मांजर, हत्ती, कुत्रा कि चिमणी?

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
17 Jul 2013 - 11:12 pm

पाहिले एक मांजर , दूध पिताना
मिटलेले डोळे , सतर्क कान
भोवताली
सर्व लक्ष असताना

पाहिले एक हत्ती
तलावास क्रमण करताना
भुंकले कुत्रे , ओरडले माकड
मात्र स्वतः मग्न चालताना

मग पाहिल्या चिमण्या
लागताच चाहूल 'संकटाची'
वाचविण्यास इतरांस
निस्वार्थ सतर्क करताना

गरज अश्याच चिमण्यांची
आज समाजास आहे
मी पा एक वृक्ष, मात्र
बाकी आपल्या वर आहे!

समाज

प्रतिक्रिया

धन्या's picture

17 Jul 2013 - 11:37 pm | धन्या

अप्रतिम काव्य !!