वाड्यात.... १

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
6 May 2013 - 3:33 pm

मराठे दूर गेली त्यानंतर वर्षही संपलं होतं, वर्ष संपलं होतं म्हणून कॉलेज संपलं आणि बाय डिफॉल्ट बेकारी सुरु झाली होती. त्या वर्षी कोणत्याही मुलीकडे मी बघितलं सुद्धा नाही. पुन्हा ते सगळं सुरु झालं म्हणजे..?

मराठे दूर गेली म्हणून जाधवही दूर गेला आणि पाप्याही. शत्रूंचीसुद्धा सवय होते अशी विचित्र जाणीव झाली.

गावात बसून काय करणार म्हणून आम्ही पोरंही शहरात आलो. आमच्यासाठी शहर म्हणजे येऊन जाऊन पुणे अन मुंबई.

शहरात कुठेतरी कॉम्प्युटर शिकायचा असा प्लॅन होता.. परांजप्या आणि मी दोघेही एमसीए आणि तसल्या एंट्रन्स देऊन मार खाऊन बसलो होतो. आता कॉम्प्युटर क्लासमधे जाऊनच काहीतरी सुरुवात करायला हवी होती, नाहीतर रिकामे बसलो की बेकारतुंबडी म्हणणारच सगळे लोक. आणि तसं कितीवेळ चालवणार?

तसे आम्ही आपले आपण कुठेतरी जाण्याच्या हिमतीचे नव्हतोच. आणि आपण गांडू आहोत अशी जाणीवही होती. शेपटावर पाय पडेपर्यंत पेटायचे नाही अशा प्रकारातले आम्ही होतो. मोमीन त्याच्या कोणा भावबंदाच्या मदतीने पुण्यात कुठेतरी खोली घेऊन राहिला होता. मग त्याची काडी वापरुन मीही पुण्यातच जायचं असं ठरवलं आणि परांजप्याला डायरेक्ट सांगून टाकलं. आला तर आला.. असंही इथे काय शाट करियर करणार होता तो. आमच्यासारख्या सेकंडक्लास पोरांना पुढे काही खास करता येऊ शकतं असं काही माहीतच नव्हतं खरं तर.

कॉम्प्युटरला बरे दिवस आहेत आणि तो शिकला की मरण नाही असं खूपजणांकडून ऐकलं आणि परांजपेसाठी महिनाभर वाट पाहून शेवटी एकटाच निघून आलो. येण्याच्या आदल्या रात्री ब्राऊला मिठी मारुन रडलो. पण आता पूर्वीसारखं घुसमटवणारं जोरदार रडू येत नाही.. म्हणून वाचलो.

पुण्यात पोचलो रात्री झोपेच्या वेळी.. मोमीनची खोली गाठली आणि लक्षात आलं की तो आणखी तीन पोरांसोबत एका वाड्यातल्या छोट्या जळमटल्या खोलीत पालीप्रमाणे राहात होता. खोलीत चिरडलेल्या ढेकणांचा पादरट वास येत होता.

"आयच्चा.. इथे राहायला नाही जमणार मोम्या..", मी खूपच हळू मोमीनच्या कानात बोललो.

मोमीनने मात्र आवाज अजिबात न लपवता खणखणीत बोलायला सुरुवात केली, "केळ्या, भडव्या,तुझा बंगला गावी ठेवून ये आधी.. तरच इथे जमेल.."

"अरे तसं नाय रे, इथे आधीच फुल्ल आहे ना रूम, म्हणून म्हटलं..", मी त्याचा आवाज खाली आणण्यासाठी म्हटलं.. च्यायला आल्याआल्याच भांडण नको.

"फुकन्या, इकडे सगळे आपल्यासारखेच आहेत. इथे चौघात पाचवा आरामात झोपेल.", मोमीनने मधे पॉज घेतला. तो या खोलीत मला घेण्यासाठी आणखी मुद्दा शोधतोय असं वाटलं.

"आणि मेन म्हणजे इथे बाजूच्याच वाड्यात मेस आहे.. इथे राहून तुला बरं पडेल. बाहेर कुठे गेलास तर हजार बाराशेच्या खाली जागा नाही. आणि इथे राहिलास तर आम्हाला सुद्धा शेअरिंग होईल. तुझा शेअर फक्त दोनशे.."

मी इथे राहिल्याने मोमीनचेही पैसे वाचणार आहेत हे माझ्या लक्षात आलं.

कोपर्‍यातल्या सोलापुरी चादरीच्या ढिगातून एक काटकुळा पोरगा उठून बसला आणि कानात करंगळी घालून खटाखट हलवत म्हणे, "वैसे बी छे लोगा का रूम है.. हम पूरे रूम का भाडा देते. तुम आयेगा तो सबका भाडा बचेगा.. और तेरा बी."

मोमीनने त्याची "अरुणी" म्हणून ओळख करुन दिली.. अरुणीने स्वत:च्या नावाचा करेक्ट उच्चार अर्नी आहे असं क्लियर केलं.

मोमीनने तिथे भिंतीला लागून पडलेली दोन मोठी खोकी खोलीच्या मधे ढकलली आणि म्हणाला,"आत्ता रात्री तर नाही ना चाललास दुसरी रूम शोधायला? मग आत्ताच्या वेळी इथे पड.. नंतर बघू काय ते.."

दमलो तर मी होतोच. म्हणून मग गपचूप तिथे बॅग टाकली आणि तिचीच उशी करुन आधीच घातलेल्या चटईवर अंग सोडलं. बॅग उघडून आपली चादर इथे अंथरावी असा विचारही मनात आला नाही कारण इथल्या घाणीत ती चादरही घाण झाली असती. पुन्हा एखादा ढेकूणही त्यात भरला असता तर.. ?

इथे मी राहणं बापजन्मात शक्य नव्हतं.

खोली एकदम थंड आणि शांत होती. अंधाराने भरलेली होती. अशा जागी इतकी शांत झोप लागते हे मला सकाळी उठल्यावरच कळलं.

उठल्याबरोब्बर बघितलं तर अर्नी गायब झाला होता. पण खोलीतला आणखी एक उरलेला काळा केसाळ काटकुळा सांगाडा कुबटशा अंथरुणात उठून बसला होता.

