✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुप्रभात -

व — विदेश, Sat, 04/20/2013 - 07:38
वेळ झाली हो चहाची सूर्य सांगे तो पहा कोंबडाही साद घाली स्मरण द्याया तो पहा पाखरे घेण्या भरारी आळसाला झटकती छान वाटे गार वारा झोंबणारा तो पहा वर्दळीला जाग आली चालली रस्त्यावरी श्वान भुंके आणि सांगे मीहि जागा तो पहा दूध पिशव्या लागल्या की लोंबण्या दारावरी स्वच्छता मोहीमवाला शीळ घाली तो पहा छान सजली आज दारी नक्षिची रंगावली पाहुणाही थबकला का पाहण्याला तो पहा .

प्रतिक्रिया द्या
1899 वाचन

💬 प्रतिसाद (1)

छान कविता आहे आवडली, म्हणुनच

Bhagwanta Wayal
Sun, 04/21/2013 - 09:02 नवीन
छान कविता आहे आवडली, म्हणुनच प्रतिसाद दिला तो पहा
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा