काल रात्रीच्या पावसाने
खूपच गोंधळ केला
.
तुझ्या घरातील काही
गळक्या कौलांना वाहून
घेऊन आला
वाहत वाहत त्या कौलांनी
माझ्या घराशी आधार घेतला
त्यांनी माझ्या मनाचा
नकळत ठाव घेतला
.
.
पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही?
.
काल रात्रीच्या पावसाने
खूपच गोंधळ केला
.
सारे अंगण मनासारखेच
भिजवून गेला
भिजल्या मनाने भिजल्या अंगणात
जीव कासावीस झाला
अंगणातून कुंपणाजवळ
धावाधाव करत राहिला
.
.
घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही?
.
काल रात्रीच्या पावसाने
खूपच गोंधळ केला
.
येतांना बरोबर वाऱ्याला घेऊन आला
विझणाऱ्या निखाऱ्यांना
धग देऊन गेला
अन् वरची राख तेवढी उडवून गेला
.
.
वारा तरी कसा ना?
राख उडवतो आणि निखारे भडकावतो
.
खरचं
काल रात्रीच्या पावसाने
खूपच गोंधळ केला
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२८/०३/२०१३)
...हललं काहितरी...
आधी दूष्काळ...आता पाऊस :).....छान आहे :)
आवडली. :)
'काल रात्रीच्या' ऐवजी 'काल रात्री' असा किंचित बदल करुन कविता वाचली आणि मग अधिक आवडली.
सहमत.
ह्या बदलाने कविता खूपच प्रभावी झालीय.
मिका, तोडलंस मित्रा... कमाल म्हणजे प्रचंड कमाल आवडली कविता...
येतांना बरोबर वाऱ्याला घेऊन आला विझणाऱ्या निखाऱ्यांना धग देऊन गेला अन् वरची राख तेवढी उडवून गेला . . वारा तरी कसा ना? राख उडवतो आणि निखारे भडकावतोव्वाह वा !
नेहमीप्रमाणेच सुंदर काव्य
पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही?
>>> छान !!
नो मिका दादा .... नाहि ........ खुपच वरवर वाटलं ... कुठल्याच ओळीत काहिच नसल्यासारखं
सॉरी ....
विझणाऱ्या निखाऱ्यांना धग देऊन गेलाछान कविता. :)
मस्त!! खूप महिने नव्हतो मिपा वर...
पण आता मिका च्या कविता वाचण हा एक छंद जडलाय मला......
मस्त !!
सारे अंगण मनासारखेच भिजवून गेला भिजल्या मनाने भिजल्या अंगणात जीव कासावीस झाला अंगणातून कुंपणाजवळ धावाधाव करत राहिला . . घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही?आणि फक्त या ओळीच अर्थगर्भ. कदाचित बाकिची कविता मला कळली नसेल. .
मिकामूड = मिकाकाव्य