मोमीन आधीच क्लासला पळाला होता. आणि चौथा गोराघारा गुबगुबीत पोरगा डोळे मिटून पद्मासनात उघडाबंब अन श्वास रोखून बसला होता. एका बोटाने नाकपुडी दाबून.

एकेक येडझवे नमुने दिसताहेत हे लगेच लक्षात आलं. आजच्या आज अन आत्ताच्या आत्ता उठून चांगलं हॉटेल शोधायला पाहिजे असं म्हणून उठणार होतो तितक्यात अर्नी दोन वाट्या हातात घेऊन हाय हुई करत खोलीत शिरला. त्याची बोटं पोळत होती असं वाटलं. माझ्यासमोर वाटी ठेवली तेव्हा एकात एक वाटी उलटी मारुन आणलेला चहा दिसला.

मला असला वाटी चहा अजिबात आवडत नाही. म्हणजे चहा आवडतो, पण ती वाटी नाही. काचेच्या ग्लासातून चहा पिणं म्हणजेच खरा चहा पिणं. सँडोजच्या चहाचा ग्लास आठवून जिभेला चरका लागल्याचा भास झाला. च्यायला या सौथिंडियन लोकांना बाकी खाण्यापिण्याची मजा कळते पण चहा कसा प्यायचा ते कळत नाही. मी तोंड वाकडं होताहोता सरळ केलं आणि "थँक्स रे.." म्हटलं.

मग माझ्या लक्षात आलं की सांगाडा आणि ध्यानमग्न यांच्या चहाचं काय? मलाच व्हीआयपी ट्रीटमेंट का?

"अर्नी.. इनकी चाय?"

"ये काल्या तो खुद जाके पीता.. तुम आजही आया ना तो गेष्ट है ना मोमीन का.. इसलिये. और ये फडके तो एकदम योगाचारी , वो तो सेंट आदमी.. इसलिये चाय नही पीता. ओन्ली गायका मिल्क. अबी उसका ऐसा आसनही और एक घंटा चलेगा. तुम पीले रे चाय तुम्हारी.."

वाटीत चहा ओतला. पुण्यातल्या सकाळच्या थंडीतही अर्नीने पळत पळत आणल्यामुळे चहा तसा गरम राहिला होता. पण मला एकदमच कढत चहा लागतो. पुन्हा एकदा सँडोचा वाफाळत्या चहाची सय काढत डोळे भरले आणि वाटी तोंडी लावली. चहा आणखीच कोमट लागायला लागला.. जास्त गोड होता.. मुसुंबीचा रस पिऊन आजारपण भोगल्याचा भास झाला पण अर्नीने सकाळी सकाळी माझी आठवण ठेवली होती ते जाणवलं..

प्रेशर आल्याबरोब्बर टॉवेल लावला आणि संडास कुठे म्हणून विचारलं. अर्नी मला दोन खडखडते जिने उतरुन वाड्याच्या तळाशी कुठेतरी असलेल्या त्या जागेच्या अगदी दारात घेऊन गेला. तिथे दिवसाही अंधार होता. आता हा अर्नी आतपर्यंत सोबत करतो की काय असं वाटायला लागलं.

"मैं जायेगा अर्नी अब.. थँक यू यार..", मी म्हणालो.

"तू पानी ज्यादा डालेगा हा..वो वाडा की मालकीन हर इकका होने के बाद चेक करता पानी डाला की नही..फिर चिल्लाता सब के सामने.. तू संभालो.. और बाजूवाला संडास में मत जा.. वो ओनर का संडास रेहना"

अर्नीच्या हिंदीने लईच हसू येत होतं. आणि आत गेल्यावर जो काही गुप्पकन अंधार झाला म्हणता. बसायचं कुठे तेही कळेना.

"अर्नी.. लाईट लगा ना यहांका", मी ओरडलो.

"लाईट नही लगाता मालकीन. किसदिन हमने गल्तीसे ऑन छोडा तो निकाली बल्ब... मोंबत्ती रखा उदर उप्पर.. माचिस भी रखा.. उसको जला"

थरथरत्या हाताने काड्यापेटी चाचपली अन मेणबत्तीचा अर्धा इंच उरलेला तुकडा पेटवला. दोन काड्या खर्ची पडल्या.

आता आपण बाहेर आलो की मालकीण उभी असणार चेक करायला या विचाराने आतच गोळा आला आणि दहा मिनिटांचं काम पाच मिनिटांत संपलं. संडासात नळ नव्हता. समोरच्या टाकीतून तीनचार वेळा डबा भरुन ओतणं भाग होतं.

बाहेर आवाज न करता यावं म्हटलं तर जुनाट आणि जडशीळ कोयंडा जोर लावून उघडल्याबरोब्बर खळ्ळ खाट आवाज करत दारावर आपटला.

बाहेर येतो तोच समोर लगबगीने आलेल्या मालकीणबाई दिसल्या. मी खालच्या मानेने टाकी ते संडास अशी पखालसेवा सुरु केली.

"कोणाकडे आलायत? फडक्यांकडे का?", नाकातल्या आवाजात लठ्ठ मालकीणबाई म्हणाल्या.

प्राणायाम करणारा फडके हा या खोलीचा मुख्य भाडेकरु आहे हे समजलं.

"हो. फडकेंकडे.. म्हणजे तिथेच .. मोमीन माझा मित्र..", मी हळूच बोललो.

"मोमीन? मोमीन नाव कोणाचं आहे इथे?" मालकीणबाई धक्का बसल्यासारख्या बोलल्या.

हगलो तिच्यायला.. मोमीन काय नाव लपवून राहिलाय की काय इथे? मी उगाच बल्ल्या केला की काय?

"नाही. म्हणजे मी फडकेंकडेच आलोय.. गेस्ट.. मला बाकीच्यांची नावं नीट माहीत नाहीत.. काहीतरी गोंधळ झाला असेल माझा.."

"बरं..पाणी नीट ओतत चला.."

मला एकदम चीड आली.. पण इथे रहायचं नसल्यामुळे उगं ताणाताणी कशाला, म्हणून घुटका गिळून गप्प झालो.

"किती दिवस मुक्काम आहे? रात्री मुक्कामाला तर नाहीत ना? गेस्ट चार्ज लागतो."

