शेतकर्याची आत्मह्त्या (फाशी)
आला सोसाट्याचा वारा
गेले छ्प्पर ऊडुन।
मातीच्या चार भिंती
गेल्या पाण्यात बुडून॥
गोठ्यातील जनावरे
गेली जलप्रवासाला।
शेत जमिनही त्याची
तिचा पिकपात झाला॥
आली सरकारी फौज
गेली पहाणी करुन।
झालेले नुकसान
म्हणे देऊया भरुन॥
पूर्ण झाले वर्ष एक
नाही मदत पोह्चली।
सावकाराच्या कर्जापाई
त्याची कंबर खचली॥
झाला कर्जाचा डोंगर
चिंता मनाला वाटली।
खचले आत्मबळ त्याचे
"फाशी" झाडाला घेतली॥
गोठ्यातील जनावरे
वाचुन मन सुन्न झाले... .....
कवितेतील आशय उत्तमपणे कवितेत
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार
ह्म्म..
(No subject)
सुन्न