या नात्या बद्दल सगळेच लिहितात,
पण बाप आणि मुलाच्या नात्याच काय हो …।
आईशी असलेला नात,ओढ जगजाहीरच कि हो,
पण बापाच्या नात्याशी असलेली घट्ट विण कोण जाने….
मुलासाठी हळवी होणारी माऊलि सगळ्यांना ठाऊक असते,
पण मुलाच्या पाठीशी खंबीर उभा राहणाऱ्या बापच काय हो…
आई आपल्या भावना व्यक्त तरी करू शकते हो,
पण त्याच भावना फक्त नजरेतून व्यक्त करणाऱ्या बापच काय हो…
आई मुलाच नात असेना का हृदयस्पर्शी,
पण बाप लेकाच्या नजर-नजरेत त्याहून कैक मोठी जादू आहे हो,
लहानपणी धडपडताना हाथ देणारा तो बापच असतो,
अल्लड वयात नजरेतून जरब बसवणारा बापच असतो,
लग्न झाल्यावर आयुष्या बद्दल चार गोष्टी सांगणारा पण फक्त बापच असतो,
आहेच मुली बाप लेकाच नात असा कणखर,खंबीर,राकट,
पण तरीही अवीट आणि प्रेमळ ……
प्रतिक्रिया
23 Jul 2013 - 1:38 pm | पक पक पक
तुमच्या बापा बद्दलच्या भावना समजु शकतो हो,
पण ह्या असल्या लिखाणाला काही अर्थ आहे काहो.. ;)
पावसाळ्यात पोटाचा त्रास बर्याच जणांना होतो हो,
पण हि काय पोटातल्या भावना मोकळ्या करायची जागा आहे का हो... ;)
23 Jul 2013 - 3:45 pm | दादा कोंडके
'बापा'च्या कवितेची सुरवात 'आई'वरून शिवीने झाली.
हाण्ण!...
23 Jul 2013 - 3:46 pm | बॅटमॅन
दादा, भावणाओंको समझो :)