"नाही. मुक्काम नाही. आजच्या दिवसात इथून जाईन."

डगमगत्या जिन्याने रूमवर आलो. अर्नीने माझ्यासाठी उप्पिटाची ताटली उघडी केली आणि समोर धरली. उडप्याचं चिक्कट उप्पीट मला आवडतं तसंच.

उप्पीट खाता खाता मोमीनबद्दल मी केलेली काशी मी अर्नीच्या कानावर घातली.

ऐकता ऐकता फडकेने डोळे उघडले आणि आसन सोडलं. त्याचे डोळे हिरवेगार दिसले.

"मालक वेडझवा आहे. म्हणून आम्ही मोमीनचं नाव इथे अमित म्हणून सांगितलं आहे. तो सकाळी तुला सांगायला विसरला असणार."

"आयचा घो.. मी घाण केली उगीच खाली.",मी म्हणालो.

"हरकत नाही. आपण धुवू घाण म्हणे..", फडके हसून बोलला.

अर्नी मागून म्हणाला,"मोमीन नाम बताना तो पूरे पेठ में जगाह नही मिलना.. बोत दूर जगा मिलना..क्लास बी दूर पडना.."

दरवाजा लोटून काल्या आत आला. हातातला पेपर बघत त्याने घोषणा केली, "हा बघ पिक्चर कोणता लागलाय.. मालिबू मडस्लाईड.."

"कंप्लीट आहे का पण? की हाफ?", फडके म्हणाला.

"एकदम कंप्लीट नाही रे.. थेटरला लागतो तेवढा कंप्लीट आहे.. चल दुपारीच जाऊया..", काल्याने स्पष्ट केलं.

"केळकर येतोस का? पण गरम आहे हां पिक्चर.. तुला आवडत नसेल तर नको येऊ मग", फडके माझ्याकडे वळून म्हणाला.

मला डीके, परांजप्या आणि फॉक्सी लेडीची जाम म्हणजे जाम आठवण झाली.

"चालेल.. जाऊ या टाईमपास..", मी म्हणालो.

"मी आलोच..", फडकेने आसनाची घडी केली आणि कमरेला टॉवेल गुंडाळला.

खोलीत ढेकणांसाठी व्यवस्थित फवारा मारला आणि जरा उदबत्ती लावली तर खोली तशी ठीक होईल असं वाटायला लागलं.

....

(क्रमशः)

कथाविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 May 2013 - 3:35 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

पण अनावश्यक जिलबी.

तसं सगळंच अनावश्यक आहे. पण ही अनावश्यक जिलबी असं म्हणण्यामागचा उद्देश विस्कटून सांगितल्यास बरं होईल.

धन्यवाद.

कपिलमुनी's picture

6 May 2013 - 5:17 pm | कपिलमुनी

आता तुम्ही पण असल्यां प्रतिसादांना उत्तरे द्यायला लागला का ? मारा फाट्यावर !!

इतक्या दिवसांनी तुम्ही लिहिते झालात याचा आनंद आहे .. लौकर लौकर येउ द्या

प्रकाश घाटपांडे's picture

6 May 2013 - 5:39 pm | प्रकाश घाटपांडे

हेच म्हणणार होतो.

अग्निकोल्हा's picture

6 May 2013 - 8:17 pm | अग्निकोल्हा

तसं सगळंच अनावश्यक आहे.

चुक भुल झाल्यास क्षमा करा. या भागाबद्दल बोलायच तर हा भाग अनावश्यक वाटला.

पण ही अनावश्यक जिलबी असं म्हणण्यामागचा उद्देश विस्कटून सांगितल्यास बरं होईल.

आधिच यावेळचा असह्य उन्हाळा, त्यात संस्थळावर नॉस्टेल्जियाचे आलेले उदंड पिक... हे असं असायच, ते तसं असायचे. तेव्हा अमुक केलं अन मग नंतर तमुक घडलंचा नुसता भडीमार... "त्या" काळातलं यांव अन "त्या" काळातलं त्यांव, कोणी मामाच्या गावात, कोणी शाळा कॉलेजात, कोणी स्टेशनात, कोणी बोटीवर म्हणून कोणी तरी वाड्याचा अट्टहास धरतय की काय असा प्रश्न लेख वाचुन निर्माण व्हावा.. इतका विदाउट हॅपनिंग.

काही मोजके लोक सिध्दहस्तच असतात, म्हणुनच काय लिहले यापेक्षा लेखकाने दिलेला "टच" वाचकाचे मन जिंकुन घेत असतो. तसही हा भाग वाचताना गवीटच तर मिसींग नाहीच मुळी. पण साला इथे तुमचे धागे "गवीटच" साठी वाचायला येतं कोण... कारण तुम्हाला तुमच्या लिखाणातुन टच न्हवे तर पंच करायची सवय आहे. पण या लेखात नॉकौट मात्र या उदंड झालेल्या नॉस्टेल्जियाने केलय, अन हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. एक ते दोन वाक्ये सोडली तर गवी-पंच टोटल मिसींग आहे. ही कदाचीत माझी भावनिक चुकही असेल... पण तरीही लिखाण औपचारीकच वाटले, जणू चवदार वाटेल अशी सुरेख पण तोच साचा, तोच पदार्थ, अन तेच कंटेंट असणारी अनावश्यक जिलबी.

ओके . सविस्तर सांगितल्याने समजले. धन्यवाद..

लेखकाने काय लिहावे हे आता वाचकांना विचारून लिहावे लागते हे माहिती नव्हते.
पुढील लेख लिहिताना आधी वाचकांची परवानगी काढावी लागेल तर..!

प्यारे१'s picture

6 May 2013 - 10:12 pm | प्यारे१

ती सिवाजींची प्रेमळ तक्रार आहे मालक. पण मुळात हे नॉस्टॅल्जिक लेखन नाही तर केळकर नावाच्या कथानायकाचं लिखाण आहे असा माझा समज आहे, केळकरची स्टोरी समजण्यासाठी ब्राऊ नि त्याबरोबरची सगळी 'प्रकर्णे' वाचावीत असा अनाहूत सल्ला देण्याचे धाडस मी पामर मा. श्री. रजनिकांत (अका) द बॉस यांजप्रति करतो.

