✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अर्धा पूल…..

फ — फिझा, Tue, 03/26/2013 - 02:59
आयुष्यात सगळं मिळवूनही प्रत्येक जण संपूर्ण समाधानी नसतोच ....शेवटी शेवटी मोक्ष मिळावा असे वाटते ........तो मिळाला तरी .....समाधान कुठे असते ............. अर्धा पूल….. धुसर होत जाणारा एक मोठा पूल … अत: पासून इति पर्यंत .... या जगापासून त्या जगाला जोडणारा असेल कदाचित ..... इकडून अर्धाच दिसतो ....पुढे फक्त धुके .... ...... ..... गाडी, घोडे काहीच नाही ... पायीच जावे लागते सगळ्यांना ..... रस्ता तसा मोठा रुंद …गर्दीत एकट्याचा … प्रत्येकाची वाट मात्र अरुंदच ...तीही ठरलेली ... इकडून अर्धीच दिसते ....पुढे फक्त धुके .... काहीतरी निसटल्याची भीती जाणाऱ्यांची ... येणाऱ्यांच्या फक्त हसऱ्या सावल्या ... गजबजलेला तो पक्का पूल ....पण आधारहीन सर्वच ... अर्धा चालून झाला तरी ....पुढे फक्त धुके ..... मागे वळून पाहिले तर सगळंच हरवलेलं ..... एरवी फक्त प्रकाशात दिसणारं जग ...... आता अंधारातही उजळलेलं …… पुलावर मात्र पांढरा अंधार....काहीच दिसत नाही ... संपत आला तरी ...पुढे फक्त धुके ..... एक लख्ख सोनेरी कमान ..... आता हर्षून टाकणारी ढगांवरची पावले ...न कसल्या वाटा न कसली कुंपणे ... न दिशाहीन आकाश न संपलेली जमीन ... न मरणाची भिती न जगण्याची चिंता ... आपण न कोणाचे.. न कुणी आपले .... न सुखाचे रडू न दुःखातले हसू .... फक्त मी ....एक असमाधानी ....असा प्रत्येकजण ..... आणि ... आता इकडूनही अर्धाच दिसणारा ... हा एक पूल .....पुढे फक्त धुके ..... -----फिझा !!

प्रतिक्रिया द्या
1027 वाचन

💬 प्रतिसाद (3)

__/\__

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 03/26/2013 - 08:29 नवीन
आपण महान आहात!!
पुलावर मात्र पांढरा अंधार....काहीच दिसत नाही ... संपत आला तरी ...पुढे फक्त धुके .....
पांढर अंधार!! व्वाह क्या बात!!
  • Log in or register to post comments

कवितेशी पूर्ण सहमत

भावना कल्लोळ
Tue, 03/26/2013 - 16:22 नवीन
जीवनाचे एक कटु सत्य ......
  • Log in or register to post comments

सुरेख कविता.

गंगाधर मुटे
Sun, 03/31/2013 - 15:46 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा