ऑफिस आणि फॉर्मल कपडे
In reply to आयला, तरी तुमची परिस्थिती by गणामास्तर
In reply to आयला, तरी तुमची परिस्थिती by गणामास्तर
In reply to आयला, तरी तुमची परिस्थिती by गणामास्तर
एरवी अमुकच प्रकारचा पोशाख हवा अश्या अट्टाहासाशी मीदेखील असहमत आहे. परंतु हपिसात शिस्त असावी याचा तो एक भाग आहे. सैन्यदलांमध्ये प्रत्येक प्रसंगासाठी आणी कार्यासाठी पोशाख ठरलेला असतो. तो या शिस्तीचाच एक भाग आहे. एक सामान्य नागरिक म्हणुन एवढ्या कडक शिस्तीचा पोशाख कर्मचार्यांना आवश्यक नाही. पण अगदीचे सूट दिली की पोरी नितकोर चड्ड्या आणि पोरे पार्श्वभागावरुन खाली घसरणार्या जीन्स किंवा केशरी पोपटी रंगाच्या बर्म्युडा घालुन हापिसात येतात. त्यामुळे सुवर्णमध्य म्हणुन फॉर्मल ड्रेस नावाचा पर्याय असण्यास काही हरकत नसावी.हे सगळ्यात योग्य वाटले. मूळ अडचण ही आहे की तारतम्य ठेवले जात नाही. कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नको हे म्हणण्याला काही अर्थ नाही.. कारण अगदी ताळतंत्र सोडला जातो. घरात रात्री घालण्याच्या बर्म्युडा किंवा तत्सम शॉर्ट्स घालून मुलं आणि टँक टॉप्स, स्पॅगेटी, थोडे खांदे झाकणारे ट्युब्स घालून मुली आंतरराष्ट्रीय कचेरीत कामावर आल्याचं पाहिलं आहे आणि मग एच आर ला कॅज्युअल मध्ये काय चालणार नाही याची यादी बनवावी लागली होती. इन्फोसिस मध्ये कित्येक वर्षे सोमवार आणि मंगळवार कंठलंगोट सक्तीचा आहे. पण उन्हाळ्याचे तीन महिने त्यात सूट असते (१५ मार्च ते १५ जून). काही वेळा उन्हाळा रेंगाळला तर ही सूटही वाढवून देण्यात आली होती. अर्थात यातही चेन्नई सारख्या ठिकाणी इतर महिन्यातही हा कंठलंगोट घालून शहराबाहेर असलेल्या कचेरीत तास दीड तास प्रवास करून जाणं हा केवळ छळ आहे. या फॉर्मल्स चे मूळ स्थान ब्रिटनमध्येही कारण नसताना कोणी सगळा जामानिमा करून येत नाहीत. संचालक दर्जाचे क्लायंट्स त्यांच्या हापिसात लक्ख पांढरा शर्ट आणि डार्क रंगाची पँट घालून येत होते. तसे कारण असले की जय्यत तयारी पण उगाच बळंच रोज टाय सूट नाही. आणि आमच्याकडचे परंपरावादी लोक हे न समजून त्याच क्लायंटस च्या हापिसात रोज पूर्ण सूट आणि रोज तोच सूट आणि तोच टाय मूर्खासारखा घालत होते. नेहमी व्यावसायिक कार्यशाळेच्या वेळी पूर्ण फॉर्मल्स असायचे. एकदा कार्यशाळा फ्रांकफुर्टात ऐन उन्हाळ्यात होती तर क्लायंटने स्वतःच जाहीर केलं की फॉर्मल नाही जे समंजसपणाचं लक्षण होतं. पण सवलत मिळाल्यावर आग्नेय आशियाई भगिनी जे काही घालुन आल्या ते पाहून भल्याभल्यांचे डोळे फिरले. टिशर्ट ला कॉलर नसल्याने काय फरक पडतो. खरंतर काही नाही. काही अतिमूर्ख किंवा अतिशहाणे सवलत दिली की वाट्टेल ते घालतात आणि अत्यंत सैलपणे वागतात. ते होऊ नये म्हणून आणि सर्वांना सारखे नियम असावेत म्हणून नियम करावे लागतात. त्याला काही तरी सीमा ठरवावी लागते. ती रेषा मनुष्यबळ विभागातले लोक आणि एकूण संघटन काय पद्धतीने आणि किती समंजस पद्धतीने काम करते यावर ठरते. अर्थात स्त्रियांना भारतात तरी साडी, पंजाबी ड्रेस, पाश्चात्य पद्धतीचा पोशाख (ट्राउसर, शर्ट्स, ब्लाउझेस, सूट वगैरे), किंवा इतर कॅज्युअल न वाटणारे अनेक प्रकार वापरता येतात फॉर्मल म्हणून. आणि साडीमध्ये एक भारदस्त लूक येतो. म्हणून साडीच नेसली पाहिजे असं नाही. बरेचदा स्वतःला कंठलंगोट नाही म्हणून दंड होत असताना काही तरी वेगळा पोषाख करूनही पळवाटा काढणार्या स्त्री सहकर्मचार्यांकडे पाहून पुरुषांचा संताप होतो. यात पुरुषांना सगळीकडे सवलत, वरचष्मा वगैरे काही नाही.