तुमचे मत मान्य. पण काय लिहावे व काय वाचावे याचे प्रत्येकाचे अधिकार ठरलेले आहेत व तरी एखादी तक्रार (प्रेमळ) जरी असली तर ती त्या लेखकाला व्यनि करुन किंवा खरड करुन कळवता येतेच की. हा जिलेबी इत्यादी काय प्रकार आहे हे समजले पण त्यानंतर आलेला खुल्लासा काही पटला नाही (वर मामाचे गाव याचा उल्लेख केला गेला आहे, त्यामुळेच लिहतो आहे असे नसले तरी त्यामुळे याकडे लक्ष वेधले गेले हे मात्र खरं).

त्यापेक्षा लेखन कसे असावे हे गवि आणि इतरांनाही कळावे, म्हणून सिवाजी-द-बॉस (अका) ... (अका) ... वगैरे यांनी निदान एक तरी लेख लिहावा असा अनाहूत सल्ला देण्याचे धाडस मी, पामर मा. श्री. रजनिकांत (अका) द बॉस यांजप्रति करत आहे.

मी, पामर मा. श्री. रजनिकांत (अका) द बॉस यांजप्रति

हे

मी पामर, मा. श्री. रजनिकांत (अका) द बॉस यांजप्रति

असे वाचावे. स्वसंपादनाची सोय नसल्याचा परिणाम हो, बाकी काही नाही.

मी फक्त त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे स्पष्ट व्हावं म्हणून विचारलं.

असं ते का म्हणताहेत असा माझा प्रश्न मुळीच नाही. मला त्याची कल्पना आहे.

बर्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्या. सिवाजी द बॉस यांनी केवळ या कथेचे यापूर्वीचे सर्व भागच नव्हे तर माझे सर्वच लिखाण अगदी पूर्वी आणि पूर्वीपासूनच वाचले आहे हे स्पष्ट झालं. स्वतः ते देखील एक मुळात उत्कृष्ट लेखक आहेत आणि बराच काळ लेखन केलेलं नाही. तेव्हा त्यांनी वेळ काढून अवश्य लिहातं व्हावं अशी माझीही विनंती आहे.

धन्यवाद.

पैसा's picture

6 May 2013 - 7:20 pm | पैसा

लेखक इकारान्त आहे याचा अर्थ असा नाही की "ती लेखिका" आहे! जरा शांति को धारण करो!

पिलीयन रायडर's picture

7 May 2013 - 9:17 am | पिलीयन रायडर

काय तुम्ही पैसा ताई..
तुम्हालाबी कळना का आता की कुणाला मनावर घ्यायचं न कुणाला फाट्यावर मारायचं..
गविंच्या लेखनाला.. तेही ब्राऊच्या सिरिझला "जिलबी" म्हणणार्‍या माणसाचं मुळात कुणी काही मनावर घेऊच कसं शकतं!

मी_आहे_ना's picture

6 May 2013 - 3:58 pm | मी_आहे_ना

बरेच दिवसांनी गविटच वाचायला मिळतंय..पुभाप्र.

मोदक's picture

6 May 2013 - 4:00 pm | मोदक

वाचतोय.

नंदन's picture

6 May 2013 - 4:05 pm | नंदन

सुरूवात झकास. वाचतो आहे.

राजेश घासकडवी's picture

6 May 2013 - 8:16 pm | राजेश घासकडवी

असंच म्हणतो.

प्यारे१'s picture

6 May 2013 - 4:05 pm | प्यारे१

पुढचा भाग कधी?

स्पा's picture

6 May 2013 - 4:11 pm | स्पा

जबर्या सुरवात ...

तिथे दिवसाही अंधार होता. आता हा अर्नी आतपर्यंत सोबत करतो की काय असं वाटायला लागलं.

=)) =))

आत गेल्यावर जो काही गुप्पकन अंधार झाला म्हणता. बसायचं कुठे तेही कळेना.

=)) =))

आता आपण बाहेर आलो की मालकीण उभी असणार चेक करायला या विचाराने आतच गोळा आला आणि दहा मिनिटांचं काम पाच मिनिटांत संपलं. संडासात नळ नव्हता. समोरच्या टाकीतून तीनचार वेळा डबा भरुन ओतणं भाग होतं.

खपलो =))

मन१'s picture

6 May 2013 - 4:41 pm | मन१

शेवटच्या एकाच वाक्यात कथन करणार्‍याचं मतपरिवर्तन झालेलं दाखवून पुढील दिशेचाही अंदाज दिलात.
पुभाप्र.

सूड's picture

6 May 2013 - 4:57 pm | सूड

पुभाप्र !!

विसोबा खेचर's picture

6 May 2013 - 4:48 pm | विसोबा खेचर

छान वाटलं, येऊ द्या साहेब..

चाणक्य's picture

6 May 2013 - 4:54 pm | चाणक्य

.

श्रावण मोडक's picture

6 May 2013 - 4:56 pm | श्रावण मोडक

गवि कथन... वाचतो आहे.

गवि's picture

10 Apr 2014 - 10:46 pm | गवि

:-( Sorry..

चाणक्य's picture

6 May 2013 - 4:57 pm | चाणक्य

जॉईन झाली वाटतं

लॉरी टांगटूंगकर's picture

6 May 2013 - 5:01 pm | लॉरी टांगटूंगकर

पुण्यातले दिवस आठवले, याच टाईपची सुरुवात होती. अंधारलेल्या खोल्या, हिरवट थंडपणा, ढेकुण, काळपट चादरी, रंग उडालेल्या भिंती, अन् त्या पंधरा बाय बारामध्ये चार-पाचजण

मोदक's picture

6 May 2013 - 5:18 pm | मोदक

सदाशिव पेठ का रे..?? मी डेक्कन.

बाकी हेच आणि असेच वर्णन करेन आमच्या रूमचे. फक्त आम्ही १० बाय १० मध्ये ३ जण होतो.

भरीस भर म्हणून आठवड्यातून दोन दिवस त्याच मजल्यावरती एक लहान मुलांचे क्लिनीक असायचे. :-))

लॉरी टांगटूंगकर's picture

6 May 2013 - 5:36 pm | लॉरी टांगटूंगकर

शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोडला लागून असलेल्या गल्ल्या.

