॥ अज्ञान ॥
तिर्थयात्रा सर्व करुन आली ।
परी देवाची भेट नाही झाली ।
वेळ आणि अर्थिक वाया गेली ।
व्यर्थ तुझी ही काया झिजवली ।
देव नाही हो कुठे तिर्थस्थानी ।
जेथे जावे तेथे धोंडा-पाणी ।
धंदा मांडला तेथे पुजार्यांनी ।
पावतीविना सोडिना आत कोणी ।
देवा नाही हो गिरी कपारीत ।
तो आहे आपल्याच ह्रुदयात ।
शोधा त्याला आपुल्याच घरात ।
आईवडिलांच्या शुध्द स्वरुपात ।
आला आजार भगताकडे गेला ।
लिंबू देऊन चमत्कार केला ।
राख ताबीत घेऊन घरी आला ।
काय म्हणावे ह्या अज्ञानाला ।
अस्वलाच्या एका केसावरी ।
म्हणे सामर्थ्य आहे तेथे भारी ।
ते अस्वल असते त्याच्या करी ।
मग तो का हिंडतो दारोदारी ।
कोणी काढती फुले हातातुन ।
कोणी काढती साखर मातीतुन ।
लोक भूलती पाहुन चमत्कार ।
तेथेच करिती साष्टांग नमस्कार ।
जर का फुले निघती हातातुन ।
बागा कशाला फुलविल्या शेतातुन ।
मातीतुन जर का निघती साखर ।
पर्वत रांगा ना दिसती भूमीवर ।
कोण काढील अज्ञान मुळातुन ।
अंधश्रध्देच्या मल्लीन गाळातुन ।
सद्गुरु काढतील वर तळातुन ।
निरुपणाच्या शुध्द जळातुन ।
निरुपणवजा कविता आवडली.
>>>निरुपणाच्या शुध्द जळातुन ।
बदल सुचविल्याबद्दल आभार