- पावसाळ्याच्या काळात कपडे न वाळल्याचे कारण देऊन जीन्स घातली म्हणून
- सॉक्स वाळले नाहीत सो फ्लोटर्स घातले म्हणून
In reply to तारतम्य by मैत्र
In reply to तारतम्य by मैत्र
टिशर्ट ला कॉलर नसल्याने काय फरक पडतो. खरंतर काही नाही. काही अतिमूर्ख किंवा अतिशहाणे सवलत दिली की वाट्टेल ते घालतात आणि अत्यंत सैलपणे वागतात.पण हे सगळे नियम स्त्री कर्मचारी ह्यांना देखील लागु होतात की नाही कि फक्त पुरुष कर्मचार्यांनीच शिस्तीचे पालन करावे. आमच्या कार्यालयात तर मुली शुक्रवारी असे काही कपडे घालुन येतात की "आमच्या टिशर्ट ला कॉलरचा चिंधीएवढा कपडा नसल्याने काय फरक पडतो" असा प्रश्न नेहमी डोक्यात येत राहतो. असो.
शिस्त नसताना लोक काय वाट्टेल ते घालून किंवा किती अजागळपणे येतात हे प्रत्यक्ष पाहिलं आहे त्यामुळे फॉर्मल अगदी नकोच असं नक्कीच म्हणणार नाही.+११११११ पण नियम सगळ्यांना समसमान असावे हाच फक्त आग्रह. :)
In reply to तारतम्य by मैत्र
In reply to माझे निरिक्षण by श्रीरंग_जोशी
पण भारतात शुक्रवारी काही स्त्री कर्मचार्यांचा पोशाख पाहून जसे संकोचल्याची भावना होते तशी भावना अमेरिकेत काम करताना कधिच झाली नाही. हे निरिक्षण अमेरिकेत येण्यापूर्वी चित्रपट पाहून बनलेल्या समजूतीला छेद देणारे होते.तुम्ही आणि मी एकाच अमेरिकेत गेलो होतो ना !!!!!
In reply to पण भारतात शुक्रवारी काही by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to आम्ही या बाबतीत सुखी आहोत. by ज्ञानोबाचे पैजार
In reply to संध्याकाळ पर्यंत तो त्यांचे by रेवती
In reply to व्यक्तिमत्व आणि पोशाख by रमेश आठवले
In reply to ऑफिसमध्ये सेल्फ एस्टीम व by अन्या दातार
In reply to मनोबा by प्रकाश घाटपांडे
In reply to पकाकाका, by प्यारे१
In reply to नाय नाय by प्रकाश घाटपांडे
In reply to मनोबा by प्रकाश घाटपांडे
In reply to थट्टा/चेष्टा/मिश्किल भाव by मन१
In reply to यात मनोबांनी मला प्रत्यक्षात by प्रकाश घाटपांडे
In reply to एखाद्या कंपनीत कोणत्या by अप्पा जोगळेकर
ईयर प्लग असे वाचावे..