मोग्याम्बो's picture

6 May 2013 - 5:02 pm | मोग्याम्बो

Sequel आला... आता सगळे आधीचे पार्ट परत वाचून घेतो म्हणजे चांगली लिंक लागेल....

प्रकाश घाटपांडे's picture

6 May 2013 - 5:06 pm | प्रकाश घाटपांडे

एकदा अशा वाड्यात कॉट बेसीसवर गेलो होतो. मालकीण बाईना गावावरुन अर्जंट बोलावण आल आहे असे सांगून एका दिवसात कल्टी मारली होती.पैशे द्यायचे होते म्हणुन वाचलो. नाहीतर एका महिन्याचा बांबू!

खेडूत's picture

6 May 2013 - 5:26 pm | खेडूत

मस्त ओ ….
पुण्यातल्या कॉट बेसिसच्या दिवसांची आठवण करून दिलीत.
एकेक नमुने आठवले! :)

तुमचा अभिषेक's picture

6 May 2013 - 5:34 pm | तुमचा अभिषेक

मस्त खुसखुशीत.. पण पुढचे भाग लेट आले की मग मजा गेली..

अमित's picture

6 May 2013 - 5:58 pm | अमित

तुमची लिखाणशैलीच खास आहे

प्रचेतस's picture

6 May 2013 - 6:07 pm | प्रचेतस

परवाच चर्चा करत होतो की गविंचं लिखाण हल्ली खूपच कमी झालंय पण तेव्हढ्यात ही मेजवानी आलीच.

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 6:08 pm | ढालगज भवानी

बापरे वेगळच जग आहे हे!!! वाचतेय. रोचक वाटतय!

पैसा's picture

6 May 2013 - 6:19 pm | पैसा

पुढचा भाग लवकर येऊ द्या!

चिर्कुट's picture

6 May 2013 - 6:37 pm | चिर्कुट

या केळ्याच्या स्टोरीशी बरंच रिलेट करतोय मी :) पुभाप्र, लई वाट बघायला लावू नका..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2013 - 6:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन वाचतोय. पुभाप्र.
स्पानं कोट केलेली लेखनातली वाक्य जबरीच. :)

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

6 May 2013 - 6:51 pm | प्यारे१

अहो, 'आतले अनुभव' आहेत ते! ;)

मुक्त विहारि's picture

6 May 2013 - 10:13 pm | मुक्त विहारि

लय भारी...

किसन शिंदे's picture

6 May 2013 - 6:53 pm | किसन शिंदे

ज्जे ब्बात गवि!!

बर्याच दिवसांनी केळ्या परत आला.

प्रभाकर पेठकर's picture

6 May 2013 - 7:11 pm | प्रभाकर पेठकर

एखाददुसरा अपवाद वगळता, लिखाण आवडलं. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.

बॅटमॅन's picture

6 May 2013 - 7:15 pm | बॅटमॅन

अशा ठिकाणी राहण्याचा स्वानुभव नसला तरी मित्र-भौ इ.च्या रूमवर जाताना अशा रूम्स लै पाहिल्यात. खत्रूड अन तर्‍हेवाईक घरमालक हा यांचा मसावि म्हटला पाहिजे. बाकी रूमची कंडिशनसुद्धा काही वेगळी नाही. अगदी असेच! पण मत्कुणसंहाराचा मात्र दांडगा अनुभग गाठीशी आहे. कॉन्सण्ट्रेशन क्यांपात माणसे मारल्याच्या थाटात ढेकूण मारत असू. ढेकणांशी आमच्या हाष्टेल लाईफमधल्या बहुत आठवणी जोडलेल्या आहेत.आठवल्या तशा शेअर करतो.

-हॉष्टेलतर्फे ढेकणाचे म्हणून फवारले जाणारे औषध-विशिष्ट वास यायचा त्याला, थोडासा आवडायचादेखील. पण ते फवारल्यावर रूममध्ये बसणे अशक्य व्हायचे आणि काही तास रूम बंद ठेवण्याची आज्ञा होत असे. मग तोपर्यंत कुठेतरी बाहेर उंडारणे आले. काही दिवसांनी दुप्पट जोमाने ढेकणांची पैदास व्हायची, काऽही फरक पडत नसे.

-ढेकूण लै झाले की कॉटा रूमबाहेर आणायच्या. त्या आधी सगळी अंथरुणे-पांघरुणे झाद झाड झाडायची, तिथून काही ढेकूण बाहेर पडायचे. हे प्रीप्रोसेसिंग झाले, की मग कॉटांवर पेपर अंथरायचे-शक्यतोवर पुणे टाईम्सची रद्दी. शिवाय काही पेपर असे गुंडाळून त्यांची चूड करायची. मग ती पेटवायची. आणि सगळे पेपर जाळायचे. कॉरिडॉर बंदिस्त असला तर अगदी कुणाची चिता वगैरे जळत असल्यागत दृश्य दिसायचे. मध्येच मग कोपर्‍याकापर्‍यातले ढेकूण पळताना दिसायचे. त्यांची पांढरी अंडी फुटायची, त्याचा आवाज व्हायचा कधीमधी. एखादवेळेस कॉटच्या जास्तच जवळ गेल्यास काही ढेकूण अंगावरही चढायचे. चूड नीट पेटावी म्हणून ठीकठिकाणी थोडे मेण पाडले जायचे, मग मधूनमधून चूड अशी भस्कन पेटायची.

हे झाले ड्राय क्लीनिंग. काहीवेळेस गरमागरम पाणी ओतूनही चांगले रिझल्ट्स मिळायचे.

पण हेही काहीवेळेस तितके लागू पडायचे नाही. कारण खोली कितीही झाडली तरी साले ते दर्‍याखोर्‍यांत लपलेले ढेकूण साले दाद देत नसत. मग अशावेळी एकच उपाय- ऑल ऑट सुलतानढवा. मला एकदा रात्री लै पिडलं होतं नालायकांनी, ३-४ ला अंगांग खाजवत चरफडत जागा झालो. मग म्हटले %^&%$ना आज काय तो इंगा दाखवलाच पाहिजे. झालं मग, कॉट वर सांगितल्याप्रमाणे खोलीबाहेर आणली. आणि यावेळेस कर्कटक घेऊन कोपर्‍यातले समस्त ढेकूण, त्यांची अंडी, सगळा बाजार उठवला. नंतर परत कॉट जाळून शुद्ध केली आणि कॉट निर्मत्कुण केल्याच्या महदानंदात सुखाने झोपी गेलो. त्यानंतर मात्र कधीही ढेकणांनी फारसे कधी पिडले नाही. एखादा ढेकूण अधूनमधून सरहद्द ओलांडून यायचा तितकेच.

-ढेकणांचे वैशिष्ट्य म्हंजे चिमटीत धडपणी सापडत नाहीत. दाबले तरी लगेच मरत नाहीत. दोन बोटांच्या मध्ये शिग्रेटीगत धरले तर कुठे पळून जातील काही ग्यारंटी नाही. पण साले मोठे चिवट असतात खरे. एकदा एक रक्त पिऊन टम्म फुगलेला ढेकूण पाहिला, आणि त्याला मारण्याची मनुष्यसुलभ इच्छा मनात जागृत झाली. रूमचे कुलूप त्यावर आदळले. रक्त सांडले, पण ढेकूणबुवा आरामात तसेच पुढे चालले होते. संताप अनिवार झाला आणि हॅकसॉ ब्लेडने सरळ त्याला आडवे कापले. तरीही बेटा ३-४ सेमी चालून मगच शांत झाला.

-माझा एक मित्र आम्रिकेत पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला होता. तिकडे त्याचे काही दाक्षिणात्य मित्र होते, त्यांच्या रूममध्ये लै ढेकूण होते. इतके की शेवटी त्या रूममध्ये बसून बसून त्याच्या थ्रू ढेकूण मित्राच्या रूममध्ये पसरले. त्यांनी सगळ्या फर्निचरची वाट लावली, शेवटी सगळे फेकून द्यावे लागले. ढेकणांचा हा दबदबा सातासमुद्रापारही कायम असल्याचे पाहून डोळे पाणावले.

(ढेकूण-उल्लेख पाहून गहिवरलेला) बॅटमॅन.

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 7:21 pm | ढालगज भवानी

तरीही बेटा ३-४ सेमी चालून मगच शांत झाला.

शी!!! =)) =))

आगागागागागा....
डिट्टो असाच प्रकार आमच्याकडे पण होता. आम्ही असाच ढेकूणसंहार करायचो.
उन्हाळ्यात भोवताली पाण्याची लक्ष्मणरेखा चारीबाजूंनी आखून झोपणे. पाणी वाळले की मधूनच ढेकूण यायचे मग त्यांना जाळणे, रॉकेल फवारणे इ,इ, बरेच प्रयोग चालायचे. भिंती सगळ्या काजळलेल्या असायच्या.

>>>ढेकणांचे वैशिष्ट्य म्हंजे चिमटीत धडपणी सापडत नाहीत. दाबले तरी लगेच मरत नाहीत. दोन बोटांच्या मध्ये शिग्रेटीगत धरले तर कुठे पळून जातील काही ग्यारंटी नाही. पण साले मोठे चिवट असतात खरे. एकदा एक रक्त पिऊन टम्म फुगलेला ढेकूण पाहिला, आणि त्याला मारण्याची मनुष्यसुलभ इच्छा मनात जागृत झाली. रूमचे कुलूप त्यावर आदळले. रक्त सांडले, पण ढेकूणबुवा आरामात तसेच पुढे चालले होते. संताप अनिवार झाला आणि हॅकसॉ ब्लेडने सरळ त्याला आडवे कापले. तरीही बेटा ३-४ सेमी चालून मगच शांत झाला.

विपरीत परिस्थितीत जगण्याच्या ऊर्मी माणसानं ढेकणाकडून घ्याव्यात. ;)

लक्ष्मणरेखेबद्दल तंतोतंत सहमत ;) तो प्रकार परंतु फेल गेलेलाच जास्तकरून पाहिलेला आहे. :)

प्रचेतस's picture

6 May 2013 - 10:32 pm | प्रचेतस

ढेकूणपुराण आवडले.

ही जात लैच चिवट,
आमच्या एका मिपाकर मित्राकडे भयानक ढेकूण होते. दुसर्‍या दिवशी भटकंतीस त्याचेबरोबर जायचे असल्याने अजून एका मिपाकराबरोबरच त्याच्याकडे मुक्कामाला गेलो. ढेकूण असतील अशी पुसटशी शंका आली होतीच. पहाटे लवकरच उठलो तर ढेकणांची रांगच्या रांग, जिकडे बघावे तिकडे ढेकूण फरशीवर, सोफ्यावर, भिंतींवर, उशांवर, गाद्यांवर आणि ते पण चांगले टेणे, टम्म फुगलेले, अगदी बिन्धास्तपणे हिंडतायत. इतके ढेकूण आयुष्यात कधीही पाहिले नव्हते.
शेवटी त्या मित्राचे अम्ही काही जणांनी जोरदार ब्रेनवाशिंग केले आणि पेस्ट कन्ट्रोल त्याच्याकडून करवून घेतले. आता तो मिपाकर मित्र पूर्णपणे जरी नाही तरी बर्‍यापैकी ढेकूण विरहित जीवन जगतोय.

ढेकणावर आलेली ही ढेकणांचा अड्डा ही मजेदार कविता पाहा.

अगायायायायाञा ढेकूणपुरीच की हो एकदम =)) =)) =))

बाकी कविताही मस्तच! वर काहाडल्या गेली आहे, धन्यवाद वल्लीशेठ :)

छोटा डॉन's picture

7 May 2013 - 2:35 pm | छोटा डॉन

सीओईपी हॉस्टेलचा विजय असो !
जबर्‍या रे ब्याट्या, मजा आणलीस एकदम.

गवि, लेख उत्तमच.
काही काळ शिवाजीनगर आणि कसब्याच्या वाड्यात राहिलो असल्याने बरेच रिलेट करता आले.
पुढच्या भागाची वाट पहात आहे.

- (हॉस्टेलवाला) छोटा डॉन

बॅटमॅन's picture

7 May 2013 - 2:51 pm | बॅटमॅन

धन्यवाद डान्राव :)

सीओईपी हाष्टेलचा विजय असो! विजय असो!! विजय असो!!! पुढच्या भागाची वाट पाहतोय मीपण उत्सुकतेने.

(ए २०६, आय २०४, डी- २०३ अन डी २०३ वाला ) बॅटमॅन.

अरे ह्या ढेकणांपायी कसबा पेठेत माझ्या मित्रांनी एक गादी जाळली आहे. मी मात्र जेव्हा ढेकूण चावायचे, तेव्हा मालकाला फोन करुन चावायचो.

दादा कोंडके's picture

4 Aug 2013 - 1:21 pm | दादा कोंडके

ढेकूण लै झाले की कॉटा रूमबाहेर आणायच्या. त्या आधी सगळी अंथरुणे-पांघरुणे झाद झाड झाडायची, तिथून काही ढेकूण बाहेर पडायचे. हे प्रीप्रोसेसिंग झाले, की मग कॉटांवर पेपर अंथरायचे-शक्यतोवर पुणे टाईम्सची रद्दी. शिवाय काही पेपर असे गुंडाळून त्यांची चूड करायची. मग ती पेटवायची. आणि सगळे पेपर जाळायचे.

अगदी जुन्या आठवणी जागवल्या आणि जळक्या ढेकणांचा वास आला. ;))

jaypal's picture

6 May 2013 - 7:18 pm | jaypal

>>>येण्याच्या आदल्या रात्री ब्राऊला मिठी मारुन रडलो. पण आता पूर्वीसारखं घुसमटवणारं जोरदार रडू येत नाही.. म्हणून वाचलो.
नि:शब्द झालोराव. ___/\___

मस्त! पुन्हा लिहिते झाल्याचं बघून आनंद झाला.

निमिष ध.'s picture

6 May 2013 - 7:23 pm | निमिष ध.

वा मस्त सुरुवात आहे. चालू द्या. आम्ही ही होतो एके काळी फक्त पेठ नाही तर कोथरूडला!! तुमचे बारीक निरिक्ष्ण आवडले.

आजानुकर्ण's picture

6 May 2013 - 7:28 pm | आजानुकर्ण

मस्त लेख... ढेकणांच्या आठवणीने हळवा झालो. अनेक महिने तो प्राणी दिसलेला नाही. :(

आदूबाळ's picture

6 May 2013 - 7:44 pm | आदूबाळ

गवि, पुभाप्र!

कोणी आधीच्या भागांच्या लिंका देईल काय?

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 7:45 pm | ढालगज भवानी
अभ्या..'s picture

6 May 2013 - 7:45 pm | अभ्या..

मस्त लिहिलेय गवि. येऊद्या पुढचे भाग लवकर.
बाकी मला घरमालक्/मालकीण यांचा कधी त्रास झाला नाही. फारच प्रेमाने वागायचे. अगदी पुण्यात पण ;)
माझ्या पार्टनर्सनी मात्र परस्पर घर विकायचेच बाकी ठेवले होते. ;)

पैसा's picture

6 May 2013 - 8:01 pm | पैसा

आमच्या रत्नागिरीच्या शेजार्‍यांनी त्यांचा डबल बेडरूम फ्लॅट ६ मुलग्यांना रहायला दिला होता. मालक फक्त पैसे गोळा करायला यायचा. काही काळातच तिथे १२ मुलगे राहू लागले. रोज २/३ वेळा आंघोळ्या करून त्या पोरांनी सोसायटीच्या तोंडचे पाणी पळवले. टँकर मागवायची पाळी आली. आम्ही अधून मधून तिकडे जातो. एकदा ३ महिन्यांनी गेले तर दाराला टेकून चपलांचा स्टँड आणि त्याच्याबाहेर चपला आणि बुटांचा खच पडलेला. मी तिथेच आरडाओरडा केला आणि स्टँडसकट चपला जिन्यातून खाली फेकून दिल्या. कोणीही बाहेर आले नाही!

मग सोसायटीच्या सेक्रेटरीकडे रीतसर तक्रार केली. तेव्हा तिथे रात्री दारूच्या पार्ट्या चालतात क्वचित अनोळखी मुली दिसतात; आम्हाला इथे रहायलाही भीती वाटते असे काहीबाही इतर लोक सांगू लागले. मग सगळ्यांनी मिळून त्या फ्लॅटमालकाला त्या पोरांना काढून टाकायला लावले. नंतर सोसायटीत शांतता झाली!

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 7:47 pm | ढालगज भवानी

व्हरमाँट ची माझी घर मालकीण अतिशय सुंदर व अतिशय खड्डूस होती. सुंदर बायका/मुली खडूस असणे हा नियमच पाहीला आहे.
(मारला खडा मोहोळाला अभी आन दो!!);)

कपिलमुनी's picture

10 May 2013 - 1:26 am | कपिलमुनी

मालकिणीचा फोटू आहे का ?

अभ्या..'s picture

6 May 2013 - 7:52 pm | अभ्या..

आधी व्यत्यास सिध्द करावा लागेल ;)

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 7:54 pm | ढालगज भवानी

हाहाहा "अभी" म्हणजे फक्त तूच का रे? रच्याकने - व्यत्यास ला इंग्रजी शब्द काय? :(
कटते आता - प्रत्यक्ष संपादकांच्या धाग्यावर अवांतर बरं नाही दिसत ;)

बॅटमॅन's picture

6 May 2013 - 8:40 pm | बॅटमॅन

व्यत्यास- कॉन्व्हर्स.

सुहास झेले's picture

6 May 2013 - 8:13 pm | सुहास झेले

वाह... मस्त सुरुवात... सगळं एकदम डोळ्यासमोर घडतंय असे वाटले.... तुमची ती खासियतच आहे म्हणा :)

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत :) :)

ढेकुण नव्ह्ते पण चिक्कार झुरळं होती, इतकी कि कधी कधी भातात्/आमटीत पण यायची..

राही's picture

6 May 2013 - 8:46 pm | राही

गविंचा लेख, आणि आवडला नाही असे शक्यच नाही. ब्राउ एका वाक्यात चटका लावतो.
बाकी हा आठवडा मूषक-मत्कुण-निर्दालन सप्ताह दिसतोय. तिकडे विक्रांतवरचे 'जंगी' किंवा 'घमासान' युद्ध आणि इथे चकमकी आणि दग्धभू धोरण.
एकेकाळी मुंबईच्या लोकलमध्ये लाकडी बाके असत आनि त्यात भरमसाट ढेकूण होत त्याची आठवण झाली. अलीकडे मात्र ही जमात अस्तंगत होऊ लागली आहे असे दिसते.
घरात ढेकूण,झुरळे, उवा अतोनात झाल्या तर ते अमंगळाचे लक्षण असते अशी समजूत ऐकली आहे.

सहमत

रेवती's picture

7 May 2013 - 1:21 am | रेवती

वा! छानच जमलीये वातावरणनिर्मिती.
पुढील लेखनाची वाट पहावी लागणार की काय?

प्यारे१'s picture

29 Oct 2013 - 1:53 pm | प्यारे१

+१

अजूनही पुढील लेखनाची वाट पहावी लागणार की काय?

केळकरच्या प्रतिक्षेत सेन्च्युरी झाली. :(

स्पंदना's picture

7 May 2013 - 8:20 am | स्पंदना

वाचतीय हो!
उगा सांगीतलेले बरे.

अलबेला सजन's picture

7 May 2013 - 9:21 am | अलबेला सजन

वॉव गवि यान्चि नविन कथा... येउदे... येउदे...

(अनुस्वार कसा देतात कोणी सान्गेल का?? प्लीज...)

मी_आहे_ना's picture

7 May 2013 - 9:28 am | मी_आहे_ना

ज्या अक्षराला अनुस्वार हवा त्याच्या नंतर शिफ्ट+एम

अलबेला सजन's picture

7 May 2013 - 9:35 am | अलबेला सजन

थँक यू :-)

पिलीयन रायडर's picture

7 May 2013 - 9:23 am | पिलीयन रायडर

पहिलं तर..
मला खूऊऊऊऊऊऊप बरं वाटलं तुमचं नाव नवीन लेखना मध्ये पाहुन..
त्यात परत केळकरची स्टोरी.. म्हणजे सोनेपे सुहागा...!!

धन्यवाद गवि.. "गवि" असल्याबद्दल...!!

वसईचे किल्लेदार's picture

7 May 2013 - 10:25 am | वसईचे किल्लेदार

ब्राउ कोण ते ठाऊक नाहि (वाचन नाहि तेव्हढे), पण आपण जे जे म्हणुन लिहिता ते वाचुन आम्हि फक्त आणि फक्त "पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत" असतो.

ऋषिकेश's picture

7 May 2013 - 1:01 pm | ऋषिकेश

काहितरी नव्याची अपेक्षा घेऊन आलो होतो.. पहिला भाग छान आहे, पण तितके वेगळेपण नाही. :(

गवि म्हटल्यावर जी अपेक्षा मनात येते ती पुढिल काही भागांत पूर्ण होईल याची खात्री आहेच म्हणा!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 May 2013 - 2:39 pm | निनाद मुक्काम प...

खोलीत ढेकणांसाठी व्यवस्थित फवारा मारला आणि जरा उदबत्ती लावली तर खोली तशी ठीक होईल असं वाटायला लागलं.

हे वाचून जीवात जीव आला.
आता थोड्याच दिवसात केळकर ला वाड्याचा मुक्काम मानवणार असा माझा होरा आहे,
आपल्याला आयुष्यात कितीतरी वेळा एखादी गोष्ट , ठिकाण , स्थळ प्रथमदर्शनी अजिबात आवडत नाही , आपण नाक मुरडत लगेच तशी नापसंती व्यक्त करतो.
मग हळूहळू लोणच्यासारखे त्याठिकाणी मुरत जातो.
गावातून चाळीत लग्न करून येणाऱ्या चाळकरी महिला विशेषतः माझ्या आजीच्या पिढीतील बायकांचे असेच चाळी विषयी , चाळ संस्कृतीविषयी मत असायचे.
मग त्या हळूहळू बटाट्याच्या चाळीतील पात्र बनून जायच्या ह्याचा त्यानंच पत्ता लागत नसे.

गविंचे वाचन इतक्या दिवसांनी वाचायला मिळत आहे हीच खरे आनंदाची बाब आहे.
आता नियमितपणे ही मालिका पूर्ण व्हावी असे मनापासून वाटते.
....

दिपक.कुवेत's picture

7 May 2013 - 3:12 pm | दिपक.कुवेत

पुढिल भाग पटापट टाका....जास्त पॉज घेउ नका हि विनंती

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 May 2013 - 4:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

केवळ सुंदर लिखाण.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

धमाल मुलगा's picture

7 May 2013 - 5:41 pm | धमाल मुलगा

केळ्या इज ब्याक! आता मजा येणार :)

आता लवकरच रुमवर रुळला की केळ्याच्या आयुक्षातली पैली 'म्हातार्‍या साधूसोबतची बैठक' येईल अशी आशा आहे. (आशा म्हणजे काय राव, रुमवरच्या ग्यांगचा तो एक धर्मच नै का? :) )

गविभाय, आने दो लवकर लवकर पुढचे भाग!

- सोनकेळ्या

बिपिन कार्यकर्ते's picture

9 May 2013 - 6:30 am | बिपिन कार्यकर्ते

वाचतोय... आज परत वाचले.... या निमित्ताने ब्राऊ वाचायचं राहिलंय याची आठवण झाली! वाचतोच.

अर्धवटराव's picture

10 May 2013 - 2:50 am | अर्धवटराव

दिवाळी अंकाच्या संपादकीयनंतर गवि गायबच झाला होता. थोडाफार प्रतिसादांच्या कवडश्यांतुन दिसायचा. आता दरवेळी मिपा उघडताना वाड्यात काय नविन झालय याची उत्सुकता लागुन राहिल.

अर्धवटराव

प्रसाद गोडबोले's picture

12 May 2013 - 4:37 pm | प्रसाद गोडबोले

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

मोदक's picture

20 Jun 2013 - 1:35 am | मोदक

+१

पु भा प्र.